(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आज दिवाळीच्या दिवशी

    आज दिवाळीच्या दिवशी
    आमची परत नजरानजर झाली
    हाय-हॅलो झाले..
    मग खुप गप्पा झाल्या..
    ब्रेंक-अप नंतर आजच भेटलो
    बाहेर फटाके फुटत
    नव्हते दिवाळी असून देखील..
    परिस्थितीच तशी आहे,
    फटाक्यापेक्षा जगणे
    महत्वाचे ,तरी पण काही
    मूर्ख असतातच.
    पण मनामध्ये एक
    पणती फडफडत होती
    माझ्या आणि तिच्याही
    हे मला तिच्या डोळ्यात दिसले......
    परत जाताना
    दोघानाही बरे वाटले
    परत भेटू..
    ती म्हणाली...
    माझ्या मनात गोधळ
    सुरु झाला...कधीकुठे
    तिलाही तो गोंधळ कळला
    पटकन म्हणाली
    मला फोन कर..
    तेव्हा मला खुप
    गिल्टी वाटले..
    कारण मी माझा नंबर
    बदलला होता..
    त्या नंबरची
    माझ्या नंबरशी
    सवय व्हायला हवी..
    ..तिने नंबर दिला
    जाताना मी मागे वळून पाहिले
    आणि तिनेही मागे बघितले
    तेव्हा ती माझा
    मेसेज वाचत होती
    मी लिहिले होते..
    ' जग खुप छोटे आहे...:

    -- सतीश चाफेकर.

      December 5, 2021


  • देह – एक महान वस्ती

    सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक ।

    प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।।

    सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना ।

    शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।।

    अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे 'पुरूष' ।

    'पुरू' म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे 'ईश ।।

    अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी ।

    विधात्याची वास्तूकला, अप्रतीम अजोड ठरे खरी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 20, 2020


  • मिटलेलं पान

    तुटलेल्या नात्यांचे
    जरतारी पदर
    त्या ना मायेची उब
    प्रेमाची कदर
    गाठीगाठीत फक्त
    बोचरे आठव
    कशास मिरवायचे?
    भरजरी पाटव !……… १

    तो पाठीवर हात अन
    डोळ्यात पाणी
    ते तुडुंबलेलं मन
    श्वासात गाणी
    क्षणाक्षणाने दिलं
    जीवनाचं दान
    उघडेल का कोणी ते?
    मिटलेलं पान !………… २

    .....मी मानसी

      November 5, 2019


  • मैत्री तुझी माझी

    मैत्री आपली की आपण मैत्रीचे उदाहरण?

    तू हसावं, मी त्यात विरावं,

    आनंदाच्या ओघात, मी मिठीत तुझ्या शिरावं,

    मी मिठीत येताना, हलकीच एक खोड करावी,

    तू खोट खोट रागवताना, ती गमतीत रुपांतर व्हावी…

    तू आणि तुझा चेहरा, त्यात फक्त तू असावी,

    तुझ्याव्यतिरिक्त मला त्यात माझी झलक दिसावी…

    तू आणि मी कधी एकमेकांचे होऊन गेलो कळलच नाही,

    भान जगाचे विसरून गेलो, एकटेपण उरलेच नाही…

    तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू,

    कधी आई तर कधी तिचे लेकरू,

    खूप सुरक्षित वाटतं मला तूझ्या मिठीत,

    म्हणूनच हक्काने शिरते तूझ्या कुशीत,

    थकलेल्या या जीवाला , मिळतो त्यात विसावा,

    तूझ्या डोळ्यात दोस्तीचा अथांग सागर दिसावा…

    हसलीस ना? अशीच हसत रहा,

    हेच तर हवं आहे मला,

    आता उमगलं त्या गहन प्रश्नाचं उत्तर,

    का आहे “मैत्री” सगळ्यांत बेहतर…

    अशी आहे आपली ही निखळ मैत्री,

    कधी माझ्यामध्ये तू, कधी तुझ्यामध्ये मी….

    – श्वेता संकपाळ

      August 17, 2018


  • किर्तनी झोप

    नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन
    तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून...१,

    एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई
    निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही....२,

    पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती
    झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती....३,

    शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी
    आनंदाचे वलय भोवती, समाधान ते त्यास करी....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 18, 2015


  • मतदार

    झालो मी अठरा वर्षांचा

    म्हणुन मिळे अधिकार नामी.

    मत देण्याचा.

    या दिवशी मी आहे राजा

    ताजा ताजा.

    उलथिन मी नेत्यांची तख्तें

    बदलिन मी नावांचे तक्ते.

    -

    तख़्त - सिहासन

    -- सुभाष स. नाईक

      July 19, 2018


  • कोण तू कोण मी

    कोण तू कोण मी
    ओळख अनोळखी आहे
    वाट वाकडी समोर अशी
    भेट का दुरुन अबोल आहे
    कोण तू कोण मी
    मनात हुरहूर आहे
    चांद बिलोरी चांदण्यात
    ओढ तुझी अंतरात आहे
    कोण तू कोण मी
    ऋणानुबंध भेटीत आहे
    प्राजक्त दवात गंधाळला
    तुझ्यात बंध गुंफून आहे
    कोण तू कोण मी
    कोडे न उलगडणारे आहे
    नियतीचे फासे उलटे सारे
    खेळात मी हरवुन आहे
    कोण तू कोण मी
    प्रश्न अनेक भावनांचे आहे
    तू मस्त किनाऱ्यावर उभा
    भोवऱ्यात मी फसत आहे
    कोण तू कोण मी
    प्रश्न अंतरी व्यापून आहे
    भाव हृदयी ओल अनामिक
    लोपले शब्द तू दूर दूर आहे
    कोण तू कोण मी
    मोगरा बहरुन आहे
    तुझ्या स्पर्शाचे चांदणे
    गोड माझ्यात सजून आहे
    कोण तू कोण मी
    रातराणी गंधित वाहे
    तुझ्या मिठीची अलवार आस
    मलमली बंध तुझ्यात गुंतून आहे
    -- स्वाती ठोंबरे.

      November 3, 2021


  • प्रथम शाहाणा कर

    अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी ।

    मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी ।।

    ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी ।

    भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही ।।

    निर्धनासी धन मिळता, जाई हर्षूनी ।

    हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी ।।

    माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण ।

    गैरउपयोग होई शक्तीचा, नसता सामान्य ज्ञान ।।

    शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता ।

    वेड्यापरी कोठेही पळतील मर्यादा सोडता ।।

    जाण आहे एकची मजला, तुझ्या शक्तीची ।

    वाल्मिकी, कालीदास, अज्ञानीना ज्ञानी केल्याची ।।

    तसेच देऊन ज्ञान थोडेसे, शाहणा कर आधी ।

    ठेवणार नाहीत नावे मजला, नंतर कुणी कधी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      May 9, 2016


  • आनंद सोहळा

    माहोल हा प्रसन्नतेचा
    तृप्त! कृतार्थ लोचने
    आभाळ सप्तरंगलेले
    ब्रह्माण्ड! सारे देखणे।

    मनांतरी, मीरा! राधा!
    कृष्ण! कृष्ण! अंतरी
    हृदयांतरी, माधुर्यभक्ती
    मंत्रमुग्ध! नाद सुस्वरी।

    निरभ्र! या निलांबरी
    लपंडाव, भास्कराचा
    साक्षी! लोभस निसर्ग
    खेळ हाच दयाघनाचा।

    रूप! निरागस निर्मल
    भाव! मधुरम मधुरम
    नेत्री कनवाळू कैवल्य
    मुक्ती मोक्षाचा सागर।

    सांजआभाळ, तुष्टलेले
    मेघ आठवांचेच लोचनी
    भास! सोज्ज्वळ हृदयी
    ब्रह्मानंदी सोहळा जीवनी।

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १५५.

    १७ - १२ - २०२१.

      December 24, 2021


  • वेड लावतोस तूं कुणां कुणां !

    हे मुरलीधर मनमोहना

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//

    तुझ्या भोवती नाचती गौळणी

    भान त्यातर गेल्या हरपूनी

    थकूनी गेल्या नाच नाचुनी

    विसरुनी गेल्या घरदारानां //१//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    रमले सारे गोकूळवासी

    पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी

    बागडती सारें तव सहवासी

    करमत नाही तुजविण त्यांना //२//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    संसार सोडला राधेने

    भारुनी गेली तव प्रेमानें

    ध्यास घेतला तुझाच तिनें

    तुजविण नव्हती दूजी भावना //३//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    मीरेचे तर प्रेम निराळे

    विषालाही प्राशन केले

    तुजसाठी सर्वस्व अर्पिले

    कसा तारशी तुं भक्तांना //४//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 20, 2019