(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • Beetroot-Koshimbir

    बीटाची कोशिंबीर

    सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

  • आलू चाट

    आलू चाट

    साहित्य:- दोन उकडलेले बटाटे, एक कांदा बारीक चिरून, पाव टी स्पून काळे मीठ, 3 ते 4 चमचे चाट चटणी (चिंच व कोथिंबीर पुदिना), पाव टी स्पून मीठ, थोडी चिरून कोथिंबीर.

    कृती:- बटाट्याचे सोलून लांब लांब तुकडे करून प्लेटमध्ये मांडावेत. त्यावर कांदा घालावा. त्याच्यावर तीन ते चार चमचे चिंचेची चटणी व पुदिना- कोथिंबिरीची चटणी घालावी. नंतर दोन्ही प्रकारचे मीठ भुरभुरावे. वरून कोथिंबिरीने सजवावे. नंतर सर्व्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • आलू चाट

    कणकेच्या चकल्या

    साहित्य - 2 कप कणीक, मीठ, तिखट, दोन जिरे पूड, ओवा, हिंग इ. आवडीनुसार.

    कृती :- पातळ फडक्यायत कणकेची पुरचुंडी बनवून कुकरमध्ये 15 मिनिटे वाफवावं. गरम असतानाच हाताने मोडून पीठ चाळून घ्यावं. इतर साहित्य, थोडे तीळ घालून चकल्या बनवाव्या.

    टीप - मोहन घालू नये.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • आलू चाट

    कचोरी चाट

    साहित्य:- कचोरी, उकडलेला बटाटा, शेव, दही, चिंचेची चटणी.

    कृती:- प्रत्येकासाठी एक कचोरी घ्यावी व ती मधोमध फोडावी. त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक शेव व दही घालावे. त्यावर आंबटगोड चटणी घालून सर्व्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • आलू चाट

    पिकलेल्या केळ्यांची कोशिंबिर

    साहित्य:- २ पिकलेली केळी, अर्धी वाटी गोड दही, चवीपुरते मीठ, साखर.

    कृती :- प्रथम सुरीने केळ्याच्या फोडी करून घ्याव्यात. त्यात दही, मीठ आणि साखर एकत्र करून घ्यावे.

  • आहारात फायबरचा वापर

    फायबर कशात मिळतं?
    अपचनीय बिया, भाज्यांची आवरणं, फळं आणि धान्यांमध्ये फायबर सापडतं. फायबर हे अपचनीय कार्बोहायड्रेट्सपासून बनतं. त्याचे घटक असतात सेल्युलोज, पेक्टिन, लिगिनन, हेमसिल्युलोज, गम्स, म्युसिलेज आणि ब्रान. फायबरचे दोन प्रकार असतात, द्रवणीय आणि अद्रवणीय. हे दोन्ही फायबर आरोग्य, पचन आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी आवश्यक असतात. द्रवणीय फायबर पाणी खेचून पचनक्रियेदरम्यान जेलमध्ये रूपांतरित होतं. द्रवणीय फायबर ओटचा कोंडा, बार्ली, नट्स, बिया, चवळी वर्गातली धान्यं, डाळी, मटार आणि काही फळं तसंच भाज्यांमध्ये सापडतं. ‘सायलीअम’ नावाच्या फायबर सप्लिमेण्टमध्येही ते सापडतं. अद्रवणीय फायबर गव्हाचा कोंडा, भाज्या आणि अख्ख्या धान्यांमध्ये सापडतं. या फायबरमुळे मलाला घट्टपणा प्राप्त होतो आणि ते पोट आणि आतडय़ांमधून लवकर बाहेर पडतं.

    पाश्चिमात्यांमध्ये आणि भारतीयांत भौगोलिक दृष्टीने मोठा फरक पडतो. पाश्चिमात्यांमध्ये सॅलडचा म्हणजे कच्च्या भाज्या, गाजर, टोमॅटो आदींचा आहारात वापर खूप असतो. त्यामुळे शरीरात फायबरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होते. हेच फायबर जास्तीच्या चरबीला शरीराबाहेर टाकतात. मात्र, आपल्याकडे भाज्या खाण्यास नाक मुरडले जाते. पाश्चिमात्य जीवनशैलीत एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चार-पाच वेळा थोडे-थोडे खाल्ले जाते. आपल्याकडे एकाचवेळी जास्त खाण्यावर भर दिला जातो. पाश्चिमात्यांच्या शरीरात मूळातच घातक कॉलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. तर भारतीयांमध्ये जास्त असते. पाश्चिमात्यांचा ३० बीएमआय नॉर्मल समजला जातो. तर आपल्याकडील व्यक्तीमध्ये २५ बीएमआय (वजन-उंची गुणोत्तर) ही पातळी ठरवण्यात आली आहे.

    फायबरचे फायदे कसे होतात?
    फायबर हा बद्धकोष्ठतेवरचा रामबाण इलाज आहे. कारण फायबरचं पचन होत नाही. ते शरीरातल्या टाकाऊ पदार्थाना घट्टपणा मिळवून देतं आणि कोठा साफ ठेवण्यात मदत करतं. बृहदांत्राचा कॅन्सर तसंच मधुमेह होण्यास रोखतं. अभ्यासाने असं दिसून आलं आहे की भरपूर फायबर असलेला आहार घेतल्याने कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते आणि त्यामुळे हृदरोगांचा धोका टाळण्यास मदत होते. याकामी पेक्टिन हा घटक महत्त्वाचा ठरतो जो जेवणानंतर अन्न शोषणाच्या क्रियेचा वेग मंद करतो. पेक्टिन शरीरातले विषारी घटक तसंच अनावश्यक धातूही काढून टाकतो. हे पेक्टिन सफरचंद, केळी, कोबी, लिंबू वर्गातली फळं, मटार आणि गाजरात तसंच सेल्युलोज या फळं, भाज्या आणि धान्यांच्या बाह्य़ावरणात असलेल्या अपचनीय कार्बोहायड्रेटमध्ये भरपूर प्रमाणात सापडतं.

    फायबर कसं काम करतं?
    फायबर आद्र्रता शोषून घेतं आणि अन्नघटकांना घनता मिळवून देतं. त्यामुळे स्नायूंना प्रेरणा मिळते आणि शरीरातले टाकाऊ घटक लवकर बाहेर टाकले जातात. अभ्यासातून हेही दिसून आलं आहे की फायबरच्या सेवनामुळे रक्तातल्या शर्करेचं प्रमाणही कमी होतं. कारण भरपूर फायबर असलेल्या आहारामुळे पचनाला विलंब होतो आणि परिणामी स्टार्चचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यासही वेळ लागतो. डाएटवर असणाऱ्यांसाठीही फायबर गुणकारी ठरतं. फायबर पोटात गेल्यावर फुगत असल्याने भूक मंदावते आणि पोट भरल्यासारखं वाटतं.

    दररोजच्या आहारात फायबरचं प्रमाण किती असावं?
    आहारात फायबरचं प्रमाण गरजेपुरतंच असावं. त्याचं प्रमाण वाढल्यास शरीरासाठी अत्यावश्यक असणारी लोह, झिंक आणि इतर खनिजं कमी प्रमाणात शोषली जातात, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. फायबरच्या अतिसेवनाने पोटात हानीकारक गॅसेस निर्माण होतात, तसंच मळमळल्यासारखंही वाटतं. दररोज आपल्या शरीराला ७ ते १० ग्रॅम एवढंच फायबर लागतं. बद्धकोष्ठतेवरचा रामबाण उपाय म्हणून फायबरकडे पाहिलं जात असलं तरी ही समस्या टाळण्यासाठी आणखीही काही उपाय योजता येतात.
    बद्धकोष्ठता ही काही जीवघेणी समस्या नाही किंवा हे आरोग्य ढासळत असल्याचं चिन्हही नाही. परंतु बद्धकोष्ठतेमुळे बरीच गैरसोय होऊ शकते. कोणालाही कोणत्याही वेळी या समस्येला तोंड द्यावं लागतं. वृद्ध आणि गरोदर स्त्रियांमध्ये ही समस्या वरचेवर होताना आढळते.

    त्यामागची कारणं-
    ० अयोग्य जीवनशैली
    ० पाणी आणि फायबरचं कमी सेवन
    ० ठराविक मिनरल सप्लिमेण्टस किंवा औषधांचा वापर
    बद्धकोष्ठतेला दूर ठेवण्यासाठी काही सोपे आणि वर्षांनुर्वष चालत आलेले तोडगे
    ० द्रवपदार्थ, विशेषत: पाणी भरपूर प्यावं. उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शौचाला साफ होतं.
    ० ताजी फळं, भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या आणि अख्खी धान्यं आणि त्यांचा कोंडा भरपूर खावा.
    ० इसबगोलसारखे पदार्थ प्रमाणात खावेत.
    ० नियमित व्यायाम
    ० पोट साफ ठेवण्यासाठी प्रून्स हा आजवरचा सर्वात प्रभावी घटक आहे.
    ० शौचाला होण्यासाठी प्रेरित करणाऱ्या घटकांचं नियमित सेवन करू नये. त्यामुळे आतडय़ांमध्ये उपकारी जिवाणू नष्ट होऊन बद्धकोष्ठता गंभीर रूप धारण करते.

    भरपूर फायबर असलेला आहार घेतल्याने केवळ बद्धकोष्ठताच नियंत्रणात येत नाही, तर इतरही अनेक फायदे होतात. फायबरमुळे पचनसंस्थेचं आरोग्य राखलं जातं, वजन नियंत्रणात राहतं आणि बृहदांत्राचा कॅन्सर टाळता येतो.

    फायबरचे प्रकार
    फ्रूट ज्यूसपेक्षा फळ खावं, ब्रेडपेक्षा पोळी खावी इ. आहारातले फायबर वाढवण्यासाठीच्या सूचना आपण ऐकतो किंवा वाचतो. बिस्किटं, ब्रेड, कॉर्नफ्लेक्स असे बरेच मल्टी ग्रेन आणि हाय फायबर प्रोडक्टदेखील आज सर्रास मिळतात. आहारातले फायबर आपल्याला वनस्पतीतून मिळते. फायबर म्हणजे अन्नातला असा पदार्थ, जो शरीरात शोषून घेतला जात नाही किंवा जो पचनक्रियेतून जात नाही. त्याचे मुळात दोन प्रकार असतात सोल्युबल किंवा विद्राव्य आणि इन्सोल्युबल किंवा अद्राव्य. दोन्ही प्रकारचे फायबर आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून ते मधुमेह, वाढलेला रक्तदाब, हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा बर्यामच विकारांपासून आपले संरक्षण करतात.

    सोल्युबल फायबर
    हे शरीरातल्या पाण्याला शोषून घेऊन एक मऊ गोळा बनतं. त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि पोट जास्त काळ भरल्यासारखं वाटतं. यांनी आहारातल्या कॅलरी कमी करायला मदत होते आणि मेदोवृद्धी कमी होते. या फायबरमुळे शरीरातले इन्सुलिन कमी वेळात जास्त ग्लुकोज रक्तपेशींपर्यंत पोचवू शकते. तसेच कोलेस्टेरॉल पण कमी शोषले जाते. स्रोत: डाळी आणि कडधान्य, ओट्स, अक्रोड, खारीक, सफरचंद, पेर, जांभूळ, संत्रे, गाजर, काकडी, कोबी इ.

    इन्सोल्युबल फायबर
    या प्रकारचे फायबर आहारातले रफेज किंवा बल्क वाढवते. शरीरात जाणार्याच अन्नाचा ऐवज वाढवून हे फायबर पचनक्रियेची गती वाढवतं. याचा मुख्य फायदा म्हणजे बद्धकोष्ठतेवर हा एकमात्र उपाय आहे. इसबगोलमध्ये पण याच फायबरचे प्रमाण खूप असते (पण जर रोज इसबगोल घेतलं तर अन्नातले बाकी पोषण पण मिळत नाही). दुसरा फायदा म्हणजे ज्या पदार्थांमध्ये इन्सोल्युबल फायबर जास्त असते त्यात कॅलरी पण तुलनेत कमी असतात (जर त्या पदार्थाच्या कृतीत तळणे, खूप मोहन घालणे किंवा गोड पदार्थ नसेल तर!). त्यामुळे कमी कॅलरी खाऊन पण भरपूर जेवल्यासारखं वाटतं. स्रोत: सर्व असोल्या भाज्या (सालं न काढलेल्या उदा. काकडी, बटाटा, गाजर, बीट) व फळे, कडधान्य, कंदमूळ, गहू, लाल तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी इ.

    आपल्या आहारात रोज २५-३० ग्रॅम फायबर असले पाहिजे. आहारातले फायबर वाढवले की त्याच बरोबर खूप पाणी पण प्यायला पाहिजे नाहीतर पोटात अन्न कोरडे पडून परत बद्धकोष्ठता होईल. आता २५ ग्रॅम फायबर म्हणजे नक्की काय खायचे? साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं. आहारातले फायबर अचानक वाढवले तर अतिवात पण होऊ शकतो. कायम लक्षात ठेवा, आहारात अचानक कुठला पण टोकाचा बदल केलात तर त्रास होतो. नेहमी हळूहळू पोषण वाढवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आलू चाट

    उपवासाचे गुलाबजाम

    साहित्य- सव्वाशे ग्रॅम खवा, एक टेबलस्पून अरारूटचे पीठ, एक कप साखर, एक कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा (उपवासाला चालत असेल तर), तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतले तरीही चालेल.

    कृती- माव्यात अरारूटचे पीठ घालून चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडे दूध घालून मळून घ्या. २०-३० मिनिटं गोळा तसाच ठेवा. नंतर पुन्हा मळून घ्या. छोटे गोळे करून तळून घ्या. साखरेच्या गरम एकतारी पाकात गार गुलाबजाम टाकावेत.

  • आलू चाट

    गूळपापडीचे लाडू

    साहित्य- १ वाटी जाड रवाळ कणीक (खांडवा किंवा खपली गहू वापरावेत कारण ते अधिक पौष्टिक असतात.) लोणकडे तूप, १ वाटी गूळ, वेलची पूड.

    कृती- गव्हाचे जाड रवाळ पीठ (कणीक) लोणकढय़ा तुपावर भाजून घ्यावे. पीठ चांगले खरपूस वास येईपर्यंत भाजावे. पीठ बाजूला एका ताटात काढावे. त्याच कढईत एक वाटी बारीक तासलेला गूळ घालून वितळवावा. त्यात भाजलेले पीठ घालून ढवळावे. वरून वेलदोडय़ांची पूड व चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण एकजीव झाले की गॅसवरून उतरवावे. थोडे कोमट असताना त्याचे लाडू वळावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • आलू चाट

    आजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती

    ज्याने जगभरातल्या सगळ्या संस्कृतींवर, कलेवर, शिक्षणावर आणि बऱ्याच गोष्टींवर आपली छाप पाडली.. किंवा असंही म्हणता येईल की, किती तरी गोष्टींचा खरा उगम याच देशातून झाला तो ग्रीस. ग्रीस हा युरोपमधला हा उंच सखल भागाचा प्राचीन देश. मुळातच चिकित्सक बुद्धीचा ग्रीक माणूस काळाच्या नेहमीच पुढे होता.

  • आलू चाट

    आजचा विषय मशरूम

    मशरूमला 'व्हेजिटेरियन्स मीट' असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी लागत नाही. कारण वर्षभर मशरूम मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ते विकत आणले तर ते साफ करण्यावरून कटकट होणारच असते. मशरूम शिजायला फार तर पाच मिनिटं लागतील, पण साफ करणं म्हणजे दिव्यच. त्यामुळे अनेकदा मशरूम हे हॉटेल किंवा रेस्तराँमध्येच खाल्ले जातात. आपल्याकडे इंग्रजीत ‘मशरूम’ किंवा मराठीत ‘कुत्र्याची छत्री’ आणि हिंदीत कुकुरमुत्ता असं म्हटलं जातं. याची लागवड विशेषत: जमिनीवर किंवा अन्न स्रेतावर एका बुरशीच्या रूपाने होत असते. या मशरूमची वाढ एका रात्रीतही वेगाने होऊ शकते. भारतात मशरूमचा अधिक वापर केला जात नाही. पण हल्ली चायनिजसारख्या पदार्थामध्ये याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे हल्ली मशरूमची लोकप्रियता वाढलेली दिसतेय. मशरूमचे अनेक प्रकार असून भारतात प्रामुख्याने तपकिरी मशरूम, पांढरा मशरूम असे प्रकार असून त्याला टेबल मशरूम किंवा इटालियन मशरूम किंवा पांढरं बटण म्हणूनही प्रसिद्ध आहे. याचा आकार छत्रीप्रमाणे असून त्यावर काळ्या रंगांचे ठिपके दिसतात. खाण्यास योग्य जातींपैकी बटन अळिंबी, धिंगरी अळिंबी, भाताच्या काडावरील अळिंबी या तीन ते चार जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येते. त्यातील धिंगरी अळिंबीच्या जातीपैकी महाराष्ट्रात प्ल्युरोट्‌स साजोर काजू, प्ल्युरोट्‌स फ्लोरिडा, प्ल्युरोट्‌स डवोस, प्ल्युरोट्‌स प्लॅबीलॅट्‌स, हिपसिझायगस अलमॅरीस या जातीचे उत्पादन घेतले जाते. अळिंबी या हरितद्रव्यविरहित असल्यामुळे अन्नासाठी तिला इतर सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. अनेक ठिकाणी हे मशरूम सुकवून बाजारात विकले जातात. यापासून लोणचं, सूप पावडर, मुरंबा, बिस्किटं, चॉकेलट आदी पदार्थ केले जातात. घरच्याघरी अगदी सहजपणे मशरूमच्या अनेक रेसिपी बनवता येतात. सॅलड पासून ते अगदी चमचमीत डिशपर्यंत...
    मशरूम अतिशय पौष्टिक असून याचे काही औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

    » यात प्रोटिनचा भरपूर समावेश असतो. » स्तनांचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो. » अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. » खनिजांचा भरपूर साठा असल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते. » यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबरचं प्रमाण अधिक असल्याने हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. » याच्या सेवनाने चयापचय शक्ती सुधारते. » यात कॅलरीजचं प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असं असलं तरी मशरूम खाताना थोडीशी खबरदारी बाळगावी लागते. कारण हे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला धोकादायकही ठरू शकतं.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    काही मशरूमचे पदार्थ

    मशरूम सॅलड
    एक वाटी मशरूम स्वच्छ करून घ्या. घेवडा आणि गाजर बारीक चिरून वाफवून घ्या. एक सिमला मिरची चिरून घ्या. दोन लसणाच्या पाकळ्या वाटून एक चमचा गरम तेलात घाला. मीठ आणि मिरपूड घाला आणि एकत्र केलं की झालं सॅलड तयार.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मशरूम मसाला
    साहित्य:- पाव किलो मशरूम, पाव किलो मटार, तेल आणि थोडं लोणी, फोडणीसाठी जिरं, दोन कांदे, दोन चमचे आलं, दोन चमचे लसणाची पेस्ट, एक चमचा तिखट, दोन चमचे धनेपूड, एक चमचा कसूरी मेथी, दोन टोमॅटो, ताजं क्रीम आणि कोथंबीर.
    कृती:-तेल आणि लोणी एकत्र तापवा. त्याला जिऱ्याची फोडणी द्या. कांदे बारीक चिरून परता. त्यात आलं, लसूण पेस्ट, तिखट, धने टाकून परतून घ्या. बारीक चिरलेले टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. कसूरी मेथी थोडी तव्यावर गरम करून मसल्यात टाका. त्यात मटार, मशरूम घाला. पाणी घालून शिजवून घ्या. मशरूम लवकर शिजतात. त्यामानाने मटारला वेळ लागतो. त्यानुसार शिजवा. फ्रेश क्रीम घालून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीसह वाढा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मशरूम करी
    साहित्य:-एक वाटी मटार, पाव किलो मशरूम, तीन कांदे, टोमॅटोचा रस अर्धा कप, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, एक चमचा तिखट, दीड चमचा धनेपूड, एक चमचा जिरेपूड.
    कृती:-मशरूम चिरा. थोडे तेल तापवून त्यात जिरे टाका, त्यानंतर कांदा परता. आलं, लसूण, धनेपूड टोमॅटो घालून शिजवा. त्यात उकडलेले मटार, आणि चिरलेले मशरूम घाला. रस्सा घट्ट ठेवा. जास्त पाणी घातलं तर चव लागणार नाही. या मशरूम करीला वेगवेगळ्या मसाल्याची चव देता येते. त्यासाठी तयार झालेल्या करीत कोणताही मसाला अर्धा चमचा घालावा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मशरूम पुलाव
    साहित्य:- दोन कप बासमती तांदूळ, पाऊण कप उकडलेले मटार, एक कप मशरूम, लसूण आणि आलं पेस्ट, तीन कांदे.
    कृती:- तीन कांदे स्लाइस करून घ्या. या पुलावासाठी वेगळा मसाला तयार करावा लागेल. त्यासाठी मिरे, लवंगा, वेलची, शहाजिरे एकत्र वाटून घ्या. अगदी पावडर करण्याची गरज नाही. तुपावर कांदे स्लाइस केलेला कांदा परता. आलं-लसून पेस्ट, मशरूमचे तुकडे करून घ्या. पुलाव करण्यासाठी तांदूळ भिजवून जास्तीचे पाणी घालून शिजवून घेऊन त्यातील पाणी काढा. मग मसाल्यासह मशरूम टाकून प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्या किंवा मसाल्यासह धुतलेले तांदूळ कुकरमध्ये शिजवा. कोथंबीर, तळलेल्या कांद्याने सजवून वाढा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    क्रिमी मशरूम सूप
    साहित्य:- चार चमचे तेल, एक चमचा आले-लसूण पेस्ट, चार हिरव्या मिरच्या, 200 ग्रॅम मशरूम, करी पावडर, मीठ, साखर, मिरेपूड, ४५० ग्रॅम नारळाचे दूध, तीन चमचे लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर.
    कृती:- एका पसरट भांड्यात चार चमचे तेल गरम करा. त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे लांब काप करून परता.
    - मशरूमच्या पातळ काचऱ्या करून पाच मिनिटे गॅस मोठा ठेवून ढवळा. त्यात दोन चमचे करी पावडर, एक चमचा मीठ, एक चमचा साखर, काळे मिरेपूड आणि नारळाचे दूध घालून ढवळत राहा. आठ ते दहा मिनिटे गॅसवरच ठेवून सतत ढवळत राहा.
    - आता पातेले गॅसवरून खाली उतरवून त्यात लिंबाचा रस घाला. मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा व सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मशरूम सँडविच
    साहित्य:- २ हॉटडॉग ब्रेड्स, १ चमचा बटर, १/२ चमचा तेल, १५ ते १८ मशरूम उभे कापून, २ मध्यम कांदे, पातळ उभे कापून, १/२ वाटी किसलेले चीज, १/४ चमचा रेड चिली फ्लेक्स, १ चिमटी मिक्स हब्र्ज, मीठ आणि मिरपूड चवीनुसार
    चिमटीभर साखर.
    कृती:- कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले की कांदा घालून लालसर परतून घ्यावा. कांदा छान परतला की मशरूम घालावे. साधारण ४ ते ५ मिनिटे परतून शिजू द्यावे. मिक्स हब्र्ज, मीठ, मिरपूड आणि साखर घालून मिक्स करावे.
    आच मंद करून चीज घालावे. चीज वितळेस्तोवर मिक्स करावे. रेड चिली फ्लेक्स घालून ढवळावे. ब्रेड एक बाजूने कट करावा, पण विरुद्ध बाजू कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी. ब्रेड उघडून त्यात तयार मिश्रण भरून ग्रील करावे. ब्रेड थोडा क्रिस्पी झाला की सव्‍‌र्ह करावे. टॉमेटो केचप किंवा इतर आवडीच्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    पनीर मशरूम शासलिक
    साहित्य : पनीर क्युब्स ८ ते १०, बटन मशरूम ७ ते ८, ब्लॅक ऑलीव्ह ५ ते ६, ग्रीन ऑलीव्ह ५ ते ६, रंगीत सिमला मिरची १ इंच कापलेले ५ ते ६ तुकडे, शासलिक स्टिक्स (बांबू स्टिक्स) ५ ते ६,
    मॅरीनेशनसाठी साहित्य : मोहरी पूड – १ चमचा, मीठ, बाब्रेक्यु सॉस – २ ते ३ चमचे, (बाब्रेक्यू सॉस नसेल तर टोमॅटो केचप वापरा) व्हाइट पेपर पावडर- चिमूटभर, तेल – ३ ते ४ चमचे, बारीक चिरलेली लसूण – १ टीस्पून, बारीक चिरलेली बेसील पाने – २ चमचे (असल्यास), वरील सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र मिक्स करून मॅरीनेशन तयार करून घ्या.

    कृती : तयार मॅरीनेशनमध्ये पनीर व मशरूम, ऑलीव्ह, रंगीत सिमला मिरची, डीप करून बांबू स्टिक्सला एकामागोमाग एक लावून घ्या. नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल टाकून या स्टिक्स ग्रिल करून घ्या. गरमागरम बाब्रेक्यू सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३