(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मन नावाचे भूत.. (माझी लंडनवारी – 28)

    मला प्रिया अजिबात वरती जाऊन द्यायला तयार नाही. तिच्या डोक्यात काही तरी हॉन्टेड गोष्ट आहे तिथे, नाही तर आपण न उघडता ती खिडकी उघडली गेली कशी? आणि माझ्या डोक्यात चोर तर नाही वरती?

  • राणीसाहेंबाचे गुपित

    यशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली.

  • एका कुटुंबाची गोष्ट – भाग ३ (आठवणींची मिसळ २८ ब)

    मला मात्र वंश वगैरेची चिंता आता एकविसाव्या शतकांत योग्य वाटत नाही. “मुलगी शिकली, प्रगती झाली.” हे वचन सर्व बहिणींनी सिध्द केले. तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या. त्यांनी नोकऱ्या केल्या. सगळे मुलगे नाही शिकले. मुलींनी दुसऱ्या घरांत जाऊन त्या कुटुंबांच्या आधार बनल्या. आणखी काय हवं ? दुसऱ्या भागापर्यंत करूण वाटणारी गोष्ट, ह्या मुलींच्या मुलांची व मुलींच्या उत्कर्षाची माहिती मिळाल्याने ती गोष्ट आता सुखान्त झालेली पाहून मला खूप आनंद झाला. आणि तो तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणजे दुणावेल असेही वाटले.

  • शालेय अभ्यासात नाटक (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ६)

    नाटक हा विषय २००८ पासून शालेय अभ्यासात आहे…हे अनेक पालकांना माहीत नव्हते.शाळांनी ही माहिती पालकांना कधीच दिली नाही.नैतिक भाषेत हे पातक आहे.असे पाप या पुढे घडू नये ही इच्छा.त्या साठी पालकांनी सतर्क राहून शाळेला प्रश्न विचारायला हवेत.नाटक शिकण्याचा मुलांचा हक्क त्यांना मिळवून द्यायला हवा.

  • यी तेजदेवता

    कुणी एके काळी आद्यदेव सृष्टी निर्माता बाईमी यांनी पशुपक्षी, जलचर, कीटक, फुले, वृक्ष अशी सारी सृष्टी निर्माण केली. परंतु ही सारीसृष्टी चित्रासारखी स्तब्ध होती. निर्जीव होती. या सृष्टीत चैतन्य नसल्यामुळे जमिनीतून रोपांना अंकूर फुटत नव्हते. तळ्यातील पाण्यावर बर्फाचे दाट थर असल्यामुळे जलचर बंदिवान झाले होते. अतिथंडीमुळे पक्षी गारठले.

  • माझी कथा – भाग ३

    पुढे मी त्या कारखान्यातील कामाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका एका यंत्रावर स्वार झालो. या दरम्यान मला वाचनाची गोडी लागली कारण जाधव आणि जावळे रोज कारखान्यात येताना वर्तमानपत्र आणत आणि मी ही त्यावेळी आमच्या बसमध्ये वर्तमान पत्र वाचणारा मी एकटाच होतो.

  • वेणीदान

    काळ बदलला तशी केस रचना पार बदलून गेली. काटाकाटी करत. अमूक कट तमूक कट अशी नांवे आहेत…. पण सर्वात मला ते शोल्डर कट आणि कपाळावरचे सारखे केस मागे करणे अजिबात आवडत नाही.

  • मुंबईतील बसचा प्रवास

    मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो...

    बसमध्ये सीटवर बसलेला बस आपल्या बापाची समजतो ...

    सारखेच पैसे देऊनही एक आरामात आणि

    दुसरा धक्के बुक्के किव्हा प्रसंगी शिव्याही खात असतो ...

    कंडक्टर सारखा आगे बढो म्हणत असतो

    शेवटी उतरणाराही दरवाज्यात पोहचत असतो...

    मुंबईतील बसचा प्रवासी बऱ्याचदा चुकून

    झालेल्या चुकीचाच दंड भरत असतो...

    त्या चुका करण्यालाही कधी - कधी

    त्याचा नाइलाज कारणीभूत असतो...

    बस मध्ये पुरुषाला स्त्रीचा धक्का

    लागला तर तो माफ असतो...

    पण पुरुषाचा चुकूनही स्त्रीला लागला

    तरी तो नालायक ठरतो...

    बसमध्ये राखीव जागा मिळविण्यासाठी

    जो तो धडपडत असतो ...

    त्या धडपडीचा त्रासही विनाकारण निमूट उभ्याने

    प्रवास करणाऱ्यांनाच सहन करावा लागतो...

    म्हणूनच म्हणतो मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो ...

    याच बसमध्ये कित्येकदा नवीन भांडणाचा ,

    भानगडीचा आणि प्रसंगी प्रेमप्रकरणाचा जन्म होतो ...

    माझ्या सारखा चुकून एकादा लेखकही या बस मुळेच घडतो ...

    जो या बसमध्येच कित्येक कावितांसह

    कथाही जन्माला घालतो ...

    - निलेश बामणे

     

  • माय रेट्रो… व्हॅलेन्टाईन

    ही कथा सुरू होत आहे १९७२-७३ च्या काळात… तो काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्नाचा. तो त्या काळचा सुपरस्टार आणि जोडीला चटपटीत गोल चेहऱ्याची मुमताज ही जबरदस्त हीट जोडी! ‘कटी पतंग,’ ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आनंद’, ‘अपना देश’, ‘दो रास्ते’ सारखे जबरदस्त हिट सिनेमे देणारा आमचा हिरो राजेश खन्ना. जणू आमचे दैवतच! अपऱ्या नाकाची, फुगीर गोबऱ्या गालांची मुमताज साथीला आल्यावर सिनेमात प्रेमसरिता खळाळून वाहू लागायची. मग आमचा अवतारही काही वेगळा नव्हता…

  • दाढावळ

    माझ्या मित्राच्या घराण्यात कोणालाच अक्कलदाढ आली नव्हती. बातमी घराबाहेर लीक झाली आणि गावभर पसरत पसरत गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमधे पोहोचली. घराण्याचं पितळ उघड पडून होणारी नाचक्की टाळण्यासाठी मित्राच्या वडिलांनी मला मध्यस्थीची गळ घातली आणि मी गिनीज बुक वाल्यांना बातमी प्रसिध्द करण्यापासून थोपवायच ठरवल.