महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- चण्याच्या डाळीचे पीठ २ वाट्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार लिंबाचा रस, साखर अर्धा चमचा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, खाण्याचा सोडा पाव चमचा, ओलं खोबरं 4 चमचे, कोथिंबीर, सोडा पाव चमचा, हिंग पाव चमचा, मोहरी १ चमचा.
कृती:- चण्याच्या डाळीच्या पिठात सोडा, मीठ, तिखट घालून चाळून घ्यावे. नंतर यात थोडे कोमट पाणी व लिंबाचा रस घालून एकत्र मळून घ्यावे. त्यात १ चमचा तेलही घालावे. नंतर साच्यात याची शेव पाडून ही शेव वाफेवर उकडून घ्यावी. तोपर्यंत एका छोट्या कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर व लसूण घालून परतावे. गॅस बंद करून यात थोडी साखर, मीठ व हळद घालावी. शेव वाफवून झाल्यानंतर त्यावर ही फोडणी घालावी. वरून खोबरं, कोथिंबीर पण घालू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ज्वारी तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पाण्यातून उपसून त्याची कापडाच्या साहाय्याने साले काढून घ्यावीत. नंतर त्याला भारतासारखे शिजवून कच्चं तेल, कढी किंवा ताकाबरोबर खावं.
साहित्य : स्वीटकॉर्न पेस्ट १ वाटी (स्वीटकॉर्न दाणे मिक्सर मधून काढून पेस्ट करणे किंवा अर्धवट बारीक केले तरी चालतील), १ वाटी बारीक रवा, १ वाटी ताक (दह्यात पाणी घालून घेतलं तरी चालेल), मीठ, आलं, जिरे, मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा (आवडतीच्या भाज्या), सोडा किंवा इनो.
कृती : एका भांड्यात ताक घेऊन त्यात रवा घाला व नीट मिक्स करून घ्या. त्यात कॉर्न पेस्ट, आलं-जुरे-मिरची पेस्ट, मीठ, कांदा घालून एकसारखं हालवून घ्या. मिश्रण १० मी झाकून ठेवा. मिश्रणात सोडा किंवा इनो घालून हलवा आणि आप्पे पात्रात मिश्रण घालून झाकण ठेवून आप्पे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. चटणी बरोबर सर्व्ह करा.
साहित्य:- पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक, पाव वाटी तूप, अर्धी वाटी साखर, १ ते दीड वाटी दूध, आवडीप्रमाणे सुका मेवा.
कृती:- १)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व चांगले परतून घ्यावे .मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास अजून थोडे तूप घालावे .कणिक चांगली लालसर परतून घ्यावी .
२)कणिक चांगली लालसर झाली कि त्यात १ ते दीड वाटी गरम दूध घालावे व लगेचच साखर घालावी व चांगले परतून घ्यावे .आता लगेचच यांत सुका मेवा घालून परतून घ्यावे .
३)शिरा खाली चिटकू शकतो म्हणून सतत परतत रहावे ,दूध घातल्यानंतर साधारण ५ मिनिटातच कणिक आळायला लागते म्हणजेच समजावे कि शिरा तयार झालेला आहे लगेच आच बंद करून गरमागरम शिरा सर्व्ह करावा .
टीप:- १)या शिऱ्यासाठी आपण साधी पोळ्यांची कणिकही वापरू शकतो पण त्यासाठी ही कणिक खूप जास्त भाजावी लागते नाहीतर शिरा एकदम चिकट येतो .
२)कणिक चांगली लालसरच भाजली गेली पाहिजे नाहीतर शिऱ्याची चव बिघडण्याची शक्यता असते .
पेरू शक्य तो सर्वांच्या आवडीचे फळ. पांढरा आणि लाल या दोन रंगामध्ये पेरू असतात. पेरूचे झाड कोठेही उगवून येत असल्याने आपल्या परबागेत एकतरी पेरूचे झाड आपल्याला पहावयास मिळेल.
नेहमी कुठल्याही करंज्या करताना एक, दोन तरी मोदक करावेत.
नेहमी कुठलेही मोदक करताना एक-दोन तरी कानवले करावेत.
करंज्या फार गोड नको असतील तर आपल्या आवडीप्रमाणे साखर व गूळ वापरावा.
मधुमेही लोकांसाठी तसेच इतर काही कारणांनी एखाद्याला जर गोड पदार्थ खायचे नसतील तर "सुक्रालोज' (Sucralose) वापरावे. साखर व गुळाऐवजी "सुक्रालोज' वापरणे उत्तम.
करंज्यांच्या सारणात पिठीसाखर व गुळाऐवजी त्याप्रमाणात "सुक्रालोज' घातले तरीही चालते.
सारण जर दोन ते तीन वाट्यांचे असेल, तर त्यात तीस ते पन्नास ग्रॅम "सुक्रालोज' वापरावे. तेसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
घावन :- तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन असे म्हणतात. हे घावन घाटल्याबरोबर खाण्याची पद्धत आहे.
घाटले :-घाटले म्हणजे तांदळाचे पीठ गूळ-खोबरे वगैरे घालून केलेली एक प्रकारची खीरच आहे.
साहित्य :- ५ ते ६ वाट्या पाणी १ वाटी बारीक चिरलेला गूळ अर्धी वाटी तांदळाचे पीठ दीड वाटी ओले खोबरे अर्धा चमचा मीठ ८ ते १० वेलदोड्याची पूड.
कृती :- एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. त्यात गूळ, ओले खोबरे, मीठ व वेलदोड्याची पूड घालावी.दुसऱ्या लहान पातेलीत तांदळाच्या पिठात १ वाटी पाणी घालून कालवून घावे व सरसरीत करावे. वरील पाण्याला उकळी आली की त्यात हे कालवलेले पीठ ओतावे. उकळून जरा दाटसर झाले की उतरवावे. निवल्यावर घाटले फार दाट होते. म्हणून फार दाट करू नये. वरील प्रमाणाने केलेले घाटले ५।६ मंडळींना जेवण्याच्या वेळी पुरते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य:
सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ,१ चमचा आले पेस्ट,३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा बडीशेप
१ चमचा गरम मसाला, दिड चमचा साखर, हिंग, हळद, कढीपत्ता, तेल, मीठ.
आवरणासाठी: २ वाट्या गव्हाचे पिठ,३-४ चमचे तेल,पिठ भिजवण्यासाठी पाणी,चवीपुरते मीठ,तळण्यासाठी तेल.
कृती:
१) मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. भिजवलेली मूगडाळ जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन १ वाटी पाण्यात उकळवावी. उकळवताना गॅस मध्यम असावा आणि पातेल्यावर झाकण ठेवावे. मूगडाळ अगदी नरम शिजवू नये. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे. नंतर मूगडाळ थोडी चेचून घ्यावी.
२) गव्हाचे पिठाची कणिक भिजवावी. अगदी घट्ट किंवा अगदी सैल भिजवू नये. कणिक झाकून ठेवावी.
३) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात हिंग, हळद, आले पेस्ट, मिरच्या/लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यानंतर मूगडाळ, गरम मसाला, बडीशेप, आमचूर पावडर, मीठ, साखर घालून ढवळावे. सारण थंड होवू द्यावे. हाताने एकत्र करावे म्हणजे ते मिळून येईल.
४) कणकेचे दोन-दोन इंचाचे गोळे करावे. गोल पुरीसारखे लाटावे. पुरी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने त्यात एक चमचा सारण घालावे आणि सर्व कडा एकत्र आणून व्यवस्थित बंद करावे. हे करत असतानाच तळणासाठी कढईत तेल गरम करत ठेवावे. मिडीयम हाय हिटवर कचोर्या गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळून काढाव्यात. या कचोर्या गरम असतानाच खाव्यात. थंड झाल्यावर चव फार चांगली लागत नाही.
या कचोर्या कोथिंबीर-पुदीना मिरचीच्या चटणीबरोबर किंवा चिंच खजूराच्या चटणीबरोबर अगदी झकास लागतात.
टीप:
१) गरम मसाल्याबरोबर २ चमचे गोडा मसाला (काळा मसाला) वापरल्यास चव छान येते.
२) आवडत असल्यास सारण परतताना काळ्या मनुका किंवा बेदाणे घालू शकतो.
घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती, जेवल्यानंतर बडीशेपची पुडी, घरात डब्यात भाजून ठेवलेली बडीशेपची थाळी आगत्याने पुढे केली जाते. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही विविध काढे आणि ‘ग्रीन टी’सारख्या चहामध्येही वापरली जाते.
र्धी वाटी गव्हाचं सत्व, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे, कोथिंबीर, मीठ, ताक आणि साखर.
कृती – मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. गव्हाच्या सत्वात दीड वाटी पाणी, एक वाटी ताक आणि मीठ-साखर घालून ते व्यवस्थित कालवून घ्यावं.
Copyright © 2025 | Marathisrushti