वेडा मगर आणि हुशार कोल्हा

समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.



समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं. मगराने झाडाचे शेंडे कापून नेले. पण घरी गेल्यावर त्यात एकही बटाटा मिळाला नाही. कारण बटाटे मातीच्या खाली जमिनीत लागतात आणि झाड-पाला जमिनीच्या वर असतो. मगर परत शेतावर गेला.

तिथे कोल्हा माती खणून बटाटे काढण्यात मग्न होता. मगराला आपली चूक कळली. पुढच्या पिकाच्यावेळी शहाणं व्हायचं त्याने ठरवलं. पुढचं पीक भाताचं घेतलं. मगर म्हणाला, “कोल्हेदादा, यावेळी पिकाचा खालचा भाग माझा, वरचा तू घे.” करार झाला. पुढे भाताचं पीक तयार झालं. कोल्ह्याने वरचं पीक कापून नेलं. त्याला कणगी भरून भात मिळाला. मगर शेतात जाऊन जमीन खणू लागला. तिथं त्याला काहीचं मिळालं नाही. पुन्हा त्याला आपली चूक समजली. आता मात्र मगर निधारपूर्वक म्हणाला, “पुढच्या पिकाच्यावेळी वरचा भाग माझा, खालचा तुझा.” कोल्ह्याने संमती दिली. पुढचं पीक घेतलं उसाचं. पीक तयार झाल्यावर मगराने शेंडे कापून नेले. पण एका शेंड्याला धड चव नाही. नुसती हिरवी पानं. कोल्ह्याने बुडखाच्या गोड ऊसावर ताव मारला. ते पाहून मगराला राग आला आणि म्हणाला, “कोल्हे दादा, तू दादा कसला, लबाड, भामटा आहेस. तुझ्याबरोबर यापुढे मी शेती करणार नाही.” तेव्हा पासून मगराची आणि कोल्ह्याची शेती संपली. आता कोल्हा लबाड की हुषार हे ज्याचे त्याने ठरवायचे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →