(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कुटुंब !

    भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या, उर्मटचेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला, पांढऱ्याशुभ्र कपड्यातला, बाराफुटी कट आऊट बोर्ड, स्वागताला उभा केला होता. डीजेच्या भिंती, आणि बाकी — वेगळं काहीच नव्हतं. नेहमीची लगीन घाई, माणसांची वर्दळ, तेच ते.

      March 24, 2021


  • लताचे पराभव !

    ७०हून अधिक वर्षे सुरांचे आभाळ समर्थपणे पेलणारी लता ! अनेक सहगायकांबरोबर ती गायली आहे. तिची उंची आता सर्वमान्य झालीय. संगीत क्षेत्राचे वादातीत नेतृत्व तिच्याकडे आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही. खुद्द भालजी पेंढारकरांनी तिचे वर्णन ” कृष्णाची हरवलेली बासरी ” असे केले आहे. आनंदघन या टोपणनावानें तिने काही चित्रपटांना दिलेलं संगीत अनुभूतीपलीकडचे आहे. तरीही मी वरील शीर्षक वापरतोय.

      February 7, 2022


  • समुद्राचे काळीज/ समुद्र आणि धरतीची अनोखी प्रेम कहानी

    समुद्र आणि धरतीचे असे अद्भुत मीलन पाहून कवींनी मेघ आणि धरतीच्या प्रेमावर लांखो कविता रचल्या असतील पण त्यांस काय माहित मेघांमध्ये असते समुद्राचे काळीज…..

      September 12, 2011


  • पाश्चात्य संस्कृती

    ( बर्‍याच दिवसानंतर विजय आणि अजय हे दोन मित्र भेटलेले असतात आणि हॉटेलातील एका टेबलावर बसून चहा पिता-पिता गप्पा मारत असतात तेंव्हा त्याच्यात झालेला नाट्यमय संवाद )

    विजय – ( अजयकडे पाहत ) मध्यंतरी गोव्याला गेला होतास का ?

    अजय – ( आश्चर्याने ) तुला कसं काय कळल ?

    विजय – अरे ! कसं काय ? फेसबुकवर तू गोव्याला काढलेले फोटो ‘अपलोड’ नाही का केलेस ? तेच मी पाहिले .

    अजय – अच्छा ! ते तू पाहिलेस का ?

    विजय – अरे ! तू गोव्याला जावून नक्की केलस काय ? तू ना दारू पित, ना मच्छी मटन खात , ना तुला पोहता येत, तिकडे जावून काय समुद्रावर कविता वगैरे लिहल्यास की काय ?

    अजय – अरे ! तुला कोणी सांगितल की फक्त दारूडेच जातात गोव्याला सहलीला ? गोव्याला इतरही बर्‍याच गोष्टी आहेत की पाहण्या सारख्या.

    विजय – हो ! आहेत ना अर्धनग्न स्त्रिया समुद्राच्या किणार्‍यावर उन खात पडलेल्या, पाहिला तुझा फोटो पाहिला समद्र किणार्‍यावर त्या अर्धनग्न पाश्चात्य तरूणीसोबत काढलेला.

    अजय – हो ! त्या अर्धनग्न तरूणीमुळेच माझा पाश्चात्य संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्या फ्क्त शरीराने अर्धनग्न असतात पण मनाने निर्मळ आणि पवित्र असतात पण आपण मनाने आणि दृष्टीनेच अर्धनग्न असतो. अश्लीलता आपल्या नजरेत भरलेली असते ती अर्धनग्न तरूणी किती सहज गोड हसत माझ्या सोबत फोटो काढायला उभी राहिली होती. तिने माझ्या भावनांचा आदर केला होता तिच्या मनात तेंव्हा विचारही आला नाही की हया माणसाला कदाचित आपल्या अर्ध नग्नतेत रस असेल म्ह्णून. आज तिच्यासोबतचा फोटो मी पाहतो तेंव्हा चुकूनही माझे मन तिच्या अर्धनग्नतेकडे नाही तर तिच्या चेहर्‍यावरील निरागस आणि निर्मळ हस्याकडे आकर्षित होते.

    विजय – आता तुला पाश्चात्य संस्कृती आवडायला लागलेली दिसतेय ?

    अजय – संस्कृती पाश्चात्य काय आणि भारतीय काय ? ती फक्त माणणार्‍यांसाठीच मह्त्वाची असते. मला माझ्या भारतीय संस्कृतीबद्द्ल नितांन्त आदर आहे म्ह्णूनच तर त्या फोटोत मी समुद्र किणार्‍यावरही पूर्ण कपडयात तिच्यापासून किंचित अंतर ठेवूनच उभा असलेला दिसतोय ना ? ती माझ्या संस्कृतीचा आदर म्ह्णूनच माझ्या सोबत फोटो काढायला तयार झाली होती उद्या ती माझ्या सोबतचा तिचा फोटो तिच्या देशात कोणाला दाखवेल तेंव्हा त्यांनाही आपली संस्कृती कळेलच की. मला फक्त इतकच वाटत ती जर आपल्या संस्कृतीचा आदर करत असेल तर मी ही तिच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा ! तिच्या संस्कृतीकडे अश्लिलता म्ह्णून पाहता कामा नये.

    विजय – बरोबर आहे तुझ ! या दृष्टीने मी कधी विचारच केला नाही. आपण सतत पाश्चात्य संस्कृतीकडे अश्लीलतेचा चष्मा लावूनच पाहतो त्यामुळे आपल्याला त्यांच्या संस्कृतीतील फक्त अश्लीलताच दिसते. त्यांना जर आपल्या भारतीय संस्कृतीबद्द्ल आदर वाटत असेल तर आपणही त्यांच्या संस्कृतीचा आदरच करायला हवा !

    अजय – आता कसं बोललास ? प्रत्येक संस्कृती ही आपल्या जागी बरोबरच असते म्हणून आपली संस्कृती सोडून दूसर्‍या संस्कृतीचा स्विकार करणे योग्य होत नाही पाश्चात्य संस्कृतीचा आदर करणे आणि तिचा स्विकार करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. दुसर्‍या संस्कृतीतील काही गोष्टीचा आपण स्विकार जरी केला तरी तो डोळसपणे करायला हवा !

    विजय – हो ! तू अगदी योग्य तेच बोललास , चल आता निघूया मला घरी जायला उशिर झालाय !

    ( दोघेही टेबलावरून उटून हॉटेलच्या बाहेर पडतात.)

    -- निलेश बामणे

      December 23, 2015


  • वृक्षांचे देवत्व

    वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर….

      June 30, 2013


  • नाथ हा माझा’ – कांचन काशिनाथ घाणेकर

    डॉ. काशीनाथ घाणेकर! एक कलंदर व्यक्तीमत्वाचा मनस्वी कलावंत! त्याच्या देखण्या रूपानं, स्वत:ला झोकून देऊन केलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना विलक्षण मोहिनी घातली होती. पंचवीस वर्षे प्रेक्षकांना रिझवणार्या या कलावंताचं पारदर्शी व्यक्तीचित्रं या पुस्तकात कांचन घाणेकर यांनी चितारलं आहे. त्यात त्यांच्या बेभान, बेदरकार, व्यसनाधीन वृत्तीसह सार्या गुणदोषांचे, प्रेमप्रकरणांचे, नाट्यप्रवासाचे निखळ रंग उमटले आहेत. एका कलावंताचे कौटुंबिक, मानसिक, कलात्मक जीवन चितारणारे रसाळ चरित्र.

      September 14, 2017


  • खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी (आठवणींची मिसळ ३)

    ज्योतिष, पत्रिका, ग्रह ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असं तर्काधारे कितीही समजवून दिलं तरी माणसाच्या मनांत भविष्यात काय घडणार याचं कुतूहल असतचं. त्याचा गैरफायदा घेतला जातो.पण कांही कांहीच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की खरंच असं कांही नसेल?

      July 23, 2022


  • दगड

    लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते अशी मान्यता आहे, हे लक्षात घेतल्यास दगडाचे देखील तसेच आहे. कारण एखाद्या साधारण दगडाला कोण्यातरी कलाकाराचा हात लागला तर त्यातून मुर्ती साकारते, वनवासात असताना रामाच्या स्पर्शातून अहिल्या प्रकटली होती. विठ्ठलाची मुर्ती आणि नामदेवाची पायरी दोन्ही दगडाच्याच ना. दोघांनाही भाविकांच्या मनात श्रद्धेचं स्थान…..

      April 26, 2020


  • डुक्कर आणि दारुडा

    एक घोट घे, दोघही झिंगात येऊ, गळ्यात- गळे घालून , गटरात लोळू, एक-मेकांना चाटू व स्वर्गसुख भोगू.

      April 1, 2012


  • अधीर मन, अपूर्ण ध्यान (सुमंत उवाच – ११)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मला किती कळतं, मला किती माहिती याचा गवगवा करणारा आजकाल समाजाला प्रबोधन करू पहातो, तो खरंच त्या केपेबल आहे का? याची खात्री आपण कधीच करत नाही.

      September 2, 2021