नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
गेल्या तीन वर्षापासून माझा संपादकीय भूमिकेतून वाचकांशी आणि लेखकांशी थेट संपर्क येत आहे. मी वाचकांच्या रुची बद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो पण त्या माझ्या व्यक्तीगत अनूभवातून सांगत आहे हे येथे लक्षात घ्यावे.
‘प्रेम’ या विषयावरील साहित्य आणि त्या भोवती गुंफलेल्या साहित्य वाचण्यात मराठी वाचकांना रुची अधिक दिसते. त्यानंतर आरोग्याशी निगडीत साहित्य वाचण्यात वाचकांना रुची दिसते कारण आता आपल्या आरोग्या बाबतची जागरूकता लोकांच्या मनात वाढू लागली आहे. त्यानंतर चित्रपट, नाटक , क्रिकेट, आणि सध्याच्या दैनदिन मालिका यांच्या विषयी वाचण्यात वाचकांना रुची दिसते. त्यानंतर उरलेल्या वाचकांना राजकारण वगैरे विषयांवर वाचण्यात रुची दिसते. आर्थिक, सामाजिक वगैरे विषयांवरील साहित्य वाचण्यात रूची असणारा एक वेगळाच गट आहे.
संपादकीय भूमिकेतून मला आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्ह्णजे आज लोकांना भरमसाठ वाचायला नाही आवडत. लोकांची आज थोडक्यात बरच काही सांगणारे आणि शिकवून जाणारे साहित्य वाचण्यात अधिक रुची दिसते. वेळेचा अभाव हे एक कारण असेलही कदाचित त्या मागे. मराठी वाचकांना आजकाल शंभर लेखकांचे शंभर विषयांवरील शंभर लेख वाचायला आवडतात पण एकाच लेखकाचे एकाच विषयावरील शंभर पानांचे विचार वाचायला काही मोजक्याच वाचकांना आवडतात त्यामुळेच तर मराठी साहित्यात मराठी दिवाळी अंकाचे महत्व दिवसेन दिवस वाढत आहे.
लघूकथा लोकांना वाचायला आवडत नाहीत अशी ओरड होते पण तस नाही आज वाचकांची रुची डोळ्यासमोर ठेऊन कथा लिहल्या जात नाही हेच कारण असावं कदाचित. बोध देणारे साहित्य वाचकांना वाचायला आवडते पण ते एका मर्यादेपर्यत. त्या साहित्याकडे कोणीही वाचक मनोरंजन या दृष्टीने पाहत नाही. आजच्या वाचकांची मनोरंजन करणारे साहित्य वाचण्याकडे रुची अधिक दिसते. ती रुची लक्षात घेऊनच बोध दाखवणार्या साहित्याची निर्मिती भविष्यात करावी लागेल.
लहान मुलांची वाचनाची रुची लक्षात घेता लहान मुलांनीच् लिहले साहित्य येत्या काळात लहान मुलांना वाचायला आवडेल असं मला व्यक्तीशः वाटत.
वाचकांची जशी रुची असते तशी रुची काही बाबतीत काही संपादकांनाही असते. त्यांना वाचकांना बोध देणारे, त्यांच्या फायद्याचे, त्यांच्या हिताचे ,एकूणच समाजाच्या हिताचे आणि देशाच्या हिताचे रक्षण करणारे साहित्याला प्रोत्साहन देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या हया रुचीचा वाचकांनीही सन्मान करायलाच हवा !
भविष्यात वाचकांची रुची सांभाळत – बोधपर साहित्य निर्माण करणारे संपादकच पुढे दिसतील असं चित्र आज तरी स्पष्ट दिसतय.
-- निलेश बामणे
February 10, 2014
काळी सावळी. कपाळावर रुपया एवढे मोठे ठसठशीत कुंकू. नाकात लोंबणारी नथ, गळ्यात मंगळसूत्र. हातभार बांगड्या आणि कडव्याची माळ घालून एक आराधीण यायची. ढळजेत बसून हातातील परडी खाली ठेवून हातात तुणतुणे (एक तारी) आणि खणखणीत आवाजात म्हणायची. मला पहिल्या ओळी आठवत नाहीत. आराधी आल्याति दारात. मागते जोगवा मंगळवारात शुकीरवारात. असे म्हणायला सुरुवात केली की वाड्यातील कुणी तरी एक जोगवा वाढत असत.
June 17, 2022
नुकतीच वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केली होती त्याने. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आता जॉब मध्ये देखील तो स्थिर स्थावर झाला होता. त्याच्या आई-वडिलांना आता त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करायची होती. स्थळ बघायला सुरुवात करण्याआधी वडिलांनी मित्रत्वाच्या भावनेने त्याला एकदा विचारून घेतले की त्याच्या मनात कोणी आहे का?
December 31, 2019
आपण ताज्या पदार्थांच्या समृद्धीपासून पॅकेज पदार्थांच्या गरीबीकडे वेगाने जात आहोत.. हे कुठेतरी थांबायला पाहिजे.. आपली भारतीय खाद्य संस्कृती विसरुन चालणार नाही.. अन्यथा पुढची पिढी ही अंधानुकरणामुळे सुदृढ रहाणार नाही..
October 23, 2021
सुरुवातीला ढगाळ्या पॅन्टमधला, केसांचा कोंबडा ठेवलेला देव, काळानुरूप बदलत गेला.
October 3, 2021
चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे.
November 8, 2018

साहित्यिक सहवासाचे जे जे प्रसंग आहेत ते सर्वच लिहायला हवेत असे मनापासून वाटते. पण खूप मर्यादा पडतात आणी जसे आठवते तसे लिहिलेही जाते. कधी कधी द्विरुक्तीही होत असते. पण अशा ओघवत्या लिखाणात ते लगेच टाळता येत नाही.
June 18, 2021
काही खास चर्चा असली म्हणजे आम्ही ‘परिंदा’ मध्ये भेटायचो. सिद्धार्थ गार्डनच्या जवळ, नाल्यावरच्या सिद्धी विनायक मंदिरासमोर, परिंदा म्हणजे एक धाबा वजा छोटंसं हॉटेल होतं. भरपूर मोकळी जागा, उघड्यावर टेबल खुर्त्या प्लॅस्टीकच्या, चार चार टेबलांच्या ग्रुपला एक मेंदीचं बुटकं कुंपण, आजूबाजूला भरगच्च झाडी. फारशी गर्दी नाही, भरवस्तीत असूनही शांत आणि आमच्या सारख्या मुलींना सुरक्षित. तिथं फारशी वर्दळही नसायची. आमच्या सारखीच कॉलेजची काही मुलं-मुली. गार्डनमध्ये येणारी माणसं किंवा समोरच्या मंदिरात येणारी काही माणसं एवढंच गिहाईक. चार घटका बसून गप्पा मारायला मस्त जागा. एक छोटसं टपरीवजा किचन, काही खाण्याचे पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ड्रींक असा माफक मेनू. धाब्याचा मालक शब्बीरभाई दिसायला परिंदा पिक्चरमधल्या नाना पाटेकर सारखा. आम्ही पण त्याला गमतीने नानाजीम्हणायचो. तो खूष व्हायचा. आमच्या ग्रुपची वास्तपुस्त करायचा. मला तो ‘डॉक्टर मॅडम’ म्हणायचा. का कोण जाणे माझा पांढराशुभ्र पोषाख आणि छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून असेल … पण तो आमचा चांगला दोस्तच झाला होता.
June 30, 2022
आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्वस्थ बसायचं कां? आपल्या जनजीवनात, व्यापार-व्यवहारात इंग्रजीच्या तुलनेने आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान मिळूं नये, असं आम्हाला जर वाटत असेल, तर आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्यासाठी झटलं पाहिजे. त्यासाठी करायच्या काही गोष्टींकडे आपण एक नजर टाकू.
March 23, 2019
तो मेसेज होता मराठीतले प्रसिद्ध लेखक श्री. वसंत वसंत लिमये यांचा. ‘लाॅक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ ह्या दोन रहस्य-थ्रिलर कादंबऱ्यांतून चोखंदळ मराठी वाचकांच्या घरात आणि मनात पोहेचलेले श्री. वसंत वसंत लिमये यांची माझी भेट झाली. अगदी ठरवून झाली.
February 12, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti