नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।१।।
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।२।।
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।३।।
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।४।।
अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।५।।
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 7, 2019
उन्हांत फडफडणारी
एकाकी
फांदी................
वर आभाळापर्यंत
हात पोहचत नाहीत
आणि खाली
कुठलाच समुद्र
स्वागताला उत्सुक नाही .................
तिचे अस्तित्वच
असे,
पणांला लावलेले
बदमाष ऋतुंनी
बहरांतच शापलेले ....................
-- सुषमा एडवण्णावर
August 31, 2010
कळावे लोभ असावा ,पत्र मी केले पुरे
कळेल ना खरोखरी , पत्ता कुठचा लिहावा बरे ?
सगळेच गुंग मोबाइलवरी ..मेसेज आणि कॉलवर
मी अडाणी अजून चिपकून ..जुन्याच पत्र चिट्ठीवर
शब्द लेकराचे जपून ठेवले ....वाचते,हात लावते पुन्हा पुन्हा
घड्या करुनी सांभाळते ....त्यात माझा दिसे कान्हा
स्पर्श अक्षरांचा जणू लेकराला थोपटते मी
झोपतो बाळ आन स्वप्न पाहत झोपते मी
केवढा होता सहारा पत्राचा ...छान वेळ वाट बघण्यातही
आता तर विसरलाच पत्ता घराचा ..गावचा पोस्टमनही
मोबाईलवर थरथर म्हणुनी बोलणेही होतेच कट
खरे तर नातसुनांना ..वाटते माझी का कटकट
खोटेपणा, फसवेगिरी ..दिसतेच या यंत्रात मला
खास वेळ काढून लिही रे लेकरा एक पत्र मला /
-- श्रीकांत पेटकर
March 8, 2019
पाऊस
June 24, 2012
ईश्वराचा वास कोठे, प्रश्न नेहमी पडतो,
फुलांफुलांतील सुगंध,
मग त्याचे उत्तर देतो,--!!!
आकार फुलांचे विविध,
सुबक आणखी नाजूक,
एक नाही दुसऱ्यासारखे,
कोण त्यांना रेखितो,--!!!
पानांचे रंग निरखून पहा,
छटाही त्यांच्या निरनिराळ्या,
कोण त्यांना असे रंगवे,
रंगारी त्यांचा कुठला हा,--!!!
फुलती कळी जवळून पहा,
पाकळी पाकळी उमले,
कोण त्यांचा जन्मदाता,
आतून कोण त्यांना घडवे,--!!!
एक फळ नसते दुसऱ्यासारखे,
चव, रंग, आकार, नि दिसणे,
कोण त्यांची रूपरेषा आखे,
कोण बनवतो त्यांना बरे,--!!!
एक एक झाड असे निराळे,
लता वेली वृक्ष झुडुपे,
कोण त्यांची आखणी करतो,
कोण त्यांना मातीत पेरे,--!!!
अन्नपाणी, सूर्यप्रकाश,
कोण त्यांना पुरवतो, मातीतुनी प्रत्येक घटक,
ते सांगा,कसे शोषतो,
झाड इतुके सहनशील,
कोण त्यांना तसे बनवे,
घाव घातला कोणी जरी,
ते आपले बाहू फैलावे,
बी रुजते आपोआप,
कोंब त्यातूनच घडतो,
बी चे रूपांतर कसे,
कोण त्याचे रहस्य दडवतो,--?!!
कोंबाला फुटती धुमारे,
एकेक पान येऊ लागे, -
एका पानासमअसंख्य पाने,
कोण त्यांना जागा देतो,--!!!
किमया सारी निसर्गाची, विज्ञाननिष्ठ म्हणे, पण,
सृष्टी निसर्गाची आई,
तिलाही जन्मा घाले कोण,--???
. हिमगौरी कर्वे
©
May 31, 2019
आठवते का तुला ?
पहिल्या पावसाची सर..
मृदुगंध ओल्या मातीचा
थेंब साचलेले ओंजळभर...
सरीवर सर झेलताना
अंगणात वेचल्या गारा..
धरेची तृष्णा शमवताना
बरसल्या ग्रीष्माच्या धारा..
July 13, 2026
भिज नां जराशी नखशिखांत
मना नाहूदे चिंबचिंब पाऊसात...
हा ऋतुच बहरलेल्या प्रीतीचा
ओलेती ये भावनांच्या मिठित...
निर्मळ स्पर्शात चैतन्य आगळे
ब्रह्मानंदाची, साक्ष त्या सुखात...
निसर्गाचे, अविष्कार पांघरावे
भिजुनी रिमझिमल्या सरिसरित...
ही कोजागिरी, चंद्र चांदण्यांची
कोजागर, कोजागर मनांमनात...
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५३
९/१०/२०२२
October 15, 2022
भिंत ओलेती मनाची
तुझ्या आठवणी झिरपलेल्या,
धुळीत थेंब टपोरे , देती आठव
ओल्या बटा तुझ्या झटकलेल्या,
तुझ्या हास्याची जाळी काढी
नक्षी त्या छताला,
प्रतिबिंब तुझे झळकते
जेव्हा पाहतो स्वतःला,
किती भकास उदास
तुझ्याविना घर मनाचे गं
जन्म देण्यास आतूर
जडावलेले गर्भ घनाचे गं,
झाली जीर्ण वास्तू मनाची
तुझे येणे होत नाही,
अवकळा येते त्या घरास
जिथे स्त्रीचे पाऊल फिरत नाही,
किती किती वाटते तुला लेखणीत बांधावेसे
पुन्हा नव्याने तुला जुने काही सांगावेसे
कित्तीदा भास झाला तू येऊन गेल्याचा
मनाचा उघडा दरवाजा पुरावा होता तू गेल्याचा,
आत्मा कधीचा पाण्यात ठेऊन बसलेला ,
उंबरठ्यावर एक तांब्या उपडा हीं घातलेला
कधी वळत नाहीत तुझी पावले इथवर
प्रतिक्षा हीं किती काळाची न कुठंवर
वास्तू कोसळण्याआधी जमेल का ग तुला येणे
बांधू नव्याने घर , रचू पुन्हा नवे गाणे
साद देतो हि अंतिम अन प्रतिक्षाहीं थकलेली,
अक्षरे बोलावती तूज , विरहात माखलेली..
-- अँडव्होकेट ऐश्वर्या वैजापूरकर
(नावासहित share करावी)
September 10, 2018
जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले
परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले...१,
वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती
ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती...२,
षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो
सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो...३,
पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती
गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती....४,
थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये अडकून जातां
जीवनाचे जे साध्य असते, स्वकर्माने गमवून बसतां...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
April 19, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti