नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
१९३४ साली प्रसिद्ध चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वॉल्ट डिज्नी यांच्या कल्पनेतून डोनॉल्ड डकची निर्मिती सुचली. चित्रकार डिक लूंडी यांनी डोनाल्ड डकची प्रतिमा चित्रित केली होती.
July 24, 2021
माणसाला स्वप्ने पडत असल्याची नोंद ५००० वर्षांची तरी आहे. आधीही पडत होतीच असतील. जंगलात रहाणाऱ्या माणसालाही स्वप्ने पडत होतीच असतील की. कारण स्वप्न माणसाला आपोआप पडतात. कांही करावचं लागत नाही. अर्थात किमान झोपावं लागतेच म्हणा. तर ह्या आपोआप पडणाऱ्या स्वप्नांना तो आदिमानव कसा सामोरा गेला असेल ? घाबरला असेल ? त्याची स्वप्ने कशी असतील ?
January 18, 2024
प्रभात झाली रवि उदेला ऊठ उशिर झाला;
प्रेमळ भावे सरळ मनाने वंदि जगत्पाला ।॥१।।
दहिवर पडले मौक्तिकवृष्टी जणु भूवर झाली;
प्रेमरंगरंगित ही स्मितमुखि पूर्व दिशा खुलली ।।२।।
मंदमंद मधुगंधि समीरण येती भेटाया;
आलिगुनि सांगती 'काळ हा दवडु नको वाया' ।।३।।
हास्यवदन ही सुमनमंडळी उठुनि उष:काली;
दहिवरतोये जणु का प्रात:स्नान करित बसली ।।४ ।।
प्रसन्नवदना वनलक्ष्मी ही सूचिर्भूत दिसते;
नानाविध नवपल्लव वाहुनि देवपुजा करिते ।।५।।
तरुवर उठले, प्रफुल्ल झाले, आनंदे डुलती;
तन्मय होउनि मानसपूजा जणु का हे करिती ।।६।।
विहंग उठले गाउ लागले तरुवरि केव्हाचे;
मंजुळ वाणी ऐक, जणू हे गायक स्वर्गीचे ।।७।।
गगनविहारी खग वैतालिक वायूवरि बसुनी;
प्रभुगुण गाती उंच अंबरी तल्लिन होउनी ।।८।।
खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरिवरुनी;
देवदर्शना जणू चालल्या भाविक या तरुणी ।।९।।
तरुवसनावृत तुंग पुरातन पर्वत हे दिसती
वबल्कलधारी, आद्यक्र्षी जणु
ध्यान धरुनि बसती ।॥१०॥।
जिकडे तिकडे मंगलमय हे भूमंडल दिसते;
ऊठ मानवा ! आळवि प्रभुला
जाइ शरण त्याते ।।११।।
June 22, 2026
प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते.
February 4, 2022
त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.
November 15, 2025

बंद दाराबाहेर अनेक भाविक योग्य ते अंतर राखून रांगेत उभे होते
October 25, 2020
“यशोमतीबाईसाहेबांच्या– देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो – अंतिम संस्कारानंतर येताय ना?”, रिटायर्ड मेजर मालोजीराव गायकवाडानी त्यांच्या पुतण्याला विचारलं. “कशी काय होती व्यवस्था? सगळं ठीक पार पडलं ना?”
December 12, 2022
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
November 25, 2025
माझ्या लहानपणी घरापेक्षा अंगण मोठे असायचे . शिवाय घरा मागे पण मोकळी जागा असायची . तेथे गुरांचा गोठा आणि त्यात एखादी दुभती म्हैस किंवा गाय असायची . बैल बारदाना शेतात . अंगणात तुळशी वृंदावन त्याचा समोर एकाच दगडात कोरलेले नंदी आणि शिवलिंग असे . अंगणात सकाळी सडा हे नित्यकर्माचा भाग असे . संध्याकाळी कधीतरी नुसते पाणी शिंपडले जाई .तुळशी वृन्दावना समोर रोज तिन्हीसांजेला सांज वात , त्याचा समोर हात जोडून नऊवार साडीतली माझी आई , निरांजनाच्या तांबूस प्रकाशात तिचा उजळलेला चेहरा हे चित्र माझ्या मनावर कायमचे कोरलेले आहे . आम्हा लहानग्यांचा वावर घरा पेक्षा अंगणातच ज्यास्त . घर कश्याला ? तर जेवायला आणि झोपायला !
May 1, 2018
दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून लोक त्याला ओळखीत असत.
October 5, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti