शोधत होतो रुप प्रभूचे, एक चित्त लावूनी ।
अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी ।।
शांत झाले चंचल चित्त, शांत झाला श्वास ।
ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश ।।
पचन शक्ती हलकी झाली, जठराग्नीची ।
शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्याची ।।
देहक्रियांतील प्राणबिंदू , असे ईश्वर ।
समरस होतां त्याच शक्तिशीं, होई स्थिर ।।
शोधामध्यें चिंतन करतां, ध्यान परी लागते ।
समाधी स्थितीत येतां प्राण, अनंतात मिसळते ।।
नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे ।
विश्वमंडळ तोच असतां, शोधू तयास कोठे ? ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 19, 2017
एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.
जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.
अस्वलाला वाटलं…
‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.
सिंहासारखं रुबाबात फिरावं.’
September 14, 2010
तेजोनिधीच्या आगमनाने,
निळ्या आभाळां सोनझळाळी, जलद अवतरती सोनेरी किती,---- डोकावती विस्तीर्णजलाशयी,---
आपुला रंग लेऊनी पाणी,-----
कसे खळाळते समुद्री,खाली, अस्तित्व" अमुचे दाखवतो त्यांना, प्रतिबिंबित होऊनी समुद्रकिनारी,--
निळा जलाशय तो हसे गाली, कुठून आली माझ्यावर "निळाई", वर्षा ऋतूत जेव्हा 'बरसला' तुम्ही,
तुमच्यातील पाणीच आले खाली,
निळे--शाssर रंगले माझे पाणी,
किनार्यावर लोक हिंडून बघती, जलभरले' "मेघ" कुठे असती,--
उत्सुकताही त्यांना केवढी,-?
माझ्यात तुमचे प्रतिबिंबदिसे,
भास्करच त्यांना उत्तर देई ,
थेंब -थेंब पारदर्शक होती,
ही जादू सगळी सूर्यप्रकाशाची,
सोनेरी रंगाचा मुलामा घेऊनी,
पाणी कसे वर बघत असे,
विलक्षण रंगसंगती साधती किनाऱ्यावरती बाजूची झाडे,
हिरवागार रंग कंच लेवुनी, भोवती उभी कशी हिरवाई, आपल्या अद्वैताचे साक्षीदार ते,
शिवाय किनाऱ्यावरची रेती,-----
हिमगौरी कर्वे.
May 6, 2019
मीच अजूनही जगतो
तुझ्याच हृद्य आठवात
तुझेच ते रूप लाघवी
पाझरते या लोचनात....
सांग कसे व्यक्त करू
भावनांना शब्दाशब्दात
तुही निष्पाप निरागसी
अव्यक्तता.! पापण्यात....
तीच अधीरता अंतरात
जाणवते तुझ्या विरहात
मीही अजूनही जगतो
तुझ्या हृदयस्थ आठवात....
रचना क्र. ६०
२७/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
August 2, 2023
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 29, 2017
रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी
आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी...१,
नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी
फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी...२,
नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक
मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक...३,
दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा
कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 4, 2017
कशांत दडले समाधान ते,
शोधत असतो सदैव आम्ही,
धडपड सारी व्यर्थ होऊनी,
प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।
बाह्य जगातील वस्तू पासूनी,
देह मिळवितो सदैव सुख,
क्षणीकतेच्या गुणधर्माने,
निराशपणाचे राहते दुःख ।।२।।
'समाधान' ही वृत्ती असूनी,
सुख दुःखातही दिसून येती,
चित्त तुमचे जागृत असतां,
समाधान ते सदैव मिळते ।।३।।
सावधतेने प्रसंग टिपता,
समाधान ते येईल हाती,
सुख दुःखाला दूर सारता,
अंतरभागी समाधान दिसती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 3, 2016
आभाळ आपल आपणच पेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
कुणाची काठी हवी कशाला
मनगटातली ताकद दिसू दे जगाला
बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
अन् वाहेल मध्येच बेभान वारा
सावली तेंव्हा तू शोधु नकोस
आडोशाला जाऊन बसु नकोस
उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
सोन नाही का विस्तावात चमकत
सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
निर्भीड छातीने सगळ झेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
सूर्य झालास तर अतिउत्तम पण
काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
आपल आभाळ...
-- धनराज साळवे (Dhanraj Salve)
dhanrajasalve@gmail.com
October 27, 2016
खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार
शिकला सवरला परि न जाणला संसार
पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी
घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी
वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता
कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता
सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची
व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 19, 2019
उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!
नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!
रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!
-- ..... मी मानसी
June 20, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti