(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाघीण – भाग ३

    दुपारचे  दोन वाजले होते,  रखरखत्या उन्हात सुगंधा घराकडे निघाली होती. सकाळपासून अन्नाचा एक दाणा सुध्हा पोटात गेला नव्हता. त्यामूळे तिला थकवा आला  होता. आपली अशी अवस्था आहे, तर आपल्या चिमुकल्याच काय हाल झाले असतील, या विचारत ती होती.

      January 18, 2022


  • शेजारधर्म

    प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याने सर्वप्रथम पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरते असा शोध लावला. त्याच्या आधी 'सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो' हाच सार्वत्रिक समज होता. त्यामुळे गॅलिलिओच्या था शोधाला अर्थातच प्रचंड विरोध झाला. त्या काळच्या धर्ममार्तंडांनी तसेच कर्मठ लोकांनी गॅलिलिओविरुद्ध मोहीमच उघडली.

    सामान्य नागरिकही गॅलिलिओला शिव्या देण्यात तसेच त्याची निंदानालस्ती करण्यात आघाडीवर होते. त्यामध्ये गॅलिलिओचा शेजारीही होता. त्याने तर गॅलिलिओवर बहिष्कारच टाकला होता. त्या शेजाऱ्याचा तरुण मुलगा आजारी पडला व दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली. गॅलिलिओला हे कळल्यावर त्याने त्याच्या ओळखीच्या नामांकित डॉक्टरची भेट घेतली व त्याला घेऊन तो शेजाऱ्याच्या घरी आला. दरवाजा ठोठावल्यानंतर त्या शेजाऱ्यानेच दार उघडले व गलिलिओला पाहिल्यावर कसलाही न विचार करता त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली.

    त्याच्या शिव्या संपल्यानंतर गॅलिलिओ शांतपणे त्याला म्हणाले, 'मी तुझ्या मुलाचा गंभीर आजार ऐकून त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक नामांकित डॉक्टर घेऊन आलो आहे.'

    ते ऐकून तो शेजारी वरमला व त्याचवेळी त्याला हीही जाणीव झाली, की आपण त्या नामांकित डॉक्टरचे बिल देण्यास असमर्थ आहोत, शेजाऱ्याने आपणास डॉक्टरची फी परवडणार नाही म्हणून उपचार नकोत असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅलिलिओ त्याला लगेच म्हणाला, 'तुम्ही पैशाची काळजी करू नका कारण तुमचा मुलगा आजारातून वाचणे हे महत्त्वाचे आहे व शेजारधर्म म्हणून माझे ते कर्तव्य आहे. त्यामुळे डॉक्टरांची फीज व औषधाचा खर्च मीच करणार आहे.'

    ते ऐकून तो शेजारी फारच खजिल झाला व गॅलिलिओला म्हणाला, 'मी तुम्हाला रोज शिव्या देऊनही तुम्ही माझ्या मुलाला वाचविण्यासाठी एवढा खर्च करायला कसे तयार झालात?'

    त्यावर गॅलिलिओ म्हणाला, 'सूर्य पृथ्वीभोवती फिरी की पृथ्वी सूर्याभोवती फिरो' हे आपल्या शेजाऱ्यामधील वैर निर्माण होण्याचे कारण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने चांगला शेजारधर्म पाळणे आवश्यक आहे व तो पाळण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही तुमचा शेजारधर्म (शिव्या देण्याचा) पुढेही पाळलात तरी त्याला माझी हरकत नाही. ''

      February 25, 2017


  • पहिला झेब्रा

    पृथ्वीवर सगळंच नवं नवं होतं, तेव्हा सगळी जनावरं एकसारखी होती. त्यांची शिंगं वेगळी आहेत, त्यांच्या अंगावरची कातडी चमकदार पिवळी तांबडी आहे आणि तिच्यावर काळे ठिपके आहेत असं काहीच नव्हतं. सृष्टिनिर्माता निर्माण करीत असलेल्या विशाल व्यवस्थेला पूर्ण स्वरूप देण्यात गढलेला होता. त्याने नाना प्रकारची शिंगं बनवली. आकार, लांबी, रुंदी ह्यात अफाट वेगवेगळेपणा ठेवला. नाना प्रकारची कातडी केली. केसाळ, रंगीबेरंगी, ठिपकेवाली, पट्टेवाली. काम झालं तेव्हा निर्मात्याने शिंगं, कातडी सरोवराच्या काठी असलेल्या एका गुहेत ठेवली.

      October 5, 2025


  • तु का तो चोर!

    गोपाळ कुणी खाल्ला असेल रे तो पेरू! आई मीच खाल्ला. तुच निरोप द्यायला सांगितले बघ मला सकाळी कि तुमचा कार्यक्रम उद्या दुपारी नवले काकूकडे ठरला आहे हे सांगायला गेलो होतो. काकूला निरोप देऊन परतत असताना पेरूच्या वासाने मला आकर्षित केल.

      May 8, 2021


  • मनी जे धरावे (सुमंत उवाच – ३३)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ही गोष्ट खूप आवडते, मला अमुक गोष्ट सारखी करावीशी वाटते. या सारख्या अनेक विषयाच्या वाटा आपल्या मनातल्या मार्गावर सतत मार्गक्रमण करीत असतात.

      September 24, 2021


  • अजब न्याय नियतीचा – भाग ४

    बोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, ” खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही….. असच…. सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर….”

      September 24, 2019


  • नकोशी (कथा)

    मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो.

      May 11, 2022


  • अमेरिकेतले हायवेज – मानवी प्रगतीचे निदर्शक

    आम्ही या वर्षीच्या जानेवारीत अमेरिकेला गेलो होतो. या छोटयाशा तीन आठवडयांच्या ट्रीपमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर इथले सुपर हायवेज – एक्सप्रेसवेज. खरंच फार सुंदर आणि शिस्तशीर आहेत. या रस्त्यांवरून कोणीही अगदी आरामात एका दिवसात (१०-११ तासात) एक हजार किमीचा प्रवास करू शकतो.

      June 27, 2023


  • करोना (कथा)

    उद्याच्या वृत्तपत्रात हेडलाईन आणि आता रात्रीच्या न्यूज चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज असणार होती, पालकमंत्री इसाक साहेबांच्या पुढाकाराने आणि सर्व आमदार, खासदारांच्या सहकार्याने कोविड १९ ची हि लाट लौकरच आटोक्यात येणार.

      February 4, 2026


  • जिमी वेल्स ‘ विकिपिडियाचा जनक ‘

    जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती

      August 7, 2023