(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विहीण की मैत्रीण (कथा)

    अहो आई आणि ए आई हा फरक तसा नेहमीच राहतो. तरीही या काळातील अहो आई आणि ए आई असा फरक मुलींसाठी तसा कमीच झाला आहे. या लाॅकडाऊनच्या मिळालेल्या वेळेमुळे तो अजून कमी झाला असेल. अशी अपेक्षा आहे. 

      July 5, 2020


  • प्रेमाच्या वाटेवर – भाग ३

    मनिषाच्या आठवणीत तो लिहू लागला. मनिषाचं स्वप्न त्याने आपल्या हृदयात साठवलं आणि सुरु झाला त्याचा प्रवास एक प्रसिद्ध लेखक होण्याच्या दिशेने.

      September 3, 2021


  • प्रयत्नांती परमेश्वर

    बर्‍याच वर्षांपूर्वी इटलीतील एका शहरातील एका शाळेत घडलेली ही एक घटना. वर्गात एक शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवित होते. त्याचवेळी वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक मुलगा उभा राहून ते काय शिकवितात हे लक्ष देऊन ऐकत होता. त्या मुलाचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते, पायात चप्पलही नव्हती. हा मुलगा खिडकीपाशी उभा राहिल्याने वर्गातील मुलांचे लक्ष सारखे त्याच्याकडे जात होते. त्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली.

    आपण इतके तन्मयतेने शिकवित आहोत व एकाही मुलाचे लक्ष नाही, व त्याला कारणीभूत तो मुलगा आहे हे पाहून ते अतिशय संतप्त झाले व त्याच अवस्थेत ते वर्गाबाहेर आले व त्यांनी त्या मुलाला खडसावून विचारले, '' इथे उभा राहून काय करतोस?''

    त्यावर तो गरीब मुलगा घाबरत म्हणाला, '' सर, मी तुम्ही काय शिकवता ते ऐकत होतो. परंतु माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर उद्यापासून मी येथे उभा राहणार नाही. ''

    त्या गरीब मुलाच्या तशा अवतारातही त्या शिक्षकाला त्याच्या डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसली. ते त्याला म्हणाले,'' तुला शिक्षणाची आवड आहे तर मग शाळेत का येत नाहीस?''

    त्यावर तो मुलगा खाली मान घालून म्हणाला, '' सर, माझे वडील साधे मजूर आहेत. त्यांना माझ्या शाळेची फी परवडत नाही म्हणून मला शाळा अर्धवट सोडावी लागली. ''

    हे सांगताना त्या मुलाला गहिवरून आले. तरीही त्या शिक्षकाचा प्रथमदर्शनी त्या मुलावर विश्वास बसला नाही. ते त्याला म्हणाले, ' 'मी काल वर्गात काय शिकविले हे तू सांगू शकशील काय?'' त्यावर त्या मुलाने लगेच आदल्यादिवशी त्यांनी काय शिकविले ते सांगितले.

    त्याची स्मरणशक्ती पाहून शिक्षक दंगच झाले. त्यानंतर ते त्याला म्हणाले, '' शाळेच्या फीची मुळीच काळजी करू नकोस. उद्यापासून सरळ वर्गात येऊन बसत जा. ''

    त्याप्रमाणे तो विद्यार्थी शाळेत शिकू लागला व प्रत्येक वर्षी तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेला. मोठेपणी हाच मुलगा प्राध्यापक होऊन प्रसिद्ध लेखकही झाला. त्याचे नाव होते लुडव्हिक अँटोनिओ म्युरोहोरी..

    (थोरांच्या गोष्टी या संग्रहातून)

      July 20, 2016


  • जे केले ते न करायचे (सुमंत उवाच – १६)

    सुमंत जयंत परचुरे. 

    आयुष्यात कोणत्याही वेळी काय करायचे हे कसे ठरवायचे? मग लहान मूल असो किंवा पूर्ण वाढ झालेला माणूस त्याला कोणीतरी उपदेश देणारा लागतोच.

      September 7, 2021


  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती

    सावरकरांची क्रांतीवृती सर्वश्रुत आहे.वयाच्या केवळ १५व्या वर्षी  “मी स्वदेश स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा झेंडा उभारून, शत्रूला मारीत मारीत मरेतो झुंजेन“ अशी शपथ घेतली होती.

      September 30, 2022


  • जग दिसते तसे नसते

    एक पिटुकला उंदीर होता. त्याने आपल्या बिळाबाहेरचे जग पाहिले नव्हते.. बाहेर जावे आणि सारे जग पाहून यावे असे त्याला सतत वाटत असे. एकदा त्याला त्याच्या आईचा मूड चांगल असल्याचे दिसले. त्याने पटकन आईला विचारले, ‘आई, मी जरा बिळाबाहेर फिरून येऊ का?” आई म्हणाली, ‘ हो जा ना. पण जरा सांभाळून जा बरं का?’ थोड्या वेळानंतर पिटुकला उंदीर बिळाबाहेरच्या जगात होता. तोच त्याला एक कोंबडा दिसला. कोंबड्याचा लालभडक तुरा आणि कर्कश आवाज ऐकून उंदीर घाबरला. तो घाबरून कोंबड्यापासून वेगाने दूर पळाला. त्याला वाटले हा भयंकर प्राणी दिसतो आहे.

     

     

      July 3, 2025


  • बोल अबोल

    जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावर मनापासून प्रेम केल तिच्याकडे माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त न केल्याबद्दलची खंत मला आजही अस्वस्थ करते. कदाचित त्यावेळी मी जो विचार केला तो बरोबर नव्हता हे मला आज वाटते आहे कारण आज मी विचारवंत झाल्याचा मला साक्षात्कार झालेला आहे पण त्या वेळची माझी जगाकडे पाहणारी दृष्टी आणि माझी आजची जगाकडे पाहण्याची दृष्टी यांच्यात बरेच अंतर निर्माण झालेले आहे. हे खरं होत की माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिचे चालणे, बोलणे, हसणे, नावणे, गाणे, रूसणे आणि रडणे ही मला आवडत होते. पण सर्वात महत्वाचे म्ह्णजे तिच्या अचाट बुध्दीमत्तेवर माझे खरे प्रेम होते. तिला ही माझ्यातील कला गुणांबद्दल आदर होता. त्यावेळच्या माझ्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि माझ्या खाद्यावर मी स्वतःहून घेतलेल्या माझ्या कौटूंबिक जबादार्‍यांमुळे मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही. मला ती नाही म्ह्णण्याची भिती वाटत नव्ह्ती पण जर ती हो म्ह्णाली तर तिला माझ्यासाठी थांबायला मी कोणत्या तोंडाने सांगणार होतो ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्ह्ते कारण काही तरी जगावेगळे मिळविण्याच्या दिशेने केव्हांच माझा प्रवास सुरू झाला होता.

    या प्रवासात मला अनेक जणी भेटल्या पण त्यापैकी एकही तिची बरोबरी करू शकत नव्हती. अजून काही वर्षे ती थांबली असती तर कदाचित मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलच असत. पण कदाचित ते नियतीलाच मान्य नसावे बहूदा. तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला मी तिच्या या निर्णयाच समर्थनच केल कारण तेंव्हा मला माझं ध्येय खुणावत होत. पण तिला गमावल्यावर थोड्याच वर्षात मी काय चूक केली हे माझ्या लक्षात येऊ लागले. आज मी मिळविलेल्या यशावर फक्त तिचा आणि तिचाच अधिकार आहे. माझे यश हे मला फक्त तिच्यासोबत साजरं करायला आवडलं असतं म्ह्णूनच मी माझ्या यशाचा आनंद आजही कोणासोबत कधीच साजरा करीत नाही. मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही याची मला सर्वात जास्त खंत जाणवते कारण मी जर तस केल असत तर कदाचित माझ्या जीवनाला एक वेगळच वळ्ण मिळाल असत आणि मी तिच्या ही जगण्यालाही एक अर्थ प्राप्त करून देऊ शकलो असतो. आज तिच्या वाट्याला आलेले एका सर्वसामान्य गृहीणीचे जीवन माझ्या मनात खर्‍या अर्थाने खंत निर्माण करून जाते. माझं प्रेम अबोल न ठेवता बोलून व्यक्त केल असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील ही एकमेव खंत ही दूर झाली असती.

    -- निलेश बामणे

      December 23, 2015


  • उल्लू टिल्लू बेडूक (संक्षिप्त रूपांतरीत कथा २२)

    ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते.

      June 5, 2022


  • काय देवा आता पहातोसी अंत (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३३)

    शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण निरपराध्याला शिक्षा होऊ नये, असं कां म्हटलं जातं, ते ह्या कथेत सांगितलं आहे. मूळ कथा रशियातील त्झारच्या अन्यायी राजवटीच्या काळांत घडलेली दाखवली आहे. मृत्यूलोकांत विनाकारण यातना भोगणा-याला पण परमेश्वराला न विसरणा-याला तो मरणानंतर सद्गती देतो, असा ख्रिश्चॅनीटीचा संदेश कथेत आहे. रूपांतरात मी पापक्षालन, पूर्व कर्मे असा भारतीय उल्लेख केला आहे.

      July 10, 2022


  • मन आणि बुद्धि

    मन , बुद्धि , आणि सदगुण , सदाचार म्हणजे ईश्वराच्या साक्षात्काराचे केवळ अंशात्मक असे दर्शन आहे. या सर्वच विधायक गोष्टी जर माणसात एकत्र आल्या तर तो नुसता माणूस राहणार नाही. त्यात देवत्वाचा अंश निर्माण होईल.
    जे जे चांगले आहे , सुंदर आहे , सत्य आहे , शाश्वत चिरंजीवी आहे तो एक ईश्वरी साक्षात्कार आहे.

    माणसाची बाह्य सुस्वरुपता , सौंदर्य ही त्याच्या दिसण्यावर , किंवा त्याच्या व्यक्तिमत्वावर असते हे निर्विवाद पण या सुंदरतेतील जीवंतपणा सात्विक डोळ्यातून जाणवतो .
    डोळे म्हणजे मनाचा आरसा..!!
    मनाची निर्मलता म्हणजे ईश्वरियता
    सर्वाप्रती केवळ कल्याणकारी भावनां...!!
    हे मानवतेचे मूलतत्व आहे..असे माझे मत.

    मानवी मनभावनां , बुद्धि , आत्मा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन आणि असे संगमी जीवन म्हणजे शाश्वत सुख..!!

    मानवी मन अनाकलनिय आहे. म्हणुनच " याच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही किंवा हा आतल्या गाठीचा आहे अशा प्रकारचे वाकप्रचार आपल्याला समाजात रूढ़ झालेले आढळून येतात.
    तेंव्हा मानवी मनांचे अनेक कंगोरे आहेत. अनेक उपमांनी मनाला संबोधले आहे. विकारी मन साऱ्या षडरिपुंचे ते आगर आहे. तर सात्विक मनाला सद्गुणांची झालर आहे.

    मन:शक्ती म्हणजे जाणीवपूर्वक विचार , स्मरणशक्ती ,भावनांची गुंफण , तर्क , कल्पना असे म्हणता येईल. या बुद्धिरूपी मेंदुच्या प्रेरणा आहेत. मन कधी सोज्वळ , संस्कारी वैचारिक सद्गुणांच प्रतीक आहे. कधी संथ जलाशय तर कधी आक्राळ विक्राळ लाटा उधळणाऱ्या महासागरासारखं देखील त्याच भयंकर असे रूप आहे. तर कधी राऊळ गाभाऱ्यातील तेवणाऱ्या मंद प्रसन्न ज्योती सारखं शांत रूप आहे. तर कधी धगधगता ज्वालाग्नी देखील आहे. याचा अनुभव आपल्याला येतो. मन चंचल आहे. चंचलता त्याचा स्थायी भाव आहे.-
    मानवी शरीराला अनेक अवयवांनी दृष्य सुरुपता आलेली आहे . पण मन आणि बुद्धि जीवनाचे समतोल साधणारे प्रेरक असे अदृष्य निराकार अवयवच म्हणावे लागतील आणि ते आपल्या स्पंदनासोबत असतात हे वास्तव आहे. नीर क्षीर विवेक बुद्धिचे मूल्यांकन करण्याची क्षमता याच अदृष्य , निराकार अशा अवयवामध्ये आहे.
    वर म्हटल्याप्रमाणे मन चंचल , सैरभैर , दिशाहीन स्वैर भरकटणारे बेकाबू जरी असले तरी वर म्हटल्या प्रमाणे आपले अंतर्मन म्हणजे एक बिलोरी आरसा असून ते मन आपल्याला कधीच फसवु शकत नाही.
    आपल्या व्यक्तिमत्वाचं सत्य प्रतिबिंब हे आपल्या मनाच्या दर्पणात असतं..!!

    नीरव शांततेत आपल्या मनाची ही विविध रूपं
    म्हणजे आपण केलेले सत्कर्म , दुष्कर्म , पाप , पुण्य या साऱ्या चांगल्या , वाईट गोष्टी अगदी एखाद्या चलचित्रा प्रमाणे आपण सहज पहात असतो. म्हणुच आपले अंतर्मन आपल्याच जीवनातील प्रखर तेजस्वी सत्य कधी लपवू शकत नाही.
    म्हणून तर जीवन एक रहस्य आहे असे म्हटले आहे आणि त्याचाच वेध घेण्यासाठी मन धावतं असतं.!!

    ऋणानुबंधानं एकत्र आलेल्या व्यक्ती या मनानं अगदी निश्चित सन्निध असतीलच असं ठामपणे सांगता येत नाही. तिथे अंतरातिल भावभावनांच अव्यक्त गूढ असतं.!
    अशा मनाच्या अवस्थेत मनाला विवेकी बुद्धिच सर्वारथाने सदैव सावरत असते.
    म्हणूनच तर बुद्धि ही विवेकाधिष्ठ , वैचारिक , सतर्क , संस्कारी , कल्याणकारी मार्गदर्शक अशी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
    मनाला सद्गति , सन्मति , योग्य तो सन्मार्ग दाखविणारी अशी शक्ती आहे. मन चंचल स्वैर मुक्त आहे . पण बुद्धि ही निर्णायक , अविचल ,निश्चयी आहे.
    मानवी जीवनात या बुद्धी आणि मन यांचा सकारात्मक विवेकी संयोग , समतोल हा जीवनाच्या सात्विक सांगते साठी अत्यंत महत्वाचा आहे.
    भारतीय प्राचिन सर्वच ग्रंथसंपदे मध्ये " मन आणि बुद्धि " याबाबत अनेक दृष्टांत देवून विवेचन केलेले आहे. मानवी नात्यांची , त्या नात्यातील सर्वच भावसंवेदनांची , सगुण , निर्गुण, दुर्गुण , स्वार्थ , निस्वार्थ , वात्सल्य , प्रेम , द्वेष , संघर्ष , आणि त्यातून अंतिम सत्य असणारा जीवनाचा अर्थ उलगडुन दाखविला आहे याचा प्रत्यय येतो.

    मन निरंकुश सार्वभौमी राजासारखे वागत असते

    मात्र त्यावर नियंत्रणी अंकुशाची गरज आहे . ती बुद्धि म्हणजेच आपला कार्यरत असणारा विवेकी मेंदूच अशा प्रकारचा अंकुश मनावर ठेवू शकतो. आणि मनाला अविवेका पासून सावरतो , जागृत करतो.
    अशा मन आणि विवेकी बुद्धिचा साधर्मी ,समन्वयी समतोल मानवी जीवनाला कल्याणप्रदी ठरतो.
    जे संतत्व भगवंत दर्शनाचा मार्ग सुकर , सुलभ , सोपा करतात त्यांनी देखील आपल्या संतवाङ्गमयातुन हा विचार मांडलेला आढळून येतो.
    जीव सृष्टिमध्ये मनुष्य हा सर्वात हुशार आहे. चांगले काय किंवा वाईट काय किंवा सत्य काय हे समजण्याची जन्मजात नैसर्गिक दैवी देणगी , बुद्धिमत्ता त्याला ईश्वर कृपेने लाभली आहे. तरी तर्क आणि वितर्काच्या द्विधा मनावस्थेतुन योग्य तो खंबीर मार्ग काढण्यासाठी सुसंगत मन आणि बुद्धि योग्य तो सुंदर दिशा दाखवतात. यालाच मनावरचे सुंदर संस्कार आणि त्याला अनुषंगुन भावनिक कल्याणप्रदी बुद्धिची प्रगल्भता हाच विवेकी संस्कार आहे.
    म्हणूनच प्राचीन अनादीकालापासुन जे संत ,मुनी , ऋषी यांचे वाङ्गमय ग्रंथ स्वरुपात उपलब्ध आहे ते वाचल्यावर आपल्याला संस्कारांची महती लक्षात येते.

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली , जगतगुरु संत तुकाराम , संत नामदेव , राष्ट्रसंत रामदास स्वामी तसेच अनेक ज्ञात संतांनी , कविवरांनी , साहित्यिकांनी , विचारवंतांनी आपल्या साहित्य संपदेत कल्याणकारी कृतार्थ जीवनाचा समग्र अर्थ समजून संगितला आहे.

    रामायण , महाभारत , भगवत गीता , ज्ञानेश्वरी , तुकारामांची गाथा , पसायदान , हरिपाठ , दासबोध इत्यादि ग्रंथामधुन मानवी जीवनाच्या भावनिक नीतिमुल्यांचा परामर्श घेतला आहे.

    प.पु. रामदास स्वामींनी आपल्या २०५ मनाच्या श्लोकामधून मनाबद्दल प्रत्येक श्लोकात अत्यंत मनोवेधक , प्रासादिक प्रबोधन केलेले आहे....

    हे मना विवेकी बुद्धिने तू जीवन कल्याणासाठी निर्मोही भक्तिने वाटचाल कर असा उपदेश आपल्या सर्वांना केला आहे...
    "
    प्रभाते मनी राम चिंतित जावा।
    पुढे वैखरी राम आधी वदावा।
    सदाचार हा थोर सांडू नये तो।
    जनी तोची तो मानवी धन्य होतो।

    अशी सुरुवात करून

    या मनाच्या श्लोकांची सांगता शेवटच्या २०५ व्या श्लोकात...

    मनाची शते ऐकता दोष जाती ।
    मतिमंद ते साधना योग्य होती ।
    चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
    म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी।

    असे उद्बोधन करून केली आहे.
    ते म्हणतात..
    " नुसते शंभर श्लोक आणि त्याचा अर्थ जरी तुम्ही ऐकला किंवा वाचला तरी तुमच्यातील सर्वदोष समूळ नष्ट होतील आणि मन निकोप होवून बुद्धि प्रगल्भ होवून जीवनाचा अर्थही कळू लागेल.....!!!

    इती लेखन सीमा

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    अध्यक्ष : महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे. (महाराष्ट्र )

    दिनांक : १२ / ९ / २०२२

      October 9, 2022