नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं हळूच पसरतात जमिनीवर . नकळत बागेतली , दारातली , कुंडीतील फुलं बघतात डोकावून.आज तोडण्यासाठी कुणाचा नंबर आहे ते ?
दिवस सरकत जातो.रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढते.. लालपरी मुक्कामाच्या गावावरून निघते. प्रवाशांची धांदल उडते.भाजीवाले,दुधवाले , खारी, पाववाले ओरडून विकतात.आपला माल... शिक्षक करतात प्रवास गाडीने . जेवणाचे डब्बे असतात सोबतीला.मुलंही पळतात शाळेच्या ओढीने . दप्तरात आपले भविष्य घेऊन . वडाच्या, पिंपळाच्या झाडावर भरते पाखरांची शाळा. गाव, नदी, डोंगर, रस्ता , चौक होतात जागे सेवेसाठी. मुलं शाळेत गोळा झाली की गजबज होतो सुरू. परिपाठाने घुमतो परिसर. सडा रांगोळीने सजते घर. शेतातील कामाची असते लगबग. खुरपणी , कोळपणी, नांगरणी, पाळी, पेरणी, राखणी, गुरांची सोडबांध , वेचणी , तोडणी यांचा असतो समावेश . शाळेत पहिला तास सुरू होतो. प्रसन्न मुद्रेने असतात सर्वचजण. हजेरी होते. वेळापत्रक असते.तासिकेनुसार शिक्षक बदलतात. भाषा, गणित, विज्ञान, कला, इतिहास , भूगोल हे असतात विषय . जे शिकवतात. जे घडवतात उद्याचा भारत. प्राथमिक शाळेतच घडत असते भविष्य .. शाळेत नसतो निर्जिव दगडांच्या सांगाडा .भींत बोलत असते मुलांशी . संवाद होतात फळ्यावरच्या अक्षरांशी. संवाद होतात रंगवलेल्या भिंतीशी.निसर्गातील प्रत्येक घटकांशी.. सकाळ सरून जाते पटकन.दुपारची चाहूल लागते. अंगाला ऊन स्पर्श करून जाते.जाणिव करून देते.पोटात ओरडतात कावळे. न्याहारीचा वखत टळून गेलेला. मुलं बघतात . किचनशेडकडे . भात , वरण , खिचडी की अजुन काही. हात धुवून तयार असतात.गाडीला अडकवलेला डबा पटकन येतो हातात. मनसोक्त होते पंगत . रानात सुटतात मजूर . दुपारच्या भाकरीसाठी. लसणाची चटणी आणि पाट्यावर रगडलेला ठेचा असतो . तोंडी लावण्यापुरता. कामाचा पडतो विसर . कारण कोणते तरी एक गाणं असत सोबतीला.असेच दिवस पडतात मागे एकेक ....प्रत्येक दिवसाची सकाळ असते नविन काही देणारी .. शिकवणारी ...
विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
मो.9421442995
vitthalj5@gmail.com
May 17, 2017
कर्माशी निष्ठा ठेऊन निर्मोही आचरण करत निवृत्त होणाऱ्या असंख्य पोलिस कर्मचाऱ्यांचे परब जमादार हे एक प्रातिनिधिक उदाहरण. खिसा कसा कापला आहे हे पाहून कोणत्या ‘लाईन’ वरचा आरोपी आहे हे ओळखणारे , कडी कशी तोडली आहे हे पाहून आणि चोराने काय नेलं या पेक्षा काय सोडून गेला हे पाहून आरोपींचा नेमका अंदाज बांधणारे आणि काही तासात केस उघडकीला आणणारे unsung heroes या DCB CID ने पाहिले आहेत.
August 26, 2022
बाबांची वर्धा पोलीस स्टेशन वरून मनमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्यावर आम्ही कल्याणजवळच्या आमच्या गावातून मनमाडला राहायला गेलो. बाबा पोलीस अधिकारी असूनसुद्धा मला पहिलीला गावातल्याच मराठी आणि त्यातल्या त्यात झेड पी च्या शाळेत घातले होते.
June 10, 2021
आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड !
सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला !
हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं .. सगळीकडे धूसर धूसर ! . आणि त्याचा एका लयीतला आवाज ! काहीच करु नये … त्याच्या समोर शांत बसावं .. त्याचं म्हणणं ऐकावं .. मग जणू त्यालाही बरं वाटतं आणि तो द्रुत लयीत बरसायला लागतो …
अशा पावसाळी हवेत कवितेची सोबत मला फार हवीहवीशी वाटते … काचांवर ओघळणारे थेंब पाहिले अन् शांताबाईच्या ओळी आठवल्या ..
“आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे “
October 6, 2019
सत्तरीच्या दशकात वयात आलेली तरुण मुलं आणि त्यांच्या जगण्याचं भान या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र ते सत्तरीच्या दशकापुरते मर्यादित नाही. चक्रधर, या कादंबरीचा नायक, अशा पिढीचा प्रतिनिधी आहे. तो समूहात असूनही एकाकी आहे. चक्रधरचा आणि त्याच्या पिढीचा हा प्रवास अरविंद रे यांनी मोठ्या ताकदीने चित्रित केला आहे.
February 18, 2023
जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
January 16, 2014

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती ?
May 1, 2018
शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच.
June 29, 2021
विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा.
April 2, 2022
राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.
ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.
October 5, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti