(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चिरयौवना..

    समोरचा माणूस गप्प असताना त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, तो बोलू लागला की, ‘कळू’ लागतो ते त्याच्या बोलण्यातून. सवयीनुसार प्रत्येकाचे बोलणे बदलत जाते. काहींना शिवीचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही. त्याउलट संस्कारी माणूस कितीही चिडला तरी अपशब्द बोलूच शकत नाही, त्याऐवजी तो गप्प राहणेच पसंत करतो.

      November 30, 2022


  • जोडवी – भाग १

    विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती…

      December 14, 2022


  • चिट्ठी

    कानाला हेडफोन होते,सहज पंकज उधासचे ‘ वतन से चिट्ठी आयी है ‘ गाणे ऐकत असताना संपूर्ण भूतकाळातच गेलो.
    आज तू इथे नाहीस , आहेस कुठे तरी परदेशात २० वर्षे झाली, सपंर्क नाही.

      December 5, 2021


  • पाटलाचा वाडा

    गोडाती बबनराव काळे 
    हाताळा, हिंगोली

    गावाच्या खालतुन सोंडु पाटलाचा चिरेबंदी वाडा लय दिमाखात उभा व्हता.सोंडु पाटील मंजे मुलखातली नामीगिरामी आसामी व्हता.तरूणपणात बारा गावचे आखाडे पाटलानं आपल्या खिशात घातले व्हते.घरी शंभरक एकर जमीन,दहा बारा बैल जोड्या,पाच पंचेविस दुभते जनावर आन पन्नासेक एकर फळबाग आसा गड्याचा जुमला व्हता.सोंडु पाटील मंजे लयच ईरसाल आसामी व्हता.मनल तं साधा भोळा,नाय तं खुनशी,कपटी, पक्का धुर्त आन मुरलेला राजकारणी व्हता.तसेच त्यो रगेल आन रंगेलबी व्हता.आख्ख गाव त्याच्यापुढं सळसळ करायच.सोंडु पाटलान नुसते डोळे जरी वटारले तरी सगळा गाव चिडीचूप व्हयाचा,एवढी धमक आन दरारा व्हता त्याच्यात.मंधल्या काळात बाईचाबी नांद लागल्याच ऐकीवात व्हतं.शेजारच्याच गावच्या मंजुळा नावच्या कोल्हाटणीवर त्याचा लय जीव जडला व्हता.बाईचा नांदच लय वेगळा आसतो.नांदानंदात गड्यानं मंजुळेल तमाशाच्या फडावरून उचलुन डायरेक आपल्या शेतातल्या आखाड्यावर ठुल व्हतं.असो तं पाटलान आपल्या खाजगी जिवनाल कव्हाच आपल्या सार्वजनिक जिवनावर हावी व्हवु देल नाही.

      July 3, 2025


  • देखल्या देवाला दंडवत

    एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्‍हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्‍हाईकांकडे घेऊन जात असे.

    कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या गावाकडे जायला निघाला. रस्त्याने जाता-येता भेटणारे लोक गाढवावरील मूर्तीकडे पाहून हात जोडत होते.

    गाढवाला वाटले सर्व लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत. त्यामुळे गाढव सुखावले व आणखी ऐटीत चालू लागले. अनेकदा मान हलवून लोकांच्या नमस्काराचा स्वीकार करू लागले. त्या गावी पोहोचल्यानंतर कुंभाराने ती मूर्ती ज्याची होती त्याला दिली व त्याच्याकडून पैसे घेऊन तो पुन्हा आपल्या गावी निघाला.

    रस्ता तोच होता. त्या रस्त्यावर पूर्वीचेच लोक होते, मात्र त्यापैकी कोणीही आता गाढवाची साधी दखलही घेत नव्हते. कारण गाढवाच्या पाठीवर आता मूर्ती नव्हती. लोकांनी आपल्याला नमस्कार करावा म्हणून गाढव हळूहळू चालू लागले, तसेच अधूनमधून ओरडू लागले. मात्र त्याचा लोकांवर कसलाच परिणाम होत नव्हता.

    गाढवाची मंद चाल कुंभाराच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या जवळची काठी गाढवाच्या पाठीवर सपदिशी मारली आणि तो हसून म्हणाला, “लोकांना देखल्या देवाला दंडवत घालण्याची सवय असते हे तुला 'गाढवाला' कसे कळणार ?”

    काठीचा मार पडताच गाढव निमूटपणे रस्त्यावरून वेगाने चालू लागले.

      July 24, 2016


  • आभाळाचे खांब : १

    अन्यथा जात, पात, धर्म, पंथ, राजकारण आणि स्वार्थ यात गुंतून गेल्यानं नव्या पिढीच्या डोक्यावरचं आभाळ हरवून जायला वेळ लागणार नाही आणि मग काळ कुणालाही क्षमा करणार नाही!

      October 22, 2020


  • उपऱ्यांची माती !

    मुंबईच काय, महाराष्ट्रातील सर्वच महानगरे आता उपऱ्यांची वसतिस्थाने झालेली आहेत. मला मात्र अजूनही कोणी “पुणेरी किंवा पुणेकर” असं संबोधलं तर आवडत नाही. ताडकन माझा “खान्देशी बाणा ” उफाळून येतो.

      March 29, 2022


  • माणुसकीचा झरा

    मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे.
    माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था होते काय, हे बघण्यास घराबाहेर पडलो. तेव्हा आम्ही मुलुंड (पू.) मध्ये रहायचो. आम्ही नाव नोंदविलेले प्रसृतीगृह मुलुंड (प.) ला होते. मला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी मिळाली नाही. शेवटी आसपासच्या दोन-तीन रिक्षावाल्यांच्या घरी गेलो; पण त्यातील दोघे जण गावाला गेले होते. तिसरा म्हणाला, की त्याची रिक्षा नादुरुस्त आहे. मला खूपच दडपण आले. शेवटी मी पूर्व महामार्गावर उभा राहिलो. दिसेल त्या वाहनाला थांबण्याची विनंती करीत होतो; पण कोणीही आपले वाहन थांबविण्यास तयार नव्हता. त्यात त्यांची तरी काय चूक होती म्हणा! त्या उत्तररात्री वाहन थांबविण्याचा धोका कोण पत्करेल? इकडे माझ्या पत्नीचा व आईचा काळजीयुक्त, वेदनायुक्त चेहरा दिसत होता. इतक्यात मुलुंड चेक नाक्यावरून एक मारुती मोटर आली. मी तिला हात केला. आश्चर्य म्हणजे ती थांबली. मी त्यांना माझी असहाय्य व अगतिक परिस्थिती विशद केली. ते गाडी घेऊन माझ्या घरी आले.

    घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, ``मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला

    केव्हाही हाक मारा.'' माझ्या स्वतवर विश्वासच

    बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, ``करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.'' दुसर्‍याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.

    मनात विचार केला, की तो जर देवरूपाने मला भेटला नसता, तर आमची काय अवस्था झाली असती? तेव्हाच मी ठरविले, की आपल्याला संधी मिळाली तर आपणही दुसऱयांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी निरपेक्षपणे मदत करून सात्विक समाधान प्राप्त करून घ्यायचे.

    -- किशोर कुलकर्णी

      May 19, 2006


  • स्वॅब

    सकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच.

      February 10, 2024


  • मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

    मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- - -)

    दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून - Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्याच प्रकारचा आघात होत राहतो, परिणाम दिसून येतो.

    मेंदूचे कार्य अर्थात विचार करण्याचे. आणि हे कार्य सतत होत असते. विचारांची उत्पती हे जिवंतपणाचे लक्षण असून, त्यामुळे मेंदूला सतत चेतना मिळत राहते. मेंदूचे हे एक प्रकारे खाद्यच आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये. विचारांचे मार्ग एका दिशेने जाणे चागंले. त्याला लय असते. विचार भरकटत राहणे चांगले नव्हे. मनन, चिंतन, ध्यान creative विचार शोधबुद्धीचे विचार आध्यात्मिक विचार हे मेंदूला एकप्रकारे शांतता देते. त्याला कारण विचारांना एक दिशा, लय असते. विचार जेव्हा विखूरलेले असतात धावपळ करतात असंबध असता आणि सर्वांत निर्माण होणे हे धोक्याचे ठरते. अशी वैचारिक ठेवण शरिराला म्हणजे इतर अवयवांना धोका वा आघात निर्माण करु शकतात. ह्यालाच आपण तणाव म्हणतो. विचार करणे हेच तर मेंदूचे कार्य परंतू जेव्हा तोच तोच विचार सतत घोळत राहतो तणाव निर्माण करतो.

    माणसाला विवेक शक्ती दिलेली आहे. घटनांचे विश्लेषण करणे, त्यामधली सत्यता, नैसर्गिक परिणाम, जीवन चाकोरीवरील त्याचा आघात हे सारे आपण विवेकी विचारांनी ठरवू शकतो.

    होणाऱ्या घटनेत तुमच्या विचार करण्याने काही बदल होऊ शकतो. आणि जेव्हा हे आपल्या मनाला चांगले मान्य होते, तेव्हा तो विचार बाद करणे काढून टाकणे,त्याला प्रयत्नपूर्वक मनात येवू न देणे चांगले. जर तुमची विवेकबुद्धी, समजदारी सुस्थिर असेल तर तुमचे गैरविचार उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही रोखू शकता. अशा विचारांना चालना न देणे, त्याच्या लयीमध्ये न जाणे हे तुमच्या हाती असू शकते. तुमच्या स्वभावाची ठेवण ह्यास कारणीभूत असते. जो स्वभाव तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीने निर्माण केलेला असतो. कित्येकजण प्रत्येक घटनाच्या प्रसंगाच्या मागे जावून त्यांत गुंतून राहण्यात समाधानी होतात. मग त्याचा संबंध नजदीकचा असो वा नसो. त्याच वृत्तीमधून त्या त्या घटनेबद्दल सतत विचार करण्याची सवय जडते. हेच विचारांचे चर्वण शरिराला धोकादायक ठरु शकते. ह्याचा परिणाम म्हणजेच मानसिक तणाव .

    २. एक उदाहरण देतो. कुणाचे १०० रुपये हरवतात तर कुणाचे १००० रुपये हरवतात. हे दोन्ही निश्चित की दोन्ही घटनांनी दुख होईल आणि विचारांच्या लगभगीमुळे तुमचे मन विचलीत होईल. कदाचित, ह्यालाच क्षणिक मानसिक तणाव संबोधता येईल. अशा मानसिक तणावांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी असा तणाव सतत उत्पन्न झालेला असावा केवळ निर्माण झालेला विचार घातक नसतो तर तोच तोच विचार घोळत राहणे हे त्रासदायक असू शकते. येथे तुमचा स्वभाव विशेष असे होण्यास भाग पाडतात, पैसे हरवले ह्या बद्दल थोडीशी खंत करुन आपल्या विश्लेषणात्मक विचारांनी स्वत:ची समज घालतात आणि तो विचार मनांतून काढून टाकतात. ह्या उलट काही पैसे कसे हरवले ह्या बद्दल सतत सर्वांना वाच्यता करुन तोच तोच विषय घोळत राहतात. तणाव म्हणतात तो हाच. पैसे किती हरवले, नुकसान किती झाले ह्यावर मानसिक तणाव अवलंबून नसतो.

    निसर्गाने त्याच्या चक्रात अनेक लहान मोठे आणि काही तर भयावह प्रसंग निर्माण केलेले असतात. परंतू त्याचवेळी स्व सान्तवन, समजदारी प्रसंगामधून पुन्हा उभारी येण्याची कला माणसाला दिली आहे. अशी कला ही उन्नत करावी लागते. त्याचवेळी कोणत्याही दुर्धर प्रसंगाची धार बोथट होऊ शकते. सुसह्य होवू शकते. अशाच वृत्तीची माणसे मानसिक तणावापासून आपला बचाव करु शकतात.

    १०० रु याच्यापेक्षा १००० रु हरवणे म्हणजे जास्त मानसिक तणाव हे वैद्यकिय शास्त्रामध्ये साधे अंकगणित नव्हे. किती रुपयाच्या हानीचा विचार कितीवेळा हेच गणिताचे उत्तर ठरवितो.

    थोडेसे वैद्यकिय विश्लेषनाकडे जावू या. मेंदूमध्ये विचार करण्याचे एक अवयव असते. ते सतत चेतना मिळून कार्यरत असते. म्हणून विचार धारा सतत वाहत असते. जसे ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छवास, तसेच मेंदूचे विचार कार्य सतत Non-Stop चालू असते. अगदी झोपेमध्ये -विचार उत्पन्न होतो, पसरतो आणि नाहीसा होतो. ही समजण्यास सोपी चक्र- रचना. विचारांची साठवण होत जाते. काळाप्रमाणे व प्रसंगाच्या तिव्रतेनुसार आठवणी लोप पाऊ लागतात.

    जर विचार मंथनाचा आलेख काढला, तर हे एक सत्य आहे की विचार उत्पन्न होताच, तो पूर्णतेने आघात करतो. मग त्याला उत्पन्न करणारी चेतना कितीही छोटी असो. ग्राफ काढला तर काटा प्रत्येक विचार चेतनेला प्रथम सर्वोच्य जागी नेतो. व नंतर पायापाशी येत असतो. लहान चेतनेचा विचार आलेख चटकन पायाजवळ जाईल व जर चेतना फार प्रभावी असेल तर तीला पायाजवळ येण्यास वेळ लागेल. अर्थ असा की १०० रु. हरवले हे दोन दिवसांत विसरले जातील. वा १००० रु हरवलो हे चार दिवसात (समजण्यासाठी)

    ३. मात्र दोन्ही चेतना उत्पन्न होताना, विचारातील सर्वोच्य जागी गेल्याचे दर्शविले. जेव्हा विचार उत्पन्न होतो, तेव्हा तो प्रथम सर्वोच्य बिंदू गाठतो. असेच विचार सतत उत्पन्न होत राहतील तर प्रत्येक वेळी ते सर्वोच्य बिंदू गाठत राहतील. येथे मानसिक तणावाचा संबंध येतो. सतत तोच तोच विचार करण्यामुळे, विचार चेतना सतत जागृत राहते. हेच धोक्याचे ठरु शकते. त्यालाच मानसिक तणाव निर्मिती म्हणतात. तुमची वैचारिक ठेवण कशी असते, तुमच्या स्वभावाची ठेवण कशी तयार झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वैचारिक घटनांची सतत उजळणी करण्याचे त्या घटनांचे विश्लेषण करीत राहण्याचे काहींचे स्वभाव बनलेले असतात. अशी माणसे विचारांच्या विश्लेशनात्मक बाबींना फारसे महत्त्व देत नसतात. ते भावनिक बाबींना सतत समोर आणून भावनिक विश्लेषण करीत राहतात. त्यामुळे अशी माणसे तो विशिष्ट विचार मनातून दूर शकत नाहीत. स्वत:ला असमर्थ ठरवितात. विचार केला तर अशा भावनिक बाबींवर विचारला व्यवहारिक दबावाने, सत्य परिस्थितीचे अवलोकन करुन छेद देणे अशक्य नसते. ते अशी माणसे करीत नाहीत. अशानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

    मी माझे एक मित्र बघितले मी. वैद्य ते आणि मी गेली पाच वर्षे सततच्या सहवासात आहोत. दररोज संध्याकाळी भेटतो. बागेत फिरण्यास जातो. गप्पा-टप्पा होतात. सामाजिक विषय, राजकारण, देवधर्म बदलत जाणारा समाज, भूतकाळातील नोकरी व्यवसाय ह्यामधल्या रोमांचित प्रसंग इत्यादी विषयावर सततच्या गप्पा गोष्टी होत असतात. कुटूंब वा वैयक्तीक जीवनावर केव्हाच भाष्य होत नाही. संध्याकाळची निरामय वेळ कशी घालवावी व आनंद घ्यावा ही सर्वसाधारण धारणा.

    एका प्रसंगामध्ये मी सहज विचारणा केली, वैद्य साहेब आपण कुठे राहता? त्यांनी सोसायटीचे नाव सांगितले. घरी कोण कोण असते? आम्ही दोघेच. मी व माझी पत्नी. तुम्हाला काही मुले? मी चौकशी केली. वैद्य एकदम गप्प झाले. “नशीब आमचे, २७ वर्षांचा मुलगा होता. तरूण मुलगा, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला.

    आमच्याकडे राहयचा. दुर्दैवाने अपघात झाला व त्यातच तो खलास झाला.” वैद्यांचे डोळे पाणावले होते. आज त्याला जाऊन तीन वर्षे झाली. ते खिन्न मनाने सांगत होते.

    स्वत:चा एकूलता एक मुलगा, तरूण जीवनाच्या चक्राला हातभार लावणार आणि काळाच्या आघातामध्ये एकदम पडद्याआड होणे ही किती भयावह व दुख:द घटना आहे. मला नाही वाटत ह्या घटनेपेक्षा कोणत्याही घटनेची तिव्रता जास्त भयावह व परिणामर करणारी असू शकेल. परंतू एक गोष्ट मला जाणवली की माझा व वैद्यांचा सहवास पाच वर्षांपासून सततचा होता. परंतू तरीही मला ह्या घटनेची केव्हाच चाहूल लागली नाही. त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. न कोणता प्रसंग निर्माण झाला की ह्यांनी ती मला इतरांना सांगावी.

    ४. ह्यालाच स्वभाव विशेष म्हणतात. घटना घडली, तुफान निर्माण झाले, ते वादळच होते. थोड्याशा वेळेनंतर स्थिरस्थावर झाले. वैद्य रडले असतील, ओरडले असतील, त्यांची झोप, भुक काही दिवस त्यांना साथ सोडून गेली असेल. दुख:च्या त्या कोसळलेल्या डोंगरानी कोपाता आघात केला नसेल. परंतू ते दुखः ही पचविले होते. काळ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवणी विसरण्यास सतत मदत करीत असतो. निसर्गाचे हे चक्र आहे. ही इश्वरी इच्छा म्हणून त्याला आपण मान्यता द्यावी ही समजदारी. जी माणसे त्याला वैचारीक विश्लेशन करुन विसरत नाहीत, प्रसंगाना बाजूस सारत नाहीत, भावनीक चक्रातच अडकून राहतात,त्यानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

    एखादी भयानक, दुर्भाग्यपूर्ण, सहनशक्तीचा अंत बघणारी घटना घडते - जसे सख्यातल्याचा अनैसर्गिक मृत्यू, जन्मभर साठवलेली पूंजी नष्ट होणे, इत्यादी - एकदम प्रचंड आघात होतो, दुःखाचा डोंगर कोसळतो, हे नैसर्गिक आहे. परंतु ह्यातून स्वतःला सावरणे है काहीजण करतात. जीवनाच्या सुख दुःखाच्या चक्राचा विचार करतात. दुनियामे आये है तो जीनाही पडेगा । जीवन हे जहर तो पिनाही पडेगा । हे तत्वज्ञान ही मानसे बाळगतात. अशीच माणसे तणावमुक्त जीवन जगू शकतात.

    क्रमशः पुढे ३ वर चालू –

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      May 15, 2017