देहमनाचा आनंद औरची, नसे तयाला दुजी कल्पना ।
जीवनामधले मिळता सारे, उरे न तेथे कसली तुलना ।।
आनंदाचा घट भरूनी हा, तन मन देयी पिण्यासाठी ।
आनंदाला नसे सीमा मग, अनेक घट अन् अनेक पाठी ।।
एक घटातूनी आनंद मिळता, दुजे घट हे जाती विसरूनी ।
अनेक घटांतील आनंद हा, लूटाल कसा तृप्त होवूनी ।।
दुजामध्ये समरस होवूनी, लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा ।
‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो, आनंद घटाचा भव्य पसारा ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 7, 2017
ठोक्यात काळजाच्या वाहिला घोर आहे...
पदरात ज्याच्या नवतरुण पोरं आहे..
भरतील माप आपले तुझ्या जोंधळ्यांने
भाकरीला उपाशी तुझी चंद्रकोर आहे..
नकोस भरन देऊ सोने बंगला मोटर
परतून जरी आली सांग बाप थोर आहे...
शिकण्याची संधी दे कर तीला हुशार
तुझ्या घराची पणती तुळशी समोर आहे..
ते लेकरू तुझे दडले जगाच्या भयाने
ठेव पाठीशी हात जग हे कठोर आहे.
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 19, 2026
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात
लपवलेले सारे..
मला जणूकाही ओळखतच
नाही..
तुझ्या घरभर फिरणाऱ्या
पावलांची
मी कधीच दखल घेतली नाही
दोन टोकं विरूद्ध दिशेची
मिसळून जातात एका वळणावर..
शांतता शोधतात ह्या प्रीतिसंगमावर..
खोल अथांग सागर ही गर्जतो
भरून आलेलं आभाळ बरसतं..
तुझ्या मनातल्या खोलीचं मोजमाप
नाही समजतं..
एकटक आरशात पाहतेस पण
प्रतिबिंब तुझ्या सावलीचं तुला
तेव्हाच दिसतं..
जेव्हा मनातल्या आरशात मी
तुझ्या सोबत तुझ्या नजरेत
घर करून राहतो
तुझ्या इतकं छान तेव्हा कुणीही
नसतं... प्रतिमेला तुझ्या.. माझ्या
प्रतिभेचा श्रृंगार चढलेला असतो.
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 5, 2026
तू भासतोस जलदांसारखा, संजीवन बरसवणारा,
अविरत निष्काम सेवेला,
दिनरात अंगिकारणारा,
तू वाटतोस पावसासारखा,
चिंब भिजवून टाकणारा,
परिसरच काय, ओलेता,
तनमनही धुवून काढणारा,
तू असशी वाऱ्यासारखा,
करारी, स्वयंभू विचरणारा,
माहित नाही दिशा रस्ता,
सरळ जाऊन थडकणारा,
तू विस्तीर्ण समुद्रासारखा,
अथांग अपार उफाळणारा, भरती-ओहोटी ना कुणाला, किंचितही घाबरणारा,
तू झऱ्यागत नाचणारा ,
निर्मळ, अवखळ खेळणारा, सेवाव्रत निभावताना,
आनंद तुषार उडवणारा,
प्रतीत होशी नदीसारखा,
गावांनाच कुशीत घेणारा,
दूर सारत अस्वच्छता,
देखभाल शेतांची करणारा,
तू आधारच हतबलां,
धीरगंभीर खंबीर उभा,
सोडवत साऱ्या समस्या,
मदतीचा वसा जपणारा,
तू अगदी पर्वतासारखा,
अचल निश्चल राहणारा,
स्मरून नीर - क्षीर विवेका, जगण्याला तोंड देणारा,--!!!
© हिमगौरी कर्वे.
January 9, 2020
भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या,
मध्यभागात येऊन जसा,
चंद्रमाने आणला अडथळा ,--!!!
काही काळ दर्शना तुझ्या,
जीव कासावीस माझा,
कोलाहल माजतां उरां,
नुरला कुठलाही आसरा,--!!!
न्यारी प्रेमाची खुमारी,
चंद्राने अशी वाढवतां,---
स्वर्ग दोन बोटे राहिला ,
जशी ग्रहणाची सांगता,--!!!
मात देत सकल अंधारा,
उगवशील माझ्या राजा,
जरी तु होशी झाकोळतां,
उणीव नाही तुझ्या तेजां,--!!!
तारे वारे आणि चंद्रा,
सांगते रे मी कितीकदा,
सूर्यदेवाची करते पूजा,
तो एकमेव माझा त्राता,--!!!
चांद मध्ये असा डोकावतां,
खळबळ तनामनां,माजतां, दिनकराच्या किरणा तरसतां,--- आधार सहस्रबाहुंचा मला,--!!!
काय वर्णू त्याचा महिमा,
माझ्या राजाच्या वेगळ्या थाटां,
न कोणी धजावे लावण्यां, हाता,
महाराणी शोभे सम्राटां,--!
ग्रहण येवो काही अथवा,
फिकिर नाही मजला,
प्रियकर एवढा तेजाळतां,
अंधाराचीही नाही तमा,--!!!
© हिमगौरी कर्वे
January 2, 2020
शोषून शोषून जमविता,
झुरुन झुरुन मरुन जाता
पैशांनी भरलेल्या पिशव्या
फाटून जातील
हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र
तुमची आसवे पुसण्यासाठी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@gmail.com
September 21, 2018
अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची ।
मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची....१,
वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला ।
मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला....२,
निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन ।
दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,
बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले ।
दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व आज जाणले....४,
जेंव्हां असते स्वत: करीता, स्वार्थी भाव लपला असे ।
दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?....५,
शेवटचे सरते जीवन, ईश चरणी समर्पण व्हावे ।
अंतिम विनंती हीच, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 22, 2020
December 15, 2021
एक होती अनु
फुलासारखी जणू
डोळे फिरवी गर्र गर्र
पाऊल टाकी भरभर
तिला लागली भूक
गडू दिला एक
बघितला रिकामा गडू
तिला आले रडूं
आईने दुध भरले
कांठोकांठ ओतले
तिला हवय जास्त
दूध आहे मस्त
रडरड रडली
आदळ आपट केली
सांडूनी गेला गडू
पाठींत बसला मात्र धम्मक लाडू
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
कारखान्या विष, सोडले हवेत
गादी पैसे खात, सुजलेली
वाहनी गराडा, या भूतलावरी
लोट धुरांवरी, स्वार असे
प्लॅस्टिकने पहा, वेढले वेष्टन
पृथ्वी जे आसन, डळमळे
रसायनी शेती, विषच पेरले
बियाणे रूजले, संकरीत
बोडखे डोंगर, देखवेना डोळा
कोणा कळवळा, येईल का?
पाणी जो मागतो, नित्य देवाकडे
लक्ष नसे थोडे, वृक्षाकडे
तडातडा तोडी, बांधावरी झाड
जरा नाही चाड, वृक्षाप्रती
तोडलेली झाडे, विकती चोरून
हप्ता खाती कोण, नसे जाण
रस्ता केला मोठा, झाडावरी घाला
नसे बोलबाला, तोंडदाबी
धरणात लावी, खोटी झाडवल्ली
पंचनामी उगली, पैपाणीच
जुनाच तो खड्डा, खोदा नव्यानं
पुन्हा हे रोपण, दरवर्षी
फोटो काढा मोठा, टाका नेटवरी
येतो जो पुढारी, पेपरात
वृक्ष लागवड, लुटती अनुदान
कोटींचे उड्डाण, गल्लाभरू
कैक पिढ्या येथे, झाल्या गारद
दुष्काळी साद, सालोसाल
जो मराठवाडा, तो टंँकरवाडा
ऊसतोडी खोडा, सर्वकाळ
हातात कोयता, सोडू एकदाचा
ओघळ पाण्याचा, देई झाड
फ्रीजचा जो येथे, पहा धुमाकूळ
पेयांचा बक्कळ, तो बाजार
माणसाने येथे, वृक्ष जपावेत
झाडं पुजावेत, मनोमनी
शाश्वत वास्तव, नसे काही इथे
व्यवस्था कुतथे, दैनंदिन
वृक्षाने पाऊस, पावसाने वृक्ष
ठेवू जरा दक्ष, मानवता
फेकूनिया बिया, भूतलावरी या
मळा फुलवूया, फळपिके
प्रत्येकाने इथे, एक झाड वाढावे
जीवन जगावे, समाधानी
वृक्षसंमेलन ते, भरे देवराई
फुलेल वनराई, डोंगरात
असे आशावादी, जोडोनिया वन
भविष्याचे धन, समजूनी
नवरीने नव्या, ओलांडीले माप
एक झाड जप, आठवणी
मृतका स्मृती, झाड जे लावती
पितृ ते जेवती, समाधानी
झाड झाड जपा, सावलीत बसा
मग पहा घसा, कंठगळा
हिरवाईने जे, नेत्र सुखावती
स्मरण करती, कैक पिढ्या
बांधुनिया चंग, हिरवाई रंग
नेत्रसुखी दंग, होऊ सर्व
वारकरी भाऊ, दोन झाडं लावू
मग आरती गाऊ, विठोबाची
झाडांचे रक्षण, करा संरक्षण
मानवी लक्षण असो द्यावे
असे माझा भाव, तोच माझा देव
तेथं माझा गाव, वृक्ष नाव
हिरवी चादर, बहरे फूलपान
गर्द होई रान, हिरवाई
वृक्षसंमेलनी, करती जे श्रम
करतो नमन, त्या हातांना
-- विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
(वृक्षवाढीसाठी लढणाऱ्या हातांना समर्पित...)
November 24, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti