(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मैना खेर (महिना अखेर)

    आताशी विशेष नाही, पण लहानपणी मैना खेरने स्वत:चा असा दबदबा निर्माण केलेला होता.

      July 25, 2017


  • प्रीतीतील पावित्र्य

    हे प्रीतिच नातं! मुळातच, शुभंकर! कल्याणकारी! सांत्वनी! निर्मल! निर्मोही! आत्मशांती सुखदा असते.! तृप्तकृतार्थता असते! जिथे फक्त फक्त निर्व्याजी प्रीतभावनां असते.

      March 26, 2022


  • खुळा पाऊस

    पाऊस खुळा । किति पाऊस खुळा |!
    शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ।।धृ।।

    नाचे किती वेड्यापरी,
    बडेबडे काहीतरी
    झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ।।1।।

    दीनवाणी वेलीबाई,
    पांघधराया नाही काही
    काय करु, उघडा हा राहे छकुला ! ।।2।।

    उचलून आणू काय,
    पुसू डोके, अंग, पाय?
    काकडून गेला किती
    बघ माकुला ! ।।3।।

    निजवू या गादीवर,
    पांघरुण घालू वर,
    देऊ काय, सांग आई,
    आणुन तुला? ।।4।।

    काय - "नको तोडूं फूल,
    वेल - पावसाचें मूल ?
    ऊन येतां चमकेल
    त्याचा डोळुला? ।।5।।

    आणि 'येऊ मी घरात?
    भिजू नको अंगणात ?'
    नको आई - ! चमकेन
    मीही आपुला ! ॥6॥

    मज वेडा म्हणतील ?
    फूल शहाणें होईल?
    मग वेडी म्हणतील
    सगळे तुला ! ।।7॥

      June 21, 2026


  • लख लख चंदेरी ऽ ‘पेना’ची दुनिया ऽऽ

    त्या वेळचा शाळकरी मुलगा, जो आज ज्येष्ठ कलादिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध आहे.. त्या सुबोध गुरूजींनी ‘शेफर’ या अमेरिकन कंपनीचं ते ‘चंदेरी पेन’ जिवापाड जपून ठेवलंय.

      September 24, 2021


  • कोलीडोस्कोप

    कोलीडोस्कोप नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे.

      June 15, 2012


  • रक्त आणि रोग निदान

    एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले.

    आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहे. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून सर्व मान्य करावे हे त्यांच्या पचनी पडत नाही. मुलाच्या वडीलांनी चौकस बुद्धीने मला प्रश्न केला. " डॉक्टर तुम्ही रक्ताचा रिपोर्ट बघून कसा तर्क बांधू शकता? रक्ताचा रिपोर्ट हा निदान करण्यासाठी कशी मदत करतो. " त्यांचा प्रश्न हा साधा, योग्य व सर्वसाधारण व्यक्तीच्या मनांत येणाऱ्या शंकाच बोलून दाखवणारा होता. अर्थांत वैद्यकीय शास्त्र प्रचंड आहे. ज्या ज्या शक्यतेचे बारकावे आम्ही शिक्षण घेताना शिकलो ते सर्वच त्याना सांगणे शक्य नव्हते. व अयोग्यही होते. त्याना फक्त त्यांचा छोटासा तर्क –" रक्ताचा रिपोर्ट व निदान ह्याचा कसा संबंध ? " आणि ते मला त्याना त्यांच्या भाषेत समजेल ते सांगणे हीच मजसाठी परिक्षा होती.

    मी खिडकीवाटे बाहेर बघू लागलो. विचार करीत होतो. अचानक माझे लक्ष्य वेधले गेले ते एका पोलिस गाडी मुळे. एक पोलिस Vane व्हॉन व कांही पोलीस त्याच्या भोवती उभे होते. त्यांची आपसांत चर्चा चाललेली दिसत होती. अशी पोलिस गाडी पोलिसांसह त्या जागी मी पूर्वी बघीतली नव्हती. आज अचानक ते सारे बघीतले. मी किंचीत हासत त्या मुलाच्या वडीलांना प्रश्न केला. " बघीतल ती पोलिसांची गाडी व कांही पोलिस. ते आज अनपेक्षीत असे येथे दिसतात. काय तुमचा तर्क असावा ? "

    ते निरखून बघू लागले. " मला वाटते जवळपास कांहीतरी घटना घडली असावी. कदाचित् चोरी, मारामारी, आत्महत्या, खून, वा असलेच कांही असावे. "

    " बरोबर आहे तुमचा तर्क. असेच असते बघा दैनंदिन जीवनाच्या प्रसंगाचे. फायर ब्रिगेडची गाडी जर आली असेल तर तर्क करता येतो की कुठे आग लागली असावी. ऍम्बुलन्स (Ambulance) जर दिसली तर कोणीतरी रुग्ण मदतीच्या आपेक्षेत आहे असे वाटते. शववाहिका ( HEARSE ) त्याच वेळी दिसेल, जेंव्हा कुणातरी मृत व्यक्तीसाठी आलेली असेल. क्वचित प्रसंगी जर मिलीटरी वाहन वा सैनिक दिसले तर जवळपास आतंकवादी अथवा शत्रु गटातील कुणीतरी त्या भागांत असावा हा तर्क माणसे काढतात. ह्याचा अर्थ निर्माण झालेली परिस्थितीचे अवलोकन, तर्क, कल्पना ह्याचा अंदाज त्या त्या परिस्थितीला काबूत आणणारी यंत्रणा बघून करता येतो. हा जरी तर्क असला तरी तो त्या कारणाच्या खूपच जवळ नेण्यास मदत करतो.

    शरीराच्या आतील कार्यशाळे बद्दल असेच कांहीसे असते. रक्त शरीराचा अत्यंत महत्वाचा प्राथमिक भाग असतो. शक्ती, उर्जा, अन्न, रक्षण, सारे सारे रक्ताच्या मार्फतच होते. अनेक घटक पदार्थ असलेल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी हा एक घटक पदार्थ. रक्षणाची प्राथमिक जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता असते. ज्या पद्धतीचा रोग प्रादुर्भाव ( जंतू मार्फत ) शरीरावर होतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी, त्या रोगाचा प्रतीकार करण्यासाठी रक्तामध्ये त्वरीत बदल होतो. शरीरांत असलेला Reserve Blood stock जो कांही अवयवांत असेल तो रक्त वाहीन्यामध्ये उतरतो. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये त्या त्या रोगाला अनुसरुन त्वरीत वाढ होते. बस त्या ठराविक वाढलेल्या पेशी वा रक्त बदल हा कोणत्या रोगामुळे ते शक्य झाले असावे असा तर्क काढण्यास मदत करतो.

    चोरी, खून, मारामारी, इत्यादी तुम्ही प्रत्यक्ष न बघताच केवळ पोलीसांची गाडी व पोलीस याना बघून जसे अनुमान काढू शकतात, त्याच प्रमाणे रक्त लघवी इत्यादींचे रिपोर्ट आम्हास त्या रोगाचे अप्रत्यक्ष निदान करण्यास मदत करतात.

    मुलाच्या वडीलांनी हासत माझ्या तर्काला व निदानाला साथ दिली. मी त्याना लिहून दिलेले Prescription घेऊन ते औषधी आणण्यासाठी गेले.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 23, 2017


  • साठवणीतील एक आठवण

    आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती.

      June 12, 2022


  • वर्षभराचा सारीपाट

    खरं तर तो कुटुंबाचा वर्षांभराचा सारीपाटच असतो. प्रत्येकाला त्याच्या खेळीप्रमाणं दान पडत असतं. उद्या काय घडणार आहे हे माहीत नसताना, दिवस उजाडतो.. मावळतो.. प्रत्येक दिवस काही ना काही जीवनात भर तरी टाकतो किंवा एखादी गोष्ट हिरावून घेतो. सगळं कसं मृगजळासारखं असतं.

      February 7, 2022


  • सुखी माणसाचा सदरा हवाय ?

    पहाणाऱ्या साठी मी एक सुखी माणूस आहे . वयाच्या पासष्टीत हि उत्तम प्रकृती . सुंदर पत्नी ,हो अजूनही म्हणजे वयाच्या साठीत सुद्धा जान्हवीने स्वतःस सुरेख मेनटेन केलाय . मुलगी आणि जावाई दोघे डॉक्टर , ग्रीन कार्ड मिळालेले न्यू जर्सीत वेल सेटल्ड . मुलगा - सून बेन्ग्लोरला , आयटी क्षेत्रात . आम्ही दोघे पुण्यात . राहायला छोटेसेच असले ,तरी सर्व सोयीनीयुक्त घर . दोन वेळेच्या वरण भाता साठी पेन्शन मिळतीय . चार पैसे बाळगून आहे . दृष्ट लागण्या सारखा संसार आहे माझा ! माझ्या सारख्या ' सुखी ' माणसाचा 'सदरा'घेण्यासाठी मोठी वेटिंग लिस्ट लागेल . पण मी 'तो' कोणालाच देणार नाही !

    का ? तुम्ही विचारलं .

    आजवर याचे उत्तर मी कोणालाच दिलेले नाही . पण आज मात्र मी तुम्हाला सागणार आहे ! फक्त एकाच विनंती आहे , हे गुपित फक्त तुमच्या पुरतेच ठेवा , इतरांशी शेयर करू नका .

    000

    पाहता क्षणी जान्हवी मला आवडली . किंचित सावळी , नजरेत भरणारी उंची , सडपातळ बांधा ,रेखीव चेहरा ,( थोडासा गंभीर) , मधेच मंद स्मित करण्याची सवय , आणि त्या वेळेस पडणारी गालावरची खळी ! या पेक्षा अप्सरा वेगळी असते का हो ? मी त्याच बैठकीत होकार देवून टाकला . मुलगी पहाण्यासाठी घेतलेली सी. एल . प्रीव्हीलेज लिव मध्ये वाढवून घेतली . पंधरा दिवसात आमचे लग्न झालेही !

    मझ्या लग्नाच्या नवलाईचे नऊ दिवस थोड म्हणजे तब्बल पाच वर्ष लांबले ! तोवर स्वाती आणि शेखर अंगणात खेळत होते . हळू हळू मला जान्हवी समजू लागली . ती घरात खूप कमी बोलायची . घरची सगळी काम करायची . आईच्या औषध पाण्याचा वेळा , मुलाचं खाण - पीण ,माझा डब्बा . सगळ व्यवस्तीत वेळच्या वेळी !

    "जान्हवी , काय झाल ?तू खूप अबोल असतेस . " मी एकदा तिला विचारल .
    "काही नाही . मला बोलणच कमी आहे !"

    " मोकळ बोलत जा ना. लग्न झाल्या पासून पहातोय ,तू कधी काही मागितल नाहीस . कशाचा हट्ट हि केला नाहीस. मी जे आणीन ते नबोलता ठेवून घेतेस . अजून तुझी आवड -निवड पण मला कळू शकली नाही . "
    "मला सगळ मिळतय .मग हट्ट का करू ?"
    असतो एखाद्याचा स्वभाव समाधानी . आणि अश्या स्वभावाची बायको मिळायला शेकडो जन्माची पुण्याई लागते ! माझ्या मनातल्या तिच्या बद्दलच्या प्रेमाला आदराची प्रभावळ लाभली .
    000
    एक दिवस मी ऑफिस मधून येताना मला वेडावणारा गंध नाकात शिरला . मोगऱ्याच्या फुलाचा वास ! जीव टाकतो याच्या साठी मी ! पांढऱ्या शुभ्र ,ताजा टवटवीत , मोगऱ्याच्या फुलांचे गजरे त्या फुलवाल्याच्या दुरडीत ऐटीत बसले होते . गजरा मळलेली जान्हवी डोळ्या समोर तरळून गेली . आजवर कसे लक्षात आले नाही कोणास ठावूक ? जान्हवीच्या नाजूक चेहऱ्याला हा गजरा काय शोभून दिसेल ! आता रोज जानू साठी गजरा घेणार ! मी गजरा घेवून घरी आलो .
    "जान्हवी ,गजरा पाहताच तुझी आठवण झाली . मुद्दाम तुझ्या साठी आणलाय . "मी जान्हवीला गजरा देत म्हणालो . तिने होकारार्थी डोके हलवून गजरा एक शब्द हि न बोलता घेवून गेली . मला तिचा अबोल स्वभाव पुन्हा खटकला .
    चार दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले कि जान्हवी मी आणलेला गजरा घालत नाही.
    "जान्हवी , मी तुझ्या साठी मुद्दाम गजरा आणतो . पण तू घालत नाहीस . का ?"
    "घालते कि !"
    "मला कधी दिसल नाही. "
    "---"ती पुन्हा गप्प बसली .
    "आजवरच जावू दे . आज घाल . "
    "हो.जेवण झाल्यावर घालते . "तिने मी दिलेली वेणी माठा वरच्या ओल्या झाकणीत ठेवली . आणि कामात गुंतली .
    "जानू ,आग वेणी ?"
    रात्री मी पुन्हा विचारले.
    "आता कंटाळा आलाय. सकाळी घालीन. "
    सकाळी घाईत ऑफिसला जाताना माझे लक्ष माठा कडे गेले. मलूल झालेला तो गजरा माठा खालच्या बादलीत तरंगत होता.
    संध्याकाळी पुन्हा मी वेणी आणलीच . घरात जाताना अंगणातल्या तुळशी वृदावनात पडलेले कालच्या गजऱ्याचे कलेवर पडलेले दिसले !
    "जानू ,हे काय ?तुला गजरा छान दिसतो . घालत जा ना. माझ्या साठी तरी!"
    "खरे सांगू . मला मोगऱ्याचा वास नाही आवडत !आणि मोगराच काय मला कुठलीच फुल नाही आवडत . नका आणत जावू माझ्या साठी काही !"
    बापरे ! किती तोडून टाकणार बोलली आज . तारुण्यात बायकांना फुलांचा तिटकारा असू शकतो ? असेल हि . नसेल तिला फुलांची आवड . मी तरी का एव्हडा 'गजरा घाल' म्हणन हट्ट करावा ? हि बळजबरी बरी नाही. माझी आवड तिच्यावर का लादावी? तिच्या दृष्टीने मी विचारच केला नव्हता . मला बराच वेळ अपराधी वाटत राहील . मग मी तिच्या साठी वेणी /गजरा आणणे बंद केले . आणि झाला प्रकार विसरूनही गेलो .
    एक दिवस मिटिंग कॅनसल झाली म्हणून लवकर घरी आलो. घराला कुलूप होते. बायको माहेरी गेल्याचे शेजारच्या काकुनी सांगितले . माहेर गावातच असल्याने ती आधन - मधन माहेरी जावून येते . ऑफिस सुटण्याचा सुमासार ती परतली. मस्त लाईट मूड मध्ये होती. काही तरी गाण गुणगुणत होती. आणि मोकळ्या केसात नाजूक जाईची वेणी ! मला पहातच एकदम गप्प झाली. चेहऱ्यावर गंभीर मुखवटा आला.
    "काय ,आज माहेर ?काही विशेष ?"
    "हो ,आईने बोलावल होत . "
    "तुला फुल आवडत नाही ना ?मग आज वेणी कशी ?"मी नको तो प्रश्न विचारल्याची झाली.
    "घालते कधी कधी ! माझ्या मूडवर असत ! "तुटक उत्तर देत घरात निघून गेली! काही तरी चुकतय याची मनाला जाणीव झाली.
    000
    त्या दिवशी दिनकरकाका रस्त्यात भेटले. त्यांच्याच मध्यस्तीने आमचे लग्न जुळले होते.
    "का हो काका , जान्हवी लहानपणा पासूनच अशी अबोल आहे का हो ?"
    बोलता बोलता मी सहज विचारले.
    " कोण ? बबडी ! छे रे तिला खूप बोलायला आवडत !तोडात तीळ भिजत नाही तिच्या!पण तू का विचारतोयस ?"
    "काही नाही . लग्न झाल्यापासून खूप अबोल असते . "
    "अरे ,नव्या संसाराच्या जवाबदारीने थोडी बावरली असेल. तू नको काळजी करूस. पोर खूप गोड आहे. लग्नाला पण 'नको' म्हणत होती, मीच तिची समजूत घालून तयार केली होती !"

    मग मात्र मन सर्व गोष्टींची उकल करू लागल .गजराच काय मी आणलेल्या साड्या ,ड्रेस पण ती घालत नव्हती !तिने मला विरोध कधीच केला नाही ,पण सहकार्य पण केले नाही !' नव्या संसाराच्या जवाबदारीने थोडी बावरली असेल.'म्हणे ! हे बावरेपण पाच वर्षा नंतर हि टिकू शकत ? म्हणजे हे लग्न जान्हवीच्या मना विरुद्ध झालेलं होत! तिच्या तुटक बोलण्या -वागण्याचा अर्थ आता लागत होता! तिच्या पद्धतीने तो केलेला आणि आज तगायत चालू ठेवलेला , लग्नाचा निषेध होता!
    प्रेम म्हणजे व्यभिचार आणि प्रेमविवाह म्हणजे सामाजिक गुन्हा! हा अलिखित नियम असणारा तो काळ होता . एक वेळ जगाशी दोन हात करता येतात ,पण आपल्याच आप्तांशी , जन्मदात्यांशी नाही सगळ्यानाच नाही झगडता येत! अश्या इमोशनल अत्त्याचाराचे बळी घरोघर असत. वडिलधाऱ्या मंडळीच्या संमतीनेच लग्न ठरत. पाच - सात मिनिटाच्या 'कांदा-पोह्या 'ने जन्माचा गाठी करकचून बांधल्या जायच्या. त्यातहि मुलीना खूप कमी स्वातंत्र्य असायचे. काही विरोधी सूर लावला कि ' सहवासान प्रेम होत निर्माण ! आमचे नाही का झाले संसार सुखाचे !' हा ठोकळेबाज सल्ला तयार असायचा.
    मला या सर्व परस्ठीतीची पूर्ण कल्पना आहे . मी जान्हवीची बाजू समजू शकतो . हा घे 'नवरा ' अन कर प्रेम. अस नाही करता येत प्रेम ! सहवासाने आदर , आपुलकी ,वाटेलही पण प्रेमाची उस्पुर्ततता नाही येत. जान्हवी एक आदर्श गृहिणी आहे, आई आहे, सून सगळ आहे !आणि हो , काल पर्यंत ती आदर्श बायको पण होती !पण --पण आता मला तिचा छुपा विरोध जाणवतोय !
    आजवर जे झाल ते झाल. या नंतर मीही खूप संयमाने वागतोय. तिच्यावर माझ्या आवडी - निवडी लादण्याच टाळतोय . पूर्वी सारख हक्काच अस काही राहिलेलं नाही. जगाच्या दृष्टीने ती एक आदर्श गृहिणी/पत्नी आहे . मी हि एक आदर्श पती आहे . सहवास , संगत ,सोबत ,सामंजस्य आहे पण ------
    आज आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आहेत. गेल्या चाळीस वर्षात ती एकदाही ' LOVE U ' नाही म्हणाली .किवा त्या अर्थाची जाणीव पण होवू दिली नाही ! मी अजूनही वाट पहातोय ! मावळतीला आलेली एक आशाअजूनहि आहे. केव्हा तरी तिला माझ्या बद्दल प्रेम वाटेल .
    000
    आता सांगा ज्या माणसाच्या बायकोचे त्याचावर प्रेम नाही, आणि हे त्याला पक्के माहित आहे अश्या माणसाचा ' सदरा ' तुम्ही घ्याल का ? आणि जरी तुम्ही घेतला तरी तो मी तुम्हास कसा देईन ? न भरून येणाऱ्या जखमा साठी मी कारणीभूत का ठरू?माझे ते संस्कार नाहीत !

    -- सु र कुलकर्णी

    आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye.

      August 12, 2018


  • कोजागीरी

    “हो तर ! येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता दीनानाथ नाट्यगृहा समोरून आपली बस निघेल. प्रवास साडेतीन तासांचा आहे. रात्री साडेआठला बस डहाणू समुद्र किनाऱ्यावर पोचेल. वाटेत सुका नाष्टा मिळेल. ही सहल अविस्मरणीय करायला आपल्या सोबत आहेत आपले लाडके वपु.”

      April 29, 2022