नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
रत्नाकर मतकरींनी बालनाटय बागेत ट्रकवर, चहाच्या खोक्यांसोबत सादर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘आविष्कार’च्या चंद्रशाला या संस्थेच्या सुलभा देशपांडे यांनी ‘दुर्गा झाली गौरी (१९८२)’सारख्या सुंदर नृत्यनाटिकेची निर्मिती करून बालरंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, मीना नाईक यांच्या ‘कळसुत्री’ या संस्थेनेसुद्धा मुलांसाठी जागृती कार्यक्रम निर्मिती करून वेगळी वाट जोपासली.
March 17, 2022
आपण आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात आहोत, मात्र सहवासात नाही.कधी मनसोक्त बोलणं नाही, चर्चा नाही. आपण सारेच ‘स्वमग्न’ झालो आहोत. फक्त स्वतःचाच विचार!
February 11, 2022
ही गझल ज़फ़र यांची आहे, असें म्हटलें जातें . पण हल्ली , ही वास्तवात मुश्तर खैराबादी यांची आहे, असें मानतात. ) .
[ प-ए-फ़ातहा : फ़ातहा ‘पढण्या’साठी (वाचण्यासाठी / म्हणण्यासाठी )फातहा : मृतासाठी / मृतात्म्यासाठी करण्यांत येणारी प्रार्थना
August 5, 2017
नोंदणी पद्धतीने विवाह करून दोघे घरी आले. त्याचा ओसंडून वाहणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काय करू आणि काय नको, तिच्याशी काय बोलू आणि काय नको असं त्याला झालं होतं.
आईने हातात आणून दिलेल्या कॉफीचा घोट घेत तो तिला म्हणाला-
"आज मी फार फार खूश आहे...आनंदात आहे."
"का रे?"
"मला तुझ्यासारखी बायको मिळाली."
"म्हणजे कशी?"
"शोधून सापडणार नाही अशी."
.
.
.
"का गं? काही बोलत नाहीस?"
किंचित हसून ती म्हणाली -
"आठवतं का तुला?"
"काय?"
"पाच वर्षांपूर्वी तू नकार दिला होतास मला!"
-- संजीव गोखले.
११/०६/२०२२.
July 12, 2022
दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?”
“नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने गोरेसाहेब येतील त्यांना भेटा. ते आले म्हणजे मी सांगतो तुम्हाला.” असे म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि मी आत जाऊ बसलो.
June 24, 2022
फुंकर ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मन मोठे तर असावेच लागते. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. पण नेमके हेच मिळत नाही. मान्य आहे की आत्ताच्या पिढीला अनेक ताणतणाव आहेत. नोकरी. शिक्षण. दवाखाने. वाढवलेला व्याप त्यात गुरफटून गेलेले आहेत. शिवाय वैयक्तिक आरोग्याचे प्रश्नही आहेत.
December 10, 2021
दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला.
January 28, 2022
मराठी ग्रंथव्यवहारांसंबधीत सर्व घटकांची माहिती संबधीत सर्वांना व्हावी. वर्षभरात नवी पुस्तके कोणती निघाली? त्यांची अद्ययावत व सर्वंकष सूची सर्व ग्रंथखरेदीकर्त्यांना सहज उपलब्ध व्हावी. संपर्क : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, पाने : १२०, किंमत : २०० रु. भ्र. 9225210130
September 29, 2012
ओ’ हेन्रीच्या The Skylight Room’ या इंग्रजी कथेचे मुक्त रूपांतर
April 12, 2022
सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता.
March 24, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti