(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आगे भी, जाने न तू.. पीछे भी, जाने न तू..जो भी है, बस इक ‘यहीं पल’ है..

    तिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या.

      March 30, 2022


  • सुटका

    बस स्टॉप वरील ओळखीतून एकमेकांचा आगापीछा माहीत नसलेले ते दोन अविचारी तरुण जीव, एक महिन्याच्या ओळखीत “एक दुजेके लिये” झाले होते. त्यांना विभक्त केल्याचे पाप मी माथी घेतलं होतं.

      August 24, 2022


  • तुपाचा दिवा !

    विक्रम आणि वेताळच्या धर्तीवरची ही एक लघुकथा.. 

      July 5, 2018


  • भूमिका’ आजोबांची !

    आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले.

      November 9, 2011


  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १३

    निशा रोहनला म्हणाली, “रोहन, हे लोकं असं सहजासहजी माझं ऐकतील, असं मला वाटत नाही.  चल, आपण जबरदस्ती त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये जाऊया.” असं म्हणून निशाने रोहनचा हात पकडला आणि ती जोरात ऍम्ब्युलन्सच्या दाराजवळ गेली. आत बसायला जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी तिनं आत नजर टाकली आणि तिनं जोरात किंकाळी फोडली…..  आणि ती दचकून मागं सरकली…..

      April 17, 2020


  • गौरीचे डोहाळे

    त्या मातीच्या वासात मस्त धुंद होऊन आनंद. समाधान व तृप्त झाले होते. चैत्र महिन्यात गौर बसल्यावर असा पाऊस पडला की म्हटले जायचे गौरीला डोहाळे लागले आहेत.

      February 14, 2022


  • घुस्मटलेले श्वास झाले रे मोकळे- “गोदावरी” !

    “खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला.

      November 19, 2022


  • नाव असे अजरामर होते

    गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर असंख्य लोक या नव्या धर्माकडे आकर्षित झाले. हळूहळू गौतम बुद्धाचा शिष्यपरिवार वाढत गेला. प्रत्येक शिष्याला वाटे स्वतः गौतम बुद्धांनी आपल्याला काही तरी काम सांगावे.

    एका शिष्याला स्वतःच्या नावाचा फार अभिमान होता. ते लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी एकदा त्याला 'तू तुझे नाव अजरामर कर' अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे तो शिष्य स्वतःचे नाव अजरामर करण्यासाठी निघाला. फिरत फिरत तो समुद्र किनाऱ्यावर आला. तो विशाल समुद्र आणि त्याचा भव्य किनारा पाहून त्याला आनंद झाला. त्याने त्या समुद्राच्या किनार्‍यावरील वाळूत आपले नाव कोरले. त्या किनार्‍यावर माणसांची फारशी ये-जा नव्हती म्हणून काही दिवस त्याचे नाव वाळूत राहिले. परंतु एकदा समुद्राला मोठी भरती आली व मोठ्या वेगाने आलेल्या लाटांमुळे त्याचे नाव नष्ट झाले.

    त्यानंतर तो शिष्य पुढे निघाला. एके ठिकाणी मातीचा प्रचंड मोठा ढीग होता. त्यावर त्याने आपले नाव कोरले. मात्र थोड्याच दिवसांनी मुसळधार पाऊस आला व तो मातीचा ढीग वाहून गेला.

    त्या शिष्याने मग एका मोठ्या झाडावरील बुंध्यावर आपले नाव कोरले. त्याला वाटले हे नाव आता कायम टिकणार. मात्र एके दिवशी एक लाकूडतोड्या आला व त्याने ते मोठे झाड तोडून टाकले. त्यामुळे नाव नष्ट झाले.

    शेवटी त्या शिष्याने डोंगरावर एका खडकावर आपले नाव मोठ्या कष्टाने कोरले. परंतु थोड्याच दिवसांत त्या भागात मोठा भूकंप झाला व त्यात पूर्ण डोंगरच नाहीसा झाला.

    शेवटी तो शिष्य कंटाळून गौतम बुद्धाकडे आला व त्याने आपले एकेक प्रयत्न सांगून ते कसे वाया गेले ते सांगितले. त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले, 'तुझी विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे. नाव असे अजरामर होत नसते. त्यासाठी लोककल्याणाचे कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे.'

    शिष्याला उपरती झाली व त्याने दुसर्‍या दिवसापासून लोककल्याणाचे काम सुरू केले.

      January 25, 2017


  • प्रामाणिकपणाचे फळ

    तुरुंगातील कैद्यांची पाहणी करण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली होती. एक निवृत्त न्यायाधीश त्या समितीचे प्रमुख होते. या समितीने तुरुंगात जाऊन तेथील कैद्यांची पाहणी सुरू केली. सहज कुतूहल म्हणून समितीच्या प्रमुखांनी काही कैद्यांना त्यांनी कोणता गुन्हा केला व त्याला का शिक्षा झाली याची चौकशी करायला सुरुवात केली. एक कैदी म्हणाला, मी खरे तर कोणताच गुन्हा केला नव्हता, परंतु साक्षीदारानेच माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली. त्यामुळे मला तुरुंगात यावे लागले. दुसरा कैदी म्हणाला, माझ्याविरुद्ध काही लोकांनी हेतुपुरस्सर खटला भरला. मला तुरुंगात डांबणे हाच त्यांचा उद्देश होताच तो सफल झाल्यामुळेच मी आज तुरुंगात आहे. तिसरा कैदी म्हणाला, खरे तर मी निर्दोष होतो परंतु माझ्याबद्दल न्यायाधीशांचे पूर्वग्रह दूषित होते त्यामुळेच त्यांनी मला शिक्षा ठोठावली. थोडक्यात एकही कैदी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नव्हता. एका कोपऱ्यात एक कैदी मात्र खाली मान घालून बसला होता. त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्याने खाली मान घालूनच उत्तर दिले. होय साहेब! मी चोर केली. कारण माझ्याजवळ एकही पैसा नव्हता. घरात दोन-तीन लहान मुले होती त्यांची उपासमार मला बघवत नव्हती. त्यांचे पोट भरता यावे म्हणून मी चोरी केली. व त्या गुन्ह्याबद्दल मी आज तुरुंगात येऊनशिक्षा भोगत आहेत. समितीच्या सर्व सदस्यांना त्या कैद्याची हकिकत खरी वाटली. व त्यांनी त्या कैद्याची सुटका करण्याची एकमताने शिफारस केली. त्या कैद्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळाले होते.

      February 12, 2017


  • कृतज्ञता

    कृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्‍याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते.

      March 8, 2022