नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …
December 8, 2024

गोष्ट, खरं तर घटना आहे १९८६ मधली. आम्ही तेंव्हा बदलापूरला रहात होतो, आणि मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील एका कार्यालयात तीन शिफ्ट मधे काम करत होतो. ही घटना घडली त्या दिवशी मला सकाळी आठ ते रात्री आठ अशी दिवस पाळी होती. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. दिवसभराच काम आटोपून आणि लॉगबुक पूर्ण करून मी फ्रेश होऊन मला सोडवायला येणाऱ्या सहकार्याची वाट पहात होतो. सोबतीला असलेल्या चार्जमनने केलेल्या चहाचे घुटके घेत चार्जमन बरोबर गप्पा मारत होतो.
July 3, 2025
गदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण!,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.
September 12, 2009
कर्माशी निष्ठा ठेऊन निर्मोही आचरण करत निवृत्त होणाऱ्या असंख्य पोलिस कर्मचाऱ्यांचे परब जमादार हे एक प्रातिनिधिक उदाहरण. खिसा कसा कापला आहे हे पाहून कोणत्या ‘लाईन’ वरचा आरोपी आहे हे ओळखणारे , कडी कशी तोडली आहे हे पाहून आणि चोराने काय नेलं या पेक्षा काय सोडून गेला हे पाहून आरोपींचा नेमका अंदाज बांधणारे आणि काही तासात केस उघडकीला आणणारे unsung heroes या DCB CID ने पाहिले आहेत.
August 26, 2022
मध्यंतरी आठ दहा दिवस माझ्याकडे रहायला आली होती. मी बाजारात निघालो तर म्हणाली , ” मी येते ” . म्हटलं, चल. कोथिंबिरीच्या एका चांगल्या जुडीसाठी तिन ठिकाणी मला फिरवत आणि तागडीतील प्रत्येक लहान वांगसुद्धा दाबून , गोल फिरवत पाहून तपासून घेणाऱ्या तिने बाजाराला दीडपट वेळ लावला . वर , घरी आल्यावर बायकोला ” अजितला अजूनही बाजारहाट काडीचा जमत नाही “, हेही सांगून टाकलं. मात्र ही आली की माझी खाण्याची चंगळ असते .
February 14, 2024

अशीच होरपळ झाली तर शहराची शिस्त किती दिवस टिकेल? साठणारा संताप मग रेल्वेच्या मालमत्तेपुरता सिमित राहणार नाही. त्या संतापाचा वणवा इतका वाढेल, की त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. रेल्वेची मालमत्ता नष्ट करण्यामुळे प्रवाशांचेच अधिक हाल होतात, हे शहाणपण पुढारी मंडळी शिकवू शकतात
July 12, 2022
शिवनेरी गडावर जन्म आणि रायगडावर अंतिम श्वास असा जन्म मृत्यूचा गडकिल्ल्याशी संबंध असणारे, अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसामध्ये शासनकर्त्याप्रती विश्वास निर्माण करणारे, कुशल प्रशासक, शत्रूलाही मोह पडावा अशी कर्तबगारी, स्वतःच्या गैरहजेरीतही राज्याचा कारभार सुरळीत चालेल अशी जरब बसवणारा एक करारी शिस्तबद्ध राज्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि राज्यकारभारी यांना एकाच न्यायाने वागवणारा एक न्यायप्रिय परंतु प्रसंगी कर्तव्य कठोर असा छत्रपती शासक म्हणजे शिवाजी महाराज.
February 19, 2020

बरोबर एक वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासहीत दिल्ली-हरीद्वार-ऋषिकेशची अक छोटीशी सफर केली होती. ट्रेनमधून जाताना दिसलेल्या जाहिरातीं व त्यातून मला उमगलेल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवर मी एक लहानसं भाष्यही केलं होतं..ते काहीसं नकारात्मक होतं, पण चाच प्रवासात एक सकारात्मक गोष्टही घडली होती आणि मी ती साफ विसरूनही गेलो होतो. चांगल्या गोष्टी माणसं लगेच विसरतात आणि वाईट मात्र लक्षात ठेवतात या सर्वसामान्य मनुष्यस्वभावाला अनुसरून मी वागलो..ती चांगली गोष्ट सांगणं माझं कर्तव्य आहे..
January 2, 2017
मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे, बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी तो सहज करीत होता. हजारो नव्हे लाखोच्या नोटा तो हाताळत होता. कल्पना येते की थोडीशी चुक त्याच्या हिशोबांत प्रचंड तफावत निर्माण करु शकते. पण ते तो सार सहजतेने करीत होता.
डॉक्टर सुध्दा मोठे मोठे ऑपरेशन करताना देहामधल्या अवयवांची काटछाट, रक्तस्त्राव, तो टिपणे, रक्त नलीका बांधने, रक्तस्त्राव थांबवणे, अवयवांची जुळवा-जुळव असे एक नव्हे अनेक थरारक गोष्टी सहजतेने करताना दिसतात. गंमत म्हणजे हे सारे ते करीत असताना, इतर सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारीत असतात. चालू खेळ, चालू राजकारण वा सिनेमे इत्यादी अनेक विषयांवर ती बोलतात. मात्र ऑपरेशनमध्ये बाधा न येता, सारे कसे सहज केल्या प्रमाणे वाटते.
अशाच प्रकारे अनेक व्यवसाय असतात, ज्यांच्या कामामध्ये जेवढे लक्ष केंद्रीत करण्याची गरज असते, त्याचवेळी धोका होण्याचा, नुकसान होण्याची खूपच शक्यता वाटते. अशी माणसे मानसिक तणावामध्ये सतत असतील असा ग्रह इतरांचा असतो. परंतु असे मुळीच नसते. व्यवसाय आणि मानसिक तणाव ह्या भिन्न गोष्टी आहेत.
एक तत्व असे आहे. प्रत्येक व्यक्ती त्याची जेवढी बुध्दी असेल, त्याच्या फक्त १५ ते २० टक्केच तो ती वापरत असतो. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. ह्याचाच दुसरा अर्थ प्रत्येक व्यक्ती कार्य कुशल झाल्यानंतर जी बुध्दीची क्षमता वापरतो ती एखाद्या यंत्राप्रमाणे होवून जाते. वैचारिक बुध्दीचा,भावनेचा तेथे सहभाग नसतो. ते त्याचे काम मेकॅनीकल होवून जाते.
थोडेसे सतर्क राहून तो ज्या ज्या गोष्टी करतो त्या केवळ रोबोट अर्थात मानव यंत्राप्रमाणेच असतात. आधी फिड केलेलेच नंतर आपोआप बाहेर येवू लागते. जर नवीन क्रियेशन वा नुतन निर्मीती असेल, तरच जादा बुध्दीची अवशक्ता असते. दैनंदीन कार्याला अत्यल्प बुध्दीचा वापर होतो हे जर लक्षात आले, तर "तुमचे कार्य तणाव निर्माण करणारे आहे " हा विचार शिथील होईल. कोणत्याही क्षेत्रात जा डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सी.ए वा कलाकार, नट त्यांचे कार्य फक्त चाकेरी बध्द असते.इतरांना कदाचित्, महान अप्रतीम असे वाटेल, परंतु ते त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडते व त्यात सहजता येते. दैनंदीन कार्यात मेंदूचा वापर कमी असल्यामुळे तणाव नसतो.अभ्यासानंतर कोणत्याही दैनंदीन कार्यात बुध्दी क्षमतेचा सहभाग फारच अल्प असतो.येथे ती व्यक्ती तणावमुक्त असते.मानसिक तणाव अशा वेळी कल्पनेने निर्माण केले जातात.चाकोरीबध्द कामे करताना बुध्दीवर ताण पडत नसतो.
परंतु विचारांचा मार्ग थोडासा वेगळा झाला की तो तणाव निर्माण करु शकतो.
क्रमशः पुढे ५ वर चालू-
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
मग येते गंगोत्री! येथील मुख्य आकर्षण म्हणजे ‘गंगेचे मंदिर.’ गंगेच्या मूळ मंदिराचा जिर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केला. मात्र सध्याचे गंगेचे मंदिर जयपूर राजघराण्याने बांधले.
August 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti