प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी
कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा II१ II
जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी II २ II
मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे II३ II
कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक
त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची II ४II
सत्य परिस्थिती ऐसी, कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी, प्रभूच्या अस्तित्वाविषयी II ५II
फक्त एकमुखी वाच्यता, असे ती सर्वता
महान शक्ती असता, ह्या ब्रह्मांडामध्ये II ६II
सर्वांनी जाणले एक, ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक
त्याच ऊर्जेचे हे प्रतीक, सारे विश्वमंडळ II ७II
कुणा नाही दुजा भाव, समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञानी देती नाव, निरनिराळी त्या शक्तीसी II ८ II
कुणी म्हणती राम, कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम, येशू असे कुणाचा II ९II
परी तत्व नसे वेगळे, नावे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे, हीच खरी शोकांतिका II १०II
सारे जीवन निघून जाई, परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही, त्याच्या अस्तित्वाविषयी II११ II
जाणावी ती शक्ती, रूप आकार त्यास नसती
शक्ति समजोनी करावी भक्ती, आदर भाव ठेवून II१२ II
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला, विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उपजण्याला, मानवामध्ये II १३II
बहूत झाले विद्वान, कर्तव्य करूनी मिळवी मान
मानव जातीची ती शान, ह्या संसारी II १४II
मार्ग निरनिराळे दाखवी, सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई, ध्येय मिळतां जीवनाचे II१५ II
विचार करा मनाशी, आपले वैर आपणाशी
नसते केव्हां प्रभूशी, हेच मूळ दु:खाचे II१६ II
वाद नसतो ध्येयापरी, चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी, सर्व सुख दु:खाची II १७II
तथा कथित पंडित, सामान्यांत विद्वान होत
ज्ञान त्यांचे थोडेसे जास्त, बहुजनां पेक्षा II १८ II
वापरूनी ज्ञान शक्ती, सामान्य जनांस वाकविती
आपले अस्तित्व स्थापती, प्रभू शक्तीशी विसरून II १९II
तर्क शक्ती थोर, आहे चा नाही करणार
नाही ना आहे म्हणणार, ज्ञानाचा खेळ करूनी II२०II
मार्गाचे करूनी भेद, करीत राही वाद
जीवन करी बरबाद, विसरूनी ध्येयासी II २१II
ध्येय असे महान, मार्ग हे साधन
साधनास साध्य समजोन वाया जाई आयुष्य II २२II
साध्य नका समजू साधनासी, ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने जातासी, साधका प्राप्त होई ध्येय साध्य II २३II
निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन, ज्ञान शक्ती वापरून
स्वअस्तीत्व ठेवण्या टिकवून, केले असे II२४ II
अस्तित्वाची भावना मोठी, प्रत्येक झगडतो त्यासाठी
आयुष्य खर्ची त्या पोटी, सकळ ज्ञान II २५II
न कळे त्यास देवपण, भांडण्यास जाई विसरून
आयुष्य मातीमोल, करून टाकीत असे II २६II
विसरूनी जा सर्व भेद, मिटवून टाका वादविवाद
लहान मोठ्याचा संवाद, नष्ट करा त्वरीत II २७II
सारेच आहेत छोटे, कुणी नसती मोठे
हे केवळ आपपासातील तंटे, मानवनिर्मित असती II २८II
जात धर्म होत अनेक, हे मानव निर्मित प्रतिक
सर्व मार्गाचे ध्येय एक, न कळे अज्ञानामुळे II २९II
म्हणून जाणावा ईश, सार्थकी लावा आयुष्य
जात धर्माचे पाश, सोडून घ्यावे II ३०II
महान शक्ती तीच ईश्वर, दुसरा नसे कोणी वर
आपणच देतो त्यासी आकार, सगुण रुप देवूनी II ३१II
मानवता हाच धर्म खरा, आपसातील भेद विसरा
प्रभू देई तयाना आसरा, जीवन सुखी करण्या II ३२II
दुसऱ्याची दु:खे जाणा, त्यांच्या सुखात आनंद माना
प्रभू अंश त्यासी म्हणा, हीच जीवनाची गुरू किल्ली II ३३II
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 30, 2018
November 7, 2021
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता
गरगर गरगर फिरवू चरखा
दीन जना जो देईल तनखा।।धृ।।
चरख्याचा हा मंजुळ नाद
दशदिशांतुनी घालीत साद
स्वदेशी खादीचा जणू प्रसाद
परसत्तेचा सोडवी विळखा
गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।।
निघती भरभर कोमल धागे
सुबक गुंफुनी विणुया तागे
देश आपुला न राहील मागे
करी निर्भय हा पाठीराखा
गरगर गरगर फिरवू चरखा।।२।।
कवच स्वदेशी निर्भयतेचे
शस्त्र हाती हे संघटनेचे
गीत मुखीचे स्वातंत्र्याचे
जयभारत हा घोषही ऐका
गरगर गरगर फिरवू चरखा ।। ३ ।।
-स्व. सौ. गंगूताई वैद्य
December 18, 2023
आम्हीच लावली येथे भांडणे दोन जमातीत
फोडावीत एकमेकांची डोकी हेच स्वप्न डोळ्यात ।
आम्हीच तारणहार असे बिंबवले तुमच्या मनात
धर्माचा कैफही आम्ही वाढविला तुमच्याच रक्तात
भिती बागुलबुवाची दाखविली सदा तुम्हाला
बनविले आम्ही पुन्हा पुन्हा ऊल्लू की हो तुम्हास ।
अशिक्षीत तुम्ही रहावे हाच ऊद्देश असे अमुचा
केले बहू प्रयत्न की अमुचा ऊद्देश सफल व्हावा
राहिलात तुम्ही अशिक्षीत ऊद्देश सफल झाला
धर्मांध तुम्हा बनवण्याचा डाव यशस्वी झाला ।
रक्ताळलेत हात तुमचे करुन हत्या निष्पाप अनेक
चटावली जिव्हाही अमुची चाखुनी रक्त नमुने अनेक
मातीत जाल तुम्ही ना काही सुतक आम्हाला
निवडणुकीत मते मिळवण्याचा फंडा यशस्वी झाला ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१ आक्टोंबर २०१८
October 5, 2018
एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//
ऐष आरामांत राहून देह झाला मलीन
शरीर सुखासाठी करती नाना खटपटी
आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१//
मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी
राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार
टाकता मलीनता मनाची पेटलेल्या होळीकडे, घे धांव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //२//
विसरुनी चाललो मानवता प्रत्येक बघतो स्वार्थता
विश्वासाचे आपले नाते विसरुन गेले सारे ते
निस्वार्थी बुद्धीने आतां जाणा इतर मनाचे ठाव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //३//
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 2, 2017
चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण
दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून....१,
फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी
पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२,
चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम
खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३,
वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती
तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 22, 2019
घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।
वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार
आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,
घ्याहो निरखूनी ।।१।।
ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची
भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,
घ्याहो निरखूनी ।।२।।
राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार
ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,
घ्याहो निरखूनी ।।३।।
दया क्षमा शांति प्रेम आनंद उल्हासती
आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,
घ्याहो निरखूनी ।।४।।
प्रत्येक शोधतो आपले घर तसेच करी जीवन साकार
सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,
घ्याहो निरखूनी ।।५।।
घरें बांधली निरनीराळी घ्याहो निरखूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 1, 2020
गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ/ व्यवस्थापन समिती/ पदाधिकारी हे गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेले सभासद असतात. सदर व्यवस्थापन समिती सभासद आणि संस्था यांचे विश्वस्त (Trustee) असतात. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने गृहनिर्माण संस्थेला जर काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिक व सामूहिकरीत्या त्या नुकसानीची जबाबदार असतात. सदर लेखात खास आपणासाठी व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय असतात याची माहिती देत आहे.
August 29, 2021
मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,
कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?
कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।
श्वास चालतो रात्रदिनीं,
लक्ष्य न घेई खेचूनी,
ऊर्जा मिळते देहातूनी,
परि मनास बंधन नसावे....१,
कोडे हे उकलून घ्यावे
एकचि कार्य एके क्षणी,
एकाग्रता येई दिसूनी,
अवसर मिळे मग कोठूनी,
त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२,
कोडे हे उकलून घ्यावे,
संसाराचे ‘जू’ मानेवर,
ओढण्यासांगे ईश्वर,
मार्ग सारे असता खडतर,
कसे त्यास वळवावे पाहावे......३,
कोडे हे उकलून घ्यावे.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 18, 2016
दसरा सण आनंदाचा
सोनं द्या प्रेमाचं मोठं
देऊन पानं आपट्याची
नका देऊ सोनं खोटं
आलिंगन देऊन परस्परांना
सोनं म्हणून वृक्षबीज देऊ
झाडे जगवा झाडे वाचवा
वसा आज हा आपण घेऊ
हर्षाच्या या मंगल समयी
नका रडवू अबोल वृक्षा
रक्षण करती आपुले जीवन
आपण करूया त्यांची रक्षा
वृक्ष सदैव देतच असती
पाने-फुले किती संपदा
होऊ नकोस तू कृतघ्न
वृक्षाविन ओढवी आपदा
वृक्ष असती मित्र आपुले
आपटा, वड, पिंपळ, शमी
वृक्ष-मानव सहजीवनाने
करू साजरी विजयादशमी
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
October 8, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti