`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने…
October 15, 2019
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
सासरे पाव्हणं आलेत ग बाई
सासर्यांनी काय आणलंय ग बाई
सासर्यांनी आणली मिठाई
मिठाई मी खात नाही
सांगा मी येत नाही
दाराचं लॅच लावा ग बाई
गेटच्या वॉचमनला सांगा ग बाई ।।१।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
सासुबाई पाव्हण्या आल्यात ग बाई
सासुबाईंनी काय आणलंय ग बाई
सासुबाईंनी आणलीय पैठणी, पैठणी
साड्या मी नेसत नाही
सांगा मी येत नाही... दाराचं.... ।।२।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
नणंद पाहुणी आली ग बाई
नणंदेनं काय आणलंय ग बाई
नणंदेनं आणलंय रुचिरा ग बाई
स्वयंपाक मी करत नाही
सांगा मी येत नाही... दाराचं.... ।।३।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
हिरो पाहुणे आलेत ग बाई
त्यांनी काय आणलंय ग बाई
त्यांनी आणलेयं सुमो ग बाई
सुमोत मी बसते
सांगा मी निघते
पटकन् दार उघडा ग बाई
फ्रिजमधून कोल्डड्रिंक काढा ग बाई
October 11, 2018
रूप असे देखणे
काळजां भिडले भारी,
डोळे असती लकाकते,
पाणीदार जसे मोती,
काया कशी तुकतुकीत,
नजर फिरता हाले,
सुंदर तांबूस वर्ण,
त्यावर पांढरे ठिपके,
शिंगांची नक्षी डोई,
दिसते वर शोभुनी,
हिंडते बागडते रानी,
कुणी बालिका की हरणी, --??
चपल चंचल वृत्ती,
अचूक आविर्भाव मुखी,
क्षणोक्षणी मान वेळावी,
भय दाटले नयनी,--!!!
पाय मजेदार हलती,
नाजुकसे ते हडकुळे,
पण त्यात ताकद किती,
खुट्ट वाजता वाऱ्यावरती,--!!!
चरत चरत कुरणी,
हिरव्या गवतावर निवांत,
सारखी ही हले डुले ही,
गोजिरवाणी बघा हरिणी,--!!!
भोवती बाळे करिती घोळका त्यांच्याकडेच ना ध्यान,
हलवून इवली शेपूट,
शिकवे जगण्याचे ज्ञान, --!!!
जागरूक राहून सारखी,
भोवती नजर भिरभिरत राहे,
सभोवती हरणें सगळी,
पाहून मग जीव शांतावे,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
May 10, 2019
हे यंत्रा !
तुझी जात कोणती?
तुझा धर्म कोणता?
तुझा पक्ष कोणता?
तू सनातन आहेस?
कि पुरोगामी आहेस?
तू सजीव आहेस?
कि निर्जीव आहेस?
का बनवतोस रस्ता?
धर्मनिरपेक्ष तुझे काम
संविधानावर तर चालतोयस..
मानवी कल्याणासाठी तू..
यंत्रयुगातील तू..
कोणती घ्यावी शिकवण?
हे यंत्रा !
विठ्ठल जाधव
शिरूर, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
November 21, 2018
-- स्वाती ठोंबरे.
December 9, 2021
विपरित वागूनी मन, नाश करिते शरिराचा
वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा...१,
उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट
परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट....२,
मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते
मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते...३,
नाच गाणे देत असते, सूख नयनां - कर्णाला
शरिर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४
एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला
साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 8, 2019
एक ती झोप स्वप्न बघत राही
शिणवून शरीर ताप जीवास सुख देई
स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा
एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां
स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 30, 2020
युरोपच्या दौर्याचे पद्यरुपात सुंदर वर्णन
May 14, 2012
जयोस्तु ते श्रीमहन्मंगले
शिवास्पदे शुभदे...
स्वतंत्रते भगवती
त्वामहं यशोयुतां वंदे...
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं,
नीति संपदांची
स्वतंत्रते भगवती श्रीमती
राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची
आकाशी होशी...
स्वतंत्रते भगवती
चांदणी चमचम लखलखशी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे...
गालावरच्या कुसुमी किंवा
कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी
विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे
गांभीर्यहि तूची...
स्वतंत्रते भगवती
अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे...
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे
तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगिजन
परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत
महन्मधुर तें तें...
स्वतंत्रते भगवती
सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे...
हे अधम रक्तरंजिते
सुजन पूजिते
श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण,
चराचर शरण,
श्री स्वतंत्रते...
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे...
-- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
https://www.youtube.com/watch?v=vtCE-8EZ1o0
January 27, 2017
प्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti