त्यागवृत्ति

जीवनाच्या सांज समयीं ।

उसंत मिळतां थोडीशी ।।

हिशोब केला स्वकर्माचा ।

वर्षे गेली होती कशी ।।

दिवसामागून वर्षे गेली ।

नकळत अशा वेगानें ।।

सुख दुःखाच्या मिश्रणीं ।

जीवन गेले क्रमाक्रमानें ।।

आज वाटे खंत मनीं ।

आयुष्य वाया दवडिले ।।

ऐहिक सुखाच्या मागे जातां ।

हातीं न कांहीं राहीले ।।

' घेणे ' सारे आपल्यासाठीं ।

करीत जीवन घालविले ।।

' देण्या ' मधल्या आनंदाला ।

मन सदा वंचित राहिले ।।

सुधारुन घे आतां तरी ।

अनुभवाने चूक आपली ।।

उर्वरित वर्षे जाऊं दे ।

त्यागवृत्ति मध्यें सगळी ।।

भोगातले सुख कसे ते ।

क्षणांत येवून क्षणांत जाई ।।

त्यागातील समाधान परि ।

उशीरा लाभून सदैव राही ।

-- डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



जीवनाच्या सांज समयीं ।

उसंत मिळतां थोडीशी ।।

हिशोब केला स्वकर्माचा ।

वर्षे गेली होती कशी ।।

दिवसामागून वर्षे गेली ।

नकळत अशा वेगानें ।।

सुख दुःखाच्या मिश्रणीं ।

जीवन गेले क्रमाक्रमानें ।।

आज वाटे खंत मनीं ।

आयुष्य वाया दवडिले ।।

ऐहिक सुखाच्या मागे जातां ।

हातीं न कांहीं राहीले ।।

‘ घेणे ‘ सारे आपल्यासाठीं ।

करीत जीवन घालविले ।।

‘ देण्या ‘ मधल्या आनंदाला ।

मन सदा वंचित राहिले ।।

सुधारुन घे आतां तरी ।

अनुभवाने चूक आपली ।।

उर्वरित वर्षे जाऊं दे ।

त्यागवृत्ति मध्यें सगळी ।।

भोगातले सुख कसे ते ।

क्षणांत येवून क्षणांत जाई ।।

त्यागातील समाधान परि ।

उशीरा लाभून सदैव राही ।

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author