(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्योत

    श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक…. याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते..

      May 13, 2021


  • बोरोली पिकली गांडोली शेकली

    एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.

      October 22, 2025


  • डायरी (कथा)

    कोकणातल्या रत्नगिरी जिल्ह्यतील या एका छोट्या खेडेगावातील या घरात राहायला येउन तिला आज दहा दिवस झाले होते.मधुराचा नवरा  शरद एका सरकारी बँकेत नोकरीला होता. काही दिवसापूर्वी त्याची बदली या गावात झाली होती. बँकेच्या एका खातेदाराच्या ओळखीने त्याला खूप कमी भाड्यात हे घर मिळाले होते. घर शहरापासून दूर व तसे एकाकी होते पण होते मोठे मजबूत अगदी चिरेबंदी वाड्यासारखे.

      December 14, 2019


  • एक परीस स्पर्श ( भाग – ३२ )

    खूप विचार केल्यानंतर विजयने पुन्हां पत्रकारितेत आणि साहित्य क्षेत्रात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. विजयने पूर्वी एका साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. बातमी मिळविण्यापासून बातमी कशी लिहायची हे ही तो तेथे शिकला होता. पण पत्रकारितेत तो फार रमला नव्हता कारण तेंव्हा पत्रकारिता हे काही त्याचे उत्पन्नाचे साधन होऊ शकले नाही.

      July 26, 2022


  • वश्याच ‘ क्युट ‘ लफड

    आता येथे वश्याचा अल्प परिचय करून देणे क्रमप्राप्त आहे. (जेसे जसे तुम्ही आमच्या सोबत रहाल तसे तसे त्याचा दीर्घ परिचय होईलच ! ) याचे नाव वसंत जोशी . आम्ही याला वश्याच म्हणतो. (आणि म्हणत राहणार . तो त्याच लायकीचा आहे ! ) तो भरमसाट किमतीचे कळकट कपडे घालतो. कारण तो स्वतःला आधुनिक (त्याच्या भाषेत मॉड !) समजतो. ठीगळाचे शर्ट , मुंडीछाट टी-शर्ट ,फाटक्या , विटक्या रंगाच्या जीनच्या पॅंटी , त्याच्या भाषेत ‘कूल ‘असतात ! आम्हाला, म्हणजे मला अन शाम्याला हा ‘कंट्री’समजतो . आमच्या वश्याचे (आता मित्रच कि, मग त्याला परका तरी कस म्हणायचं? ) दोन वीक पॉईंट आहेत . एक हा मोबाईल आणि ….. बाईल ! म्हणजे हा थोडासा त्या बाबतीत हा …. आहे . हा कुठेही, कोणाच्याही , अन कसाही तो प्रेमात पडू शकतो ! (आज पर्यंत तो खूपदा पडलाय ! काही वेळेला गुडघे ,कोपर सडकून निघालेत ! पण गडी ऐकत नाही !) कोणती हि ‘ती ‘ त्याला ‘क्युट’च दिसते ! याबाबतीत तो काळ ,वेळ , वय (त्याचे आणि तिचेही !), प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष कसाही प्रेमात पडू शकतो .

      July 23, 2018


  • रात्रीची तलावपाळी

    मी सूर्य आहे… इथे नसलो तरी कुठेतरी आहेच.

      September 10, 2021


  • आत्मस्वरांच्या हाका !

    आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो.

      April 11, 2022


  • गोमुचे-प्रेम-सेवा-शरण (गोमुच्या गोष्टी – भाग ४)

    परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते.

      February 4, 2026


  • मैत्र

    भक्ती बर्वे -इनामदार आणि जया भादुरी -बच्चन यांच्यात एरवी वरवरचे एकच साम्य वाटेल -दोघीही माहेर -सासरचे आडनांव लावतात. फारतर दोघीही उच्च प्रतीच्या अभिनेत्री ! पण त्या दोघींमधील गुह्य एका ह्रुदय प्रसंगाने अनुभवले.

      January 26, 2022


  • माझा चड्डीयार – भाग १

    आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते,  तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात.

      February 20, 2019