एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे मिटून चिंतन करीत, शांत बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते. पंचवीस वर्षापूर्वीच ते वारले. ज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती. मी देखील उठून त्यांचा पिच्छा करू लागलो. मला फार उत्सुकता लागलेली होती की ही व्यक्ती कोठून आली. कोठे राहते? मला दुरूनच त्यांचा ठावठिकाणा कळला. माझ्या स्मृतींना प्रेमाचा उजाळा देणारी, वडिलांच्या सहवासाचा आनंदमय इतिहास ज्यागृत करणारी व्यक्ती, मी गमाऊ इच्छित नव्हतो. अचानक भेटली व गायब झाली असे होऊ नये. त्या आनंदायी आठवणी मला जिवंत ठेवायच्या होत्या. आठवणीसाठी माणसे आपल्या प्रेमाच्या माणसांच्या तसबिरी भिंतीवर टांगतात. दृष्टी समोर नसलेल्यांना सतत जागृत ठेवतात. क्वचित प्रसंगी हेच कार्य कुणाचे पुतळे करतात. केंव्हा केंव्हा तर अशा व्यक्तींच्या कांही वस्तू जसे काठी, चष्मा पेन कपडे इत्यादी तुम्हास त्यांच्या काल्पनिक सहवासाचा लाभ देतात.
आठवण चाळवणारे अनामिक !
ज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती.