लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ?
एक चुकलेलं गणित असतं
कारण तिथे एक आणि एक तीन असतं...

लग्न म्हणजे काय असतं ?
उगाच त्याग करणं असतं
कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं

लग्न म्हणजे काय असतं ?
दोन जीवांचं मिलन असतं
कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं

लग्न म्हणजे काय असतं ?
मोक्षाकडे नेणारं दार असतं
कारण ते तोडावसं कित्येकांना वाटत असतं

लग्न म्हणजे काय असतं ?
जगण्याला एक निमित्त असतं
कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं

© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016



लग्न म्हणजे काय असतं ?
एक चुकलेलं गणित असतं
कारण तिथे एक आणि एक तीन असतं…

लग्न म्हणजे काय असतं ?
उगाच त्याग करणं असतं
कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं

लग्न म्हणजे काय असतं ?
दोन जीवांचं मिलन असतं
कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं

लग्न म्हणजे काय असतं ?
मोक्षाकडे नेणारं दार असतं
कारण ते तोडावसं कित्येकांना वाटत असतं

लग्न म्हणजे काय असतं ?
जगण्याला एक निमित्त असतं
कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं

© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016

Author