आनंदाने नाचत गात,
घेत हृदयाचे ठाव ,
चाललो मी पुढे पुढे ,
झरा माझे नाव,--!!!
कपारीत डोंगराच्या,
जन्म होई माझा,
झुळझुळ वाहत जाता,
होत असे मी मोठा,--!!
शांत निर्मळ पाणी,
हळूहळू पुढे जातसे ,
पारदर्शक थेंब लोलक,
नजरेत ना भरती कसे,--!!
असे धवल थेंब धावती,
त्यांची बनते सुरेख नक्षी,
ती बघण्यास उत्सुक हा,
सारखे येती माझ्यापाशी,--!!
अशांत, अस्वस्थ चित्ता,
क्षणार्धात करतो शांत ,
मनस्ताप होता क्षणी,
धावती इथे निवांत,--!!
अवतीभोवती वृक्षराजी,
अन पक्ष्यांचे मंजुळ कूजन,
माझ्या पाण्याची धून मंजुळ,
हा पक्षीगान ते मधुर,-?-!!
मंद वारा संगतीला,
अखंड नित्य वाहे,
जो येईल तो आजूबाजूस,
निसर्गचित्रच पाहे,---!!!
तहान भागवण्या येती,
लहानथोर कित्येक पक्षी,
गोड पाण्याने तृप्त होतां
रमती बघा माझ्या वक्षी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 15, 2019
सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
तरणे वा बुडणे,
जगेल तो त्या क्षणी,
ज्याला माहित पोहणे ।।१।।
पोहणे जगणे कला असूनी,
अनुभव हा शिकवूनी जातो,
जागरुकतेने कसे जगता,
यशही त्याला तसेच देतो ।।२।।
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
कष्ट लागती महान,
परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
सारे देतो मिळवून ।।३।।
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
निसर्ग शिकवी क्षणोक्षणी,
सतर्कतेने वेचून घ्यावे,
दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।
बोल सारे अनुभवाचे,
त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
अर्थ सांगतो कुणीतरी ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 21, 2016
मूल्य नाही कुणा,
तूं दिल्या वेळेचे,
गमावून टाकी,
जाणूनी फुकाचे ।।१।।
लागत नसते,
दाम वेळेसाठीं,
म्हणून दवडे,
अकारणा पोटीं ।।२।।
वस्तूचे मूल्य ते,
पैशांनीच ठरते,
परी वेळेची किंमत,
कुणा न समजते ।।३।।
वेडे आहोत सारे,
कसे होई मूल्य
वेळ जातां मग,
आयुष्य जाईल ।।४।।
आयुष्य खर्चणे,
हेच वेळेचे मुल्य ठरते,
जीवनांतील यश,
त्यावरुन कळते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 17, 2015
मी मुलांनो, वाट तुमची पहाते
वात्सल्य, ओघळूनी गहिवरते
जीव माझा, लेकरांत गुंतलेला
प्रतिक्षेत सारेच मी भुलूनी जाते
तुम्हावीण, मीच इथे एकटी
जडावलेले तनमन कातर होते
तुम्ही सारे पाहुण्यासारखे येता
काळजातुनी, मातृत्व पाझरते
अधीर व्याकुळ शीणली काया
तरीही, तुमच्यासाठी मी जगते
सुरकुतलेल्या या हातांनीही
जे जे तुम्हा आवडते ते ते करते
तुमचे येणे, माझे भाग्य सुखाचे
वृद्धत्वात अजुनी जगावेसे वाटते
नका विसरू कधी तुमच्या घराला
बालपण, जिथे पुन्हा परतूनी येते
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११४.
१४ - ४ - २०२२
April 29, 2022
टेबलावर ठेवले होते
बॉसने काहीतरी लिहून
हाताखालच्या लोकांनी
निरनिराळे अर्थ काढले त्यातून
कुणास काहीच समजेना,
म्हणून असिस्टटने केली विचारणा
चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले
मला काय म्हणावयाच होत तेव्हा,
समजत नाही आता,
ती आहे एक नवकविता
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 21, 2019
तू माझी माऊली । तू माझी साऊली ।
पाहतो वाटुली । पांडुरंगे ॥१॥
तू मज एकुला । वडिल धाकुला ।
तू मज आपुला । सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव । तुजपाशी असे ।
तुजविण ओस । सर्व दिशा ॥३॥
June 15, 2026
ठसका लागून प्राण जातो, घशांत अडकून काही तरी ।
क्षणांत सारा खेळ आटपतो, धडपड केली किती जरी ।।
हृदय जेव्हा बंद पडते, उसंत न मिळे एक क्षणाची ।
केवळ तुम्हीं चालत असतां, यात्रा संपते जीवनाची ।।
कांचेचे भांडे निसटता, तुकडे त्याचे होऊन जाती ।
देहाचा काय भरवसा, जेव्हां सांपडे अपघाती ।।
वाढ करण्या शरीराची, पडत असती बहूत कष्ट ।
क्षणभंगूर देह असूनी, केव्हांही होऊन जाईल नष्ट ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 14, 2020
एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.
जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.
अस्वलाला वाटलं…
‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.
सिंहासारखं रुबाबात फिरावं.’
September 14, 2010
चाललो होतो मित्रासह सहल करण्या एके दिनीं
आनंदाच्या जल्लोषात आम्हीं गात होतो सुंदर गाणीं १
वेगामध्यें चालली असतां आमची गाडी एका दिशेने
लक्ष्य आमचे खेचले गेले अवचित एका घटनेने २
चपळाईनें चालला होता काळसर्प तो रस्त्यातूनी
क्षणांत त्याचे तुकडे झाले रस्त्यावरी पडला मरूनी ३
काय झाले कुणास ठाऊक सर्व मंडळी हळहळली
जीव घेणाऱ्या प्राण्यालाही सहानुभूती ती लाभली ४
अंत:करणीं दया भाव तो असतो ईश्ररी गुणधर्म
जीवमात्रीं वसला असूनी निर्मितो आपसातील प्रेम ५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 21, 2019
June 10, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti