(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दे धमाल ‘पुरूषोत्तम’

    पुरुषोत्तम बेर्डे यांनी आजपर्यंत दहा नाटकांचे लेखन, वीस नाटकांचे दिग्दर्शन, साठ नाटकांना संगीत, पाच नाटकांची व नऊ चित्रपटांची निर्मिती केलेली आहे.

      May 31, 2022


  • रमेशभाई एम.टेक.

    रमेश तामिळनाडू मधून एम.टेक. करण्यासाठी केरळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आला होता.त्याचे गाव पाँडेचरीच्या आसपास कुठेतरी होते. तामिळ पिक्चरचा जबरदस्त फॅन असलेला रमेश दिसायला आणि वागायला पण एकदम टिपिकल तामिळ सिनेमातले कॅरॅक्टर! उंच, सावळा, कपाळावरचे केस थोडेसे मागे गेलेले आणि टिपिकल रजनीकांत स्टाईल मिशा ठेवणारा. आम्ही सगळे त्याला “अण्णा” म्हणूनच हाक मारायचो! सिगारेट आणि केरळ मध्ये पॉप्युलर असलेली कळ्ळ ( माडी) चा शौकीन असलेला रमेश रंगात आला की रजनीकांत चे डायलॉग ऐकवायचा. त्यातल्या त्यात “शिवाजी” मधला रजनी त्याचा आवडता.

    खरेतर त्याने अण्णा युनिव्हर्सिटीमधून बी.टेक. केले होते. ‘अण्णा युनिव्हर्सिटी’ ही तामिळनाडू मधील एक नामवंत युनिव्हर्सिटी आहे. बी.टेक. मध्ये सेकंड क्लास असल्यामुळे त्याने एम.टेक. करायचे ठरवले. एम.टेक. ला एडमिशन साठी ६० टक्के गुण असणे आवश्यक होते परंतु शासनाकडून मिळणाऱ्या सवलती मुळे त्याला त्यात सूट मिळाली होती. शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मुळे त्याला सारी फी पण माफ होती. मूळचा हुशार असणाऱ्या रमेश मध्ये बेफिकीरपणा होता. एम.टेक. करताना पण तो तेवढासा सिरीयस नव्हता. कधी कधी तो, बारावीला त्याला मॅथ्स मध्ये शंभर पैकी शंभर गुण पडले होते आणि बी.टेक. करत असताना तो बॅच मेट्स ना कसे मॅथ्स शिकवायचा याचे किस्से ऐकवायचा! तामिळनाडू मधून तो केरळ मध्ये शिकण्यासाठी आला होता खरा पण मल्याळी लोकांबद्दल त्याचे काही चांगले मत नव्हते! इथले शिक्षक मुद्दामहून आपल्या असाईनमेंट्सना कमी मार्क्स देतात ही तक्रार तो बऱ्याचदा ऐकवायचा!

    “यु विल नॉट फेस एनी प्रॉब्लेम दिनेशभाई, यु आर अ सन इन लॉ ऑफ केरला… दिज पीपल विल गिव्ह यू गुड मार्क्स!” एकदा तो मला म्हणाला होता!!

    एम. टेक. चा कोर्स बऱ्यापैकी प्रॅक्टिकल वर आधारित होता. प्रत्येक विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा पण व्हायची. महाराष्ट्रात एम.टेक. च्या कोर्स मध्ये अशी प्रॅक्टिकल ची परीक्षा होताना कधी मी पाहिले नाही! तेथील प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची पद्धत इतर कॉलेजेस पेक्षा वेगळी होती. आम्हाला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन तीन चार तासांसाठी लॅब मध्ये सोडून दिले जायचे. इंटरनेट बंद केलेले असायचे आणि अधून मधून सर फक्त फेरी मारायचे. डिग्री प्रोग्रॅम ला घेतली जाते तशी कुठलाही एक्सपरिमेण्ट करून दाखवायची ती परीक्षा नव्हती!

    त्या दिवशी “डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग” या विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा होती या विषयाची धास्ती सगळ्यांनीच घेतलेली असायची. याच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार फिल्टर डिझाईन करून त्याचा कोड (सॉफ्टवेअर प्रोग्रॅम) लिहून तो कोड डीएसपी प्रोसेसर वर इम्प्लिमेंट करावा लागायचा आणि नंतर त्याला इनपुट सिग्नल देऊन मिळालेले आउटपुट हे दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार आहे की नाही ते दाखवावे लागायचे. नऊ जणांच्या बॅचमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असायचे त्यामुळे कोणी कोणाची कॉपी करेल हे शक्य नसायचं आणि दिलेल्या वेळेत आपले काम पूर्ण करणे हे ही महत्वाचे होते त्यामुळे कुणी कुणाला मदत करायच्या फंदात पडायचे नाही!

    रमेश एक्झाम साठी गेल्यानंतर त्याला जेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळालं तेव्हाच त्याला कळून चुकलं होतं की त्याच्याकडून हा प्रोग्रॅम लिहिणे काही होणार नाही! त्याच्या बॅचच्या नऊ स्टुडंट्सची परीक्षा सकाळच्या सत्रात होती आणि दुपारच्या सत्रामध्ये बाकीचे नऊ स्टुडंट्स येणार होते. त्यामध्ये त्याचा रूम पार्टनर पण होता. लॅब मध्ये कुणी सुपरवाझर नाही आहे हे बघून रमेशने त्याच्या पार्टनरला मोबाईल वरून प्रॉब्लेम स्टेटमेंट पाठवले आणि प्रोग्रॅम लिहून पाठवायला सांगितले! इकडे रूमवर त्याचा पार्टनर दुपारी परीक्षा असल्यामुळे अभ्यासात गर्क होता रमेशला प्रोग्रॅम लिहून पाठविण्यात त्याचा वेळ वाया जाणार होता. त्यामुळे त्याने त्याला मेसेज पाठवून दिला की त्याला काही हा प्रोग्राम लिहायला जमत नाही त्यामुळे तो पाठवत नाहीएय.

    त्याचा मेसेज वाचून रमेश ची उरली सुरली आशा संपली! रमेशने पार्टनरला मनातल्या मनात चार शिव्या घातल्या, पण तो काहीच करू शकत नव्हता! त्याच्याकडे आता करण्यासारखं काहीच उरले नव्हते. त्या दिवशी भारताची कुठलीतरी वन डे मॅच सुरू सुरू होती. प्रोग्रॅम लिहिणे जमत नाहीएय निदान क्रिकेटचा आनंद तरी घ्यावा म्हणून रमेश क्रिकेटचा स्कोअर बघायला लागला. तो स्कोअर बघण्यात गर्क असतानाच नेमके सर लॅब मध्ये आले. मोबाईल मध्ये डोळे घालून बसलेल्या रमेश कडे बघून त्यांनी त्याचा मोबाईल मागून घेतला.

    “सार, आय एम नॉट कॉपिंग सार” रमेश त्याच्या टिपिकल तामिळ चा प्रभाव असलेल्या इंग्लिश मध्ये म्हणाला.

    “आय नो, यु आर नॉट कॉपिंग बट लेट मी सी युर मोबाईल” पर्यवेक्षक म्हणाले.

    “आय वोज जस्ट चेकिंग स्कोर सार” रमेश म्हणाला.

    “ओके, बट गिव्ह युवर मोबाईल”

    “येस सार, यु कॅन सी सार” असे म्हणून रमेश ने सरांकडे मोबाईल दिला.

    मधल्या काळात इकडे हॉस्टेलवर त्याच्या पार्टनरला काय वाटले कुणास ठाऊक, आपली तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी रमेशने पाठवलेला प्रॉब्लेम सोडवला आणि आता सोडवला आहेच तर रमेश ला मेसेज पाठवूया म्हणून त्याने तो प्रोग्रॅम रमेशला पाठवूनही दिला!

    सरांनी रमेश चा मोबाईल घ्यायला आणि त्याच्या रूमपार्टनर चा मेसेज यायला एकच गाठ पडली. त्यावेळी व्हाट्सएप नव्हते. SMS वरच बोलणे व्हायचे. मोठा मेसेज असेल तर तो तुकड्या तुकड्यात येई. प्रोग्रॅम मोठा असल्यामुळे सरांच्या हातातल्या मोबाईल वरचे मेसेज थांबत नव्हते!
    सरांनी शांतपणे मोबाईल रमेश च्या समोर धरून विचारले

    “रमेश, व्हाट इस धिस? कुड यु एक्सप्लेन?”

    ते सारे मेसेज पाहून रमेश चा चेहरा बघण्यालायक झाला होता!

    त्या परीक्षेत त्याचा ‘निकाल’ लागला हे सांगायला नको. तो अर्थातच नापास झाला. कालिकत युनिव्हर्सिटी च्या नियमाप्रमाणे कोणत्याही विषयात एकदा नापास झाले की पुढच्या प्रयत्नात कितीही मार्क्स मिळाले तरी “पास क्लास” मिळतो. त्यामुळे त्याला एम.टेक. ला पण पास क्लास वर समाधान मानावे लागले.

    त्या दिवशी संध्याकाळी, ‘आधी नाही म्हणून नंतर प्रोग्रॅम का पाठवला’ या कारणावरून त्याची आणि पार्टनर ची चांगलीच जुंपली. रमेश च्या मते सारी चूक त्याच्या रूम पार्टनर ची होती! त्याच्या मते पार्टनरने अगोदर ‘नाही जमणार’ असा मेसेज पाठविल्यामुळेच तो बिनधास्त मोबाईल वर स्कोर बघत होता. त्याच्या मते अगोदरच जर पार्टनर ने त्याला ‘पाठवतो’ असे सांगितले असते तर तो सतर्क राहिला असता! अर्थात त्याच्या या लॉजिक ला पार्टनर कडे उत्तर नव्हते!

    - श्रीस्वासम

      May 27, 2020


  • ध्यानी ‘गुरू’ ‘मनी’ गुरू

    जीवनात गुरू विविध रूपांत भेटतो. कधी दृष्य स्वरुपात तर कधी अदृष्य स्वरुपात..

      August 9, 2021


  • निसर्गाची ध्यान प्रक्रिया

    खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता  ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला.

      March 21, 2021


  • समथिंग डार्क इन ब्लॅक

    कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब
    बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती.

      December 12, 2021


  • महाराजानी मिळवले देवत्व

    एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, फुले, उदबत्ती, निरंजनचा दिवा तेवत ठेवलेला होता. त्या महाराजाविषयी चौकशी करता ते शेजारच्याच गावचे एक ग्रहस्थ असल्याचे कळले. सामान्य जनाप्रमाणे त्यांचे व्यवहार चालू असतात. एका बँकेमध्ये नोकरी करुन उदार्निवाह चालवितात हे कळले. परंतु अध्यात्मिक प्रांतात, ईश्वरी ज्ञानाबद्दल जाणकार होते. वाचन, अभ्यास, व अनुभव ह्यातून त्यानी ज्ञानसंपदा केलेली होती. ईश्वरी श्रद्धा, संकल्पना, ज्ञान आणि वाणी कौश्यल्य ह्याचा अप्रतीम संगम प्राप्त ती व्यक्ती होती. निसर्गतः ह्या व्यक्तीचा समोरच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांवर एकदम परिणाम होणारच. व्यक्तीचे ज्ञानच फक्त प्रभावित करणारे असते. त्या ज्ञानी व्यक्ती बद्दल आदर वाटू लागतो. त्याचे प्रत्येक शब्द आपणास पटू लागतात. प्रत्येकजण अशा व्यक्तीचे मोजमाप आपल्या स्वतःच्या ज्ञान साधनेतून करतो. त्याला संपर्कात ठेवतो. आदर्श मानतो. मोजमापाचे कोणतेही परिमाण नसते. फक्त वाटले, पटले, भावले, ह्या शब्दानी त्यावर मुलायमा लावला जातो. त्याचे तुम्ही वर्णन करु बघता. त्याला चांगल्या, उत्कृष्ट स्थानी मानता. देवत्वाची कल्पना ही अशाच चक्रातून सुरु होते. दुसरा ऐकून तोही प्रभावित होतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्या तथाकथीत थोर व्यक्तीला कृपावंत, दयावंत, सुखदाता, दुःख हर्ता इत्यादी विषेशने लाऊन, त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम आदर्श व्यक्त करताना आपलाही अहं जागृत केला जातो. मला कोणीतरी देवतुल्य व्यक्ती सापडला, हा भाव निर्माण केला जातो. तसे जीवन हे सुख दुःख यांच्या परिणामांचेच चक्र असते. मात्र व्यक्ती नेमके सुखदायी घटना टिपून त्या देवत्व दिलेल्या व्यक्तीवर लादतात. त्यांच्यामुळे हे सारे मिळाले, प्राप्त होऊ शकले ही अशांची समज. बस ह्याच आहिक मिळकतीची यादी सतत सर्वासमोर ठेऊन, वाचून त्या व्यक्तीला दिले गेलेले देवत्व द्दढ करण्याचा प्रयत्न होतो. एकापासून दुसरा, नंतर तिसरा, मग चौथा --- सर्व त्या मार्गानी धावण्याचा प्रयत्न करतात. येथे प्रमुख ध्येय बनते ते सुख मिळवणे वा दुःख कमी करणे. आदर भावना, प्रेम, हे तर देवत्वासाठीचे रंग आहेत. सारा व्यवहार हा फक्त अशाच मुखवट्याने झाकलेला असतो.

    प्रत्येक सजीवाला भावना दिलेल्या आहेत. हा एक सिद्धांत आहे. तो त्याचा जीवन जगण्याचा व आशेचा एक मार्ग असतो. भावनाप्रधानता हा नैसर्गिक गुणधर्म असतो. मानवाला मात्र 'विचार- विवेक ' ह्या संकल्पनेचे विशेष वरदान मिळाले आहे. त्याच्याच जोरावर जीवनांत तो प्रगती करतो, जीवनाच्या गरजांचा मागोवा घेत ते सुसाह्य करतो. मात्र अनेक प्रसंगी भावना ह्या विचारावर मात करतात. त्या प्रमाणे तो वागण्याची दिशा अखतो. विचारच सांगतात की परिस्थिती काय आहे. वातावरण कोणते आहे. जगण्याचे सारासार मार्ग कोणते. पायंडा कोणता. इत्यादी. खरे जगणे व सुसाह्य जगणे, सत्याचा मागोवा तर्क बुद्धीने घेणे, याचे मार्ग दर्शन फक्त सुविचारच करु शकतात. व्यक्तीचे मुळ गुणधर्म असतात स्वार्थ, अहंकार, वर्चस्व, राग, लोभ, मोह. आणि ह्याच्या गुंत्यातच राहण्यांत ती समाधान मानते.

    निसर्ग महान असतो. जीवनासाठी उर्जा देणारा असतो. गरजांची पूर्तता करणारा असतो. खरे म्हणजे त्यालाच देवत्व ही संकल्पना लादलेली असते. प्रकाश, अग्नी, हवा, पाणी, प्रथ्वी इत्यादी मध्येच ईश्वराच स्वरुप असते. प्रथमदर्शनी अभ्यासकांनी विद्वानानी, ऋषी मुनीनी हे मान्य केले. निर्गुण निराकार सर्व व्यापी अणूरेणूस्थित इत्यादी. माणूस एक बुद्धीवान प्राणी. त्याच्या भावना उसळू लागल्या. मन सैरावैरा धाऊ लागले. ईश्वराला जाणण्यात भावनानी अनेक अडचणी निर्माण करण्यास सुरवात केली. ईश्वराच्या संकल्पनेला सगुण रुप दिले गेले. 'विविधता ' हा मानवी स्वभाव गुणधर्म आहे. तो वरदान तसाच शाप देखील ठरत आहे. एकसंघपणा, एकवाच्यता ह्यामुळे संपूर्ण नष्ट झाली. ज्याला जसा विचार सुचला, जशी भावना आली, त्याप्रमाणे तो त्याने व्यक्त केला. इथेच न थांबता, आपलेच विचार कसे योग्य व परिणामकारक आहेत, ह्यावर भाष्य सुरु झाले. जो जेवढा प्रभावी, पटवून देणारा , अभ्यासक, वाक् चतूर होता, इतरांच्या गळी उतरविण्यास सक्षम ठरला. झाले निरनीराळे संघ, समाज, कुटूंबे त्याच्या विचारावर मोहून गेली. अनेक मार्ग, विचारसरणी, प्रथा, बनू लागल्या. प्रमुख विचार धारा एकच होती. मात्र वेगवेगळ्या दिशा, मार्ग विचारसरणी ह्यानी अनेक तुकडे तुकडे बनत गेले. फारच थोड्याना हे कळले. परंतु अनेकजण फक्त नक्कल करण्यांत समाधानी होऊ लागले. एक इसापनिती मधली गोष्ट आठवली. झाडाचे पान पडले. ससा भितराच तो. घाबरला. त्याला वाटले आकाश कोसळत आहे. तो धावत सुटला. ओरडत सुटला--- ''पळा पळा आकाश कोसळत आहे."---- त्याचे ओरडत धावणे बघून, रस्त्यामधील भेटणारे इतर प्राणी ही त्याच्या बरोबर धूम ठोकून पळू लागले.---- कसलीही खातरजमा न करता. फक्त जे दिसते ते सत्य समजून.

    मानवी जीवनातही असेच चित्र दिसून येते. बुद्धीमत्तेचे वरदान असून देखील. कुणीही सारासार विचार, विवेकाला चालना देताना दिसत नाही. फक्त जे दिसते, एकू येते, कुणीतरी सांगते, कांही तरी वाचले जाते, बस माणसे ह्यातच वाहुन जातात. जीवन प्रवाहांत प्रवाह नेईल तस वाहून जायच नसत. पोहून मार्ग आक्रमण करावयाचा असतो. इतरांचे अनुभव मार्ग दर्शनासाठी ठीक. परंतु त्यातील सत्यता व तारतम्य ह्यावर चिंतन असावे. स्व अनुभव व सदसदविवेबुद्धी ह्यावर जीवन प्रवाह करायचा असतो. आज काल कोणत्याही संकल्पनेचे त्वरीत व अनेक शिष्यगण तयार होतात. कुणीही सखोल अभ्यास, ज्ञान, माहीती याचा विचार करीत नसतो. फक्त तो करतो. मला पटले. आम्ही असे वर्षानुवर्षे करीत आलो आहे. पुर्वजानी केले. आता मी करीत आहे. कुणीही रचमात्मक अभ्यास करीत नाही. त्याला आवाहन देऊन त्याची सत्यता पडताळून बघत नाही. मागुन आले. पुढे चालू. शेवटी शेवटी तर संपूर्ण सत्य, तत्वज्ञान, बदलून जाते. व राहतात त्या रुढी, फक्त गैरसमज, अज्ञानाच्या भिंतीच्या चौकटीमध्ये बंदीस्त. मुळ गाभ्याकडे कुणीच लक्ष देत नाही.

    भावना आली, पटले, व अनुकरण केले. एकनाथरावानी ज्या व्यक्तीचा फोटो घरांत लाऊन त्याला सर्व भावनिक देवत्वाचे गुणधर्म अर्पण केले. देव संकल्पनेपेक्षाही जास्त प्राधान्य दिले तो अशातलाच भानिक श्रद्धेचा प्रकार झाला होता. ती व्यक्ती कदाचित् थोर असेलही. त्याला विरोध नाही. मात्र एकनाथरावांच्या वैचारीक ठेवणाची खंत वाटते. आगदी सहजपणे त्यानी त्यांचे पारंपारीक व घराण्याचे रुढी संस्कारीत देव संकल्पना मोडीत काढल्या. आपल्या उत्पन्न झालेल्या भावनाना प्राधान्य देत एक वेगळेच ईश्वरत्व निर्माण केले. अर्थात मान्य आहे तत्वज्ञान "जसा भाव तेथे व तसा देव" परंतु असे प्रकार फक्त भावना व ईश्वर भक्ती ह्याच्यातच रहात नाही. तर त्याला व्यवहारीक, मानसिक रंग चढतो. त्याना काय भावते, आवडते, हे मानवी विचार तुमच्या ईश्वरी भावने भोवती चक्रा मारु लागतात. व आपण त्याने प्रभावित होतो. व तसाच मार्ग निवडतो. व आपले स्वताःचे अध्यात्म निर्माण ३ करतो. ह्यात फक्त उद्देश, ध्येय नसते. असतो, मला, माझा, माझ्यासाठी,अर्थात अहंला शांत करणे. खऱ्या देवत्वाच्या कल्पनेपासून खूप दूर. मानवी अहंकारी स्वार्थी जगांत.

    एकनाथरावांच्या कल्पना रम्यतेत होता, फक्त जीवन व्यवहार. जीवनाच्या सुख दुखाःचे धागे, झगडा, यश अपयशाच आलेख. आणि हे सारे घडत असते कुणाच्या तरी इच्छेनुसार, शक्तीनुसार, योजने नुसार. त्यांच्या लेखी मानवी प्रयत्नाना खुपच कमी मर्यादा असतात. सारे होत असते ते फक्त ईश्वरी इच्छेनुसार. त्यांचे ते आदरणीय महाराज हेच ईश्वराचे प्रतिक आहेत. त्यांच्याच दयेवर सारे व्यवहार, दैनंदीनी चाततात. महाराजाना समर्पण भाव, व प्रेम, सतत वाहणे, व्यक्त करणे हेच ते आपल्या जीवनाचे ध्येय समजतात. एकनाथराव आपल्या वैचारीक व भावनिक गुंत्यात सतत राहू इच्छीत होते. हीच त्यांची श्रद्धा व ते द्रष्य स्वरुपांत देऊ करण्याचे आश्वासन देणारे त्यांचे देव अर्थात महाराज.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 25, 2017


  • हार्ट’फिल

    यमराज आजच्या ‘डिस्पॅच’ यादीवर नजर टाकत होते. त्यांनी नाव वाचलं ‘शुभांगी’, वय पन्नास, घरात सासू-सासरे, नवरा व मुलगा. मृत्यूचं निमित्त. हार्ट ॲ‍टॅक. वेळ. मध्यरात्र.
    शुभांगी दिवसभर घरकाम करुन थकलेली होती. तिचे पती शेखर, नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. वयोवृद्ध सासू सासरे, हे तिचे आधारस्तंभ होते. मुलाचं काॅलेज शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता. संध्याकाळी शुभांगी, थोडा दम खायला खुर्चीत बसली, तेव्हा तिच्या छातीत अचानक दुखू लागलं. चमक आली असेल, असं समजून तिने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यात शेखर आले. चौघांसाठी तिने चहा केला. चहा झाल्यावर ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

      March 16, 2022


  • दुसरे महायुद्ध (पुस्तक परिचय)

    दुसरे महायुद्ध साऱ्या जगाची उलथापालथ करणारे ठरले. केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाची नव्हे तर अनेक देशांची अंतर्गत परिस्थिती या महायुद्धामुळे बदलली.

      January 20, 2024


  • पर्जन्य काल समीप येता (सुमंत उवाच – १०५)

    सुमंत जयंत परचुरे. 

    पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात.

      December 25, 2021


  • पूर्णागिरी

    पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव ‘ब्रह्मदेव.’

      August 17, 2022