(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खुळा पाऊस

    पाऊस खुळा । किति पाऊस खुळा |!
    शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ।।धृ।।

    नाचे किती वेड्यापरी,
    बडेबडे काहीतरी
    झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ।।1।।

    दीनवाणी वेलीबाई,
    पांघधराया नाही काही
    काय करु, उघडा हा राहे छकुला ! ।।2।।

    उचलून आणू काय,
    पुसू डोके, अंग, पाय?
    काकडून गेला किती
    बघ माकुला ! ।।3।।

    निजवू या गादीवर,
    पांघरुण घालू वर,
    देऊ काय, सांग आई,
    आणुन तुला? ।।4।।

    काय - "नको तोडूं फूल,
    वेल - पावसाचें मूल ?
    ऊन येतां चमकेल
    त्याचा डोळुला? ।।5।।

    आणि 'येऊ मी घरात?
    भिजू नको अंगणात ?'
    नको आई - ! चमकेन
    मीही आपुला ! ॥6॥

    मज वेडा म्हणतील ?
    फूल शहाणें होईल?
    मग वेडी म्हणतील
    सगळे तुला ! ।।7॥

      June 21, 2026


  • वाट

    मला राज रस्त्यावरुन
    चालता येत नाही
    कारण ती शान
    मला पेलवत नाही |

    मला हम रस्त्यावरुन
    चालता येत नाही
    कारण सुखदु:खाच्या गर्दीतून
    वाट काढता येत नाही |

    मला आड वाटेंने
    चालता येत नाही
    कारण त्याचा तोकडेपणा
    मला झेपत नाही |

    मला वळणा-वळणाने
    चालता येत नाही
    कारण भोवळ येऊन
    मला मार्ग दिसत नाही |

    मला काट्याकुट्या
    पायवाटेंनं चालतां येतं
    कारण त्या काट्यांच्या टोकाला
    माझंच रक्त लागलेलं असतं |

      July 28, 2015


  • निखळ प्रेम !

    राधेचं श्रीकृष्णावरील निखळ प्रेम
    आजच्या तरुण प्रेमिकांत दिसत नाही !
    असा प्रश्न सामान्य जनांच्या मनात
    आला तर काही चुकले नाही !

    प्रेमी युगल एकमेकांवर अंधळ प्रेम करतात,
    तर काही जण प्रेमात पडून अंधळे होतात !
    कोणाचं प्रेम खरं कोणाचं खोटं,
    ते आपापल्यापरीने पुढे रेटतात !

    एकतर्फी प्रेमात अपयश आल्यावर
    अॅसिड हल्ले, बलात्कार होतात,
    बाह्य आकर्षणाला भुलून केलेलं प्रेम
    काश्याची साक्ष देतात !

    आंधळ्या प्रेमात केलेल्या चुका
    गडद काळोखात वाकुल्या दाखवतात,
    मुलांपेक्षा मुलींच्या कलंकांच्या
    शृंखला भविष्यात सुरु होतात !

    अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्यावर कळते
    निर्णय चुकीचा होता,
    प्रेम नव्हतेच
    वासनांचा चक्क बाजार होता !

    जगदीश पटवर्धन, दादर

      February 19, 2015


  • काव्य एक चिंतन

    शब्दा सहज वेचुनी फक्त लिहावे
    झटपट, हवेतसे मुक्त गुंफीत जावे
    काव्य म्हणुनी शब्दां उधळीत जावे
    सत्यार्थ! जीवनाचे कुणी सांगावे.

    काव्याभ्यास! वाचन,चिंतन, मनन
    साधना आत्मचिंतनी सद्भाव असतो
    शुकासारखे वैराग्य,वशिष्ठापरी ज्ञान
    तिथे वाल्मीकी जैसा कवी जन्मतो

    ज्ञाना, तुका, नामा, नाथा, कबीरा
    समर्थ रामदासा,सांगा कोण वाचतो
    धर्म ग्रंथांचा सांगा अर्थ कोण जाणतो
    मूलमंत्र! मानवतेचा कोण जाणतो

    मन प्रांगण! शब्दाक्षरी मनभावनांचे
    संस्कारी शब्दस्पर्श वेदनांना शमवीतो
    शब्दशब्द, सुखसंवेदनांचेच मोरपीस
    भावकाव्य! शांतीचा सागर असतो

    काव्योत्पत्ती यज्ञ! शब्दची समिधा
    स्पर्श मनभावनांचा शब्दात बरसतो
    अल्पशब्दी घनाशय,सर्वश्रेष्ठ प्रतिभा
    ते कवित्व, साहित्यात्माच असतो

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना:-क्र. ९६.

    २९ - ३ - २०२२.

      April 7, 2022


  • चेतना

    ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।

    आकाशातील थवे पाहूनी,

    चंचल माझी नजर झाली

    भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर

    असंख्य चित्रे उमटूनी गेली

    चित्र बघूनी नाचे मन जे

    पाषाणा परी स्थिर कां झाले....१

    ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले

    झूळझूळ वाहे सरीता पाणी

    पाण्यावरती दिसे तरंग

    हलके हलके भिजवी अंग

    पुलकीत करी रोम रोम जे

    थंड आज परि होता दिसले....२

    ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,

    सारे कांहीं तसेच आहे

    सभोवतालचा निसर्ग ठेवा

    अंतर्मनही माझे आपले

    लुटीत असे जो सुखद मेवा

    परि दोन्हीमधले अंतर ते

    आज भासते दूर जाहले...३

    ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 31, 2021


  • भान हरपले विठ्ठला

    भान हरपले विठ्ठला
    तुझ्या चरणी देह माझा,
    भोळ्या भक्तीचा तू भुकेला
    धाव घेई तू भक्तांच्या साह्याला
    रुप तुझे सावळे
    कटीवरी हात असे,
    मुखी विलसे हास्य सदा
    सावळ्या तू हरी विठ्ठला
    पंढरपुरी असे वास
    वर्णावे काय तुझे चरित्र,
    धन्य धन्य होतो जीव तुझ्या
    दर्शनाची आस हृदयी सदा
    -- स्वाती ठोंबरे.

      June 3, 2022


  • अजाणतेतील अपमान

    स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।

    चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।

    कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।

    कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।

    पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।

    काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।

    फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।

    विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।

    अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।

    नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।

    चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।

    शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।

    खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून

    निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।

    पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।

    शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।

    अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।

    प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 11, 2020


  • अनुभवाचे श्लोक

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

      June 19, 2012


  • अभिमन्यू

    अभिमन्यू

      September 18, 2012


  • मन

     

      June 17, 2013