नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं. नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते. ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते. तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल.
January 17, 2022
इन्स्पेक्टर राघवचे अंडरवर्डचे नेटवर्क जबरदस्त होते.गुप्तहेर संघटनेचा सिक्रेट मेसेज आलेच होता. काहीतरी गडबड होणार याची त्याला जाणीव होती. ड्रग्स ,सोने किवा हत्यारे मुंबई पास करण्याची शक्यता होती. हल्ली कल्पनाही करता येणार नाही अशे रुट्स हे स्मगलर्स वापरत आहेत. राघवने आपल्या इंफोर्मेर्सना ‘लक्ष’ठेवण्यास वार्न केले होते.
September 6, 2018
किती छोटीशी गोष्ट असते, शुभेच्छा देणं! शुभेच्छा मिळाल्या की प्रसन्न वाटतं… कुणाला तरी आपली आठवण आहे, याचा आनंद होतो. हुरूप येतो. राजकारणी लोक आणि व्यापार-व्यवसायातले शुभेच्छा देण्या-घेण्यात तरबेज असतात. मोठमोठी होर्डिंग्ज लावतात आणि शुभेच्छांच्या बदल्यात मोठमोठ्या हॉटेलमधून पार्ला देतात.
December 29, 2023
१९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
July 2, 2022
प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर?
January 8, 2022
आज ऐन सनासुदीचं आभाळ आलं व्हतं, तळहाताच्या फाॅडावाणी जपलेलं आमच्या रानातलं ह्ये पिवळं सोनं उघड्यावरच व्हतं, आमच्या रानातला समदा कारभार हाकणारं आण्णा आन् दादा ह्येन्ला एकच चिंता पडली. आता सनासुदीमुळं लेबर मिळायचंबी आवघड झालतं मग काय तोंडातला घास पावसात भिजुनी म्हणुनशान घरातल्या समद्या पावण्या रावळ्यांसहीत मी आन माझं भाऊबंद निघालोकी रानात. आमचं दादा आन् आण्णा सकाळपसुनच रानात व्हतं, सोयाबिनिची रास लाल तळवटावर शिग लावुन बसली व्हती. सुतळी गोण्या, चार घमेली, रूपेश, सुजित, युवराज, स्वप्निल ही पोरं गवतावनी झटली आन् समदं सोयाबिन आवघ्या तासाभरात शिलपॅक करून टाकलं. ऊशिराची पेर आसल्यानं मधल्या पावसाच्या रपाट्यातुन आमचं सोयाबिन थोडक्यात वाचलं व्हतं. चार एकरात ईनबिन ईस किंटल सोयाबिन पदरात पडलंय, शेतकऱ्याचं ह्ये पिवळं सोनं बाजारात मातुर कवडीमोल किंमतीनं ईकलं जाणाराय ह्यजी खंत वाटतिया.
रानातलं ह्ये सोयाबिन ईकल्यावर ह्यज्यापसुन सोया दुध, सोया पनिर, सोया टिक्का, सोया चिल्ली, सोया ऑईल आसली डझनभर उत्पादनं तयार व्हत्याली पण ह्ये सोयाबिन मातीत पिरून त्याला कोरड्या आन् वल्या दुष्काळाच्या हाबाड्यातुन वाचवुन, घरातल्या समद्या माणसानी जे जिवाचं पाणी केलंय त्याचा दाम मातुर त्येन्ला मिळणार नाय ह्यजंच वाईट वाटतंय. माझ्या फिरस्तीमुळं मला शेताकडं जास्तीचं लक्ष देता येत नाय पण जितबी कुठं कोणत्याबी ईषयावर बोलायला जातो तवा शेतकऱ्याचं दुःख मांडल्याबिगीर माझं व्याख्यानच पुरं व्हत नाय. शिवटी समदं ईषय रानातल्या मातीत सुरू हुन मातीतच संपत्यात मग त्या मातीला माझ्या बोलण्यातुन आन् लिव्हण्यातुन जित्तं करणं ह्ये तर माझं कर्तव्यच हाय की.
ईस किंटल सोयाबिन पोत्यात भरणं म्हंजी माज्या सारख्या कधीतरी शेतात राबणाऱ्या माणसासाठी जरा ओव्हरलोडंच काम म्हणायचं. उद्या व्याख्यानाला उभा राहील्यावर आंगतला ह्यो दर्द शब्दांच्या रूपानं भाहीर पडलं हे नक्की. आज बऱ्याच दिसानं माझ्या आंगातुन कष्टाचा घाम आलता. गेल्या कित्येक दिसापासुन मोबाईल पेक्षा जास्त वजन कधी उचलण्यात आलं नाय पण आज साठ किलोच्या गोण्या दादांसोबत उचलताना माझ्यातला पैलवान जागा झालता. वडीलांच्या हातात हात दिऊन शेतात राबताना येगळाच आभिमान वाटत व्हता. खरं सांगतु आपल्या बापासोबत काम करण्यासारखा दुसरा आनंद नाय राव. दुपारपसुनचं ह्ये आमचं कष्टाचं काम सांच्याला समदी पुती शेडमदी टाकुनच संपलं. शेततळ्यावर हात पाय तोंड धुवुन आमच्या टॅक्टरवर बसुन ह्यो सगळा परसंग टाईपीत बसलोय. दिवस मावळलाय, रानातली पाखरं घराकडं निघाल्याती म्या बी फोर्डमधी बसलुय, पोटात मरणीची आग पडलीया; कधी एकदा आईच्या हातची चुलीवरची भाकरं म्हशीच्या घट्टबंड्या दुधात चुरून खातुय आसं झालंय.
लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता (रानात)
November 2, 2016

आमच्या घराशेजारी देशमुख आडनावाचे नवीनच कुटुंब राहायला आले. देशमुख पती-पत्नी, त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा आर्यन आणि आर्यनची आजी… राधाआजी.
घरात इनमीन चारच माणसं. आर्यनच्या आजीने घरात लागणारे किराणा सामान इथे जवळ कुठे मिळते याची आमच्याकडे चौकशी करताच आईने त्यांना आमचा दूधवाला, पेपरवाला, किराणावाला, इस्त्रीवाला, केबलवाला यांचे संपर्क नंबर आणि पत्ते दिले. त्यामुळे त्यांचं काम खूपच सोपं झालं. त्यांना ह्या गोष्टींसाठी विनाकारण धावाधाव करावी लागली नाही. पोळ्या लाटण्याच्या कामासाठी आजी जेव्हा बाई शोधत होत्या तेव्हासुद्धा आईनेच आमच्याकडच्या घरकाम करणाऱ्या रखमाबाईंना त्यांच्याकडे काम करण्यासाठी राजी केले. आईमुळे रखमाबाई आढेवेढे न घेता लगेच त्या घरी कामासाठी तयार झाल्या. आजीला किती हायसं वाटले. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या झाल्या. आईला तर त्या कितीतरी वेळ धन्यवाद देत होत्या. आर्यनच्या नवीन शाळेच्या प्रवेशासाठीसुद्धा बाबांनीच मदत केली. बाळूच्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला.
July 3, 2025
नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे. ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती. संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते. “पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥ पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले.
January 24, 2024
झेन गुरु बोकोजू आपल्या शिष्यांना ध्यानधारणा शिकविण्यासाठी जी पद्धत वापरीत असत ती लोकांना थोडी विचित्र वाटे.
एकदा एक राजपुत्र त्यांच्याकडे ध्यानधारणा शिकण्यासाठी आला. बोकोजूंनी त्याला एका उंच झाडावर चढायला सांगितलं.
राजपुत्राचं सारं आयुष्य महालात गेलेलं. झाडावर वगैरे तो कधी चढला नव्हता. शिवाय गुरूने ज्या झाडावर चढायला सांगितले त्याची उंची पाहून तो घाबरला.
बोकोजूंना तो म्हणाला, 'मला झाडावर चढता येत नाही. पडलो तर?'
बोकोजू त्याला म्हणाले, 'झाडावर चढता येणार्यांना झाडावरून पडताना मी काही वेळा पाहिलंय, पण झाडावर न चढता येणार्यांना झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना पडलेलं मी अजून पाहिलं नाही. तू चढ बिनधास्त.'
चढावंच लागेल हे लक्षात आल्यावर राजपुत्र झाडावर चढू लागला.
शे-सव्वाशे फूट उंचीचं झाड होतं ते. गुरुजींनी त्याला पार शेंड्यापर्यंत चढायला सांगितलं होतं. अतिशय सावधपणे तो हळू हळू चढू लागला. त्याला वाटलं होतं की आपल्याला चढताना गुरू मार्गदर्शन करतील. असं कर, तसं करू नको असं सांगत राहातील. पण अधून-मधून जेव्हा त्याची नजर खाली जमिनीवर जाई तेव्हा गुरुचं आपल्याकडे लक्षच नाही हे त्याला जाणवे.
शेवटी एकदाचा तो शेंड्यापर्यंत पोहोचला. मग पुन्हा खाली उतरू लागला. गुरु अजूनही डोळे मिटूनच बसले होते.
राजपुत्र जमिनीपासून साधारण पंचवीसेक फुटांवर आला तेव्हा गुरुंनी त्याला सूचना केली, 'जपून उतर रे!'
राजपुत्र खाली उतरला आणि गुरुजींना त्यानं आपली शंका विचारली.
बोकोजू त्याला म्हणाले, 'तू जेव्हा बिनधास्त होताना दिसलास तेव्हाच मी तुला सावध केलं. जमीन आता जवळ आली असं जेव्हा तुला वाटलं तेव्हाच तुझा तोल जाण्याची शक्यता वाढली होती. झाडाच्या शेंड्याजवळ असताना तू स्वतःच अतिशय सावध होतास. त्यावेळी तुला माझी गरज नव्हती. जमीन जवळ येऊ लागली तेव्हा तुझी एकाग्रता थोडी ढळू लागली. त्यावेळीच तुझ्याकडून चूक होण्याची शक्यता होती. म्हणून मी तुला सावध केलं.'
राजपुत्राला आठवलं, बोकोजूंचं म्हणणं अगदी बरोबर होतं. झाडावर चढताना,शेंड्याजवळ पोहोचताना आणि उतरावयास सुरवात करताना तो अतिशय सावध होता. जमीन जवळ दिसू लागली आणि त्याचा जीव थोडा फुशारला. आता आपली जीत पक्की असं त्याच्या मनाला वाटलं. उतरल्यानंतर गुरुंना काय काय विचारायचं याबद्दलचे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते आणि झाडावरून उतरण्याच्या क्रियेकडे त्याचं क्षणकाल दुर्लक्ष होऊ लागलं होतं. त्याच वेळी गुरुजींचा आवाज त्याच्या कानांवर आला आणि इकडे-तिकडे भरकटणारं त्याचं मन पुन्हा कामावर केंद्रीत झालं होतं.
हे उमजलं अन गुरुजींबद्दल त्याच्या मनातले सारे प्रश्न विरघळून गेले.
-- दीपक गायकवाड
March 14, 2017
एकदा दोन तरुण संन्यासी एका गावाहून आपल्या आश्रमाकडे परत येत होते. आत्मज्ञानाच्या शोधयात्रेमध्ये गुरूचं मार्गदर्शन लाभल्यानं दोघंही खूष होते. गाव मागे पडत होतं. वसाहत कमी झाली. निसर्ग जवळ आला.
April 20, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti