(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सप्तसुरांची भैरवी

    सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाला, घटनेला जुळणारी गाणी लतादीदींनी गायलेली आहेत. ती ऐकली की, आपण त्या काळात जाऊन येतो. म्हणूनच त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता शतकानुशतके अबाधित राहील.

      March 6, 2022


  • नागराणीचा मुकुट

    एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली

      October 5, 2025


  • सोंग

    पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.

      February 2, 2026


  • आषाढी आठवणी

    शाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला..

      August 19, 2021


  • मध्यमहेश्वर

    हिमालय हा भारताच्या सांस्कृतिक भावजीवनातील एक अनन्यसाधारण विभुती आहे. भारताची सस्यशामल भूमी समृद्ध करणाऱ्या पवित्र नद्यांचा हिमालयात उगम झाला आहे. परंपरेने भगवान शंकराचे हिमालयाशी नाते जोडले आहे.

    अशा शंकरानी आपल्या कायम वास्तव्यासाठी हिमालयाची निवड केली. पुराणांनी शंकराचे हिमालयाशी आलेले कोमल संबंध आल्हादाने उलगडून दाखवले आहेत. अनेक देव-देवतांचे क्रीडास्थान, निवासस्थान म्हणून हिमालय पुराण प्रसिद्ध आहे. कालिदासाने आपल्या कुमारसंभवाच्या आरंभीच हिमालयाला 'देवतात्मा' म्हणून गौरवले आहे. प्राचीन काळापासून स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील मध्यस्थाची भूमिका हिमालयाने बजावली आहे. इथला निसर्ग, पावित्र्य, शांतता अनुभवण्यासाठी मुमुक्ष लोक जगाकडे पाठ फिरवून हिमालयाच्या आश्रयाला येतात व इथे सांडलेल्या स्वर्गीय तेजाच्या प्रभेमध्ये न्हाऊन लौकिक जीवनातील अंधाराचे शाप सुसह्य करायला समर्थ ठरतात. अशा या हिमालयात असेच एक पवित्र स्थान आहे 'मद्महेश्वर'. कोणी या स्थानाला मध्यमहेश्वर असेही म्हणतात. मद्महेश्वर पंचकेदारातील दुसरे केदारस्थान समजले जाते. गढवाल हिमालयातील या स्थानाला निसर्ग सौंदर्याने भरभरून दिले आहे. हिमालयाच्या स्वर्गीय सौंदर्याचा एक अनुपम आविष्कार या ठिकाणी अनुभवायला मिळतो.

    स्कंदपुराणाच्या केदारखंडातील ४७ व ४८ च्या अध्यायात या स्थानाचे वर्णन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, "हे मध्यमहेश्वर क्षेत्र केदारपुरीपासून तीन योजने दूर असून हे स्थान गुप्त ठेवावे पण जर कोणी मध्यमहेश्वराचे नुसते दर्शन जरी घेतले तरी तो सदैव स्वर्ग लोकात वास करेल."

    गुप्तकाशीपासून एक रस्ता केदारनाथकडे व एक रस्ता कालीमठकडे जातो. कालीमठला बस प्रवास संपतो व पदभ्रमंती सुरू होते.

    'कालीमठ', सर्व बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेले हे स्थान. या स्थानाचे मूळ नाव 'काविलथा'. हे स्थान एक सिद्धपीठ, महापीठ म्हणून ओळखले जाते. असे सांगतात की, रक्तबीजाचा वध केल्यावर कालिमातेने स्वत:चा शिरच्छेद करून घेतला व या स्थळी ती समाधिस्त झाली. या ठिकाणी कालिमातेचे मंदिर आहे. पण मंदिरात कोणतीही मूर्ती नसून श्रीयंत्र आहे व ते चांदीच्या आवरणाने झाकलेले आहे. वर्षातून एकदा मध्यरात्री हे यंत्र उघडले जाते. त्याची मंत्रघोषात श्रद्धेने पूजा केली जाते व परत यंत्र झाकले जाते. कालिमठला महालक्ष्मी व महासरस्वतीची पण मंदिरे आहेत व त्यांची पण नित्यनेमाने पूजाअर्चा होत असते. सर्वसाधारण या तिन्ही देवतांची मंदिरे एका ठिकाणी पहायला मिळत नाहीत व त्यांची पूजा होत नाही. पण कालिमठला मात्र हे पहायला मिळते. नवरात्रात येथे खूप मोठा उत्सव होतो. परिसरातील अनेक भाविक श्रद्धेने या ठिकाणी येतात. पूर्वी हे स्थान तांत्रिक विद्यासाधनेचे केन्द्र असावे, असा एक अंदाज आहे. कालिमातेच्या मंदिराची स्थापना आदिशंकराचार्यांनी केली असेही सांगितले जाते. परिसरात आणखीही छोटी मंदिरे आहेत. मंदिराजवळूनच सरस्वती नदीचा प्रवाह खळाळत आपल्या आवाजाने इथल्या शांततेला पावित्र्याची झालर चढवत असतो.

    कालीमठ येथील शिव मंदिरात शंकर-पार्वतीची वैशिष्ट्यपूर्ण अप्रतिम मूर्ती आहे. चतुर्भूज शंकराच्या हातात धोत्र्याचे फूल व त्रिशूल आहे तर उजव्या मांडीवर पार्वती विराजमान आहे. ही मूर्ती आठव्या शतकातील असावी असा अंदाज आहे.

    महाकवी कालिदासाचा जन्म या ठिकाणी झाला असावा असे काही तज्ज्ञ लोकांचे मत आहे.

    कालीमठ ते रौलिक हे अंतर साधारण ८ कि.मी. आहे. पहिली काही थोडी चढणीची वाट संपल्यावर पुढचा रस्ता बराचसा सपाटीचा आहे. आजूबाजूला उंच पर्वतशिखरे. वाटेवर चीड पाईन वृक्षांची दाटी, मधेच पायात-पायात येणारे झरे, परिसरात उगवलेली फुले, पक्ष्यांचे गोड कुंजन, बघता बघता तीन साडेतीन तास कधी संपतात हेच कळत नाही. मग येते रौलिक, रौलिकला जाण्यासाठी उखीमठहून जीपसुद्धा उपलब्ध होतात.

    रौलिक ही १००-१२५ घरांची वस्ती आहे. गावात पोस्ट, लाईट इ. सुविधा आहेत. या ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था होते. आपल्याकडचे जादा सामान रौलिकला ठेवून गरजेपुरते सामान बरोबर घेतल्यास पुढे सोईचे ठरते.

    रौलिक ते रांसी हे अंतर साधारण ६ कि.मी. आहे. पहिला १ कि.मी. रस्ता बराचसा सपाटीचा आहे. मग मात्र रस्ता चढावाचा आहे. पण उभी चढण अशी कुठेच नाही. रस्ता पूर्ण सुरक्षित व प्रशस्त आहे. पण उजाड आहे. त्यामुळे या मार्गावर थोडी दमछाक होते.

    रांसीसुद्धा ५०-६० घरांचे गाव आहे. पण हे गाव प्रसिद्ध आहे तेथील राकेश्वरी देवीच्या मंदिरामुळे. गावातच राकेश्वरी देवीचे मंदिर आहे. नवरात्रात येथे खूप मोठा उत्सव होतो. या मंदिरात अखंड धुनी प्रज्वलित असते. त्यासाठी परिसरातील ग्रामस्थ लाकडे पुरवतात. ही धुनी कधी प्रज्वलित केली हे मात्र कोणालाही माहित नाही. मात्र खूप वर्षांपासून ती प्रज्वलित आहे, असे सर्वजण सांगतात. चंद्राला क्षय रोग झाला असता त्याने या ठिकाणी राकेश्वरी देवीची आराधना केली व देवीच्या आशीर्वादाने तो रोगमुक्त झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

    रांसी गावात राहण्याची, खाण्याची व्यवस्था होते. रांसी ते गौंडर हे अंतर साधारण ६ कि.मी. आहे. रांसीनंतर जवळजवळ ४ कि.मी. अंतराचा रस्ता खूपसा उताराचा आहे. रस्त्यावर झाडीपण आहे. त्यामुळे रस्त्यावर सावली असते. ऊन जाणवत नाही. मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक सुखावत असते. शेवटचा २ कि.मी. रस्ता काहीसा चढणीचा-सपाटीचा आहे.

    गौंडर हे मदमहेश्वरी नदीच्या काठावर वसलेले १००-१२५ घरांचे हे छोटेसे गाव आहे. या ठिकाणी राहण्याची-जेवणाची सोय होते. गौंडर परिसरात 'बिच्छुकाटा' नावाची झुडपे बऱ्याच प्रमाणात दिसतात. उघड्या अंगाला या वनस्पतीचा स्पर्श झाला की स्पर्श झालेल्या ठिकाणी भयंकर आग होते. तो भाग लाल होतो. २-३ तास तरी आग होत राहते. विशेष म्हणजे या वनस्पतीजवळ आणखी एक वनस्पती उगवते. झेंडुसारखी त्या वनस्पतीची पाने असतात. ही पाने आग होणाऱ्या जागेवर चोळली तर आग खूप प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरात फिरताना आजूबाजूला नजर ठेवून फिरावे लागते, सावधानी घ्यावी लागते.

    गौंडर ते मदमहेश्वर हे अंतर साधारण १२ कि.मी. आहे. डोंगरात फिरताना अंतराचा नक्की अंदाज येत नाही. कोणी सांगेल तेच खरे मानायचे.

    मदमहेश्वर हे स्थान एक उंच पहाडावर आहे. या स्थानाची उंची आहे ३२८९ मीटर्स. (१०,८५० फूट). ही वाट मात्र उभ्या चढणीची आहे. गौंडरपासून साधारण १ कि.मी. रस्ता उताराचा आहे. मदमहेश्वर पर्वताच्या पायथ्यापाशी मदमहेश्वरी नदी वाहते. या नदीवरील पूल ओलांडला की चढावाचा रस्ता सुरू होतो. साधारण २ कि.मी. अंतरावर खटरा ही वस्ती लागते व मग पुढे २ कि.मी. अंतरावर नानु ही वस्ती.

    नानुची उंची आहे २९०० मीटर्स (९,५७० फूट). नानु ही वस्ती १०-१५ घरांचीच आहे. पण या ठिकाणीसुद्धा राहण्याची-खाण्याची सोय होते. या ठिकाणी एका फलकावर लिहिले आहे, 'चढाईला घाबरू नका, अनुपम दृश्ये तुमची वाट पहात आहेत.'

    मद्महेश्वराचा निसर्ग आता मात्र खुलायला लागतो. सभोवताली उंच पर्वतशिखरे, खोल दऱ्या, पर्वतशिखरावरून दरीकडे झेपावणारे पांढरे शुभ्र प्रपात. पर्वतशिखरावरील पांढराशुभ्र बर्फ उन्हाने चमकत असतो. निळ्याभोर आकाशात ढग आरामात पहुडलेले असतात तर काही ढग पर्वतशिखरांच्या गळ्यात हात घालून बसलेले असतात. प्रत्येक पावलावर निसर्गाचे वेगळे मोहक रूप समोर येत असते.

    नानुनंतर साधारण ४ कि.मी. अंतरावर येते 'कुद' ही वस्ती. हा रस्ता चढाचा तर काही ठिकाणी सपाटीचा आहे. वाटेवर बऱ्यापैकी झाडी आहे. पानगळीमुळे रस्त्यावर वाळलेल्या पानांचा सडा पडलेला असतो. त्यामुळे पावले सांभाळून टाकावी लागतात. नाहीतर घसरण्याची भीती असते. तसा हा रस्ता पूर्ण सुरक्षित आहे. प्रशस्त आहे. एक चढ सोडला तर अवघडपणा, धोका असा या रस्त्यावर कुठेच नाही. कुद ही सुद्धा १०-१२ घरांची वस्ती आहे. कुदहून मद्महेश्वर हे अंतर साधारण २ कि.मी. आहे. हा रस्ता मात्र जवळजवळ सपाटीचा आहे.

    हिरव्यागार कुरणावर मद्महेश्वराचे मंदिर उभे आहे. या कुरणातून स्फटिक जलाने एक झरा कायम वहात असतो. कुरणावर निळ्या, जांभळ्या, पांढऱ्या, लाल रंगाची चिमुकली फुले बहरलेली असतात. सर्वत्र हिरवाई चीड-पाईन व इतर वृक्षराजीने नटलेला हा परिसर जुलै ऑगस्ट महिन्यात निरनिराळ्या फुलांनी बहरून जातो. जवळ असलेले हिमाच्छादित चौखंबा पर्वतशिखर या सर्वावर नजर ठेऊन बसलेले! जणूकाही या स्थानाच्या रक्षणाची जबाबदारी या पर्वतशिखरावर दिली आहे आणि त्याला सोबत करत असतात आसमंतात पसरलेली आदिअनादीअनंत शाश्वत हिमालयाची पर्वतशिखरे! हे निसर्गाचे वैभव पाहिल्यावर वाटू लागते की परमेश्वराने जेव्हा हिमालयाची निर्मिती केली तेव्हा त्याला सौंदर्य पाहावयाचे वेड लागले असावे.

    सर्व हिमालय सुंदर आहे. पण मध्यमहेश्वर व गंगोत्रीच्या वाटेवरील हरसिल या ठिकाणी निसर्ग उधळला आहे. या दोन स्थानांचे वर्णन शब्दात करणे. खूप अवघड आहे.

    आकाशात मेघमाला विहरत असतात. बर्फाच्छादित शिखरे चमकत असतात. कुरणात चिमुकली फुले माना डोलावत आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात. पायाखालची हिरवळ आपल्या मखमली स्पर्शाने पाय गोंजारत असते तर शेजारच्या निर्झराची खळखळ या सौंदर्याचे वर्णन करत असते. पाहता पाहता अचानक सर्व धुरकट होऊ लागते व धुक्यात सर्व काही अदृश्य होते. शरीराला ओलावा जाणवू लागतो. वाऱ्याची एखादी झुळूक अंगावर शिरशिरी आणते. मध्येच पाण्याचे थेंब उडू लागतात तर मधेच बर्फाचे साबुदाण्यासारखे बारीक कण! वातावरणात निस्तब्ध शांतता पसरते. सर्व परिसर ढगात लपेटून जातो.

    हळूच एखादी प्रकाश शलाका या धुक्याला भेदत जमिनीचा वेध घेऊ लागते. तिचा मागोवा घेत प्रकाशकिरण धुके भेदू लागतात. आजूबाजूचा परिसर दृश्य होऊ लागतो. धुक्यात हरवलेले मध्यमहेश्वराचे मंदीर हळूहळू दिसू लागते. वाऱ्याबरोबर धुके दूर पळू लागते व बघता बघता आसमंतातला निसर्ग हसू लागतो. दूर काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर हिमाच्छादित पर्वतशिखरे, सर्व परिसर संध्याकाळच्या सूर्यकिरणांची झालर घेऊन झळाळू लागतो. हळूच एखाद्या पर्वतशिखरावर हिमज्वाळा पसरते. तर मध्येच अचानक काळ्या ढगावर वीजेची रेषा तेजाळते. या सर्वात आकाशात इंद्रधनुष्याची कमान कधी उभी राहते हे कळतच नाही. अवर्णनीय हिमालयाचे एक अनुपम रूप समोर उभे असते. आणि मग कवी सुमित्रानंदन पंत यांच्या काव्याच्या ओळींची आठवण येते.

    रवि की किरणे जिसे स्पर्श कर ।
    हो उठती आलोक निनादित ||
    जिस पर उषा संध्या की छबि ।
    आदि सृष्टी सी हो स्वर्णांकित ||

    अशी श्रद्धा आहे की मद्महेश्वरचे मंदिर भीमाने बांधले. असेही सांगतात की, केदारनाथ, मद्महेश्वर व तुंगनाथ ही मंदिरे पांडवांनी बांधली पण काही कारणाने रूद्रनाथ व कल्पेश्वरची मंदिरे ते बांधू शकले नाहीत. आजही केदारनाथ, मद्महेश्वर व तुंगनाथ या ठिकाणी मंदिरे आहेत पण रूद्रनाथ व कल्पेश्वर या ठिकाणी मंदिरे नाहीत.

    पुरातत्त्व खात्याच्या अनुमानानुसार या ठिकाणी एक प्राचीन मंदिर होते. १४-१५ च्या शतकात त्या मंदिराची पुर्नबांधणी किंवा जीर्णोद्धार केला असावा तर काहींचे सांगणे आहे की आदिशंकराचार्यांनी या स्थानाला भेट दिली होती व त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पण आज जे मंदिर उभे आहे ते कोणी व कधी निर्माण केले याबद्दल काहीच माहिती नाही. ते काहीही असो हे मंदिर पाहताना "त्याकाळी कोणत्याही प्रवासी सोयी-सुविधा, साधने उपलब्ध नसताना अशा दुर्गम जागी प्रतिकूल वातावरणात हे मंदिर बांधलेच कसे, हाच प्रश्न उभा राहतो.

    कत्युरी शैलीतील, हिरवाईच्या पार्श्वभूमीवरील हे मंदिर खूप शोभिवंत दिसते. मंदिर छोटेसेच आहे. मंदिरात पाषाण शिवलिंग असून, चांदीची उत्सवमूर्ती आहे. जवळच पार्वतीचे व अर्धनारी नटेश्वराचे मंदिर आहे. मंदिरापासून साधारण १ कि.मी. अंतरावर कालभैरवाचे मंदिर आहे. कालभैरव हा या परिसराचा क्षेत्रपाल मानला जातो व या क्षेत्राचे पावित्र्य व रक्षण करण्याची जबाबदारी कालभैरव सांभाळत असतो अशी श्रद्धा आहे. या मंदिरात एका भांड्यात खूप जुनी-नवी नाणी ठेवली आहेत. विशेष म्हणजे ही नाणी कोणीही घेत नाही उलट येणारा या नाण्यात आपली भरच घालतो.

    मद्महेश्वरचे मुख्य पुजारी कर्नाटकातील लिंगायत समाजाचे आहेत. उत्तराखंडात फिरताना ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. केदारनाथचे मुख्य पुजारी आंध्र प्रदेशातील आहेत. बद्रीनाथचे पुजारी केरळचे नंबुद्री ब्राह्मण आहेत तर पाताळभुवनेश्वरचे मुख्य पुजारी काशीचे भंडारी लोक आहेत. भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील लोकांना येथे पौरोहित्य करण्याचा मान त्या काळच्या सत्ताधिशांनी दिला आहे. त्या लोकांना इथे बोलावून त्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देऊन त्यांना वंशपरंपरेने पूजेचे हक्क दिले आहेत व आजही ही परंपरा हे लोक सांभाळत आहेत, मग कारण काहीही असेल.

    येथून जवळच पांडवदरा म्हणून एक पर्वतशृंखला दाखवली जाते. पण इकडे जाणारा मार्ग अवघड आहे. त्यामुळे सहसा तिकडे कोणी जात नाही. असे सांगतात की, पांडवांनी आपल्या शेवटच्या प्रवासात आपली शस्त्रास्त्रे येथील एका गुहेत ठेवली व निशस्त्र होऊन त्यांनी आपला पुढील प्रवास सुरू केला.

    हिवाळ्यात इथे फार मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते. सर्व रस्ते, वाटा बंद होतात. त्यामुळे दिवाळीनंतर हे मंदिर बंद केले जाते व देवाची उत्सवमूर्ती उखीमठला नेली जाते तेथे देवाची पूजाअर्चा होते. साधारण मार्च-एप्रिलपासून बर्फ वितळू लागते. मे महिन्यात सर्व रस्ते मोकळे होतात व मग एका शुभ दिनी वाजत-गाजत, जयजयकार करत उत्सवमूर्तीच्या रूपात देवाचे आगमन आपल्या मूळ स्थानी म्हणजे मद्महेश्वरला होते.

    देवस्थानने येथे एक धर्मशाळा बांधली आहे. तसेच स्थानिक लोकांनी २-४ दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे राहण्याची- जेवणाची सोय होते. या सर्व परिसराचा केदारनाथ अभयारण्यात समावेश केला आहे. निरनिराळे पक्षी इथे दर्शन देतात पण मुख्य आकर्षण म्हणजे 'मोनाल' हा पक्षी ! अद्वितीय सौंदर्य या पक्ष्याला लाभले आहे. हा पक्षी उत्तराखंड राज्याचा राज्यपक्षी आहे. एखादे वेळेस कस्तुरीमृग सुद्धा नजरेस पडतो.

    मदमहेश्वरहून हिमालयाच्या पर्वतराजीचे फार सुंदर दर्शन होते. हिमालयाच्या अफाट पर्वत रांगा काही उघड्या तर काही हिमाच्छादित. ही पर्वतशिखरे एका मधूनच एक अशी बाहेर पडलेली दिसतात. कधी एकमेकाला समांतर तर कधी निरनिराळे कोन केलेली. पर्वताचे एका पाठीमागे एक असे स्तर असे किती स्तर आहेत व त्या पलिकडे काय आहे याचा अंदाजच येत नाही. एखादवेळेस एखाद्या हिमाच्छादित पर्वत शिखरावर धुरासारखी उंच रेष दिसते. ह्याला 'हिमज्वाला' म्हणतात. पर्वतशिखरावरील हिमकण पर्वत शिखरावरील वेगाने चक्राकार वाहणाऱ्या वान्यामुळे आकाशात फेकले जातात. अशा कणांचा एक स्तंभच निर्माण होतो. काही वेळा हे कण मर्यादित जागेत पसरतात व आता हे रूप पिसाऱ्यासारखे होते. सकाळची किंवा संध्याकाळची सूर्यकिरणे अशा हिमज्वालावर पडतात तेव्हा तर त्याचे सौंदर्य काही वेगळेच दिसते.

    मंदिरापासून साधारण २ कि.मी. अंतरावर साधारण ३००-४०० फूट चढून गेल्यावर वृद्ध मद्महेश्वराचे मंदिर आहे. मंदिर फक्त सांगण्यापुरते! खरं तर ही एक छोटीशी घुमटीच आहे. कदाचित पूर्वी मद्महेश्वरचे मंदिर या ठिकाणी असावे. नंतरच्या काळात आताच्या मंदिराची उभारणी केली असावी. इथे पोहचण्यासाठी रस्ता असा नाही. अंदाजानेच जायचे. वाटेवर सर्वत्र हिरवळ व त्यावर उमललेली चिमुकली सुंदर फुले. ही फुले पायाखाली येतील म्हणून पाऊल उचलावे असे वाटतसुद्धा नाही. पण किती फुले चुकवणार? पायाला हिरवळीचा मखमली स्पर्श जाणवत असतो.

    वृद्ध मद्महेश्वराचे मुख्य आकर्षण म्हणजे इथून होणारे चौखंबा पर्वतशिखराचे व इतर पर्वतशिखरांचे तसेच विस्तृत प्रदेशाचे दर्शन. चौखंबा हे उत्तराखंड राज्यातील उंचीने पाचव्या क्रमांकाचे शिखर आहे. सदैव हिमाच्छादित अशा या पर्वतशिखराची उंची आहे ७१३८ मीटर्स (२३,५५५ फूट). या पर्वतशिखराचा माथा सपाट असून त्याची चारही टोके उंचावलेली आहेत.

    वृद्ध मदमहेश्वराला पोहचल्यावर सर्वप्रथम नजर जाते ती या चौखंब्याकडे. आपल्या समोर उंच अतिभव्य पांढरीशुभ्र हिमाची भिंत उभी असल्यासारखी दिसते. ऋषीमुनींनी म्हटले आहे, 'यद वाचा न अभ्युदितम', खरोखरच अशा भव्यतेचे मूर्तिमंत रूप म्हणजे येथून दिसणारा चौखंबा.

    जमिनीवर सर्वत्र पसरलेली हिरवाई व त्या पार्श्वभूमीवर आसमंतात पसरलेली केदारनाथ मॅसीफा, निळकंठ, त्रिशूल, कामेट इ. अनेक ज्ञात-अज्ञात हिमशिखरे. खोल दऱ्या, दऱ्यात तरळणारे धुक्याचे पट्टे, गर्द झाडी, निळ्या आकाशात विहार करणाऱ्या, पर्वतशिखरांना बिलगलेल्या मेघमाला. मधेच जंगली फुलांचा सुगंध पसरवणारी गार वाऱ्याची झुळूक. हे सर्व अनुभवताना वाटू लागते, हे वैभव परमेश्वराने माझ्यासाठीच निर्माण केले आहे. हे हिमालयाचे, निसर्गाचे रूप नसून साक्षात परमेश्वराचे रूप आहे असे वाटू लागते आणि मग योगी पुरुषांनी, ऋषीमुनींनी, महात्म्यांनी, संतांनी हिमालयाकडे का धाव घेतली या प्रश्नाचे आपोआप उत्तर मिळते ते शोधावे लागत नाही.

    -प्रकाश लेले

      August 10, 2022


  • काळपुरुष

    शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.

    भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्याचक्षणी हवेमुळे उडत आलेली एक छोटी वस्तू त्याच्या तोंडात शिरली. बघता बघता ती गिळले जाऊन घशांत शिरली. त्याने भास्कराला श्वास घेणे कठीण करून टाकले. भास्करची तगमग झाली. खोकून ओकून ते काढण्याचा प्रयत्न झाला. तोंडात बोटे घालून ते काढणे व श्वास मोकळा करणे याची घडपड केली गेली. कांही मिनीटे तडफड झाली. सुनील जाधव भास्कराला त्याच्या श्वासोच्छास करण्यासाठी आपल्यापरी मदत करु लागला. जवळचे इतरही जमले होते. कुणी वारा घाल, कुणी त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छास करण्यास मदत कर, हवा घाल, तोंडावर पाणी मार हे झाले. एकाने तर कांदा आणून फोडून नाकाला लावला. परंतु सारे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. कांही हलचाली वा रुग्णालयीन मदत मिळण्यापूर्वीच , एक सशक्त आणि निरोगी भास्करचा,केवळ थोड्याश्या मिनीटांत अंत झाला.

    खूप बारकाईने शवविच्छेदन ( Post Mortem ) केले गेले. विच्छेदनांत त्याच्या शवनलिकेच्या सुरवातीच्या तोंडावर, स्वरयंत्राजवळ Near the Vocal Cord एक झाडाचे छोटेसे पान दबून बसलेले सापडले. त्याला व्यवस्थीत काढून बाटली मधील फॉर्म्यालीनमध्ये (Formalin) सीलबंद केले.

    एका मृत्युला कारणीभूत होणारे ते पान होते. मी बारकाईने त्या पानाचे निरीक्षण करु लागलो.

    माझ्या डोळ्याना दिसले नाही. परंतु निश्चीत भासले की त्या पानांत काळपुरुष लपून बसला होता. वेळेची त्याला चाहूल लागतांच त्याने अलगदपणे झडप घातली.

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 21, 2016


  • बरे झाले देवा

    बऱ्याच वर्षापूर्वी अपघातात एक कान पूर्ण बहिरा झाला. एका वर भागवले. पण तेही जमेना. त्यामुळे एक श्रवण यंत्र आणले. आता ती डबी व कानात वायर घालून हिंडणे जड जाऊ लागले. अपमानास्पद वाटू लागले.

      December 4, 2021


  • पासिंग मुंबई !

    इन्स्पेक्टर राघवचे अंडरवर्डचे नेटवर्क जबरदस्त होते.गुप्तहेर संघटनेचा सिक्रेट मेसेज आलेच होता. काहीतरी गडबड होणार याची त्याला जाणीव होती. ड्रग्स ,सोने किवा हत्यारे मुंबई पास करण्याची शक्यता होती. हल्ली कल्पनाही करता येणार नाही अशे रुट्स हे स्मगलर्स वापरत आहेत. राघवने आपल्या इंफोर्मेर्सना ‘लक्ष’ठेवण्यास वार्न केले होते.

      September 6, 2018


  • मला देव दिसला – भाग ७

    प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादाला पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनानी एकदम परिपूर्ण. त्याच्या सांघीक कार्यप्रणालीची माहिती कळताच कुणीही आश्चर्यचकीत व्हावे इतके यात भव्य आणि दिव्य आहे. देहामधले अनेक अवयव (इंद्रिये) ही कोट्यावधी सेल्सनी बनलेली असतात. सेल्स अतिशय सूक्ष्म व देहाचा सर्वात लहान घटक भाग आहे आणि आश्चर्य म्हणजे जे कार्य संपूर्ण देहाकडून होत असते. तेच आणि तसेच कार्य त्या प्रत्येक सेल्सकडून केले जाते. जसे जगणे, वाढणे,मरणे,नष्ट होणे, उर्जा निर्माण करणे, तिचा उपयोग करणे इत्यादी. देह हा जशा ह्या बाबी पूर्ण करीत जीवन चक्र चालू ठेवतो, त्याच पध्दतीने ती एक स्वतंत्र सेल्स देखील अशीच चक्रमय जीवन जगते. उर्जा निर्माण करणे व जीवन चक्रासाठी देणे हाच प्रमुख जीवन उद्देश.

    ध्यान? कुणाचे? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे ह्यासाच ‘ध्यान’ म्हणतात. (objeectess awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीवर पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतू जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत चेतनामय असते, कार्य करीत असते त्यांचे कार्य थांबवणे हे फार कठीण. त्यांचे कार्य हे नैसर्गीक जीवंतपणाचेच लक्षण असते.

    ‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे असते, तसेच त्या मार्गाने एक शोध घेतला जातो. ज्यांना खऱ्या अर्थाने ध्यान लागते, त्यालाच त्या शोधाचे आकलन होते. येथे अनुभव निराळे, प्रचिती निराळी, फलश्रुती देखील भिन्न असू शकते. फक्त एक मात्र सत्य सर्व साधकांना सारखेच जाणवते आणि तो म्हणजे ‘नितांत आनंद, ब्रम्हानंद (Extary of joy) संपूर्ण शांतता’ आणि ह्याच सत्याचा तो शोध असतो.

    ‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे हे जरी असले, तरी आम्हाला आमच्याच शरीर – मनाच्या प्रक्रीया कराव्याच लागतील. साधनाला साध्याकडे नेण्यासाठी ज्यामुळे आम्हीच आमच्या अंतरंगात अर्थात देहाच्या आत प्रवेश करून अवयवांशी संवाद साधून आणि त्या सूक्ष्म मूळ घटक ज्या भागात सेल्स आहेत त्यांच्या संपर्कामध्ये येवून प्रत्येक विश्लेशनाची एक सूक्ष्म पायरी असते. ज्यावर भव्यदिव्यतेचा डोलरा उभा रहात असतो, त्या मूळ घटकांपर्यत आम्ही जाणीवेच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न ‘ध्यानातून’ करणार आहोत. डोळे मिटून (वा उघडे – हे सवयीनंतर शक्य असते.) ध्यान धारणेच्या आसनस्थ झाल्यावर जाणीव होऊ लागते की तुम्ही शरीराने स्थीर, अचल होत आहात. शरीराच्या अस्तीत्वाची जाणीव कमी कमी होत जाते. फार प्रयत्नानंतर देहहीनतेचा भास होवू लागतो. परंतू हे सारे असत्य आहे. कारण देहहीन झाल्याचा 12 भास ही तुमची कल्पना असते. विचार असतो आणि विचाराचे अस्तीत्व मन चंचल असल्याचे दाखवितो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 23, 2016


  • शिनकानसेन – जमिनीवरचे विमान

    बुलेट ट्रेनचे जपानी भाषेतले नाव शिनकानसेन. जपानला एकत्र बांधून ठेवणार्‍या प्रमुख धाग्यांमधील एक.. एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा प्रवास काही तासात घडवून आणणारी जगातली सर्वात वेगवान रेल्वे – शिनकानसेन.

    “खरोखरच…जमिनीवर धावणारी विमाने आहेत!” असं म्हंटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही अशा डौलाने ह्या शिनकानसेन धावतात.
    ३०० किमी प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने! म्हणजे कल्पना करा किती स्पीड असेल (मुंबई-पुणे प्रवास ६० मिनिटांच्या आत पूर्ण करतील इतका).

      May 23, 2021