(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी !

    डॉ आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुळकर्णी, उत्तरा बावकर, अमृता सुभाष सारेजण माउलींच्या बोटाला धरून “दिठी ” दाखवितात. राहता राहिला “किशोर कदम ” ( सौमित्र). त्यालाही “अनुभवावे.” इतका उच्च कोटीचा अभिनय अभावानेच पाहायला मिळतो. तो रामजीमय झालाय. उण्यापुऱ्या एक तास सत्तावीस मिनिटांनी आपण आधीचे राहिलेलो नसतो.

      July 26, 2021


  • सांजवेळ निवृत्तीची, विरक्तीची (ललित)

    बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना.
    इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता.
    उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती.
    सगळीकडे फुललेल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या.
    सर्वप्रथम ज्येष्ठ वयोवृद्ध काकासाहेब आणि काकींनी उभयतांचं स्वागत केलं.
    त्यानंतर आश्रम व्यवस्थापकांचं स्वागतपर परंतू सकारात्मक भाषण झालं.अनुभव कथन,मौज मजा मस्ती ह्यावर प्रत्येकानी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
    सजीव चित्ररथातून जगण्याचा मुलमंत्र दाखवण्यात आला.आणि शेवटी मिष्टान भोजनाचा आस्वाद,मुखशुद्धी होताच नविन समाविष्ट झालेल्या दाम्पत्याला पायघड्या घालून त्यांंच्या खोलीत रितसर पोचवण्यात आलं.
    एक एक करून सगळेच ज्येष्ठ आपापल्या खोल्यांमधे परतले.

    संध्याताई,सुधाकरराव आज एकवर्षापुर्वी आयुष्याच्या सांजवेळी बरोबर तिन्हीसांजेला या आश्रमात आले होते.
    निराश मनाला,हताश जगण्याला नवसंजिवनी मिळाली ,ती ह्याच आश्रमात .
    आज मात्र दोघेही या आश्रमाचे सुत्रधार होते. सांजवेळेला प्रभातवेळेत बदलवण्याचं कसब ते शिकवण्यात तरबेज झाले होते.स्वत:चे दु:ख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रु पुसावे ह्याचं साधं सरळ सोपं सुत्र ते साऔजवेळी सगळ्यांना शिकवत होते.
    ही "मंतरलेली सांजवेळ" आज सगळ्यांनाच हवी हवीशी होती.

    सौ.माणिक शुरजोशी.
    नाशिक

      January 10, 2020


  • रे हिंद बांधवा !

    रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
    अश्रू दोन ढाळी
    ती पराक्रमाची ज्योत मावळे
    इथे झाशीवाली । धृ ।।

    तांबे कुलवीरश्री ती
    नेवाळकरांची कीर्ती,
    हिंदभूध्वजा जणु जळती
    मर्दानी राणी लक्ष्मीबाई
    मूर्त महाकाली ।।१।।

    घोड्यावर खंद्या स्वार,
    हातात नंगी तरवार
    खणखणा करित ती वार
    गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित
    बीर इथे आली ।।२।।

    कडकडा कडाडे बिजली,
    शत्रुचि लष्करे थिजली,
    मग कीर्तीरुप ती उरली,
    ती हिंदभूमीच्या पराक्रमाची
    इतिश्रीच झाली ।३।।

    मिळतील इथे शाहीर,
    लववितील माना वीर
    तरु, झरे ढाळतिल नीर
    या दगडा फुटतिल जिभा
    कथाया कथा सकळ काळी ।!४॥।

    रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
    अश्रू दोन ढाळी
    ती पराक्रमाची ज्योत मावळे
    इथे झाशीवाली ।।५।।

      June 11, 2026


  • यमुना तीरे एक आठवण / (दिल्लीतली यमुना काल आणि आज)

    दिल्लीत आज वाहणाऱ्या यमुनेत ९०% टक्के पाणी नाल्यांचेच आहे. भारी-मनाने घरी परतलो. कालियनागाची कथा आठवली. यमुनेच्या डोहात कालियनागचे वास्तव्य होते. गाई-म्हशी पाणी पिऊन मरू लागल्या होत्या. एकदा खेळता-खेळता बालगोपाळांचा चेंडू नदीत पडला. चेंडू आणायला कृष्णाने यमुनेत उडी टाकली व कालियनागाला पराजित करून यमुनेपासून दूर केले. त्या वेळी कृष्ण होता पण आज यमुनेचे रक्षण कोण करणार?

      June 19, 2011


  • बाकावरचे दिवस

    पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा. त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच. तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे. आम्ही निरीक्षण करायचो. एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते. आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते. आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो. कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे.

      April 18, 2021


  • चूक

    विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता.

      February 25, 2016


  • ज्ञानगंगेच्या प्रवाहात

    भावाचे शूज थोडे जरी फाटले तरी त्याला शिवू देत नाही तर लगेच नवीन घेऊन देते. शिक्षणात मी त्याच्यापेक्षा हुशार असून मला शिक्षणापासून वंचित केलंस आणि तो दहावीत तीनदा नापास होऊन सुद्धा पुढील शिक्षण घेतोय. काय पाप केलेय गं मी म्हणून तू मला अशी शिक्षा देत आहेस? का मला दहावीनंतर शिकता आलं नाही?

      July 15, 2022


  • रडत राऊत बखर

    "शके १९७८ च्या माघ महिन्यात दख्खन प्रांतात धामधूम उडाली होती. उधोजी राजांच राज्य खालसा करण्यासाठी आदिलशहा दहा लाखाची फौज घेऊन पुन्हा एकदा जातीने उतरला होता. आदिलशाही फौजेचं नेतृत्व देवा फडणविस नावाचा विदर्भातील ताज्या दमाचा सरदार करत होता.देवा फडणविस साध्या शिपायापासुन बारगीर, हवालदार , मनसबदार अशा पायऱ्या चढत चढत सेनापती पदापर्यंत पोहचला होता तर उधोजी राजांना राज्य वंशपरंपरागत मिळालेलं होतं. फडणविसाच्या दिमतीला शेलार मामा, विनोदराउ तावडा, किरीट बहाद्दर सोमय्या आदी बिनीचे शिलेदार होते. उधोजींची सारी मदार बाळ आदित्यराजे आणि समुद्री वारे अंगावर झेलत मोठा झालेला आगरी नाखवा मिलिंद नार्वेकरावर होती. घोडदळ, पायदळ, तिरंदाज, गोलंदाज अशी दोन्ही बाजूने जय्यत तयारी झाली होती.

    नाशिकचा सुबेदार आणि उधोजींचा धाकटा भाऊ राजोजीने रसद आणि कुमक पाठवू का असा सांगावा घेऊन आपला पेशवा बाळाजी नांदगावकरनाथ राजधानी मातोश्री वर पाठवला पण उधोजी राजेंनी राजोजीसाठी "गर्दीस मेळल्यावीना तोंड देखिल दाखवू नकोस" असा उलट निरोप देऊन बाळाजीची बोळवण केली. पेशवा बाळाजी डोळ्यात अश्रु घेऊन राजगडावर परतला.

    ...............आणि एकदाची दोन्ही फौजांची गाठ साष्टीच्या बेटाजवळ पडली.एकच गर्दी झाली. गनिम चारी बाजुने हल्ला करू लागला पण उधोजी राजांनी स्वतः तोफेला बत्ती देऊन शत्रुला भाजुन काढुन बेजार केले. दक्षिण दिशेचा एक बुरुज लढवताना बाळ आदित्यच्या हल्ल्यात शेलार मामांचा धाकला बंधू ठार झाला हि खबर ऐकताच पिसाळलेल्या शेलारमामांनी ' तुमचा बाप इकडे मरुन पडला आहे आणि तुम्ही कुठे पळता' असं ओरडत उधोजींचा जवळचा सरदार राहुल शेवाळा याला जायबंदी करुन आपला बदला घेतला. अटीतटीची लढाई झाली.

    दुपार पर्यंत हाडा मांसाचा चिखल झाला.रक्ताचे ओघळ पार दर्यात जाऊन मिळाले. कोणीच मागे हटत न्हवते. पण संध्याकाळ पर्यंत चित्र पालटू लागले. शत्रूने आपल्या राखीव फौजा बाहेर काढल्या आणि मराठी फौजा शत्रुच्या संख्येपुढं धाप टाकू लागलं.किती मोती गळाले आणि किती माणकं गर्दीत मिळाली याची मोजदाद करणं कठीण होऊन बसलं. प्रत्यक्ष रणांगणावरील खबर घेऊन जासुद टाकोटाक मातोश्री वर पोहचले. खलबतखान्यात आपल्या अष्टप्रधान मंडळासह बसलेल्या उधोजींना खबर देताना जासुदांना देखिल अश्रू आवरत न्हवते.

    'राजं सध्या शिबंदी आणि रसद कमी आहे. गनिम अरबी घोडे आणि फिरंगी तोफांच्या जोरावर एकेक ठाणी काबीज करत चालला आहे. आपल्या जवळ हौसला आणि जिद्द भरपुर परंतु आत्ताच मराठी सैन्याजवळ खाण्यासाठी शिववड्याशिवाय काही उरले नाही, आदिलशाही फौजा ढोकळा फाफडा खाकरा खाऊन मस्तवाल झालं आहे. आपल्याला नुसत्या इरशिरीवर युद्ध जिंकता येणार नाहीच, पण अजून थोडा वेळ युद्ध चाललं तर आहे तेवढं राज्य सुद्धा हातातुन जाईल त्यामुळे आता आदिलशहा बरोबर सलाह करावा वेळ येईल तेव्हा आदिलशहाला बघुन घेऊ' असा पोक्त सल्ला उधोजींना अष्टप्रधान मंडळाकडून मिळाला.

    मोठ्या कष्टाने आणि दुःखी अंतकरणाने आई भवानीला साक्षी ठेऊन उधोजी राजांनी सल्ला मनावर घेतला कारण पुनवडी, वसई, वऱ्हाड, विदर्भ येथील सगळ्या किल्ल्यांना शत्रू गिळंकृत करून बसला होता. पुन्हा उभं रहायचं असेल तर आत्ता जगणं महत्वाचे होते." बचेंगे तो और लडेंगे" म्हणणारा दत्ताजी त्यांना आठवला आणि .................

    सालीना चाळीस हजार होन उत्पन्न असलेली साष्टीची बेटं उधोजी राजांना आणि खानदेश वऱ्हाड बारा मावळासह तीन लाख होनांचा प्रदेश आदिलशहाला या बोलीवर शके १९७८ साली तह यशस्वी पार पडला."

    रडत राऊत बखर

    तुषार दामगुडे
    ( खोटा इतिहासकार )

      March 11, 2017


  • दिव्याची अमावस्या

    बाहेरचे दिवे किती लखलखत असले तरी समयीतील मंद. पवित्र ज्योत एक वेगळाच आनंद देते. नुसताच आनंद नाही तर एक फार मोठे सत्य सांगते. सगळीकडे अंधार झाला की माणसाच्या मनात देखिल नको ते विचार येतात. अधांराची भिती वाटते मन अस्वस्थ होते. आणि एक छोटीशी मिणमिणता दिवा लावला तरी धैर्य येते. आत्मविश्वास वाढतो.

      December 27, 2021


  • माणसांना उभे करणारे शब्द !

    ” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी –

      March 3, 2022