(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नितळ

    त्यांच्या एकुलत्या एक कन्येला, शिल्पाला पहायला पाहुणे येणार होते. त्यांनी सकाळी अकराची वेळ दिली होती.

      September 1, 2021


  • बाबासाहेब उपाख्य बमो….

    मी पाहताक्षणी त्यांना ओळखले- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! पुढे आलेल्या व्यक्तीजवळ एक पिशवी होती आणि तिने अजीजीने सर्वांना विनंती करायला सुरुवात केली – ” अहो, यांना ओळखलं कां ? हे बाबासाहेब पुरंदरे ! पुण्याला निघाले आहेत. कृपया त्यांना बसायला जागा देता कां ?”

      November 25, 2021


  • काच कांगऱ्या

    आईची बांगडी वाढली की तिचे तुकडे करून एक खेळ खेळला होतो आम्ही एकाच रंगाचे चार तुकडे असे घेऊन चौघे जण हा खेळ खेळू शकतात. समोरासमोर बसून. फरशी वर खडूने एक आकृती काढली जाते. तेव्हा समोरासमोर प्रत्येकाचे एक घर असते. म्हणजे चौकटीत फूली मारलेली असते. तिथे आपल्या कांगऱ्या ठेवायच्या. आणि मध्यभागी एक घर असते. खेळाची अशी तयारी झाली की मग बहुतेक कवड्या दिल्या जात नसल्याने चिंचोका घेऊन ते दगडाने फोडून दोन चिंचोक्याचे चार भाग करून त्याचा डाव टाकायचा. उताणे पडतील तेवढे घर कांगरी पुढे सरकवायची. वाटेत दुसर्‍या कांगरीला मारुन किंवा कुणी आपल्या कांगरीला मारले की आपापल्या घरात जायचे. पुन्हा डाव सुरू. अनेक वार झेलत. अनेक वार करत आतल्या चौकटीत गेल्या वर मध्यभागी असलेल्या घरात चारही कांगऱ्या गेल्या की तो सुटला. शेवटी शेवटी दोघात चुरस असते. एक कायमच बाहेर राहतो. खूप छान वेळ जातो. घरात बसून. कसलेही खर्च नको..
    खेळाचे नियम कुणीही मोडत नाही. भांडण नाही. घरात असल्याने घरचे लोक निर्धास्त. खेळ संपला की कांगऱ्या. चिंचोका. खडू एका डबीत आणि फरशी वरची चौकट फडक्याने पुसून टाकली की बस्स. आनंद आणि मजा हा फायदा. या वरुन मला सहजच वाटले की आपणही असेच आपल्या घरात राहतो. जीवनाची वाटचाल करताना अनेक प्रसंग असे येतात की कधी वार करावे लागतात तर कधी वार झेलावे लागतात. परिस्थितीचे वार अनेक प्रकारचे. प्रत्येक खेळ खूप काही शिकवून जातो. बघा ना आता चौघांची चार घरे. आणि शेवटी सगळ्यात मोठे घर यात फरक आहे तो असा विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब याची माहिती आहेच तुम्हाला.कधी कधी एकेक करुन जातात व दोघेच राहताता मग एकटेच रहावे लागते. त्यामुळे अशा वेळी रडायच नाही तर लढायचे असते . नियमानुसार वागले पाहिजे. जशी कांगरी जिला पूर्वी मारलेल असत पण ती त्याच्याच घरी गेल्यावर तर तिथे मारायचे नाही. वैरभाव ठेवू नये ही शिकवण. एकदा तरी एखाद्या कांगरीला मारुन तिला तिच्या घरी पाठवल्या शिवाय मोठ्या घरात जाण्याची परवानगी नसते. म्हणजे जिंकण्यासाठी लढावे लागते. मन मारुन धैर्याने. सगळे मोठ्या घरात एकत्र आले तर जास्त सुरक्षितता असते तसेच एकत्र कुटुंबात असते..
    लॉकडाऊन मुळे घरातील सुरक्षितता आपण समजू शकलो. त्यामुळे आता ही हेच तत्व पाळू या. यात आणखी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना एकमेकांना समजून सांभाळून घेऊन आधार दिला जातो हे मधल्या मोठ्या घराची शिकवण आहे.. तेव्हा खेळ आणि त्यातून काय शिकायचे हे पाहिले पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

    –सौ. कुमुद ढवळेकर.

      August 30, 2022


  • नवं -जुनं !

    अनेक वर्षांपूर्वी मी ठाण्याला असताना वंदना चित्रपटगृहात आमिरचा “सरफरोश “बघितला होता आणि तेथील नैसर्गिक उकाड्यात इतका उबलो की तो चित्रपट आत पोहोचलाच नाही. नंतर काही वर्षांनी दूरदर्शनवर पाहिला आणि चक्क आवडला.

      September 26, 2022


  • हतबल – भाग तिन

    सरकारी हॉस्पिटलमधील ड्यूटी कॉन्स्टेबल पोलिस स्टेशन ला फोन करून कळवतो. “पोलिस ठाणे हद्दीतील या ठिकाणी राहणारी स्त्री नामे वय : चोवीस , आपल्या , नमूद पत्यावरील राहत्या घरी स्टोव्हवर अंगावरील कपडे पेटल्याने भाजली असून वॉर्ड क्र. xx मधे उपचारा करिता दाखल आहे “

      January 23, 2023


  • रुद्रा – कादंबरी – भाग ४

    राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस मध्ये सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते. 

      February 15, 2019


  • स्पर्शतृष्णेची पाणपोई

    एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.

    मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.

    सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
    माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.

    पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.

    काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले,सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.

    अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता.एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की,माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.

    कोणाला दूर असलेला भाऊ आठवला,कोणाला लाड करणारा मामा आठवला.

    कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला.
    जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.
    यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले.
    विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरूषांची संख्या जास्त होती.

    हे ही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण... अजून...

    आज सकाळी पावणेआठचा सुमार.
    बेल वाजली म्हणून दार उघडलं.तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमलाघामेजलेला. श्वास फुललेला.
    ''तुम्ही वैशाली पंडित का?'' तिने विचारलं.
    ''हो. आपण? या ना.. '' मी.

    यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?

    ''प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ''

    नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं.एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना,हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.

    शेवटी आवाज चढवला.

    ''बाई गं,माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे.कोण तू? का रडतेस?''
    आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाकडोळे पुसले.

    '' मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले,मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो,नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो.तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची.सतत पाणी वहायचं.हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो.एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली,या गं जवळ बसा.मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळेपण उघडीना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं.तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते.शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग कैला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो.भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ''

    अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई,माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.

    मी सुन्न.

    थोड्या वेळाने ती सावरली.

    जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवागाडीत बसवून दिलंय. निघते.
    माझा हात हातात घेतला.
    मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.

    ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला,काय बोलले नाही आठवत.
    इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही,एवढी जागेवर खिळले होते.
    माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही.खरंच कुठे ठेव तरी मी हे संचित ?

    -- वैशाली पंडित

      April 3, 2017


  • फक्त, टवाळा आवडे “विनोद”….

    अरे जगण्याचं साधन आहे “विनोद” वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे “विनोद” ज्याच्या कडे तल्लख “विनोदबुद्धी” असते तो दुःखा पासून बऱ्यापैकी दूर राहू शकतो !

      September 29, 2019


  • नदीपार

    ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली.

    बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी होता. बालपणापासून त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले होते.

    एक दिवस राजेसाहेब आपल्या लवाजम्यासह इरावद्दी नदीवर सहलीसाठी गेले. ब्रह्मदेशातील या सर्वांत मोठ्या नदीला ब्रह्मी लोक 'इतरावत्ती माता' म्हणतात. ते जिथे गेले होते, तिथे नदीचे पात्र विस्तीर्ण, नजरेच्या टप्प्यात न भरणारे होते. दिवस मावळला. राजाला कंटाळा आला. त्याला यु पॉ ची थट्टा करायची लहर आली. यु पॉ आता दरबारी खूशमस्कर्‍या होता. त्याला मंत्र्याचा दर्जा होता.

    'यु पॉ ही नदी ओलांडून जाशील का ?'

    'होय महाराज !' त्याने तत्काळ उत्तर दिले.

    'तू मला खूश करण्यासाठी हे म्हणतोयस, हे मला ठाऊक आहे; पण ही थट्टा नाही.'

    'महाराज, खरंच मी नदी पार करून दाखवतो.'

    'मग आताच्या आता नदी ओलांड पाहू ।'

    हे ऐकल्यावर यु पॉने आपला सॅरॉग वर उचलला आणि तो किनार्‍यावर येरझारा घालू लागला. बर्‍याच वेळाने राजाने विचारले,

    ' अरे, तू थांबलास का ?'

    'महाराज, मी बोटीची वाट पाहतोय.''

    'बोटीने तर कोणीही सामान्य माणूस जाईल, मग तूच कशाला हवा ?'!

    युपॉने राजापुढे गुडघे टेकले. जमिनीवर डोके टेकवून तो म्हणाला,

    'महाराज, त्या सामान्यांतला मी एक सामान्य माणूस आहे.'

    राजेसाहेब त्यावर खळखळून हसले, झालं!

      January 24, 2017


  • ययाति/ययातिच्या मनातिल द्वंद्व

    भोग आणि लालसा मनुष्याला कुठे घेऊन जाईल- अतृप्त मनुज – का चालला आहे विनाशाचा मार्ग वरमार्गावर – ययातिच्या मनातिल द्वंद्व

      January 1, 2011