नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कवितेच्या माध्यमातून आपण हसत-खेळत दुसर्या भाषेंतील शब्द सहज शिकू शकतो. त्याचा सर्वाना फायदाच होईल व भाषेवरून होणारे विवाद ही कमी होतील. आपण ही प्रयत्न करा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.
October 6, 2010
सावरकरांच्या अनेक पैलू पैकी आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे लेखन. १९३७ साली सरकारने सावरकरांची पूर्ण मुक्तता केल्यावर १९३८ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर निवडले गेले. एक राजकारणी, क्रांतिकारक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ. सावरकर वयाच्या ११ व्या वर्षापासून लिखाण करीत होते. लहानपणाचा काळ यात त्यांनी फटके, पोवाडे, लिहिले.
September 26, 2022
मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं.
January 12, 2018
मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं? नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील.
February 3, 2022
मी ऑस्टिनला आल्यापासून तीन मंदिरांना भेट दिली आहे. पैकी ‘ऑस्टिन पब्लिक लायब्ररी’ तुमच्या पर्यंत पोहंचवली आहे. राहिलेले दोन मंदिरांन पैकी एक होते व्यंकटेशाचे मंदिर.
November 20, 2020
अत्यंत रोमहर्षक, उत्कंठावर्धक कादंबरी...
उत्कंठावर्धक कादंबरी लिहिण्यासाठी खजिन्याचा शोध हा रुळलेला प्रकार बघावयास मिळतो. हॉलिवुड पटांमधली निकोलस केजची नॅशनल ट्रेजर सिरीज किंवा हैरिसन फोर्डची इंडियाना जोन्स सिरीज अश्याच पठडितल्या कथांची उदाहरणे...
अशीच एक उत्कंठा लावणारी कथा ती पण मराठी मध्ये नाशिकच्या मुरलीधर खैरणार यांनी लिहिली आहे.
शोध...राजहंस प्रकाशन..
या कादंबरीचे मुखपृष्ठच इतके सरस आहे की कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ बघुन वाचकाने ते हाताळले नाही तर नवलच...
हि कथा आहे छत्रपतींच्या काळातील आणि आजच्या काळातील..
महाराजांनी सुरतेवर अनुक्रमे १६६४ आणि १६७० अश्या दोन वेळा लूट केली. पैकी पहिली लूट जशीच्या तशी स्वराज्यात आली पण दूसरी लूट आलीच नाही..दुसऱ्या लुटीनंतर माघारी येत असताना गनिमांना हूल देत महाराज खजिन्याचा एक भाग घेऊन स्वराज्यात पोहचले पण दुसरा भाग घेऊन येत असलेले गोंदाजी पोहचलेच नाही. गोंदाजींकडे तब्बल ११०० टन वजनाचा खजिना होता त्याची आजची किंमत २५ लाख कोटी रुपये इतकी..त्यावेळी गोंदाजीच्या मागे गनीम लागले आणि गोंदाजीने ठरलेला रस्ता बदलून खजिना कोठेतरी दडवून ठेवला.
कुठे ठेवला हा खजिना..?
बस्स... याच तुम्हाआम्हाला पडलेला प्रश्न केतकीला देखील पडतो..या खजिन्याचा माग तरी कसा काढायचा हा एकच प्रश्न तीला सतावतो...केतकी...गेली तीन शतके तिच्या पिढ्या या खजीन्याच्या शोधात आहे.
काही करुन हा खजिना तिला मिळवायचा असतो... का?
त्याचप्रमाणे इतिहास संशोधक शौनक आणि काका.. यांना देखील खजिना शोधयचा असतो यासाठी ते फेसबुक चा इष्टतम वापर करतात.
एकीकडे हे तिघे....
आणि दुसरीकडे अजित आणि आबाजी... पैकी अजित देशातील एका मोठ्या कंपनीचा मालक.. तो ही या खजिन्यामागे...आणि विशेष म्हणजे देशातील सर्व सुप्रीमो शक्ती या खजिन्यासाठी वापरतो.
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये काय दडलंय. खास करून सप्तशृंगी, धोडप, अहिवंत, रावळ्या- जावळ्या इ. किल्ल्यांची माहिती संशोधन करून लेखकाने लिहिली आहे.यामध्ये येणारी ठिकाणे आपल्याच म्हणजे नाशिकच्या आजुबाजूची आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना समजते की आपल्या आजुबाजूच्या वास्तुंना एवढा मोठा इतिहास आहे.तसेच कळवण आणि त्याच्या आजुबाजुचा परिसर, तिथे होणारे आदिवासी लोकांचे सण, उत्सव...भाया, माऊली, डोंगरादेव, देवखळा यांचे वर्णन लेखनाने खुबिने केलेले आहे.
जवळपास ७५% पुस्तक वाचून होत तरी देखील या कथेचा नायक समजत नाही. प्रचंड उत्सुकता आणि वाचकाला खिळवून ठेवण्याची जबरदस्त क्षमता असलेले हे एक पुस्तक आहे..
ट्रेकिंग, खजिना शोधण्यासाठी वापरण्यात येणारे सिकोरस्की जातीचे हेलीकॉप्टर व् मेल डिटेक्टर ड्रोन...यांचा वापर लेखकाने केलेला आहे. त्याचबरोबर लेखक फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती फेसबुक सारख्या मिडिया वर पेरल्याने आपण खरच सुरक्षित आहोत का? हा प्रश्न देखील पडतो.
या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे अगदी सोप्या शब्दात साडे तीनशे वर्षपूर्वीची गोष्ट लेखकाने प्रकाशात आणलेली आहे. नुसतीच् प्रकाशात न आणता त्या गोष्टीचा शोध लावला आहे. अर्थात हा शोध वाचकांच्या दृष्टिकोणावर अवलंबून आहे.
कादंबरीने अनेक जुनाट विचार पुसून काढले..उदा. नाशिकचे तेव्हाचे कलेक्टर जॅक्सन यंबद्दल खरी माहिती या मध्ये सापड़ते. ते कलेच्या बाबतीत किती दर्दी होते. इतिहास जतन करण्यात त्यांचा किती मोठा हात आहे. तेव्हाच्या लेखकांनी त्या परिस्थितीमुळे त्यांच्याबद्दल असे लिहिले...अर्थात तेव्हा आपले प्रथम उद्दिष्ट हे स्वतंत्र मिळविने हेच होते.त्याचप्रमाणे आदिवासींचे सण उत्सव यांची माहिती खजिना शोधताना वाचकाला अडकवून ठेवते..
केतकी आणि शौनक ही जोड़ी खजिन्यापर्यन्त पोहचते का?
आबाजी अजित कोणकोणत्या रणनिति आखतात..अखेरीस खजिना कोणाला सापड़तो...?
या कादंबरीचा नायक कोण? याचे उत्तर पुस्तक एकाग्रतेने वाचल्यावर ते ही अगदी शेवटी समजते...
शौनक असेल..नाही केतकी...केतकी तर तिच्या पूर्वजांसाठी काम करत होती...आबाजी असावे पण आबाजी तर अजितच्या सांगण्यावरुण काम करत होते...नाही मग इतिहास संशोधक काका असावे....जॅक्सनच्या खाजगी व्यक्तीसंदर्भात इतिहासप्रेमी काकांकडे शौनक आणि केतकी गेले असता केतकीला समजू न देता शौनक काकांसाठी एका कागदावर काहीतरी लिहितो..ते का? आणि असे काय लिहितो...आणि काकांची भूमिका अगदी शेवटी लक्षात येते ती कशी....???
नक्की वाचा
नाव -: शोध
लेखक -: मुरलीधर खैरनार
प्रकाशक -: राजहंस प्रकाशन
May 17, 2017
(लेखक – दिलीप प्रभाकर गडकरी) – युनोतर्फे २००५ साली केलेल्या पहाणीनुसार जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वर नाम भाषा १८९३ साली निर्माण झाली आणि २८ सप्टेम्बर १९१८ रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्ष वापरली, ह्या पंचवीस वर्षात त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. ही सुध्दा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय ?
October 22, 2019
एका मुलाच्या शाळेतून पालकांना चिठ्ठी येते. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकांने येऊन भेटायला सांगितले असते. आई वडील शाळेत जातात. मुख्याध्यापिकांना भेटतात. त्या पालकांना सांगतात “तुमचा मुलगा स्लो लर्नर आहे. त्याला तुम्ही दुसऱ्या शाळेत घाला.
June 17, 2024
खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल.
October 20, 2018

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला.
May 10, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti