नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

संगीता अंधारात मुसमुसत पडली होती, नाना विचारांनी डोके भणभणत होते, आपल्या आनंदात बिपीन सहभागी नसेल तर काय अर्थ ? स्वभावाचे पैलू लग्नानंतरच कळतात, ही तर सुरवातच होती.
लहानपणी आई जवळ नसली की भिती. अंधाराची भिती. गोष्टीतील चोराची. भूताची भिती. शाळेत जायला लागल्यावर शिक्षकांची भिती. वर्गातील व्रात्य मुलांची भिती. आणि जसे जसे वय वाढते तसे तसे भिती कमी व निडरपणा येतो.
प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे.

त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते.
नुकताच मी “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे “ हा चित्रपट पाहिला आणि माझ्या डोक्यात विचारांचे कल्लोळ माजू लागले. दिघे साहेबांचे जे असंख्य चाहते होते त्यात मी सुद्धा होतो. फक्त चाहताच नव्हे तर मी त्यांचा अनेक दशके त्यांचा अनुयायी आणि सहकारी सुद्धा होतो. दिघे साहेब हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भविष्यात या विषयावर कुणीतरी डॉक्टरेट नक्की मिळवेल इतके त्यांचे व्यक्तिमत्व प्रचंड मोठे आणि गूढ होते या बद्दल माझ्या मनात शंका नाही .
नंतर मगरीला बघितलेली कथा आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण वर्गात खुलवून सांगितली. त्यात आम्ही तिला कसं मारलं ती कशी परत आली पासून आम्ही तिला काठीने मारून कसं परत पाठवलं पर्यंत सगळं होतं. पुढे जाऊन आम्ही तिथून बागेतल्या गणपतीला कसं जायचं हा शोध लावला ह्याची इतिहासात कुठेही नोंद नसली तरी हा पराक्रम करणारे पराक्रमी योद्धे आम्हीच होतो.
तिसर्या पहारची येळ व्हती. अजून शिरू झोपडीकडं आला नवता.त्याची कारभारीन ईमली भाकर आन कोरड्यासं घेऊन केधोळची आलती .
एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकता-ऐकता मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, ……

भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून तो ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते.
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटांवर अधिराज्य गाजवले. अशाच काही तारकांची ओळख सदानंद गोखले यांनी या पुस्तकातून करून दिली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti