विपरित वागूनी मन, नाश करीते शरीराचा ।
वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा...१,
उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट ।
परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट....२,
मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते ।
मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते...३,
नाच गाणे देत असते, सूख नयनां – कर्णाला ।
शरीर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४
एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला ।
साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 3, 2020
पर्यावरणविषयक लघुकाव्ये….
January 7, 2018
दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस
प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस.. १
खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा
खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२
खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते
तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३
विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा
बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४
-- डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 26, 2019
डेव्हलपर त्याच्या डोक्यावरील भार लवकरात लवकर उतरवायला उत्सुक असतो. तर कधी दिलेली आश्वासनं बिल्डरने पूर्ण करत नाही तोपर्यत काही सदस्य संस्थेचा ताबा घेण्यास तयार नसतात. काही संस्थेचे सदस्य आणि बिल्डर याचे वाद कोर्टात प्रलंबित असतात. तर अनेक सदस्यांना प्रश्न असतो, संस्था नोदणी झाली… पुढे काय? नविन संस्था एक इमारत १५० ते २०० त्याहून अधिक सदस्य असल्याने कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे आणि वाढले आहे. अनेक प्रकारचे करार तपासावे लागतात. तेव्हा अशा स्वरूपाच्या कामाची माहिती असलेला कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने कारभार केल्यास सदस्याचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदतच होईल. आजच्या भागात पहिल्या सर्वसाधारण सभेची माहिती आपल्यासाठी.
July 30, 2021
हा भारत माझा देश
बहू भाषा,बहू वेष
इथे नांदे हृषिकेश
नांदतो कल्पेश।।१।।
ही शुरविरांची भुमी
शौर्याची नसते कमी
असे सुरक्षेची हमी
भाग्यवान हो आम्ही
।।२।।
ही संतांची,महंतांची
पावन भुमी भक्तीची
एकी विविध धर्माची
झोळी भरे पुण्याची
।।३।।
जे देशासाठी लढले
तयांनी प्राण त्यागले
अमर हुतात्मे झाले
देशास्तव जन्मले।।४।।
त्यांचा आदर्श ठेवूया
जन उत्कर्ष साधूया
जनहितार्थ वेचूया
हा क्षण आयुष्याचा
।।५।।
नकोच झगडे तंटेे
होतील आपले तोटे
द्रोहींचे धरा बखोटे
देशहीत हो मोठे।।६।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 10, 2020
विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग
नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते
अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी
सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार
आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे
कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 10, 2018
किती पाहुणे उडून येती,
या देशातून त्या देशात,
स्थलांतर त्यांचे असे पाहुनी,
चकित होतो आपण मनात,--!!
हजारोंची संख्या त्यांची,
एकरंगी नि एकढंगी,
सारखेच सगळे दिसती,
सारख्याच त्यांच्या ढबी,--!!!
आभाळातून उडताना,
बहुतेकांना ना थकवा,
हे पाहुणे असती वेगळे,--
वेळेवरती-- आपुल्या गावा,--!!!
आगळेपण त्यांचे उठून दिसे,--!!!
किती पिढ्या गेल्या तरी,
हजारो वर्षे येती ते,
दरवर्षी परिपाठ असे,--
मार्ग त्यांना कसे सापडती,
कोण दिशादर्शक म्हणे,? --!!!
कोण त्यांना घड्याळ दाखवी,
नि कोण त्यांचे मार्गदर्शक,
ऋतू त्यांना कसे समजती,
कसे ठेवती दिवसांचा हिशोब,--?
सामान कुठले ना बरोबर,
ना कुठले साहित्य सवे, आत्मविश्वास केवळ घेऊन ,
प्रवास आपुला करती बरवे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
June 19, 2019
December 2, 2021
August 25, 2013
आठवते का तुला ?
पहिल्या पावसाची सर..
मृदुगंध ओल्या मातीचा
थेंब साचलेले ओंजळभर...
सरीवर सर झेलताना
अंगणात वेचल्या गारा..
धरेची तृष्णा शमवताना
बरसल्या ग्रीष्माच्या धारा..
July 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti