(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ती बोल्ली

    तू ‘ असं ' कर

    मी "हो" बोल्लो

    ती बोल्ली

    तू ‘ तसं ' कर

    मी "हो" बोल्लो

    तिने बोल्ली

    तूने असं ' कामून ' केलं

    मिने बोल्लो "चुकलं"

    तिने बोल्ली

    तूने असं कामून 'नै' केलं

    मिने बोल्लो "चुकलं"

    ती बोल्ली

    तूझ 'प्रेम'च नाही बुवा माझ्यावर

    मी कळवळलो 'असं नाहीये गं '

    तिची अजुनी आळी मिळी 'हुप्प' चिळी

    मी गळ्यात अडकलेल्या आवाजात

    अर्ज केला

    तुला माझा भरवसा काय केल्यावर यील

    ती बोल्ली

    तू ' असं ' कर

    -- कुप्रसाद

      September 20, 2017


  • विष्ठा

    विष्ठा बघूनी थुंकलो,

    घाण वाटली मजला,

    अमंगल संबोधूनी,

    लाखोली देई तिजला ।।१।।

    संतापूनी मजवर ,

    कान उघडणी केली,

    तुझ्याचमुळें मूर्खा मी,

    अमंगळ ती ठरली।।२।।

    आकर्षक रूप माझे,

    लाडू करंज्यानें युक्त

    कपाटातूनी काढूनी,

    केले सारे तूंच फस्त ।।३।।

    परि मिळतां तुझा तो,

    अमंगळ सहवास,

    रूप माझे पालटूनी,

    मिळे हा नरकवास ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      November 23, 2020


  • जम्मत गम्मत

      November 15, 2010


  • संगमी सांगता

    शांत, शीतल गर्द किनारा
    संथ लहरी प्रवाही सरिता
    खळाळते प्रतिबिंब नभाचे
    मनी उचंबळते प्रीतसरिता
    आठवांची, झालर झुलते
    थकली जरी ही गात्रे आता
    अंतरी, स्मृतींची गंगायमुना
    अखंड वाहते पावन सरिता
    निर्मोही भावनांची भावगंगा
    जागविते, हॄदयी भावगीता
    भावप्रीतीचे, सरोवर सुंदर
    मिलना, आतुरलेली सरिता
    तृप्ततेचा साक्षात्कार लाघवी
    सागरसरिता, संगमी सांगता

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १५०

    ११ - ६ - २०२२

      July 23, 2022


  • दिलासा

    ज्योतिष्याची चढूनी पायरी, जन्म कुंडली दाखवी त्याला ।

    अडले घोडे नशिबाचे, कोणते अनिष्ट ग्रह राशीला ।।

    नशिबाची चौकट जाणूनी, आशा त्याची द्विगुणित झाली ।

    मनांत येतां खात्रीं यशाची, जीव तोडूनी प्रयत्ने केली ।।

    प्रयत्नांती असतो ईश्वर, म्हणूनी मिळाले यश त्याला ।

    आत्मविश्वास जागृत करण्या, 'भविष्य' शब्द कामी आला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 18, 2020


  • अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री

    व्हॉटसअॅप वरुन आलेली एक हृदयस्पर्शी कविता. जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे पोस्ट केली आहे.

    केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते
    नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते
    केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
    सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते
    सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
    काय उपयोग सांग मानवा
    अशा या दान धर्माचा ??

    कधी शेतक-याला बियाणं
    दान देऊन बघ
    कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
    कधी एखाद्या निराधार बालकाचा
    पालक होऊन बघ
    कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
    कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
    कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
    कधी एखाद्या वृध्दाश्रमास
    दान करून बघ
    कधी एखाद्या आश्रमातील
    निराधारांवर प्रेम करून बघ

    एकदा दान धर्माच्या व्याख्या
    बदलून तर बघ !!

    जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच
    मस्तक सशक्त होत.....
    सशक्त झालेलं मस्तक
    कुणाच हस्तक होत नसत....
    आणि हस्तक न झालेलं मस्तक
    कुठेही नतमस्तक होत नसत...!

    शाळेचे छत गळके आणि
    मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?

    शाळेत आज मुलांना बसायला
    साधी फरशी नाही
    मंदिराला मात्र संगमरवरी ?

    शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही......
    आपला भारत नक्की महासत्ता होणार ?

    पायात घालायची चप्पल ए सी मधे विकायला ठेवतात आणि
    भाजीपाला फूटपाथवर.....
    म्हणे आमचा देश कृषी प्रधान
    आणि आत्महत्या करतो शेतकरी...
    शेकडो मैल चालतो वारकरी...

    अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..! ....

    - व्हॉटसअॅप वरुन

      April 6, 2016


  • जात’ म्हणजे काय?

    जात हा शब्द, संस्कृत जन..जा..म्हणजे जन्म घेणे या क्रियापदापासून आलेला आहे. त्यापासूनच. जन, जनता, जनक, जननी, पूर्वज, वंशज वगैरे शब्द आलेले आहेत.

      March 18, 2017


  • मानवतेचा पोशिंदा

    लाख मोलाचे
    आयुष्य आपुले,
    कोटी जणांचे आधार.
    अन्यायाविरुद्ध लढणारे सारे,
    संघर्षमय जीवनसरोवर.

    घडविले आहे आपण
    जन जीवनाला ...
    देवूनी सुयोग्य आकार
    वाढविले आहे आपुलकीने,
    दीन-दुबळ्या बहुजनांना...
    करुनी विषमतेचा प्रतिकार.

    शिकविले आहे आपण,
    निरक्षरतेलाही...!
    ओतुनी जीव शाहीचा निर्विकार.
    मिटविले आहेत
    अंधाराचे दिवे...!
    पेटवूनी सप्तरंगी इंद्रधनुविष्कार.

    संघटीत केले आहे आपण,
    विखुरलेल्या शक्तीहीन शक्तीसही...!
    पेरुनी बीज एकतेचे महाअपरंपार.
    फुलविले आहे आपण....
    रानफुलानांही...!
    जिरवुनी ओसाड मातीत महाज्ञानसागर.

    लडविले आहेत, लढे
    मानव मुक्तीसाठी...
    घेवूनी तळहाती शिर.
    काबीज केले आहेत, गड अनेक
    राष्ट्र उभारणीसाठी....
    खर्चुनी पोटचे प्राणप्रिय पोर.

    रुजविले आहेत, आपण
    स्वातंत्र्य, समता....
    बंधुत्व, न्यायाचे धडे
    चराचरात विश्वभर
    पोसीले आहे आपण,
    दु:खी कष्टी
    निराधार मानवतेलाच...!
    अखंडपणे आयुष्यभर.

    - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे (कवि, लेखक, संमिक्षक, संपादक, गीतकार)
    ☎️ मो.न.883 080 0335 ================================
    Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ================================

      September 2, 2021


  • निष्काम निर्लेपी

    कोण छोटा कोण मोठा
    सहॄदयी तो आत्मा मोठा

    जिथे सुखावे तन्मनअंतर
    तो निष्काम निर्लेपी मोठा

    ब्रह्मांडालाही कवेत घेतो
    तो निर्गुण निरागस मोठा

    प्रसन्न कृपाळू रूप ज्याचे
    तो अगम्य परमात्मा मोठा

    जो भेटता सुख मोक्षानंदी
    तो अनामिक ईश्वर मोठा

    कर्मकांडी सत्कर्मी जगावे
    तोच एक संचिताचा साठा

    हरिनामी नित्य रमुनी जावे
    मोक्षमुक्तिचा तो मार्ग मोठा

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२७८

    ३०/१०/२०२२

      November 7, 2022


  • बापाचं मन

    एक बाबा थकलेला कमरेमध्ये वाकलेला
    हातात काठी तुटका चष्मा उदासवाणा बसलेला
    अंगावर सुरकुत्या चुरगळलेल्या स्वप्नांच्या
    फाटकं धोतर फाटका सदरा अनवाणी चाललेला..!

    कधीकाळचा सूर्य आज निस्तेज झाला आहे
    करपलेल्या मनाचा एक कोपरा ओला आहे
    डोळ्यांवर हात ठेवून वाट अजून पाहतो आहे
    येईल कधीतरी लेक माझा शहरात राहतो आहे..!

    वाट पाहून वाटा सरल्या नवी वाट दिसत नाही
    काळोखात रडतो चंद्र, सूर्य कधीही हसत नाही
    जगरहाटी चालू आहे वेळ कुणाला मिळत नाही
    रोज मरणा-या बापाचं मन कधीच कुणाला कळत नाही...!!

    राजेश जगताप
    मुंबई..
    ९८२१४३५१२९

      April 2, 2023