(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक स्पर्श

    संध्याकाळी शिंप्याकडे जायला निघाले होते. रस्ता ओलांडताना मोबाईल वाजला म्हणून बाजूला उभी राहून बोलत होते. बोलता बोलता सहज समोरच्या रस्त्याकडे लक्ष गेले एक वयोवृध्द आजी आजोबा एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. दोन पावले पुढे यायचे की समोरुन भरधाव गाड्या यायच्या आणि ते परत उभे रहायचे असा प्रकार माझे फोनवर बोलून संपले तरी चालूच होता.

      November 27, 2025


  • तु का तो चोर!

    गोपाळ कुणी खाल्ला असेल रे तो पेरू! आई मीच खाल्ला. तुच निरोप द्यायला सांगितले बघ मला सकाळी कि तुमचा कार्यक्रम उद्या दुपारी नवले काकूकडे ठरला आहे हे सांगायला गेलो होतो. काकूला निरोप देऊन परतत असताना पेरूच्या वासाने मला आकर्षित केल.

      May 8, 2021


  • मानसिक तणाव (क्रमशः ८ वर पुढे चालू)

    सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.
    एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे (Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोर्‍यांनी बांधलेला. दोर्‍यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते.

      November 30, 2012


  • स्त्री: विविध अनुभूतींनी परिपूर्ण एक अजूबा

    स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे.

      July 26, 2023


  • पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-अ /११

    आधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें,

      August 6, 2017


  • दळिता कांडिता

    संसारात पण घरच्या कर्त्या माणसाने अगदी घट्टपणा म्हणजेच खबींर मजबूत मनाचा असेल तरच वरच्या पाळी प्रमाणे आपल्या सर्वांच्या सुखासाठी. समाधानासाठी राबणारी मरमर करणारी उसंत न घेता न दमता भिंगरी प्रमाणे फिरणारी तिला साथ दिली तर सर्वांचे कल्याण. आणि नंतर पण निगुतीने पीठ एकत्रित करून भरावे लागते. सर्वांना बांधून ठेवले तरच. वेग. स्पर्धा. गरजेपेक्षा जास्त. योग्य वेळी योग्य निर्णय असे शिकवतात दळण. त्यामुळे कस दळाव हे कळायला हवे.नाही तर काय होईल ते तुम्ही ठरवा पीठा ऐवजी सगळेच अर्धवट. श्रम करताना दमणे आलेच अशा वेळी चिडचिड. त्रागा. दुसर्‍यांना दोषी ठरवणे हे मात्र होऊ नये म्हणून दळिता कांडिता तुज गायीन अनंता यासाठी ओवी.चांगले विचार. अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासाठी..

      September 7, 2022


  • ग्रीष्माचे दोन रंग

    वास्तविक वर्षभर गुमान गप असणारा गुलमोहर उन्हाळ्यात राजासारखा तेजपुंज  दिसू लागतो. गुलमोहराची  विशेष अपेक्षाही नसते. त्याची वेगळी निगा राखावी लागत नाही.तो कुठेही तग धरतो.मग तो  शेताचा बांध असो, नाहीतर शाळेचे पटांगण असो ,रस्त्याच्या बाजूला असो, किंवा एखाद्या बंगल्याचे आवर असो.उन्हाळ्याच्या रखरखीत पणात काही मोजकी झाडे ज्या दिमाखात वावरतात त्यात एक गुलमोहर.

      November 24, 2019


  • कायमस्वरूपी कचरा आगाराची संकल्पना

    गावातील कचरा पेकण्यासाठी, नगरपालिकांनी निवडलेल्या जागा म्हणजे गावाबाहेरील, शेतीस निरुपयोगी असलेले भूखंड, खोल खड्डे असलेल्या जमिनी किंवा अुथळ पाणी असलेल्या खाड्या असतात. गावातून गोळा केलेला घनकचरा, या जमिनींवर भराव म्हणून अुपयोगी पडतो. काही वर्षांनी, या जमिनी पूर्ण भरल्या म्हणजे नगरपालिका, घनकचरा टाकण्यासाठी दुसरा अेखादा भूखंड निवडते. हे चक्र, वर्षानुवर्षे अव्याहतपणं चालणं अशक्य आहे.

      February 7, 2022


  • अति राग

    सीमा एक शिक्षिका. शांत आणि समाधानी. एका कडक शिस्तीच्या मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबातील. कसलेही लाड नाहीत. आवडनिवड सांगायची नाहीत अशी कडक शब्दात तंबी दिली जायची. घरामध्ये सगळ्यांना कपडे आणणे हे चुलत्याचे वडील होते वयाने म्हणून. नवू वारी साड्यांचे जोड. झगे. परकर पोलक्या साठी दोन रंगाची छिटाचे तागे. मुलासाठी खाकी व दोन रंगाचे कापड. धोतर जोड असे एकदम यायचा बस्ता आणि ज्याला जे दिले जायचे ते मुकाट्याने घेणे. अशा वातावरणात वाढलेल्या होत्या म्हणून अगदी साधे सुती फिकट रंगाची काठा पदराची साडी नेसून शाळेत जायच्या. त्यामुळे सगळ्यांना त्यांची आवड आवडायची. पण एकदा काय झालं त्यांचे अहो एका मोठ्या शहरात गेले होते तेव्हा येताना साडी आणली होती. आल्यावर सांगितले साडी आणली आहे तुझ्या साठी. सीमाला खूप आनंद झाला. नवऱ्याने साडी आणली म्हणून. पण घाईघाईत बघू म्हणून पेटी उघडून बघणे हे योग्य नाही अशी शिकवण. मग ती साडी त्यांनी दिल्या वर उघडून पाहिली होती तर.... भडक शेंदरी रंग. त्यावर आडवे काळे पट्टे. आणि निळ्या रंगाची फूले असलेल्या साडीला पाहून खर तर त्यांना कसे तरी झाले. आवडली तर मुळीच नाही. पण तसे दाखवले नाही छान आहे म्हणून ठेवली. दुसर्‍या दिवशी शाळेला जाताना ते म्हणाले नेसून जा आज. त्यामुळे नाईलाजाने आज्ञा पाळली. शाळेत मैदानावर प्रार्थना सुरू झाली. पण प्रत्येक मुलीचे व शिक्षिकांचे लक्ष या साडी कडे. आपले मत लगेच शब्दात सांगण्याची पद्धत नव्हती. म्हणजे जसे आजकाल वॉव काय मस्त वगैरे वगैरे. सीमाच्या लक्षात आले. संध्याकाळी घरी आल्यावर अगदी आठवणीने विचारले काय म्हणाले सगळे साडी पाहून. इथे इगो जास्त होता. मी आणली साडी याचा. सीमा छान आहे म्हणाले सगळे. आणि चांगला मूड मध्ये आहे म्हणून सहज म्हणाली. रंग थोडा हलका असायला हवा होता आणि ते पट्टे नको होते. झालं आकाशपाताळ एक करून तणतणत म्हणाले उद्या सकाळी ती साडी चुलीत टाक. यापुढे तुला कधीही साडी आणणार नाही. झक मारली आणि... बरेच काही बोलून राग व्यक्त केला. आणि खरच आयुष्य भर त्यानी साडी आणली नाही की पैसे सुद्धा दिले नाहीत. उलट कधी कुणी साडी बद्दल सांगितले की लगेच म्हणायचे. मला साडी आणणे समजत नाही. आणि मी आणलेली साडी तिला आवडत नाही..असे म्हणून मोकळे. आता सीमाने कुणाकुणाला खर काय आहे ते.. .
    राग येतो हे खर आहे प्राण्यांना देखिल राग येतो. पण त्याचा अतिरेक करणे. मनात डूख धरणे हे बरोबर नाही. पुष्कळदा

    अशा घटना ऐकण्यात येतात आणि शेवटी ती व्यक्ती आत्महत्या करु शकते. राग येतो पण किती काळ तो मनात ठेवावा याचे भान ठेवले पाहिजे. परत कधी तरी सीमाला तिच्या मनासारखी साडी आणली असती तर. आपण उगाच बोललो ही टोचणी जन्म भर लागून राहिली नसती.दोघांनाही. नवऱ्याने माहेरी पाठवले नाही म्हणून आत्महत्या. अगदी लहान वयात असलेले मुल सुध्दा एखादि वस्तू मिळाली नाही म्हणून आत्महत्या. म्हणजे अतिरागच...
    धन्यवाद

    –सौ. कुमुद ढवळेकर.

      September 3, 2022


  • फोनाप्पा

    आपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा.

      April 8, 2023