(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तो माझा कृष्णसखा

    निळ्या जळी, काष्ठी, पाषाणी,
    मज मेघ:श्याम दिसे,
    ऐहिक जीवनी वावरताना,
    रंग निळसर भासत असे,--!!
    निळा काळा शाम तो,
    वाजवी मधुर बासरी,
    जिथे असेन तिथे मी,
    हरवून बसते परोपरी,--!!!
    राधिका मी त्याची,
    तो माझा कृष्णसखा,
    जिथे जाईन तिथे तो,
    बनत असे पाठीराखा,--!!!
    नावेत बसुनी चालले ,
    या तीरावरून त्या तीरी,
    यमुनाही डचमळे सारखी, माझ्यासारखी उलघाल उरी,--!! मधुसूदनाचे प्रतिबिंब,
    पाहते मी पाण्यात खाली,
    त्यातच माझे मुख दिसे,
    प्रतिमा एकरुपच झाली,--!!!
    प्रवास हा प्रेममय,
    ओढ त्याची विचक्षण,
    हृदये दोन परंतु,
    एकच आहे तनमन, --!!!
    सावळ्याची होता भेट,
    अद्वैताचाच साक्षात्कार,
    कोण राधा,कोणता कृष्ण, जगासकोडेवाटे फार,-!!

    हिमगौरी कर्वे

      March 9, 2019


  • मोह

    मोह होतोय मोहाचा
    स्वछंदी मोकळ जगण्याचा
    गगनातल्या उंचचउंच भरारीचा
    मुक्त उन्मेषी श्वासांचा
    स्वतःमध्ये रमण्याचा
    नि सुंदर रंग झेलण्याचा
    खळखळून बागडून हसण्याचा
    नि आनंद सोहळ्यात हरपण्याचा
    मोह वाटे इंद्रधनू रंगांचा
    गंधित भारित शहाऱ्यांचा
    मोहासंगे झुलण्याचा ..
    प्रवाहात वाहत जाण्याचा
    मोह नव्या उमेदीचा
    नि नव्या वाटा शोधण्याचा....
    -- वर्षा कदम.

      November 17, 2021


  • या कातरल्या क्षणांना

    या कातरल्या क्षणांना,सय तुझी येते,--
    उन्हाची तप्त काहिली,
    चटकन् दूर होते,
    वारा धुंद वाही,
    ढग जाती प्रवासी,
    अधूनमधून बिजलीही,
    उगा आपुले दर्शन देई,
    अशा वेळी आठवे मज,
    सोनेरी प्रभेची सांज,
    याच समुद्रकिनारी,
    वाजली मिलनाची गाज,
    नभ सुंदर सोनबावरे,
    होते भेटीस साक्षी,
    कूजन करीत बागडती,
    पक्षी आनंदें वृक्षी,
    किनारा दूरवर तटस्थ,
    उभ्याने राखी सागराला,
    मिलनाची किती उदाहरणे,
    ठेवून समोरी चंद्राला,---!!!
    या मंतरलेल्या क्षणांना,
    आठवे चांदणी उगवती,
    प्रेमाखातर सुधाकराच्या,
    नशेत त्या नाचती -गाती,
    तिच्यावर चढली धुंदी,
    आजही मज नीट स्मरे,
    इकडे धरणीवर खाली,
    कुणी प्रेमवीर गात फिरे,
    अशी चांदणी नाचती-गाती,
    इथेच त्याला ओढत आणी,
    खळाळूंन उत्तेजित होई,
    निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!

    © हिमगौरी कर्वे.

      February 3, 2020


  • जाळी

    धागा धागा विणून,
    केली तयार जाळी ।
    गोलाकार नि बहुकोनी घरे,
    पडली निर निराळी ।।१।।

    स्थिर सुबक घरे,
    जसा स्थितप्रज्ञ वाटे ।
    सर्व दिशांचा तणाव,
    न दिसे कुणा कोठे ।।२।।

    तुटेल फुटेल तरी,
    सैलपणा येणे नाही ।
    जर ढिला झालाच तर,
    जाळी दिसणार नाही ।।३।।

    जगे तो अभिमानानें,
    मान ठेवूनीया ताठ ।
    संसारामधील क्लेश,
    झेलीत होती त्याची पाठ ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 6, 2016


  • स्वप्ने

    तुझी स्वप्ने तू जग
    माझी स्वप्ने मी जगतो
    भेटूच आपण एकदा
    स्वप्नांचा हिशेब मांडायला
    सारखी स्वप्ने वजा करू
    उरलेली मिळून पूर्ण करू

    ©निलेश बामणे

      June 11, 2017


  • राज विराज

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

      May 17, 2012


  • प्रथम शाहाणा कर

    अपमान होईल तुझा शारदे हे घे तू जाणूनी
    मूर्खावरती बरसत आहेस जाणेना कुणी....१

    ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा असे माझे ठायी
    भाषा साहित्य यांच्या छटा दिसून येत नाही....२

    निर्धनासी धन मिळता जायी हर्षूनी
    हपापलेला स्वभाव येई मग तो उफाळूनी....३

    माकडाचे हाती मिळे कोलीत विनाशास कारण
    गैरउपयोग होई शक्तीचा नसता सामान्य ज्ञान...४

    शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता
    वेड्यापरी कोठेही पळतील मर्यादा सोडता.....५

    जाण आहे एकची मजला तुझ्या शक्तीची
    वाल्मिकी कालीदास, अज्ञानीना ज्ञानी केल्याची....६

    तसेच देवून ज्ञान मज थोडेसे शाहणा कर आधी
    ठेवणार नाहीत नावे मजला नंतर कुणी कधी....७

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      October 16, 2019


  • स्वतःसोबतचं शांत जगणं

    मी म्हणालो म्हणून मला वेळ देऊ नकोस,
    विनवणीच्या सावलीतले क्षण मला नकोत.
    वेळ ही मनाच्या झऱ्यातून वाहणारी असते,
    त्या दयेच्या ओंजळीतले थेंब मला नकोत.

    जर मनाच्या आभाळात माझ्यासाठी ढग जमले,
    तरच सरीसारखी ये माझ्याकडे.
    नाहीतर कोरड्या शब्दांचा पाऊस पाडू नकोस,
    उगाच ऋतू बदलल्यासारखं दाखवू नकोस.

    ज्याला आज तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात
    नव्याने जागा मिळाली आहे,
    त्याच्यासाठी ठेव तुझा प्रत्येक श्वास,
    तुझ्या वेळेची प्रत्येक सुवासिक पहाट.

    मला नको उरलेला संध्याकाळचा अंधार,
    नको उशिरा आठवलेली आठवण.
    मी स्वीकारतो माझं एकटेपण शांतपणे,
    कारण प्रेमाला कधीच मागणं शोभत नाही.

    जा…
    जिथे तुझं मन आता निवांत विसावतं,
    तिथेच दे तुझा वेळ, तुझं जगणं.

    मी मात्र शिकतोय,
    स्वतःच्या सोबतीतही
    हळूच हसत जगायला.
    तुझ्या आठवणींच्या सावलीत नाही,
    तर माझ्याच प्रकाशात उभं राहायला.

    तुझ्या पावलांच्या आवाजाशिवायही
    रस्ता चालता येतो हे कळतंय आता,
    आणि एकटेपणाच्या शांत दुपारी
    मनाशी मन बोलतंय आता.

    तू दिलेल्या जखमांवरही
    वेळेची फुंकर हळूच पडते,
    आणि नकळत मनाला
    नवं धैर्य मिळतं.

    कदाचित कधीतरी पुन्हा
    कोणाच्या नजरेत आपलेपण दिसेल,
    पण तोपर्यंत मी
    स्वतःचाच हात धरून चालतोय.

    कारण शेवटी कळलं मला
    साथ कोणाचीही असो वा नसो,
    स्वतःसोबत शांत राहता येणं
    हेच खरं जगणं असतं.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 5, 2026


  • खेळ केवढा चाललेला

    खेळ केवढा चाललेला,
    या दुनियेच्या पटावरती,
    पर्याय नसे सोंगट्यांना,
    कळसूत्री बाहुल्या हलती,--!!!

    जेजे घडे, मागे त्या,
    कर्ता करविता असतो कोणी, दिसत नाही आपल्या डोळ्यांना, जाणिवे नेणिवेच्या पल्याडही,--!

    कोण घडवी सगळ्या घटना,
    मदत करी अडल्या प्रसंगी,
    असंख्य रूपे तुझी देवा,
    दिसती आम्हा समयी समयी,--!!!

    करुणा शांती क्षमा, प्रेम, दया,
    भावनांचे किती प्रकार असती, सिद्ध करत आपुला देवपणा,
    देवमाणसे तत्परता दाखवती,-!

    माया, ममता,आपुलकी,जिव्हाळा,
    सद्भावना ना मरते कधी,
    वाहे झरा माणुसकीचा,
    तूच नांदतशी त्यांच्या हृदयी,--!!!

    कठोर, क्रूर, निर्घृण, भयंकरा,
    मात देण्या प्रवृत्त करशी,
    भयानक, भीषण, भयावह प्रसंगा, चीत करण्या मार्ग दाखवशी,--!!

    छळती मानवा यातना वेदना,
    संहार त्यांचा करावया पाही,
    अशा संकटांचा सामना करण्या,
    हे ईश्वरा तूच बळ देई,--!!!

    नको कुठली सुखे अनंता,
    पाखर सतत तुमची रहावी,
    दुसरे काही मागणे ना, नाअपेक्षा दुसरी काही,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

      October 12, 2019


  • दोन मनें द्या प्रभू

    दोन मनें द्या प्रभू
    आपल्याला इच्छा आहे
    प्रभू तुमच्या नामस्मरणाची
    परंतू ऐकून घ्या
    कहाणी आमच्या अडचणींची ।।

    नाम घ्यावे मुखीं
    रात्रंदिनीं एकचित्ताने
    सार्थक होईल तेव्हां
    आमची तप:साधने ।।

    परि संसार पाठी,
    लावला आहेस तूं
    गुरफटल्यामुळें त्यांत
    साध्य न होई हेतू ।।

    मला पाहिजे दोन्हीं
    संसारात राहून ईश्वर
    एकात गुंततां मन
    दुसरे न होई साकार ।।

    दे मजला प्रभू
    मनाची एक जोडी
    संसारांत राहून मी
    घेईन प्रभूत गोडी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 14, 2018