तीळगुळ घ्या हो
गोड गोड बोला।।
खाली सांडू नका,
आणि भांडू नका।।धृ।।
ऊस ,बोरं ,ओंब्या,
वाण लावू चला।।
काटेरी हलवा
गोडव्याची कला।।
द्यायला मुळीच
विसरूच नका।।
खाली सांडू नका
आणि भांडू नका।।१।।
सुगड्याचं वाण
लावूया गं छान।।
उपयोगी वस्तू
त्यांना देऊ मान।।
हवाय कशाला
प्लॅस्टीकचा हेका।।
खाली सांडू नका
आणि भांडू नका।।२।।
उखाणा घेऊया
मौजही करुया।।
घरोघरी जाऊ
स्नेह हा वाटूया।।
राग,द्वेश,सारे
काढूनच टाका।।
खाली सांडू नका
आणि भांडू नका।।३।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 15, 2020
गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।
भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।
प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।
भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।
गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे
साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।
सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।
साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।
पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
यथासांग विधीने मनी तोषला ।८।
संपत असता यात्रा घटना एक घडली ।
एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।
धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।
आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।
यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।
केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 13, 2019


November 13, 2019
प्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
मध्ये एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे तिची सुखदुःखे जाणून घेतली. तिचा नवरा बराच आजारी होता. ती मानसिक दृष्टीने खचली होती. परंतु त्यावेळची तिची मानसिक अवस्था पाहून,-- आज आठवून मी खालील कविता केली आहे,---
मी आहे बघ जवळी,
रात्र घनतम काळी,
किती सोसशी वेदना,
प्रीतीची फुंकर निराळी,--!!!
असह्य होता तुझा,
जीव किती कळकळे,
काळजात थेट उठे,
कळ माझ्या सख्या रे, --!!!
कधी होशील ठीक ,
जीव सारखा तळमळे,
संसार आपुला अर्ध्यावर,
तुझ्यावाचून, कसा होईल रे,--!!!
धडकी भरे उरात माझ्या, कल्पनेतही नको हे सारे,--
भोगांची परिसीमा गाठता,
आत तरी किती तुटते रे,--!!!
जन्मोजन्मी साथ आपली,
केव्हा हे सारे सरणार रे ,
पती-पत्नी एकच असती,
देह फक्त ना दोन रे,--!!!
किती एकजीव आपण,
कुणाला सांगू जावे रे ,
जगाला हे कळत नसते,
ही अद्वैताची गुंफण रे,--!!!
प्रेमपाखरू कसे रडते,
तुला पाहून काळीज हलते,
स्वतःस किती दिलासा देऊ,
कसा ठेवावा धीर रे,--!!!
पती स्त्रीचे जग असते,
कोणाला कळेल हे बरे,
पाहून तुझे तडफडणे,
आतून मी उद्ध्वस्त रे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
August 19, 2019
सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
तरणे वा बुडणे,
जगेल तो त्या क्षणी,
ज्याला माहित पोहणे ।।१।।
पोहणे जगणे कला असूनी,
अनुभव हा शिकवूनी जातो,
जागरुकतेने कसे जगता,
यशही त्याला तसेच देतो ।।२।।
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
कष्ट लागती महान,
परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
सारे देतो मिळवून ।।३।।
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
निसर्ग शिकवी क्षणोक्षणी,
सतर्कतेने वेचून घ्यावे,
दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।
बोल सारे अनुभवाचे,
त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
अर्थ सांगतो कुणीतरी ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 7, 2017
March 5, 2022
आशीर्वाद दे ग आई मजला, विनवितो मी तुझाच पूत्र ।
बाबा माझे नसती हयात, कोण मजला ह्या जगतात ।।
'केशव' माझे वडील असता, 'केवशसूत' हा ठरतो मी ।
तसाच बनता 'केशवकुमार', मोठे होण्याची युक्ती नामी ।।
जगावयाचे जर मोठ्या नामी, तूच मजला महान आहे ।
'लक्ष्मी' तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 6, 2016
मदमस्त तारुण्य बहर,
पाहून कसा मी,
जागच्या जागी थिजलो,
दया कर जराशी,
तुला पाहुनी अचानक,
बर्फासारखा विरघळलो,--!!!
सुवर्णचंपकी कांती तुझी, चाफेकळीगत नाक,
भिरभिरणारे टपोरे नेत्र,
अन लाल कपोती गाल, --!!!
भुरभुरणारे केस उडती,
कसे वाऱ्यावरती,
जसा सुगंधच होतो,
येणाऱ्या झुळकेवर स्वार,--!!!
धडधडणारे उरोज पाहून,
पुरता मी ढांसळलो,
लटपट चालीने त्या,
एकदम गांगरुन गेलो,--!!!
शब्द "मंजुळ" किती,
जशी "सुरीली" तान,
भान हरपून ऐकत राहिलो,
तुझे "यौवनी" गान,--!!!
मादक"" चाल तुझी ती,
जशी नागीण "सळसळणारी",
पृथ्वीवरती अवतरली का,
कुणी अस्मानी परी,--!!!
तुझे लडिवाळ चाळे ,
पाहून धकधक जिवांत होते,
येते कुणी पाहुनी तुला,
काळीज काढून ठेवते,--!!!
डौलदार ती यष्टी,
गोरी-- पान काया,
भलेभले जन तरसून उठती,
तुझ्यासमोरी जाया,--!!!
नयनबांण"" फेकता कसे,
गारद मी झालो,
तृषार्त चकोर बनुनी,
कशी वाट पाहत राहिलो,--!!!
हिमगौरी कर्वे.©
February 4, 2019
ऊर्जा शोषत असतां पाणी
उकलन बिंदूवर येते
पाण्याचे रुप बदलूनी
बाष्प त्यांतून निघूं लागते
एक सिमा असे निसर्गाची
स्थित्यंतर जेव्हां घडते
एक स्थीति जावून पूर्ण
दुजामध्ये ती मिळून जाते
तपोबलाची ऊर्जा देखील
प्रभूमय ते सारे करिते
परमबिंदूचा क्षण येतां
साक्षात्कार तुम्हां घडविते
तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं
ईश्वरमय होऊन जाता
सारे परि ते तेव्हांच घडते
परम बींदूला जेव्हां पोहंचता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti