(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुखाचे मृगजळ

    धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला

    सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला...१

    मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे,

    वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे...२,

    आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे

    जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे...३,

    खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत

    बाह्य जगी शोधत असतां दुःख तुमचे हातीं लागते...४,

    दुःख असे अंवती भंवती, सुख तुमच्या अंतर्यामीं

    बाह्य जगातील सुख परि कधीं न येती तुमचे कामीं....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 15, 2020


  • जाई जुईचं अलगद बहरण

    जाई जुईचं अलगद बहरण
    की मंद निशिगंधाच दरवळण,
    गुलाबाच टवटवीत होणं की
    प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं..

    कमळाच पाण्यात भावणं
    की मोगऱ्याच गंधित होणं,
    जास्वंदीचं तरारुन उमलण
    की झेंडूच भरभरुन डवरण..
    तगरीच साधस दिसणं
    की चाफ्याच गंध धुंद करणं,
    शेवंतीच नाजूक ते फुलणं
    की बकुळीच अबोल होणं..
    रातराणीच धुंद आल्हाद होणं
    की अबोलीच अबोल लाजण,
    फ़ुलांचं हे मोहरुन बहरण
    की माझं फुलांत मोहरण..
    फ़ुलांचं हे गोड गंधित होणं
    की माझं फुलांत नाजूक हरवणं,
    फ़ुलांचं हे सुंदर अलवार हसणं
    स्वातीचं मन फ़ुलांत गुंतून जाणं..
    -- स्वाती ठोंबरे.

      June 17, 2022


  • समुद्र

    समुद्राला अनुभवण्यासाठी
    त्याच्या कुशीत शिरावे लागते

    समुद्राची खोली मोजण्यासाठी
    त्याच्या तळाशी जावे लागते

    समुद्राची लांबी रुंदी कळण्यासाठी
    जगाची सफर करावी लागते

    समुद्रांचे रंग समजण्यासाठी
    त्याच्या जुनियेत जगावे लागते

    समुद्राची गोडी अनुभवण्यासाठी
    त्यावर प्रेम करावे लागते

    समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी
    अभ्यास, अनुभव आणि धाडस असावे लागते

    चक्रीवादळात अडकणार्यांना
    समुद्र मंथनाचा अनुभवातून
    अमृत विष आणि तत्नांची ओळख पटते

    वसुंधरेचा सत्तर टक्के भाग
    का पाण्याने व्यापला याचा
    अर्थ समजण्यास पुरेसे आहे !

    जगदीश पटवर्धन

      October 31, 2017


  • प्रेम

    मी बेडूक बेडकीच्या प्रेमात पडलो
    आणि उगाच उडया मारू लागलो...
    आमची जात भले एकच होती...
    मी समुद्रातील बेडूक होतो
    ती डबक्यातील बेडकी होती...
    डबक्यात बऱ्याच बेडक्या होत्या
    समुद्रातील मी एकटा बेडूक होतो...
    तिचे विचार डबक्यासारखे संकुचित
    आणि माझे समुद्रासारखे अथांग...
    आम्ही एकाच जातीचे तरी निराळे होतो...
    तिला तीच डबकच जगासारखं वाटत होतं
    समुद्रातील माझं जग तर अमर्याद होतं...
    प्रेमासाठी मी चुकून समुद्रातून डबक्यात आलो होतो
    तरी माझ्या समुद्राला त्याच्या अथांगतेला मी विसरणार नव्हतो...
    डबक्यातील बेडकीला त्यामुळेच मी समुद्रात घेऊन जाऊ शकणार होतो...

    कवी - निलेश बामणे ( बी डी एन )

      June 10, 2017


  • नवीन वर्ष

     

      December 27, 2013


  • सत्य, अहिंसा, साधी राहणी

    सत्य, अहिंसा, साधी राहणी,
    महात्मा गांधींची विचारसरणी
    तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, ‌
    कोण आणतो सांगा आचरणी, --!!!

    असत्याच्या आधाराने,
    हिंसक, मारक, वर्चस्वाने,
    वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!

    स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
    सगळे स्वैराचाराचे भक्त,
    माणसाचे वागणे नि:सत्व,
    गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!

    सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
    आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
    समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
    घर , गाव शहर परिसरां,
    "अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!

    बोलू बघू ऐकू नका ,
    असे सांगती तीन माकडे,
    कोण पाळते तत्त्वांना या,
    गिरवती अनिती"चेच धडे,
    माणूस म्हणुनी माणसाला,
    किंमत मुळी ना देती,--!!!

    हिमगौरी कर्वे.

      May 13, 2019


  • अपूर्ण प्रेम

    प्रेमाचे पूर्णत्व
    कोणाकडेच नसते
    प्रेम जन्मालाच अपूर्ण येते...
    अर्धे प्रेम त्याच्याकडे
    अर्धे प्रेम तिच्याकडे
    फक्त त्या दोघांचेच
    प्रेम एकत्र येता
    प्रेम पूर्ण होते...
    प्रेमाच्या पूर्णत्वालाही
    आयुष्याची मर्यादा असते
    अपूर्ण प्रेम शेवटी
    अपूर्णच असते...

    ©निलेश बामणे

      June 10, 2017


  • बेताल स्वछंदीपणा

    काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
    स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।

    नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
    सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।

    स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
    जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।

    स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी
    दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।

    ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
    आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।

    बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
    चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।

    निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
    तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।

    सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
    गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।

    जेव्हां कुणी स्वातंत्र्य मागे त्याच्याही मर्यादा असती
    दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।

    दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
    दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्येक ।।१०।।

    तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासूर
    तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 10, 2017


  • आतुरता पाडव्याची

    ना कुठला dance ना कुठली party
    पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू संस्कृती ....

    ना कुठला one piece अन two piece, ना कुठला party wear
    पाडवा म्हंटल कि फक्त झब्बा-लेंगा-नववारी म्हणजेच traditional wear ...

    ना कुठला DJ break ना कुठला rawadi dance ....
    पाडवा म्हंटल कि ढोल - तशा - झांज - ध्वज आणि लेझीम नाच

    ना कुठल hard drink ना कुठल मद्य
    पाडवा म्हंटल कि फक्त फक्त आणि नैवेद्य ....

    ना कुठल hotel, ना कुठला beach, ना कुठला कोपरा
    पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू नववर्ष शोभा यात्रा ....

    ना कुठली बेशुद्धी, ना कसला hangover
    पाडवा म्हंटल कि नवचैतन्याचा कहर ...

    ना कुठला दिखावा, ना कुठले आकर्षण न घातक ज्ञान
    पाडवा म्हणजे आमच्यासाठी आमच हक्काचा सण

    ना राग - द्वेष - पश्चात्ताप, ना दगा फटका
    पाडवा म्हणजे आपल पथक आणि त्यांच्यावरची निष्ठा ....

    ना दुःख - संताप, ना पोकळ चर्चा
    पाडवा म्हणजे जल्लोष नववर्षाचा ....

      March 27, 2017


  • कृष्णछाया

    मी जगतोच, तसा एकांती
    आभाळ मनाचे येते भरुनी

    झरती निष्पाप भाव अंतरी
    अतरंग भक्तीत जाते दंगुनी

    अस्ताचली, भावरंग केशरी
    त्यावरी कृष्णछाया सांत्वनी

    जणु भासते समोर सावळा
    कृतार्थी तृप्तता या लोचनी

    झुळझुळते माय गंगायमुना
    पावन तुषारी जातो भिजूनी

    एकांती प्रहर सारे आत्मरंगी
    कृपावंता स्मरत राहू जीवनी

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८४.

    १७ - ३ - २०२२.

      March 30, 2022