(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझिया माहेराची नागमोडी वाट (भावगीत)

    माझिया माहेराची नागमोडी वाट
    जाई चढत चढत खंडाळा घाट।।धृ।।

    निसर्ग कुशीत दडलं माहेर गं
    हिरवी हिरवाई सभोवताली गं
    तिथे थाटला पोहळी बनाचा थाट
    जाते चढत चढत खंडाळा घाट।।१।।

    माझे माहेर आहे बाई तालेवार
    दिमतीला सदोदित नोकर चार
    बंगळीस आहे पहा चांदीचा पाट
    जाते चढत चढत खंडाळा घाट।।२।।

    माय माऊली माझी
    उभी स्वागताला
    वहिनीसवे माझा बंधूराया आला
    आजी-आजोबा नी भाच्चे बघती वाट
    जाते चढत चढत खंडाळा घाट।।३।।

    माझ्या माहेरी वाहतो मायेचा झरा
    खंबीर बाप साऱ्यांचा पोशिंदा खरा
    माय म्हणे सासरी पाठवणी करा
    जाते चढत चढत खंडाळा घाट।।४।।

    गीतकार
    सौ.माणिक शुरजोशी

    ५/१२/१९

      December 14, 2019


  • चक्रव्यूह

    ठोका खोकी
    बनवा खोपी
    ही झोपडपट्टी

    गटारावरी
    भटारखाना
    आणि हातभट्टी. ||१||

    ओसंडे घन
    दुर्गंधि-घाण
    कचरा सडला

    तिथेच भ्रामक
    जीवन नामक
    खेळ मांडला. ||२||

    रोज ठणाणा
    नविन घोषणा
    सुधारणांच्या.

    शून्यें असतीं
    नांवावरती
    सरकारांच्या. ||३||

    मंत्री येतां
    जिवंत प्रेतां
    बघुन न बघती

    गोठ्यामधली
    ढोरें सगळी
    तशीच ज़गती. ||४||

    चक्रव्यूह रणिं
    रचला कोणी
    मुळी न ठाउक

    अभिमन्यूंची
    भेट मृत्युशी
    इथेंच घाउक. ||५||

    -- सुभाष स. नाईक

      June 23, 2016


  • तू फक्त तुझे चंद्र आवर …

    खुसखुशीत भाषेत नेमके व्यक्त करण्यात हातखंडा आहे ह्यांचा !

      May 29, 2017


  • उमलणारी फुले

    चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या
    फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या
    निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं
    स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं
    चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची
    प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची
    आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें
    मध शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे
    सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी
    जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी
    हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी
    क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 7, 2016


  • चांदणी मी गगनांतील

    चांदणी मी गगनांतील,चमचम,चमचम चकाकती,
    कोण आहे तोडीस तोड,
    पुढे यावे अंतराळातुनी,---

    न कुठला नखरा,
    न कुठली रंगरंगोटी,
    का न मानावे देवा,
    ही त्याचीच किमया मोठी,--!!!

    रंग आमुचा नैसर्गिक,
    दुधी म्हणू की पांढरा,
    लखलखतांना,पुढे-मागे,
    कसा दिसे आमुचा तोरा,--!!!

    जेव्हा उगवतो आम्ही,
    थोडा प्रकाश अवती,
    चंद्रराजाचा डामडौल पहा,
    चांदण्या त्यात किती रंगती,--!!!

    इतरही त्याच्या सर्व सख्या,
    पट्टराणी त्याची पौर्णिमा,
    कधी--कधीच उगवते ना,
    रात्रींमांजी साथ द्याया,--?

    आमुचा जथा येई रोज ,
    चंद्रम्याच्या बरोबरी,--
    त्याविना कसे भागवील,,---
    सांगा,तुम्ही आता तरी,--?

    © हिमगौरी कर्वे.

      January 1, 2020


  • आठवणींची पिसं

    आठवणींचा डोह भासतो वरकरणी शांत नि:संग
    मात्र डुचमळता उठतात भावकल्लोळाचे अनंत तरंग
    वरवर वाटतात साऱ्या एका कुळीच्या एक जशा
    होतात बोलक्या जेव्हा, जाणवे एकमेकींचा अलग ठसा

    काहींचा केवळ नुसताच भास
    जवळून काहींचे जाणवतात श्वास
    काही रांगत्या काही रांगड्या
    मुकाट काही, काही अखंड बडबड्या

    काही गोड बोबड्या दुडदुडताना
    रुणझुणतात मनोपटलावर पुन:पुन्हा
    काही नव्हाळ, गव्हाळ रंगसाजिऱ्या
    कुजबुजती अस्पष्ट लाजऱ्याबुजऱ्या

    काही वृध्द, रुध्द काही विद्ध
    काहीच सुसंगत बाकी असंबद्ध
    लावून पंख काही जाती उडून
    काही शांत करिती संथ रवंथ

    काही निद्रिस्त काही सतत भयग्रस्त
    आनंदमयी मस्त काही संत्रस्त त्रस्त
    नुसतेच काही अवशेष, खंड
    काही धगधगती, तेवती अग्निकुंड

    काही दटावणाऱ्या काही दाटलेल्या
    काही शुष्क, कोरड्या आटलेल्या
    एकलेपणात गुंग शापित काही
    अतिआवेगाने उरी फुटलेल्या

    काही बिचाऱ्या दुखऱ्या हळव्या
    अश्वत्थामाच्या भाळी मिळाव्या
    काही त्रोटक, तुटक हवेत विराव्या
    ऋणबंधाईत काही उरी उराव्या

    काही लाजाळू असतात काही मायाळू
    काही ठुसठुसतात सदैव बनून गळू
    काहींचा सल सतत रुततो मना
    शिकवि काही पोरक्या बापुड्या केविलवाण्या

    काही मानी त्यांचा ताठर बाणा
    लपविती चेहेरा काही लाजिरवाण्या

    चालूनही काळासोबत नाही कालबाह्य
    येऊनही वयात त्या नाही होत वयस्क
    आठवणींच्या वाढतात केवळ सावल्या
    मनाच्या मेणावरच्या अस्पष्ट पाऊलखुणा

    आठवणीच्या पक्ष्याची पिसे विस्कटावी किती
    काहीच पसरतात, विखुरतात, काही गळती
    झाडून पंख, पुन्हा सावरुन झेपावतो जेव्हा
    हाती न आपल्या काही, केवळ गळक्या वेणा

    - यतीन सामंत

      August 2, 2022


  • सूर्य उद्याचा !

    चढत्या रात्री द्रव सोनेरी ।
    चषकांमधली नशा बिलंदर ।
    मंद सानुली ज्योत सांगते ।
    हे नच अपुले नवसंवत्सर ।।

    थाट चालतो माठ जिवांचा ।
    किनाऱ्यावरी गर्दी कलंदर ।
    पश्चिमेकडे झुकता झुकता ।
    दिशादिशांतील वाढे अंतर ।।

    उगा कशाला सदा वाहता ।
    दास्यवृत्तीची मढी खांद्यावर ।
    रूढी तोडुनी गढी गाडता ।
    अभिमानाने फुलेल अंबर ।।

    ब्रह्मध्वज हा तुमचा अमुचा ।
    चैत्र पाऊली येई निरंतर ।
    सरता तम , हे उजाडेल मग ।
    सूर्य उद्याचा असेल सुंदर ।।

    रचना : डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
    ९४२३८७५८०६

      January 3, 2024


  • जेव्हा मला काही लिहावे वाटते

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 17, 2010


  • चक्र

    मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी ।

    कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरती ।।

    एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरती ।

    आज गमवूनी प्राण आपला, तोच दुजाची भाकरी बनती ।

    निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे ।।

    एक मारूनी जगवी दुजाला, हीच तयाची विशेष अंगे ।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 3, 2020


  • चिमणीची निद्रा मोड

    पहाट झाली,
    चिव चिवते चिमणी
    उमज येईना,
    उठविले तिजला कोणी.....१,

    आई आहे कां ?
    जी उठवी शाळेसाठी,
    गुदगुदल्या करूनी
    कुरवाळिते हळूंच पाठी....२,

    घड्याळ उठवी
    घण घण करूनी नाद
    घरट्यामधुनी,
    नाही ऐकला असा निनाद.'..३,

    ' उषाराणी येते,
    साऱ्यांची आई बनूनी
    प्रेमानें मोडी झोंप,
    नाजूक करकमलांनी.....४,

    घड्याळ आमचे,
    दवबिंदू पडतां पानावरूनी
    चाळविती निद्रा,
    टपटप आवाज करूनी' .....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      August 12, 2019