नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
संसारात पण घरच्या कर्त्या माणसाने अगदी घट्टपणा म्हणजेच खबींर मजबूत मनाचा असेल तरच वरच्या पाळी प्रमाणे आपल्या सर्वांच्या सुखासाठी. समाधानासाठी राबणारी मरमर करणारी उसंत न घेता न दमता भिंगरी प्रमाणे फिरणारी तिला साथ दिली तर सर्वांचे कल्याण. आणि नंतर पण निगुतीने पीठ एकत्रित करून भरावे लागते. सर्वांना बांधून ठेवले तरच. वेग. स्पर्धा. गरजेपेक्षा जास्त. योग्य वेळी योग्य निर्णय असे शिकवतात दळण. त्यामुळे कस दळाव हे कळायला हवे.नाही तर काय होईल ते तुम्ही ठरवा पीठा ऐवजी सगळेच अर्धवट. श्रम करताना दमणे आलेच अशा वेळी चिडचिड. त्रागा. दुसर्यांना दोषी ठरवणे हे मात्र होऊ नये म्हणून दळिता कांडिता तुज गायीन अनंता यासाठी ओवी.चांगले विचार. अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासाठी..
September 7, 2022

आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते.
October 6, 2019
November 21, 2022
ज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती.
September 25, 2013
मामांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. मामांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत मामा निघाले.
संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. मामांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’
भाचा मामांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २० मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता.
घरी पोहोचल्यावर भाच्याने मामांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी मामा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून मामा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले.
घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. मामांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. मामांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले.
मामांना हे सर्व पाहून प्रचंड आश्चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद ? मामांना प्रश्नच पडला.
चहा घेऊन मामा निघाले. भाचा मामांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता मामांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’
त्यावर भाचा म्हणाला, ‘‘मामा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत.
हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.
‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’
February 11, 2018
मुले हेच घराचे बहुमोल अलंकार ,मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती ,मुले म्हणजे देवाघरची फुले अशा अनेक घोषणा आपण आज पर्यंत एकात आलो आहोत. पण बालसाहित्य निर्माण करून मुलांच्या सर्वांगीण विकास होऊन वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून बालकुमार साहित्य चळवळ निर्माण करणारे थोर बालसाहित्यिक म्हणजे अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ !
July 26, 2020
त्यांना मदत करणाऱ्या वाहन चालकांना हे ठाऊक नव्हतं , की हाही एक धंदा आहे . कारण ते पाणी पैसे देऊन निघून जात होते .
मनातून सुखावत होते . आपण माणुसकी दाखवली या आनंदात ते जात होते . लोकांच्या भावनेचा धंदा करता येतो आणि लोक फसत राहतात , हे पुन्हा पुन्हा जाणवत होतं .
February 4, 2026
संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते.
April 12, 2022
पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले..
December 12, 2023
जादूगार रघुवीर यांनी, त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये ७,०२३ जादूचे कार्यक्रम केल्यानंतर १९७७ साली निवृत्ती स्वीकारली. त्याआधी त्यांनी १९६७ साली, भिकारदास मारुती जवळ ‘जादूची शाळा’ नावाचा, वरती जपानी पॅगोडा असलेला तीन मजली बंगला बांधला. तिथे जादूचे प्रयोग शिकविणारी संस्था सुरु केली. देशातील व परदेशातील कित्येकांनी इथे जादू शिकून घेतली.
June 13, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti