(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • p-2950-Apple-Halwa-300

    सफरचंदाचा हलवा

    साहित्य :

    १/२ टीस्पून तूप, १/२ कप किसलेले सफरचंद, १/४ कप मावा, ३/४ कप दुध, १/२ टीस्पून साखर, १/४ कप कापलेले अक्रोड, काजू, बदाम तुकडे, व्हॅनिला इसेन्स २-३ थेंब.

    कृती :

    १ . नॉन-स्टिक कढई मध्ये तूप गरम करा मग त्यात सफरचंद घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटे सारखे हलवत राहा.
    २ . आता मावा टाका आणि २-३ मिनिटे हलवा.
    ३ . नंतर दुध टाकून ७-८ मिनिटे हलवा .
    ४ . आता साखर आणि कापलेले ड्राय फ्रुट तुकडे टाका. मंद आचेवर ७-८ मिनिटे हलवत राहा जोपर्यत त्यातील पाणी कमी होत नाही.
    ५ . पाणी आटलं की आच घालावा आणि त्यात आता व्हॅनिला इसेन्स घाला.(व्हॅनिला इसेन्स नसलातर वेलची पूड घाला)

    टीप :
    सफरचंद कापले असता ते काळे होते तर एक-एक करून किसा आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवले असता काळ होत नाही(कीस करण्यापूर्वी).

  • अंड्याचा पदार्थ – Egg Shakshouka

    साहित्य : ४ अंडी,तेल,कांदा,टोमॅटो,धणे-जिरे पावडर,तिखट,हळद,कोथिंबीर,मीठ.

    कृती : प्रथम एका पॅनमध्ये तेल तापवून घ्या. त्यावर एक बारिक चिरलेला कांदा चांगला लालसर परतून घ्या. मग त्यात टोमॅटो घालून परतून घ्या. त्यात धणे-जिरे पावडर,हळद,तिखट,मीठ घाला व थोडा पाण्याचा हपका मारुन हे मिश्रण शिजवून घ्या. त्यानंतर या मिश्रणात ४ खोलगट भाग करुन त्यावर ही अंडी फोडा.वरुन थोडी मिरपुड आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक वाफ काढा.

  • p-1137-ratatouille

    रटाटौली

    साहित्य:- १ मोठे वांगे, १ झुकिनी, ३ मध्यम टोमॅटो, २ मध्यम कांदे, लाल, पिवळी, हिरवी ढोबळी मिरची लहान असल्यास प्रत्येकी एक मोठी असल्यास प्रत्येकी अर्धी, लसणीच्या पाकळ्या २ ते ३, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल,१ टीस्पून विनेगर किवा लिंबाचा रस, २ टेबलस्पून हर्ब्ज दे प्रोविन्स. रोझमेरी, बेसललिव्ज पावडर, ओरेगानो, फेनेल (बडिशेप), दालचिनी पावडर असं सगळंकिवा ह्यातलं जे मिळेल ते थोडं थोडं घेऊन साधारण २ टेबलस्पून होतील एवढं घेऊन एकत्र करा आणि त्यात एक तमालपत्र घाला. मीठ आणि मिरपूड चवीनुसार.

    कृती:- सर्व भाज्यांचे चौकोनी मोठे तुकडे करा. लसूण बारीक चिरा. एका पसरट पॅन किवा कढई मध्ये ऑलिव ऑइल गरम करा. त्यात वांगे, झुकिनी व बेल पेपर्सचे तुकडे घाला व साधारण ५ मिनिटे परता. तुकडे गोल्डन व्हायला हवेत पण पूर्ण शिजायला नकोत, क्रंची हवेत. मग हे वेगळ्या वाडग्यामध्ये काढून ठेवा. आता पॅनमध्ये कांदा, लसूण आणि हर्ब्ज दे प्रोविन्स घाला,तमालपत्र घाला आणि कांदा गोल्डन होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो घाला आणि २-३ मिनिटे परता.

    आता ह्यात वाडग्यात काढून ठेवलेले वांगे+झुकिनी+बेलपेपर्स घाला. मीठ व मिरपूड घाला. लिंबाचा रस किवा विनेगार घाला. आता एअर फ्रायर २०० अंश से वर प्रिहिट करा. सर्व भाज्या व मसाले एकत्र केलेले बास्केट त्यात ठेवा. १० मि. एअर फ्राय करा. मग बास्केट बाहेर काढून भाज्या ढवळून घ्या थोडेसे ऑलिव्ह ऑइल ब्रश करा व परत ५ ते ६ मिनिटे एअर फ्राय करा. २ ते ३ मिनिटे फ्रायर मध्येच भाजी राहू द्या. नंतर सर्व्ह करा. गरम रटाटौलीचा अस्वाद भात, ब्रेड, न्यूड्ल्स तुम्हाला हवे असेल त्याबरोबर घ्या. एअर फ्रायर मधील रटाटौली मस्त क्रंची होते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-69-carrot-salad

    गाजराची कोशिंबीर

    साहित्य :

    गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ.

    कृती :

    सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे.

    त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी गाजरावर ओतून हवा असल्यास नारळाचा चव व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

  • Matar-300

    मटार चाट

    मिरच्या उभ्या चिराव्या. पातेल्यात तेल तापवावे. त्यावर जिरे व मिरच्या घालून धुतलेले मटारदाणे फोडणीस टाकावेत. अर्धी वाटी गरम पाणी घालून वर पाण्याचे झाकण ठेवावे. उकळी आल्यावर आंच मंद ठेवावी. सुमारे २०-२५ मिनिटांनंतर मटार शिजतील त्यात मीठ व जरून वाटल्यास झाकणीवरचे गरम पाणी घालावे.

  • Karwari-fried-fish-300

    कारवारी तळलेला मासा

    प्रथम चिंच, ब्याडगी मिरची एकत्र वाटून घेऊन त्याचा गोळा करावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ते तसेच ठेवावे.(पाणी घालू नये). हे चिंच-मिरचीच मिश्रण माशाच्या तुकड्यांना लावावं आणि तुकडे अर्धा तास मुरवत ठेवावे. अर्ध्या तासाने तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून घ्यावा. माशाचे तुकडे या पीठात घोळवून घ्यावे आणि जरा जास्त तेलावर परतून घ्यावे.

  • p-1046-upvas-thali

    खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती

    आपण नेहमी खिचडी, वरई, दाण्याची आमटी उपवासाला करतो. हा उपवास वेगळा करण्यासाठी या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही रोज विविध फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता.

  • p-1680-salinchi-chatni

    फळभाज्यांच्या सालींची चटणी

    प्रथम लोखंडी कढईत तेल घालून त्यात सालीचा किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा. मग तो काढून घ्यावा. त्यानंतर कढईत तीळ व खोबऱ्याचा कीस चांगला परतावा. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून ही चटणी चांगली कालवावी. भात- पोळीबरोबर हे तोंडीलावणे चांगले लागते.

  • p-2311-bharleli-mirchi

    भरलेली भावनगरी मिरची

    भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे.

  • जिलेबी आईस्क्रीम

    जिलेबी आईस्क्रीम

    साहित्य: जिलेबी 8, मॉगो ऑस्क्रीम, स्ट्राबेरी ऑस्क्रीम, ड्रायफ्रुट.

    कृती: एका सिलीकॉन मोल्ड मध्ये खाली जिलेबी ठेवा. मग त्यावर स्ट्राबेरी ऑस्क्रीम टाका. मग पुन्हा एक जिलेबी ठेवा. मॉगो ऑस्क्रीम घाला. त्यावर एक जिलेबी ठेवा. फ्रिजर मध्ये १ तास सेट करायला ठेवा. १ तासाने सर्व्ह करा.