नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
झांझीबार डायरी हे एक प्रवासवर्णन नाही. जागतिक बॅंकेच्या कामानिमित्त अरुण मोकाशींनी केलेल्या झांझीबार वारीमध्ये त्यांनी अनुभवलेले झांझीबारमधील जनजीवन, तिथल्या प्रथा-परंपरा, सोहोळे, वन्य-जीवन यासारख्या विषयांवरील अत्यंत सुंदर लेखांचे हे संकलन आहे. मोकाशी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत, खेळीमेळीच्या शैलीत हे सर्व लेख लिहिलेले आहेत.
August 19, 2021
बुढा दिवस रात्र वाडीची राखण करे. बुढी गडचिरोलीच्या हाटात ( बाजारात ) भाजीपाला नि डांगरं विकून आणे. बुढ्याचं गाव नदीपासून थोड्याच अंतरावर होतं. बुढी बुढ्यासाठी रोजच सकाळ संध्याकाळ शिदोरी घेऊन यायची.
December 12, 2023
आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही.
January 18, 2023

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली… आमच्या घरी जातवालीच हवी ना..
November 3, 2019
मी ऑस्टिनला आल्यापासून तीन मंदिरांना भेट दिली आहे. पैकी ‘ऑस्टिन पब्लिक लायब्ररी’ तुमच्या पर्यंत पोहंचवली आहे. राहिलेले दोन मंदिरांन पैकी एक होते व्यंकटेशाचे मंदिर.
November 20, 2020
शेरूने स्वतःच्या नाट्य प्रेमाबद्दल खूप काही सांगितले. त्याला अभिनयाची उपजतच आवड होती, मात्र परिस्थितीमुळे त्याला ती जोपासता आली नाही. त्याने शिक्षण झाल्यावर गरज म्हणून काही वर्ष रिक्षाचा व्यवसाय केला. रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने सांगितले.
January 3, 2022
भोग आणि लालसा मनुष्याला कुठे घेऊन जाईल- अतृप्त मनुज – का चालला आहे विनाशाचा मार्ग वरमार्गावर – ययातिच्या मनातिल द्वंद्व
January 1, 2011
फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला एकटे सोडून जाण्याची इच्छा नव्हती. मात्र आईच्या इच्छेला मान देऊन तो बगदादला एका सौदागराच्या काफिल्याबरोबर निघाला. जाताना त्याच्या आईने त्याला अडीअडचणीला लागेल म्हणून एक दिनार दिला होता. तसेच कोणतेही संकट आले तरी घाबरू नकोस व खोटे बोल नकोस, असा उपदेशही केला होता. त्या सौदागराचा काफिला जात असताना वाटेत लुटारूंनी त्या काफिल्यावर हल्ला केला. जवळचे असेल ते सर्व द्या नाहीतर प्राणाला मुकाल असे त्या लुटारूंच्या टोळी प्रमुखाने सर्वांना सांगितले व सर्वांची लूट घेत तो लुटारुंचा सरदार त्या मुलाजवळ आला. त्याने त्या मुलाला तुझ्याजवळ काय आहे असे विचारले. त्यावर त्या मुलाने आपल्या फाटक्या सदराच्या खिशातून एक दिनार काढला व त्याला दिला. तो सरदार त्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, ' एकच दिनार?' तो मुलगा त्याला म्हणाला, ' माझ्याजवळ एवढा एकच दिनार होता. आणि तो मी तुला दिला आहे. ' त्या मुलाच्या निर्भयतेचे त्या सरदाराला कौतुक वाटले. त्याने त्याला विचारले, की तू कोठे जात आहेस? मुलगा म्हणाला, बगदादला मी शिक्षणासाठी जात आहे. त्यावर सरदार त्याला म्हणाला, ' तू आमच्याबरोबर चल. मी तुझे सारे शिक्षण करीन. ' त्या मुलाने लगेच, 'मला तुमचे - शिक्षण नको कारण मला चोर-लुटारू व्हायचे नाही, ' असे निर्भयतेने सांगितले. त्या मुलाची ती सत्य व निर्भय वाणी पाहून तो लुटारूचा सरदार ओशाळला व त्याचक्षणी त्याने लुटलेली सर्व संपत्ती ज्याची त्याला परत करून तो तेधून निघून गेला. हाच मुलगा म्हणजे मौलाना कादिर खिलानी जो पुढे इराकचा धर्मगुरु बनला.
February 11, 2017
स्वकष्टाने केलेले कर्म, स्वकष्टाने सुचलेले शब्द, आतून आलेले लिखाण हे जगास उपयुक्त ठरते. हे श्री समर्थांच्या कडे पाहून मनोमन पटते.
December 18, 2021
सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी
January 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti