मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ
चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ....१
चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी
करूया काही आगळे ठरवी तो विचारांनी....२
आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे
नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे....३
परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती
कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती....४
करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे
अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे....५
जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी
प्रवास केला आगळा, हेच येते समजूनी....६
मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते
आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 19, 2019
शेलकाव्य रचना - वर्ण ८
विषय - सुवास
मज आवडे सुवास
सुवास रातराणीचा
ही दरवळते रात्री
रात्री बाग सुगंधाचा
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
December 15, 2019
तो क्षण फार मस्त असतो
जेंव्हा चहा उकळत असतो
सुगंध सार्या घरभर पसरतो
किचनमधून कपबशांचा आवाज येतो
अमृतरुपी चहाला कधी स्वाद आल्याचा
गवतीचहा कधी, तर कधी सुगंध वेलचीचा
तुलसीचहा मसालाचहा - रंग नाना रुपांचा
उत्तेजित करे,क्षमता वाढवे-आनंद देई जीवनाचा
मग चहा संगे बिस्कीटे येती
कुणी पोहे त्यात बुडवून खाती
तर कुणी गरमागरम भुरके मारुन पिती
बशीत ओतून पिणारे पण असती
मित्रांची मैफिल चहाविना नाही
पाहुण्यांचे स्वागत त्याच्याशिवाय नाही
आस्वाद घ्यावा कधीही,वेळेचे बंधन नाही
दुःख असो,आनंद असो,चहासारखी साथ नाही
श्री सुनील देसाई
२२/०५/२०२२
May 23, 2022
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।१।।
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।२।।
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।३।।
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।४।।
अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।५।।
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 7, 2019
भगवान श्रीकृष्ण
September 21, 2010
लोकशाही सत्ता हवी
लोकशाही राज्य
भारताने स्विकारले
लोकहो टिकवा हे सुराज्य
इथे चालवतो
पंच वार्षिक योजना
नवी सत्ता ,नवा रस्ता स्विकारतो
बेधुंद जनता
हानीकारक देशास
निर्बंधच फायदा असता
हाव नको नुस्ती
राजकारण्या खुर्चीची
त्यास समाजसेवेची पुस्ती
करू नका इथे
जाळ-पोळ,दंगा-धोपा
जिथे शांती लोकशाही तिथे
कर्तव्य नी हक्क
दिले ना संविधानाने
पाळता होतील सारे थक्क
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 9, 2020
हांसत आली सूर्य किरणे
झरोक्यातून देव्हारयांत
नाव्हू घालूनी जगदंबेला
केली किरणांची बरसात
पूजा केली किरणांनी
जगन्माता देवीची
प्रकाश स्पर्शुनी चरणाला
केली उधळण सुवर्णांची
तेजोमय दिसू लागले
मुखकमल जगदंबेचे
मधुर हास्य केले वदनी
पूजन स्वीकारते सूर्याचे
रोज सकाळी प्रात:काळी
येउनी पूजा तो करितो
भाव भक्तीने दर्शन देउन
स्रष्टीवर किरणे उधळतो
कोटी कोटी किरणांनी
तो देवीची पूजा करितो
केवळ त्याची पूजा बघुनी
मनी पावन मी होतो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
October 29, 2018
ठाऊक नव्हते कालपावतो
नांव तुझे आणि गांवही
क्षणांत जुळले अचानक परि
नाते आपुले जीवनप्रवाही
उकल करितो जेंव्हां ह्याची
ओळख पटते माझ्या मनां
तेच रुप अन तीच मूर्ती
पूर्व जन्मीच्या खाणाखुणा
असेल हे जर ऋणानुबंद
आणेल एका छायेखालीं
साथ देऊन अनुभऊ
सुख दुःखे ही जीवनातली
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 6, 2020
तू ‘ असं ' कर
मी "हो" बोल्लो
ती बोल्ली
तू ‘ तसं ' कर
मी "हो" बोल्लो
तिने बोल्ली
तूने असं ' कामून ' केलं
मिने बोल्लो "चुकलं"
तिने बोल्ली
तूने असं कामून 'नै' केलं
मिने बोल्लो "चुकलं"
ती बोल्ली
तूझ 'प्रेम'च नाही बुवा माझ्यावर
मी कळवळलो 'असं नाहीये गं '
तिची अजुनी आळी मिळी 'हुप्प' चिळी
मी गळ्यात अडकलेल्या आवाजात
अर्ज केला
तुला माझा भरवसा काय केल्यावर यील
ती बोल्ली
तू ' असं ' कर
-- कुप्रसाद
September 20, 2017
बीजाबीजांतून ठेवून जातो तुमच्यासाठी इतुके काही
July 12, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti