(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रभू नामस्मरण

    नाम घ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत

    नामस्मरण , असू घ्या मुखांत ...१

    काय सांगावी, नामाची थोरवी

    दगडही जेथे, तरंगून जाई...२

    रोम रोमामध्यें, प्रभूचा संसार

    बनून कवच, रक्षती शरिर...३,

    नामाची लयता, मन गुंतवून

    एक होतां चित्त, जाई आनंदून...४

    अंतीम ध्येय, ईश समर्पण

    नामानी साधती, प्रभू सर्वजण...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 2, 2020


  • मनाच्या आरशात

    आपणच आपला आरसा झालो
    की आयुष्य सोपं होतं,
    परक्यांच्या नजरेत आपलं
    प्रतिबिंब शोधणं थांबतं.

    चुकांची कबुली देताना
    लाज वाटेनाशी होते,
    स्वतःशी प्रामाणिक राहिलं
    की वाट आपोआप सापडते.

    नकळत घातलेले मुखवटे
    हळूहळू गळून पडतात,
    खऱ्या चेहऱ्याशी ओळख झाली
    की भीतीही दूर जाते.

    स्वतःकडे पाहण्याचं धाडस
    जेव्हा मनात येतं,
    तेव्हाच कळतं,
    आपणच आपला आरसा झालं
    की आयुष्य खरंच सोपं होतं.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      July 8, 2026


  • प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

    प्रभात झाली उठा हो

    मुखीं नाम घ्या जगदंबेचे ।।धृ।।

    कांहीं काळासाठीं

    नव्हता जगाचे पाठीं

    कोठे तुम्हीं होता

    न कळे आठवता

    जाग येऊनी मिळाले भांडार आठवणींचे ।।१।।

    प्रभात झाली उठा हो

    मुखीं नाम घ्या जगदंबेचे

    विश्रांतीचा काळ हा

    शांततेने गेला पहा

    देह मनाची धावपळ

    थांवली कांहीं काळ

    पुनरपि लागते सर्वां चैतन्य जीवनाचे ।।२।।

    प्रभात झाली उठा हो

    मुखीं नाम घ्या जगदंबेचे

    गेल्या होत्या स्मृतिं

    कांहीं काळांती

    संपुन छोटे पर्व

    परत लाभले सर्व

    उपकार समजोनी याते आभार माना तिचे ।।३।।

    प्रभात झाली उठा हो

    मुखीं नाम घ्या जगदंबेचे

    सोडून देण्या दुःख

    निद्रा मार्ग एक

    नव्या जोमाने उठा

    शोधा यशाच्या वाटा

    हुरुप येण्या जीवनी आशिर्वाद मागा तिचे ।।४।।

    प्रभात झाली उठा हो

    मुखीं नाम घ्या जगदंबेचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 8, 2020


  • चैत्राची चाहूल (असाही एक वसंतोत्सव)

    वसंत ऋतूची हीच तर गंमत आहे. निसर्ग साद घालतो आणि बाहेरच्या पानगळी बरोबर आपला आळसही गळून जातो. कोणत्याही झाडोऱ्यात फांदी हलली की स्थिर होऊन पहावे. कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे बागडणे अव्याहतपणे चालू असते. हीच माझ्या बागेभोवतीच्या चैत्रबनातून जाणवणारी चैत्राची चाहूल. हाच माझा वसंतोत्सव.

      June 18, 2022


  • लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा

    खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत,

    कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ....१,

    भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही,

    नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही...२,

    कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून,

    एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून...३,

    गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे,

    प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे...४,

    स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली

    घराबाहेर पडून पाऊल लोप पावू लागली...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 15, 2018


  • भिकारीण

    मधूर आवाज मिळूनी,
    उपकार झाले तिजवर,
    सुंदर गाणे गाऊनी,
    आनंदीत करी इतर ।।१।।

    हातपाय दुबळे होते,
    दृष्टी नव्हती तिजला,
    कष्ट करण्या शक्ति नव्हती,
    कसा मिळेल घास तिला ।।२।।

    परि ती होती आनंदी,
    गाण्याच्या ओघांत,
    उचलित होती पैसे,
    पडता तिच्या पदरांत ।।३।।

    जरी झाला देह दुर्बल,
    जगण्याची होती आंस मनी,
    मिळालेल्या आवाजाला,
    समजे ती ऋणी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 11, 2016


  • वियोग

    सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे ।

    बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती ।।१।।

    लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा ।

    उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची ।।२।।

    कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते ।

    फुग्यापरी जातां फूटूनी, दुःख सारे जीवनीं आणिते ।।३।।

    दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी ।

    केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत ।।४।।

    प्रेम वाढते प्रभूसहवासे, निस्वार्थी भक्ती त्यांत वसे ।

    समरस होता एक रुपानें, वियोग मिटतो क्षणाक्षणाणे ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 1, 2019


  • ग्राहक मंच तक्रारी मराठीतच- अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख

    न्यायाच्या अपेक्षेने ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन येणार्‍या ग्राहकांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात येणार्‍या तक्रारी मराठीतूनच घेण्यात येतील आणि त्याची उत्तरेही मराठीतूनच दिली जातील असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

      November 6, 2010


  • मैत्री दीन

    तुझ्याशी बोलायला ;शब्दांची गरज नसते

    तुझ्या सोबत रहायला; सहवासाची गरज नसते

    इथे तुला आठवता;भावना तीथे पोहचते

    मनातल्या भावना व्यक्त करायला; सोबत गरजेची नसते

    मैत्रीच्या नात्याची; हीच तर ओळख असते

    सोबत सदैव नसते; मनात मात्र कायम असते

    प्रेम, विश्वास, आपुलकी; हेच तर नाते असते

    मैत्रीचे हे असेच; अद्भूत रसायन असते

    तुझी मैत्री माझा विश्वास; हीच ओढ असते

    जवळीक जरी नसली; साथ कायम असते

    आपल्यांचा आपलेपणा; मैत्रीच कायम दाखवते

    सुख, दुखःच्या प्रसंगी; नक्कीच ती व्यक्त होते

    आमच्याकडून; अशा अद्भुत रसायनाला

    प्रेम, विश्वास, आपुलकीच्या, सहवासाच्या

    आपलेपणासहीत; कायम राहतील

    अशा मैत्रीदिनाच्या खुप सा-या सुभेच्छा

    उमेश महादेव तोडकर.....

      August 9, 2023


  • पाऊस पहिला ………..

     

      June 13, 2013