(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रूप असे देखणे

    रूप असे देखणे
    काळजां भिडले भारी,
    डोळे असती लकाकते,
    पाणीदार जसे मोती,
    काया कशी तुकतुकीत,
    नजर फिरता हाले,
    सुंदर तांबूस वर्ण,
    त्यावर पांढरे ठिपके,
    शिंगांची नक्षी डोई,
    दिसते वर शोभुनी,
    हिंडते बागडते रानी,
    कुणी बालिका की हरणी, --??
    चपल चंचल वृत्ती,
    अचूक आविर्भाव मुखी,
    क्षणोक्षणी मान वेळावी,
    भय दाटले नयनी,--!!!
    पाय मजेदार हलती,
    नाजुकसे ते हडकुळे,
    पण त्यात ताकद किती,
    खुट्ट वाजता वाऱ्यावरती,--!!!
    चरत चरत कुरणी,
    हिरव्या गवतावर निवांत,
    सारखी ही हले डुले ही,
    गोजिरवाणी बघा हरिणी,--!!!
    भोवती बाळे करिती घोळका त्यांच्याकडेच ना ध्यान,
    हलवून इवली शेपूट,
    शिकवे जगण्याचे ज्ञान, --!!!
    जागरूक राहून सारखी,
    भोवती नजर भिरभिरत राहे,
    सभोवती हरणें सगळी,
    पाहून मग जीव शांतावे,---!!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 10, 2019


  • चैतन्य

    हवी कशाला चिंता आता
    जिथे सावरणारी साथ आहे

    रोज निरनिराळी आव्हाने
    तुझे चैतन्य, सामर्थ्य आहे

    जरी विरोध पावलोपावली
    सत्यार्थी! मी निश्चिन्त आहे

    आकांत जीवनी जरी माजला
    तुझीच, कृपावंती साथ आहे

    जपाव्या कोमलांगी भावनां
    ती सुखाची फुलवात आहे

    सांगा साध्य कोणते जीवनी
    मूल्य मानवतेचे जपणे आहे

    कसला, कुठला दुजा भाव
    सत्य! क्षणभंगुर जीव आहे

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८२.

    १५ - ३ - २०२२.

      March 29, 2022


  • इतरांतील लाचारी बघे

    शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
    विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।

    पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें
    श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही
    विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी...१
    शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी

    शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे
    देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार
    विवंचना ती पैशाची, विसरे शरीर सौख्यापरि....२
    शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी

    ज्ञानीजन ते असती, अगाध ज्यांची मति
    टीका करीत राहूनी, विसरती ते अडचणी
    परिस्थितीचे वलय, निराश त्यांना करी....३
    शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 12, 2016


  • जगावेगळे नाते

    (अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची जुनी प्रथा. आता सासूने आपल्या सुनेला वाण देऊन तिच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर)

    अधिकाचे फळ अधिकच लाभते
    अशा कथा ऐकते
    तीसतीन ह्या वर्ष दिनाला
    अभिनंदन करते ।

    पोटी न आलीस
    तुझ्या आईने भरली माझी ओटी
    देवाजीने तुला नर्मिले
    केवळ आमच्यासाठी ।

    घरात आलीस घरची झालीस
    दूधात साखर पडली
    दुध कोठले साखर कुठली
    अवघी गोडी उरली ।

    किती करिशी तू आमची सेवा
    होऊ कशी उतराई
    ह्या वास्तूतील वस्तू वस्तू
    तुझे गोडवे गाई ।

    गृहलक्ष्मी तू स्थान तुझे ग
    घरच्या देव्हार्‍यात
    दुर्गा होऊन झुंजून
    करसी संकटावरी मात ।

    जगावेगळे असे कसे हे
    सासूसुनेचे नाते
    दृष्ट लागो तुझ्यावरोनी
    शब्दफुले उतरते ।

      October 29, 2018


  • विचारवंत

     

      August 20, 2013


  • देह समजा सोय

    जेव्हां मी म्हणतो माझे,

    सोय माझी असते त्यांत,

    देह जगविण्या कामीं,

    प्रयत्न हे सारे होतात ।।१।।

    देह वाटते साधन,

    प्रभूकडे त्या जाण्याचे,

    त्यासी ठेवतां चांगले,

    होते चिंतन तयाचे ।।२।।

    भजन करा प्रभूचे,

    सुख देवूनी देहाला

    परि केवल सुखासाठीं,

    विसरूं नका हो त्याला ।।३।।

    देह चांगला म्हणजे,

    ऐष आरामीं नसावे,

    ती एक सोय असूनी,

    त्यांने प्रभू मिळवावे ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 1, 2020


  • हा मंच खास

    नमन असे हे माझे तुला
    आभार असो या विश्वाला
    तू असे गुणांची खाण
    तुला वर्णाया शब्दांची वाण
    तुझे कर्म जणू कर्तव्य
    तू जणू विश्वाची ठेव
    तू मायेचा आधार
    तू जणू भविष्याचे द्वार
    हरविलेल्या तुझ्यातल्या 'मी' साठी
    केला हा एक उपहास
    आनंद, उत्साह, सोहळा
    तुला तुझेपण जगाया
    व्यास क्रिएशन्स्ने
    केला हा मंच खास

    - अस्मिता निंबर्गी

    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

      July 13, 2023


  • नदीवरील बांध

    विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा

    काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा

    बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी

    पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी

    सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे

    गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे

    चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई

    बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई

    खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी

    चकित झाले मन बघूनी हिरवळ जागोजागी

    इच्छित दिशेने पाणी वाही बांध घातल्यामुळे

    सारे जीवन प्रफुल्ल करीं आनंदमय सगळे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 4, 2019


  • दिगंबर

    (दिगंबर म्हणजे दिग्+अंबर. आकाश हेच ज्याचे वस्त्र तो भगवान महावीर दिगंबर. ज्याला एका वस्त्राचाही मोहन नाही. त्याच्या नावाने चाललेले श्रीमंती वैभवाचे प्रदर्शन, ओंगळवाणे अभिरुचीहीन पाहून या महान अवताराच्या भक्तांची कीव येते, अशाच एका समारंभाचा मंडप पाहून-)

    भलंमोठं नक्षीदार प्रवेशद्वार
    आज वैभवशाली मंडप झोकदार
    छताला लखलखीत झुंबरं दिमाखदार
    बसायला गाद्या टेकायला लोड
    त्यावर पांढऱ्या शुभ्र चादरी चमकदार
    लाऊड स्पीकर चा आवाज दमदार
    सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर
    भजनांच्या ठेक्यांचा चाललाय कहर
    संत महंतांची गर्दी व्यासपीठावर
    गलेलठ्ठ भक्तांची गर्दी मंडपभर
    खाण्या-पिण्याची चालली चंगळ फार
    अलिशान गाड्यांचा ताफा तयार
    लखलखत्या चांदीच्या रथात
    महंत साधूंची निघाली वरात
    गाजत वाजत गेली शहरात
    मंडपात उरलाय एकांत निवांत
    प्रवेशद्वारावर एकटाच धीरगंभीर
    बसलाय महावीर भगवान दिगंबर

    -- विनायक अत्रे.

      July 13, 2022


  • नभांगणी आज मेघ

    नभांगणी आज मेघ,
    कुठून कुठे चालले,
    शेकडो योजने प्रवास त्यांचा,
    कोणी त्याला मापिले,--!!

    निळे काळे भरले ढग,
    एकत्र जमून पुढे चालले
    स्वैर विहरती त्यात विहग,
    लांबवरी ते उडत चालले,--!!!

    या मेघांची बनते माला,
    इकडून तिकडून सर्व बाजूला,
    जसा लवाजम्यात घोळका,
    निघाला तसा काफिला,--!!!

    मध्येच एखादा मेघ डोकावे,
    संजीवनाने ओथंबलेला,
    अशा काळ्याशार ढगात, जीवनदाते नीर भरले,--!!!

    कोणाची असेल ओढ,
    कोण प्रेमे त्यांना बोलावे,
    क्षितिज पसरलेले विस्तीर्ण, ठिकाणा त्याचा कैसा ठांवे,--!!!

    येता जवळी सूर्यराज,
    काय त्यांचे होत असावे,
    का त्याच्यापुढे झुकत,
    अर्पित आपले जीवन करावे,--!!

    असा सहज करती त्याग,
    दुसऱ्यास सगळे देऊन टाकणे, म्हणूनच ते निसर्गनिर्मित,
    मानवाने उदाहरण शिकणे,--!!!

    नसते काही त्यांच्याजवळ,
    अहंबुद्धी, मी माझेपण
    बघता बघता ते देती स्वतःस, आनंदे करत समर्पण,--!!!

    वृत्ती उदार त्यांची शिकत,
    निसर्गघटकांनुसार वागावे,
    आपण सारे कूपमंडूक,
    कोष फोडुनी बाहेर यावे,,--!!!

    श्रेष्ठ गुरु राजा निसर्ग,
    न बोलताही बरेच शिकवे,
    कळले ज्याला ते शहाणपण,
    तो संकुचित दृष्टी डांवले,--!!!

    हिमगौरी कर्वे©

      September 1, 2019