नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
श्रीकांत मोघे यांचा १९६१ साली प्रदर्शित झालेला ‘प्रपंच’ हा चित्रपट मी गणपतीच्या दिवसांत खजिना विहीर चौकात पाहिलेला आहे. मधुकर पाठक यांचं दिग्दर्शन, गदिमांनी लिहिलेली गीतं, सुधीर फडके यांचं अप्रतिम संगीत असलेला चित्रपट मी कधीही विसरू शकत नाही.
April 3, 2022
आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते .
November 11, 2023
तिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या.
March 30, 2022
तुमचे नाम संकीर्तन ।
हेचि माझे संध्या-स्नान ।।
तुमच्या पायाचे वंदन ।
हेचि माझे अनुष्ठान ।।
तुमच्या पायाचा साक्षेप ।
हा चि माझा काळ क्षेम ।।
तुमच्या प्रेमे आली निद्रा ।
हीच माझी ध्यान-मुद्रा ।।
एका जनार्दनी सार ।
ब्रह्म रुप हा संसार ।।
June 11, 2026
21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे.
August 8, 2022
आपण आपल्या अंतिम ध्येयावर प्रेम न करता साधनांवरच प्रेम करीत बसतो आणि आपले आयुष्य उजाड करतो. आपले अंतिम ध्येय, अंतिम उद्दिष्ट्य निश्चित करणे आणि त्यासाठी झटत राहणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. साधनांवर वृथा प्रेम करून, साधनांची वृथा भक्ती करून, साधनांचे वृथा अभिमान बाळगून आपण आपल्या आयुष्यात हिंसेला जन्म दिला आहे. साधनांचा योग्य आदर राखून निगराणी करून साध्यावर लक्ष केंद्रित करणे हि खरी अहिंसा आहे.
September 10, 2022

एखाद्या संहितेचं भागधेय असतं. प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही. पण मी नाराज नाही. कारण माझी संहिता दमदार आहे. कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे. दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी मिळणार आहे आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत.
October 16, 2020
त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.
त्याला बघताच बायकोच्या चेहर्यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. असे हसता काय, बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्या सारखी. आता तुला मैत्रीण मिळाली, तुम्ही दोघी मिळून माझ्या डोक्यावर किती मिरे वाटणार या कल्पनेनेच मला हसू आले. बायको म्हणाली, तुमच्या जिभेला काही हाड... 'नाहीच आहे, हो न परी', म्हणत तो जोरात खळखळून हसला. त्याचा आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण.
तो बेंच वर वार्डच्या बाहेर बसला होता. एक वयस्क बाई त्याच्या शेजारी येऊन बसली. तिने त्याला विचारले, क्या हुआ 'काके'. 'लक्ष्मी आई है घर में', तो उतरला. ते ऐकून तिचा चेहरा काळवंडला, त्याच्या पाठीवर हात फिरवत सांत्वन करत म्हणाली, चिंता मत कर काके, अगली बार लड़का होगा. तिचे सांत्वन करणारे शब्द ऐकून त्याचे डोके सटकले 'मला मुलगी झाली, मी खुश आहे, हिला कशाचे दुःख'. चांगले सुनावले पाहिजे हिला. पण तो थबकला. दोन दिवस अगोदरच त्या बाईच्या मुलीला, मुलगी झाली होती. अद्याप हि सासरहून कुणी ही भेटायला आले नव्हते, तिचा नवरा सुद्धा.. ..
(काके = पोरा (मुलगा))
August 5, 2015
रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें.
July 30, 2019
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट ! म्हणजे बरोबर चाळीस वर्षापूर्वीची. २० फेब्रुवारी १९८५ या दिवसाची. माझ्यासाठी संस्मरणीय !!!
March 7, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti