(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दाढावळ

    माझ्या मित्राच्या घराण्यात कोणालाच अक्कलदाढ आली नव्हती. बातमी घराबाहेर लीक झाली आणि गावभर पसरत पसरत गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमधे पोहोचली. घराण्याचं पितळ उघड पडून होणारी नाचक्की टाळण्यासाठी मित्राच्या वडिलांनी मला मध्यस्थीची गळ घातली आणि मी गिनीज बुक वाल्यांना बातमी प्रसिध्द करण्यापासून थोपवायच ठरवल.

      July 7, 2019


  • माझ्या भावविश्वातील गाव

    गावाला गेले की रानावनांत भटकायचे, पिके न्याहाळत फिरायचे, मग उंच टेकडीवर जाऊन बसायचे, समोर हजारो एकर जमीन. त्यात लांब कोठेतरी डोंगराने आपल्या नजरेला घालून दिलेला बांध! त्या शांततेत मनाला मोहुन टाकणारी ही दृश्यं आणि त्यांच्या साथीला मी… 

      May 15, 2021


  • नवजीवन कॉलनीत ओबामांचे स्वागत !

    बराक ओबामांची भारताची ट्रीप पक्की झाली आणि आमच्या कॉलनीत उत्साहाचे वातावरण पसरले.अर्थात ओबामांच्या ट्रीपचा आणि आमच्या नवजीवन कॉलनीचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही .ओबामा आमच्या कॉलनीला सोडाच पण आमच्या शहरालाही भेट देणार नव्हते.पण जगात कुठलीही घटना घडली की आमच्या कॉलनीत अत्यंत उत्साहाचे वातावरण पसरते.तसा अमेरिकेचा आमच्या कॉलनीशी तसा काही विशेष संबंध नाही ,फक्त आमच्या कॉलनीचे सेक्रेटरी कुलकर्णींचा मुलगा दोन महिने कंपनीतर्फे अमेरीकेला जाउन आला ,एवढाच संबंध . पण एवढ्याशा संबंधावरपण आमच्या कॉलनीतले लोक अमेरिकेविषयी अत्यंत अधिकारवाणीने बोलतात. फक्त बोलण्याचा शेवट ” अहो , कुलकर्ण्यांच्या मुलाने बघितलय ना हे सगळ . हो अगदी अस्सच, अगदी खर ” असा करतात. ते जाउ द्या . कुलकर्ण्यांनी रात्री कॉलनीची मिटिंग बोलावली , आणि आपण आपल्या कॉलनीतर्फे बराक ओबामांच्या स्वागताचा एक जंगी कार्यक्रम करावा असा प्रस्ताव मांडला . देशपांड्यांनी त्यांना लगेच दुजोरा दिला . कुलकर्ण्यांनी अगदी काहीही म्हटल तरी देशपांडे त्याला लगेच दुजोरा देतात .( यांची मुलगी लग्नाची आहे आणि त्यासाठी त्यांना कुलकर्ण्यांचा फॉरिन रिटर्न मुलगा डोळ्यासमोर आहे ) आता कॉलनीतील दोन प्रतिष्ठित मंडळींनी ठरवल्यावर मोडता घालायचे काही कुणाला कारण नव्हते . शेवटी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता गणपती मंदिरात कार्यक्रम करायचे ठरले आणि सभा संपली.

    आमच्या कॉलनीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बरीचशी मंडळी कलाकार आहेत. अर्थात ती नुसतीच कलाकार नाहीत , तर पोटापाण्याची नोकरी सांभाळुन कलाकार आहेत. नुसत्या कलाकाराला त्या कलेशिवाय दुसरे काही येत नाही . पण आमच्या कॉलनीतल्या कलाकारांना आपल्या कलेशिवाय पोटपाणी सांभाळण्याची कलाही पार पाडावी लागते . त्यामुळे समोरचे पांडेकाका बॅंकेत कॅशियर कम कवी आहेत , आणि बाजुच्या ढोलेकाकु एलायसीत क्लर्क कम नर्तिका आहेत. पांडेकाकांचा तर “ नोटा मोजा पटापटा ” नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असुन त्यांच्याकडे गेलेल्या सर्वांना तो ते सही करुन देतात. ढोलेकाकुंच्या नाचाचा प्रोग्रामपण कॉलनीत नेहमीच होतो .

    आता या कलाकार असण्याला माझा मात्र अपवाद आहे. मी बॅंकेत अकाउंटंट असल्याखेरीज काहीही नाही . त्यामुळे चेक पास करणे किंवा लेजरला डेबीट टाकण्याखेरीज मला दुसरे काहीही येत नाही . तसे लहानपणी माझ्या वडीलांनी मला तबला शिकविण्याचा बराच प्रयत्न केला . दररोज मला ते तबल्याच्या क्लासला घेउन जायचे . पण इतरांच्या तबल्यातुन तिरकीट , धा , कत्ता , त्रक , धिन असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे तसे माझ्या तबल्यातुन कधीच आले नाहीत . माझ्या तबल्यातुन फक्त ” ढुम्म “ असा एकच आवाज यायचा . शेवटी कंटाळुन माझा क्लास बंद झाला. या गोष्टीनंतर मला आयुष्यात दुसरी कला किंवा छंद कधीच जमला नाही . नाही म्हणायला टिव्ही बघण्याचा छंद मला पुढच्या आयुष्यात जडला पण या छंदाचे स्टेजवर प्रदर्शन करता येत नसल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता.आमच्या हिला मात्र उखाणे म्हणण्याचा छंद आहे . प्रत्येक कार्यक्रमात तिचा एकतरी ऊखाणा असतोच .

    शनिवार उजाडला , संध्याकाळ झाली , आणि गणपति मंदिरात मंडळी जमायला चालु झाली . कलाकार मंडळींची गडबड दुपारपासुनच चालु होती. आम्ही मात्र प्रेक्षक असल्याने जेवण वगैरे करुन आरामात समोरच्या खुर्चीवर जाउन बसलो. एलायसीतले सराफ माझ्याच ‘अ’कलाकार लायनीतले. तेही माझ्याशेजारी येऊन बसले. आम्ही सिक्स्थ पे कमिशन वगैरे गप्पा मारीत बसलो. आमच्या बोलण्याचे विषय काहीही प्रसंग असला आणि जागा कुठलीही असली तरी सारखेच असतात . उद्या समोर लता मंगेशकर गायला बसली काय किंवा माधुरी दिक्षित नाचायला बसली काय आम्ही आपले “ पे रिव्हिजन , सॅलरी हाइक बॉसची लफडी ” या विषयामधेच असतो . काही वेळाने समोर स्टेज म्हणुन एक सतरंजी अंथरण्यात आली.पुर्वी असे काही कार्यक्रम असताना आम्ही लाकडी स्टेज अरेंज करायचो. पण काही वर्षांपुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असताना त्यांच्या स्वागतार्थ केलेल्या कार्यक्रमात ढोलेकाकुंनी कथ्थक डान्स केला , त्यावेळी तो स्टेज कोसळला. तेव्हापासुन फरशीवरच सतरंजी अंथरुन त्याला स्टेज म्हणुन आम्ही कार्यक्रम करतो. अर्ध्या तासात तयारी पुर्ण झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

    सुरवातीला कुलकर्णी काकु अमेरिकेची आपल्याला थोडक्यात ओळख करुन देतील असे सांगण्यात आले आणि नउवारी साडी , मोठे कुंकु ,केसांचा अंबाडा या वेषातल्या काकु बोलायला उभ्या राहिल्या.काकु भुगोलशिक्षिका म्हणुन रिटायर झाल्या असल्या तरी त्यांचे भुगोलाचे ज्ञान पुस्तकीच होते. त्या स्वतः औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर कधी गेल्याच नाहीत. अपवाद एकदाच . मुलाला एअरपोर्टवर सोडायला. काकुंनी अमेरिकेची ओळख करुन द्यायला सुरुवात केली.

    ” अमेरिका हा अत्यंत खंडप्राय देश असुन त्याचे श्रेत्रफळ सुमारे दहा हजार चारशे चौरस किमी आहे. उत्तरेकडे पॅसिफिक समुद्र असुन दक्षिणेकडे अटलांटीक समुद्र आहे .पुर्वेकडे मेक्सिको आणि पश्चिमेकडे कॅनडा आहे.एकुण पन्नास प्रदेशांनी बनलेला हा देश जगातला अत्यंत बलाढ्य देश आहे . “
    काकुंची अमेरिकेची पुस्तकी ओळख सुमारे अर्धा तास चालली .त्यानंतर पांडेकाका ओबामांच्या स्वागतार्थ आपल्या कविता गातील असे समजले. पांडेकाका चालु झाले.

    ओबामांच्या घराचे
    नाव व्हाइट हाउस
    ओबांमांपुढे नतमस्तक
    चायना फ्रान्स व रुस

    ओबामांच्या विमानाचे
    नाव एअरफोर्स वन
    ओबामांचे मात्र
    भारतावर जडले मन

    अशा कवितांचा रतीब चालु झाला . सर्व प्रकारची यमके जुळवुन झाली.” मिशेल ,स्पेशेल “, ” बराक नाक ” अशा पंचवीस तीस कवितानंतर कवितावाचन संपले. काकांनी नंतर भाषण केले . त्यात आपल्या “ नोटा मोजा पटापटा” या काव्यसंग्रहाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. आता आपण सध्या एक थ्रिलर सस्पेन्स कादंबरी “ बंद दरवाजा ” लिहित असल्याचे सांगितले . हा ” बंद दरवाजा ” बॅंकेच्या एका लॉकरचा असुन आपल्या पुर्वीच्या मालकाच्या खुन्याचा हे लॉकर कसा प्रतिशोध घेते ह्यावर ही कादंबरी आधारित होती . ह्यावर सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

    त्यानंतर ढोलेकाकुंचा नवीन हिंदी गाण्यावर डान्स झाला , शेजारच्या गौरीचे ( वय चार ) गाणे झाले , एकंदर खुप कला सादर झाल्या . बराक ओबामांच्या येण्याचा आणि ह्या हिंदी गाण्यांचा कसा संबंध ? हा प्रश्न पडला असता , हे ओबामांना भारतीय संस्क्रुतीचे दर्शन आहे असे उत्तर मिळाले .

    कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या हिचा उखाणा घेण्याचा प्रोग्राम होता. आता या प्रकाराला मी फार भितो. आमच्या हिला कसला पाचपोचच नाही . मागे बिल क्लिंटन आले तेव्हा ” क्लिटनच्या घरी मोनिकाचा मुक्काम , – रावाचे डोके दुखले की मी लावते बाम ” असा उखाणा घेतला .आता या उखाण्यात कशाचा कशाला काही संबंध आहे का ? पण नाही . स्टेज दिसले की उखाणा झालाच पाहिजे . आतासुध्दा ” मिशेलला म्हणतात सगळे फर्स्ट लेडी , —- रावांशी बांधली मी लग्नाची बेडी .” हा उखाणा घेतला . आता आमच्या लग्नाचा आणि मिशेलला फर्स्ट लेडी म्हणण्याचा काही संबंध आहे का ? पण असंबध्द बोलण्यात बायकांचा हात कोणी धरु शकत नाही . त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट म्हणजे आमच्या कॉलनीत माझ्या ऑफिसमधले कोणी रहात नाही . नाहीतर माझे ऑफिसमधे जाणे लोकांनी मुश्कील करुन टाकले असते.

    कार्यक्रम संपल्यावरचे जेवण ही एकच जरा त्यातल्यात्यात बरी गोष्ट होती. बाकी जाऊ द्या , चांगल्या जेवणामुळे आणि त्यातल्या त्यात जिलेबीमुळे कार्यक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला.

    -- निखिल नारायण मुदगलकर

      December 4, 2010


  • भारत बंद (वात्रटिका)

    आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला नक्की भेट द्या

    -- सूर्यकांत डोळसे

      July 6, 2010


  • दोन गुलाबी गुलाब

    मी विचार करत होते की आईची शिकवण व संस्कार याची जाण ठेवणारी मुलगी व गुलाबाचे फूल देऊन न फसवणारा. आणि विश्वास घात न करणारा मुलगा ज्या घरात केवळ आईच्या संस्कारामुळे असे निभावेल असा मुलगा घरोघरी असेल तोच दिवस खऱ्या अर्थाने रोझ डे म्हणजे गुलाब दिन असेल. आणि मला आता जाणवल आहे की देवाला फूल वाहून जे पुण्य मिळाले असते तेवढेच आता हे सगळं पाहून मिळाले आहे.

      June 24, 2022


  • एअरपोर्ट

    लहानपणी परळच्या आमच्या आर.ए.एम. भट हायस्कूल समोर फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असे. मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर त्याच्या टोपलीतल्या आणि गाडीतल्या खाण्यांवर ताव मारण्याची कला मी बालवयातच आत्मसात करुन घेतली. अर्थात घरच्यांनी रोज आणा दोन आणे हातावर ठेवून या छंदाला खतपाणीच घातलं.

      July 23, 2022


  • आदिवासी मुलींच्या सान्निध्यात (उगवता छत्तीसगड – Part 6)

    आदिवासी तरुण मुली व बाया बांबूच्या आकर्षक वस्तू बनिविण्याचे १५ दिवस शिक्षण घेऊन परत आपआपल्या खेड्यात व्यवसाय चालू करणार होत्या. ते सर्व विकण्याची जबाबदारी खाजगी कंपनी घेणार होती. बाई प्रांज्वळपणे सुरेख हिंदीत सर्व माहिती देत होत्या. प्रशिक्षण देणाऱ्या बाईंना मुंबई बद्दल कुतहूल होते.त्यात आम्ही विमानाने आलो, म्हणजे आकाशातून कसे आलो ह्या बद्दल त्या निरागसपणे प्रश्न विचारत होत्या.

      March 8, 2022


  • विक्रमादित्य आणि न्याय देवता/ ऐकलेली कहाणी

    आज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्याय पथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज आपल्याला विक्रमादित्या सारखा राजा पाहिजे……..

      May 18, 2011


  • एक साहित्यक मुलाकात

    एक साहित्यक मुलाकात -उपमा कालिदासस्य म्हणजे काय? ?????

      November 29, 2010


  • वसंतराव

    त्या वेळी मी पत्रकारितेमध्ये नवाच होतो. 1971-72चा काळ होता तो. पुण्यातील त्या वेळच्या प्रतिष्ठित दैनिकामध्ये उपसंपादक म्हणून माझी ती सुरुवात होती. उपसंपादक म्हणून कामाच्या निश्चित वेळा असल्या, तरी रात्रंदिवस कचेरीमध्ये पडून राहावं, गप्पा माराव्यात, काम करावं, नवं काही शिकावं असं ते वय होतं. स्वाभाविकपणे अत्यंत कमी अवधीतच मी मला नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्तही काम करू लागलो होतो. कामाचा तरुण आहे, अशी प्रतिमा व्हायलाही मग वेळ लागला नाही. त्या वेळी पत्रकाराची काही व्यवच्छेदक लक्षणं होती. खांद्यावर शबनम बॅग आणि हातात सिगारेट असलेला तरुण हा पत्रकारच असला पाहिजे, असं समजलं जायचं. उदास, विषण्ण, दाढी वाढलेला तरुण म्हणजे कवी, अशी एक प्रतिमा त्या काळी होती. त्याचप्रमाणं पत्रकारांचं चित्रण हे असं व्हायचं. `सिंहासन' या चित्रपटात निळू फुलेंनी पत्रकार रंगविला, त्याचा वेशही यापेक्षा वेगळा नव्हता. सांगायचा मुद्दा असा की, पत्रकाराच्या लेखणीएवढाच त्याची सिगारेट हाही एक प्रतिष्ठेचा भाग बनला असावा किंवा असं म्हणता येईल की, धूम्रपान हे अप्रतिष्ठेचं नक्कीच नव्हतं. त्या वेळी सायंकाळी पुण्यातील कोणत्याही वृत्तपत्राच्या कचेरीत आग लागली की काय, एवढा धूर भरलेला असे, तर अशा या वातावरणात माझ्या खांद्यावर शबनम आणि ओठात सिगारेट केव्हा आली, हे कळलंही नाही. मी काम करीत होतो. तेथे खरं तर मी अन्य सहकाऱयांपेक्षा वयानं लहान होतो; पण व्यसनात वयाचा अडसर येत नसावा. कारण, त्यातील आमची देवघेव ही समानता कशी असावी, याचा वस्तुपाठ देणारीच होती. असं असलं तरी सभ्यतेचे काही संकेत मी पाळत असे. एक दिवस एक सहकारी म्हणाला, ``ज्यांच्याबरोबर दिवसातील 12 तास काम करायचय, तिथं कसले आलेय संकेत अन् कसला आलाय वयाचा मान.'' एका अर्थानं माझ्या मुक्त

    वागण्याला एक छान, समर्थ असं समर्थन मिळालं होतं. मा

    ं धूम्रपान अधिक उघड

    अन् बिनधास्त झालं होतं. अशीच एक दुपार. माझं काम सुरू व्हायचं होतं. एका सभागृहवजा दालनात आम्ही सारेजण बसत असू. आमच्या टेबलाच्या पलीकडे काही अंतरावर वृत्तसंपादक बसत. वसंतराव त्यांचं नाव. वय असेल पन्नाशीच्या आसपास. त्यांना शांतपणे एका जागेवर बसलेलं मी पाहिलं नव्हतं; पण त्या दिवशी ते स्वस्थ बसले होते. एका क्षणी त्यांची अन् माझी नजरानजर झाली. त्यांनी नजरेनंच खुणावलं, ``या,'' मी त्यांच्या पुढ्यात बसलो. ते शांत होते. काहीतरी बोलायची तयारी करीत असावेत. मिनिटभर तसंच गेलं, म्हणाले, ``किशोर, तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे आहात, एक गोष्ट बोलू?'' मी म्हणालो, ``बोला ना. काहीच प्रश्न नाही.'' ते म्हणाले, ``तुम्ही सिगारेट ओढता. वय तरुण आहे तुमचं, इतर मंडळी काय करतात बाजूला ठेवा. त्यांच्यात बदल होण्याचं त्यांचं वय सरून गेलंय. तुम्ही अजूनही बदलू शकता. मनात आणलं तर सिगारेट ओढणं बंद करू शकता.'' माझं धूम्रपान हा असा ऐरणीवरचा विषय होईल, असं वाटलं नव्हतं मला. मी म्हणालो, ``सोडेन ना, त्यात काय आहे? आतापासून मी सोडतो.'' वसंतराव म्हणाले, `बोलणं वेगळं आणि कृती वेगळी. त्यामुळं आताच काही कबूल करा असं मी म्हणत नाही; पण मी एक योजना देतो. तुमच्या सिगारेटवर रोज किती खर्च होतो?'' मी विचारपूर्वक कमी खर्च सांगितला. म्हणालो, ``रोज एक रुपया'' वसंतराव म्हणाले, ``म्हणजे दरमहा 30 रुपये. तुम्ही असं करा. सिगारेट ओढणं थांबविलं की दरमहा तुमचे 30 रुपये वाचतील. मी एक पत्र देतो. इंटरनॅशनलच्या दीक्षितांना. (पुण्यात डेक्कनवर इंटरनॅशनल हे पुस्तकाचं प्रख्यात दुकान आजही आहे.) तुम्ही दरमहा 30 रुपये त्यांना द्यायचे. दीक्षित तुम्हाला 100 रुपयांची पुस्तकं देतील. तुमच्यासाठी उरलेली रक्कम मी त्यांना देईन.'' मी ``हो'' म्हणालो, बाहेर पडलो. एक सिगारेट ओढली अन् ती सोडायचा विचार सुरू केला. या घटनेनंतर दोन महिने मी 30 रुपयांत
    100ची पुस्तकं घेतली. त्यानंतर मात्र पुन्हा दीक्षितांकडे गेलो नाही. 30 रुपयांची बचत, 70 रुपयांचा लाभ आणि वाचनातून मिळणारं अमाप ज्ञान यापेक्षाही माझ्यातील व्यसनाला मी अधिक महत्त्व दिलं. त्यानंतरही मी सिगारेट ओढत असे; पण आसपास वसंतराव नाहीत ना, याची खात्री करूनच. आज जेव्हा हा प्रसंग आठवतो, तेव्हा वसंतरावांमधील माणसाचा, माणसाकडे, माणसापलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांना माझ्याबद्दल वाटलेल्या आत्मीयतेचा अभिमान वाटतो आणि त्या आत्मीयतेला न जागल्याचा सलही जाणवतो. माणसाला जीवनाच्या प्रवासात योग्य मार्ग दाखविणारेही भेटतात अन् दिशाभूल करणारेही.

    -- किशोर कुलकर्णी

      April 8, 2006