(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दुधामधील चंद्र

    कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले
    शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले
    गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी
    आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी
    मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा,
    वायु नव्हता फिरत नभी तो, मेघ राहती त्याच ठिकाणा
    दूध आटवूनी प्रसाद घेण्या, उत्सुक होतो आम्ही सारे
    ढगात लपल्या चंद्राला मग, क्षीरात शोधी आमची नजरे
    स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते, शशिधरांच्या चांदण्यापरि
    मेघांमध्ये तो लपला नसूनी, उतरलां होता ह्याच क्षिरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 21, 2019


  • प्रेम – एक आठवणींची कविता पुढे चालू..

    प्रेमःएक आठवणींची कवीता चा पुढचा भाग क्रमशः

      June 3, 2011


  • तू आलीस तेव्हां ………

    घन काजळ रात्री तू आलीस

    अन् मूर्तिमंत अंधार मी चिंब तुझ्या प्रकाशात न्हालो....
    दंव ओल्या पहाटे तू आलीस
    अन् प्राजक्ताचा सडा पडलेल्या धरित्रीसारखा
    मी शांत निवांत झालो......
    तू आलीस तेव्हां निखळ कोरडा पाषाण
    मी चिंब तुझ्या प्रेमात भिजलो.

    -- श्री.उदय विनायक भिडे

      July 19, 2013


  • वर्तमानीच करा

    नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट

    कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,

    अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला

    वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,

    उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा

    उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,

    वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा

    केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 4, 2020


  • जीवन

    जाई जुईच्या वेलींच्या हा सुंदर पसरला वास
    लागली मला घरा जाण्याची आस
    आईचा तो नाजूक हात
    पित्याचा तो निर्मळ सहवास
    जीवनाच्या साथीला क्षितीचा हव्यास
    जीवन म्हणजे एक ध्यास
    जीवन म्हणजे एक भास
    जीवन म्हणजे शिक्षणाची आहे रास
    पण आईबाबाशिवाय जीवनात नाही काही खास

    भाग्यश्री सतीश प्रधान
    अलिबाग

      May 12, 2024


  • आज मन आनंदले

    आज मन आनंदले,
    सुखाच्याही पा--र गेले,
    भंवसागरी तरणे खासे,
    आता सोपे वाटले,--!!!

    दुनियादारी निभावणे,
    असते किती कठीण,
    तरीही तावून-सुलाखणे,
    सहजी कसे जमले,--!!!

    मनमोर थुई थुई नाचे,
    पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!

    खंबीर,धीरगंभीर राहणे,
    तटस्थभूमिका निभावावी,
    येऊ देत वारे--वादळे,
    मात्र एक झुंज द्यावी,--!

    तुझ्यापेक्षा मी सरस,
    म्हणत त्यांन भिडावे,
    संकटांचे सतत घोर,
    जिवामुळी लावू न घ्यावे

    एक दत्तगुरु पाठीराखे,
    राहावे निर्धास्त लेकराने, गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
    आपुले दुःख सांगावे,--!!!

    ते असतां मागे,
    त्यांची जाणीव ठेवावी,
    एक त्यांचे स्मरण,
    सारी दुनिया विसरावी,--!!!

    आनंदाच्याही डोही बुडावे,
    ओलेत्याने राहावे कोरडे,
    पाणी जाताना नाकी तोंडी,
    दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 18, 2019


  • पदर

    किती आदराचा आहे हा पदर..
    शालीन सुसंस्कृत शील जपणारा
    तान्ह्या बाळाला कुशीत झाकणारा
    अमृताचा पान्हा त्यावर मायेचा पदर..

    तारूण्यात वाऱ्याशी खेळतो..
    लग्नबंधनात जोडीदाराशी जुळतो..
    नंतर बाळाच्या मुखावर फिरतो..
    ओटीतले वाण सांभाळून घेतो पदर..

    किती खोल आहे हा पदर..
    आसवांना बिलगून सांत्वन आपलेच करेल
    डोईवर राहून स्वाभिमानही जपेल..

    पदरात पडेल ते साठवले जाते
    पदरावरून काही आठवले जाते...
    प्रसंगावधान राखून पदर खोचता येतो
    पदराखाली माप ही झाकतो..

    पदर बाई जातीची जन्मखूण..
    आशेच्या गाठी बांधल्या जातात..
    नकळतच त्या सोडल्या जातात
    पदरावरती उमटते पदराची खूण.

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      June 2, 2026


  • चैत्रशुद्ध प्रतिपदा

    गुढीपाड़वा, चैत्र शुध्द प्रतिपदा
    उत्सव हा चैतन्यदायी संकल्पाचा

    स्मरण, त्या शालिवाहन शकाचे
    उत्सव नव्या नव्या संकल्पनांचा

    सरो विश्वातील, सारेच अमंगळ
    उभारूया ध्वज, चैतन्य गुढीचा

    कलियुगी, अंमल जो विध्वंसक
    करु निर्दालन साऱ्या दुष्प्रवृत्तिंचा

    वरदान मांगल्यमयी श्रीरामकृपेचे
    मनी, जागवु शंखनाद हिंदुत्वाचा

    जळो, सारेच अंतरीचे ते हेवेदावे
    मुलमंत्र, नित्य जपुया मानवतेचा

    गुढी पाड़वा, चैत्र शुद्ध प्रतिपदा
    उत्सव हा चैतन्यदायी संकल्पाचा

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १००.

    २ - ४ - २०२२.

      April 2, 2022


  • आठवण आईची

    माझी जन्मदात्री
    होती अतिव सोशिक
    जणू एक पावन गंगोत्री
    //१//
    पहाटे उठावे
    आटपावे आन्हिके ही
    पाल्यांसाठी आदर्श जपावे//२//
    होती सुगरण
    कोंड्याचा मांडाही करी
    लेकरा मायेची पखरण
    //३//
    न दुर्मुखलेली
    सदाच होती हसरी
    नी अगत्यास आसुसलेली//४//
    जाता सोडूनिया
    ये आठवण आईची
    ना करमे तिला सोडूनिया//५//
    जाता अचानक
    हळहळ दाटे मनी
    स्वप्नी डोकाव ना क्षणएक//६//

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 19, 2020


  • ‘वारी संसाराची’

    कडकड भांडली अन तरातरा गेली बडवायला
    थंड्यानं ऐकलं अन लागला बेशरम हादडायला
    तिने राग काढला याने पोटात ढकलला
    ती केकाट हा मुकाट विठ्ठल रुख्माई

    वाट ती पाहते तहान भूक विसरून
    येऊ द्या कुणी गेला हा विसरून
    तिने कढ काढला याने कड लावली
    ती मुकाट हा सुसाट विठ्ठल रुख्माई

    ताटा खालचं मांजर करून नाचवते फार
    खरं करतो स्वतःचच कबुल करून हार
    ती याची सावली हा मुलखाचा आवली
    ती पावली याला गावली विठ्ठल रुख्माई

    -- कुप्रसाद

      September 20, 2017